Login

कहानी थोडी फिल्मी है... (भाग -३)

Finest Love Story
कथा नवनाथ पाटील...! एक हुशार पण अल्लड मुलगी. घरात शेंडेफळ असल्याने लाडाकोडात वाढलेली. मुळची नाशिकची पण नोकरी आणि आपली सगळी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी घरापासून दूर नवी मुंबईत शिफ्ट झालेली. मीरा म्हणते तसा तिच्या मनात एक क्षण शिवराजचा विचार  तरळून गेला, पण he is not my cup of tea असा विचार करून तिने कामाला सुरूवात केली. बर्‍याच वेळाने तिचा फोन खणखणला आणि त्यावर नाव झळकून आले, स्मित.... तिचा क्रश.. तिच्या  समोरच्या flat मध्ये राहत होता.  कलासक्त असल्याने दोघांची गट्टी जमली होती. तिने एकही क्षण न दवडता त्याचा फोन उचलला.

  "Hey कथा ऐक ना एक जिंगल compose  करायची  आहे मला सातच्या आत.. will you please.." स्मितने विचारले. "हो. का नाही ? पण मला घरी यायला उशीर होईल. आपण शालिमार कॅफेत भेटायचे का? दोघांनाही सोयीस्कर होईल." कथा बोलली. स्मितला भेटायचे म्हणून अवचित तिच्या  चेहर्‍यावर स्मितहास्य आले. लगबगीने सारे काम आटोपल्यानंतर ती कॅफेत गेली. Background ला तिचे आवडते गाणे लागले होते.. हिची चाल तुरुतुरु उडती केस भुरूभुरू.... आणि समोर तिचे स्मित बसले होते.

    त्याने हात उंचावूनच तिचे स्वागत केले आणि बसायला खुर्ची सरकवून दिली. तिने जास्त वेळ न दवडता त्याला guide करून चेंजेस करून दिले. त्याची जिंगल almost ready झाली तेही साडे सहाच्या आत.. तो तिला thank you बोलणार इतक्यात त्याच्या फोनची ring वाजली (Bella ciao Bella ciao ) कुठे मराठी साहीत्यात रमणारी ती आणि कुठे हा Spanish army...! असो काय करणार... प्रेम आंधळेच असते म्हणतात ना...

   "एक मिनिट कथा..! येस जान बोल ना.. काय तू तिकीट काढले. अगं पण... अच्छा नऊ वाजता शो आहे? मग काय problem आहे? चल बाय..." असे बोलून स्मितने फोन ठेवला. "अरे वाह आज बहिण भावांची जोडगोळी कोणता पिक्चर बघायला जात आहे. जरा मलाही कळू द्या." कथाने एक भुवई उंचावून विचारले. त्याने हसूनच उत्तर दिले, "अगं जान म्हणजे माझी बहिण जान्हवी नाही. माझी जान.. means she is my buttercup... चल निघायचे का? तुला घरी सोडून मी जातो."

🎭 Series Post

View all