Login

कहानी थोडी फिल्मी है...(शेवटचा भाग)

Finest Love Story
दुसर्‍या दिवशी तिच्या डेस्कवर पंचमदा यांच्या collection असलेला phograph आणि गिफ्ट रिबन बांधलेले महागडे पेन होते. कोणी दिले तिला कळतच नव्हते. तिने एकवार सगळीकडे बघितले पण काहीच कळले नाही. घरी जाताना तिने दोन्ही गोष्टी आपल्यासोबत घरी नेल्या.

    असेच काही दिवस गेले. एक दिवस half day घेऊन कथा दुपारी लेट ऑफिसला गेली तर पूर्ण लगबग होती. गेल्यावर तिला कळले की शिवराजचे प्रमोशन झाले म्हणून त्याने उद्या म्हणजे रविवारी पार्टी ठेवली होती त्याचाच आनंद होता. शिवराज येताच तिने प्रसन्न हसून त्याचे अभिनंदन केले. 


      दुसऱ्या दिवशी सायंकाळी पार्टी म्हणून कथा सुंदरसा आकाशी रंगाचा पायघोळ वन पीस घालून कॅब बुक करते तोवर एक गाडी तिच्यासमोर येऊन उभी राहते. टक लावून बघता दी शिवराज सिंघल तिच्यासमोर उभा होता. तिला बघताच त्याच्या तोंडून निघाले, "beautiful...!"

   कथाने विचारले, "काही म्हणालात का सर ?" त्यावर शिवराजने हसतच उत्तर दिले, "अगं काही नाही तू आज खूप सुंदर दिसत आहेस असे बोललो. तशी तू रोजच छान दिसतेस पण आज खूप छान दिसत आहेस."  त्या रात्री पार्टी खूप छान झाली.

  रात्री घरी आल्यावर तिने नेहीमसारखे फ्रेश होऊन उद्याच्या ऑफिसला जाण्याची तयारी आधीच करून ठेवली आणि बेडवर अंग टाकून पहुडली. फोनच्या मेसेजची टोन वाजता बघते तर त्या FILMY SHAYAR चे खूप मेसेज आले होते.

FILMY SHAYAR :- hey Kahani please help...

Katha :- what happened ?

FILMY SHAYAR :- आज मी तिला propose करणार होतो, पण हिंमत झालीच नाही.  ती माझ्यापेक्षा खूप छान आहे.

Katha :- का रे..? तू पण छान आहेस की..

FILMY SHAYAR :- आहे गं मी छान... पण ती माझ्यापेक्षा प्रत्येक गोष्टीत superior आहे. तसा तिला त्या गोष्टीचा अभिमान नाही. पण तरीही मी चाचरतो. कारण ती थोडी FILMY आहे.

Katha :- अरे ती तुझी smitten आहे. तुझ्यासारखीच असणार ना..

Katha :- Relation is a bond between persons who may not be equal in Qualification Talent Money or Age But equal in their commitment to understand each other. हे एका महान तत्वज्ञानी व्यक्तीने सांगितले आहे.

FILMY SHAYAR :- कोण Katha_the_literatura ने...?

Katha :- no way... मी इतकं चांगलं लिहीलं तर booker's prize मिळायचा मला. हे मी नाही लिहीले. ऐकले होते कुठेतरी. माझे हेच म्हणणे आहे की

FILMY SHAYAR  :- thank you so much for your advice friend. I will definitely work on it. Bye. Good night.

Katha :- Good night.

   त्या फिल्मी शी चॅट करताना शहाणपण दाखवणारी कथा आपण  स्वतःच सिंगल आहोत आणि दुसऱ्यांना काय advice देतो हा विचार करून हलकेच हसली. WhatsApp status टाकावे म्हणून open करताच तिला शिवराजचा मेसेज दिसला, "thank you so much Kahani to be a my friend.. you made my weekend very special..." मेसेज वाचून ती एक क्षण भांबावली पण त्याचे WhatsApp status पाहता त्याने सगळ्यांसोबत असलेला फोटो टाकून त्याखाली "thank you so much my teammates to be a my friends. You guys made my day very special..." हे पाहून बिचारीने सुटकेचा निश्वास सोडला.


   त्यानंतर शिवराज आणि कथाची मैत्री पण झाली आणि त्याला तिचे लिखाण पण आवडू लागले. त्याच्या टीममध्ये असल्याने कथा

    एक दिवस ऑफिसमध्ये week end आणि दिवाळीचा सण असल्याने बरेच जण आलेच नव्हते. कारण पुढे तीन दिवस जोडून तीन सुट्ट्या होत्या. दिवाळीचे दिवस असल्याने office मध्ये तसे काही जास्त काम नव्हते. कथा बिचारी!  येण्यावाचून पर्याय नव्हता तिच्याकडे.

    कारण ती गेली तीन महिने ज्या project वर काम करत होती त्याचे final presentation होणार होते. Presentation झाले आणि सगळे जण घरी गेले तरी कथा कामच करत होती कारण पुढला पूर्ण दोन आठवडे तिला नाशिकला तिच्या  आई डॅडींकडे जायचे होते. घड्याळात पाचचा टोल वाजले आणि शिवराज घरी जायला निघाला. जणू तो घरी जाण्यासाठी पाच वाजण्याची वाटच बघत होता. तिला बघताच शिवराज तिच्या डेस्कपाशी आला आणि बोलला, "Hey Kahani... चल घरी नाही जायचे का तुला?" त्यावर ती हसत बोलली, "फक्त एक तास सर... नंतर दोन आठवडे मी नसणार.. माझ्या वाटणीचे काम करून मोकळी होते."

  "ठिक आहे. ती निळी फाईल दे मला.. आपण एकत्र घरी जाऊया. माझे मम्मा डॅडी पण घरी नाहीत. आणि लहान बहीण आहे तिचा अभ्यास घ्यावा तर माझीच शाळा घेते. " असे बोलून तो हसतच तिच्याजवळ काम करू लागला.

  अर्ध्या तासाने पूर्ण काम झाल्यावर ते दोघेही ऑफिस बाहेर आले.

शिवराज जांभई देत म्हणाला, "कहानी... काॅफी प्यायला येशील..? शालीमार कॅफेत.. मला थोडासा आळस येतोय. आणि गाडी ड्राईव्ह करून घरी जायचे आहे."

तिने एकवार मनगटावरील घड्याळाकडे पाहीले तर पावणे सहाच वाजले होते. तिनेही कोणतेही आढेवेढे न घेता होकार दिला. कॅफेत पोचताच त्याने अदबीने तिच्यासाठी गेट उघडला. आजही कॅफेत "ही चाल तुरुतुरु"  हे गाणे सुरू होते. दोघांमध्ये हवा तसा संवाद झालाच नाही. दोघेही काॅफी पिण्यात मग्न होते. त्याने बिल पे केले आणि तिला "मी washroom जाऊन येतो तोवर थांब" असे बोलून निघून गेला.
   
   ती बराच वेळ त्याची वाट बघत होती.  जवळपास पंधरा मिनिटे झाली तरी त्याचा थांगपत्ता नव्हता. तिने त्याला फोन केला तर लागत नव्हता. ती काळजीने washroom कडे जायला निघाली. काही पाऊले पुढे गेल्यावर तिला कोणीतरी हात पकडल्याचे जाणवले. वळून बघते तर शिवराज हातात माईक घेऊन उभा होता. ती संभ्रमात येऊन बोलते , "सर.."

तिच्या हातावरची पकड घट्ट करून तो बोलतो..

गुंफता तू हातात हात माझ्या हे आकाश ठेंगणे वाटते
त्या अलवार स्पर्शाने तू जगाचे भान हरपून मला मिठीत घेते

सागराचे निळे पाणी मज बघून खळखळून हसते
पायाखालची ओली वाळू आता मज मखमली भासते

रात्रीचा प्रहर सरता चंद्र जास्तच खुलतो
तुझ्या माझ्या प्रेमाचे क्षण जणू स्वतःतच साठवतो

निरोप घेताना तुझा हवेची झुळूक ओलसर जाणवते
जणू तिच्या पापणीआडचे पाणी ती पण मुद्दाम अडवते
( मुळ कवयित्री~ऋचा निलिमा)

तिला काही क्षण कळतच नाही. ती बोलते, "म्हणजे सर तुम्हीच तो flimy SHAYAR आहात ? आणि त्याची ती म्हणजे मी ??"

"हो कथा तो मीच आहे. I really love you. My heart was a desert until you came and watered it with your love. Let's spend the rest of our lives together, pulling the weeds and enjoying the blossoms.." असे बोलून तो गुडघ्यावर बसून तिला पिवळे गुलाब हातात देतो.

   ती रडतच कॅफेतून जात असताना एक पारशी बाई तिला अडवून विचारते, "अरे डिकरी वोट छोकरा इतना सरस छे.. हा बोल ना उसे.. ऐसे पागलों के माफिक क्यो रोजी है.."
    
     "मी रडतेय कारण I love you बोलल्यावर red rose नाही दिले. " ती निरागसपणे बोलली. मागून आलेला शिवराज गोंधळून तिला विचारतो, "कहानी हे काय yellow red.. तू यासाठी रडतेय? का ? म्हणजे..."

  ती रडतच parking lot मध्ये त्याच्या गाडीपाशी जाते. तो त्या पारशी बाईने दिलेले फूल घेऊन तिच्यापाशी जातो आणि गुडघ्यावर बसून ते फूल देतो. ती हसतच ते फूल हातात घेते. तो उठून उभा राहतो.

  शिवराज तिला विचारतो, "कहानी तू फुलाच्या रंगासाठी रडली?"

हातातले फूल गोंजारत बोलली, "हो कारण तुम्हीच बोलता ना.. कहानी थोडी फिल्मी है.. तुम्ही पंचमदाचे collectionदिले पण या फूलाची पण काही value आहे ना.."
 
तो गोंधळून बोलतो, "म्हणजे ते collection मी तुला दिले हे तुला माहीत होते..? ह्या सखारामला बघतोच मी.."

त्यावर ती हसून बोलली, "सखा दादा नाही मी स्वतः तुम्हाला ठेवताना पाहीले. तेव्हा तुमच्या हातात rose होते. ते तुम्ही पुन्हा खिशात ठेवले हेही कळले मला."
 
   तिच्या निरागसपणावर हसत त्याने तिला घट्ट मिठीत घेतले आणि पाऊस सुरू झाला. त्या कोसळणाऱ्या ओल्या सरींत दोघेही प्रेमाने न्हाऊन गेले.

🎭 Series Post

View all