अगं जान म्हणजे माझी बहिण जान्हवी नाही. माझी जान.. means she is my buttercup... चल निघायचे का? तुला घरी सोडून मी जातो."
आता मराठी प्रेमकथा असलेली कादंबरी लिहीलेली आपली कथा buttercup म्हणजे गर्लफ्रेंड असते हे जाणून होती. ती बोलली, "अरे स्मित तू जा. मला जरा shopping करायची होती." तिला निरोप देऊन तो निघून गेला. आणि कॅफेत background ला आता "पल भर के लिए हमे कोई प्यार कर ले झुठा ही सही " हे गाणे लागले होते. जे तिच्या आत्ताच्या स्थितीला तंत्र जुळत होते.
ती कॅफेतून बाहेर निघाली तर समोर एक इलेक्ट्रॉनिक आणि म्युझिक सिस्टीमचे शाॅप दिसले. तितक्यात तिला आठवले की तिच्याकडे तिच्या वहिनीने gift केलेला gramophone तर होता पण त्यात सगळी मराठी गाणी होती. पण तिला आवडणारी पंचमदांची गाणी नेमकी नव्हती. ती पाय आपटतच दुकानात पडली आणि जिना उतरताना कोणालातरी जाऊन आदळली.

आपण पडलो की काय या भितीने ती डोळे घट्ट
मिटून शांत राहीली. तिला उजव्या हाताला आणि कंबरेच्या डाव्या बाजूला उबदार स्पर्श जाणवला. तिने डोळे किलकिले करून पाहीले तर समोर शिवराज तिच्याकडे बघत गालातल्या गालात हसत होता. तिने खाडी डोळे उघडले आणि सावरून उभी राहिली. तिचा aura बघून तो बोलला, "कहानी तू अशी का धावत येत होतीस. असे वाटत होते की राणी अबाक्का आता पूर्ण कर्नाटक काबिज करतील की काय?" तिने अगदी निरागसपणे सांगितले, "इतके मोठे दुकान पण पंचमदा यांची phonograph record नसावी कसं शक्य आहे. पूर्ण मुड गेला माझा!"

तिच्या निरागस उत्तरावर शिवराज खळखळून हसला, पण नंतर तिचे आवसान पाहून त्याने स्वतःला सावरले आणि बोलला, "तू gramophone वापरतेस. Wow...! पण इतकी का चिडचिड करतेस मिळेल की तुला record.. कदाचित उद्या परवापर्यंत पण मिळेल. चल मी तुला घरी सोडतो."
"नको सर मी जाईल. तुम्हाला माझ्यामुळे उगीच त्रास..Thank you for your concern." तिने तिच्या डाव्या डोक्यावर येणारी बट सावरत सांगितले.
"Oh come on Kahani... मला कसला त्रास उलट मला आवडेल." तो बोलला. "काय आवडेल सर? " कथाने कंबरेवर हात ठेवत विचारले. "तुझ्या कविता ऐकायला. तू फक्त मीराला ऐकवतेस आज मला ऐकव." असे बोलून त्याने अक्षरशः तिचा हात पकडण्यात तिला गाडीपाशी घेऊन गेला.
त्याने दरवाजा उघडून तिला आत बसण्यास मदत केली आणि नंतर स्वतः ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसला. ती गाडीत बसून अजुनही शांतच होती. दुसर्याच क्षणी वातावरण हलके करणायासाठी तो बोलला, "कहानी तुझे माॅम डॅड कधी येतात की नाही मुंबईत. की ते तुझ्या कवितांना वैतागले आहेत. की तुझा boyfriend त्यांना आवडत नाही म्हणून येत नाहीत." त्याला तिला चिडवायला खूप आवडायचे. ती उक कटाक्ष टाकून त्याला बोलली, "माझी वहिनी pregnant आहे. It's ninth month म्हणून आई आणि डॅडी आले नाहीत मला भेटायला. आणि काय सर मी सिंगल आहे हे ठाऊक असुनही तुम्हाला माझ्या जखमेवर मीठ चोळायला खूप आवडते म्हणून हा प्रश्न विचारला ना."
त्याने तिचे टोकदार नाक चिमटीत घेऊन बोलला, "आता कशी ! या मुलीला मी ओळखतो. गेली दहा मिनिटे काय माहीत कोण मुलगी बसली होती माझ्यासोबत...?"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा