कैरीच लोणचं
साहित्य : कैरी दोन किलो किंवा पाच ते सहा, सहा ते सात आख्खे लवंग मीरे, मेथी दाने दोन तीन चमचे, लाल मिरची पावडर एक दोन चमचे, लसून सात आठ पाकळ्या, हळद एक चमचा, मीठ मध्यम आकारची वाटी भरुन, बडीशेप एक चमचा, धने एक चमचा, मोहरीची डाळ पावकिलो आणि तेल अर्धा किलो.
कृती : १) कैऱ्या स्वच्छ धुवून पुसून घेणे मग त्याचे काप करून घेणे.
२) कैरीचे काप सुती कापडावर वाळत घालणे.
३) लवंग मीरे धने मेथी दाणे हे मिक्सरमध्ये जाडसर दळणे.
४) आता परातीत सगळ्यात आधी मीठ पसरवणे मग त्यावर मोहरीची डाळ, धनापावडर, लवंग मीरे, मेथीचे मिश्रण आणि प्रत्येकी दोन दोन लवंग मीरे आख्खे ठेवणे मध्यभागी आणि हिंग घालणे.
५) एका बाजुला गॅसवर तेल तापत ठेवणे चांगले वाफा आल्यावर गॅस बंद करणे.
६) आणि हे तेल थोड थंड झाल्यावर ह्या सगळ्या मिश्रणात हळूहळू ओतणे.
७) आता त्यावर मीरची आणि हळद घालणे. आधीच घातले तर गरम तेलात जळून जाईल म्हणून नंतर घालणे.
८) आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करणे.
९) हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावर म्हणजे पाच सहा तासाने त्यात कैरीच्या फोडी घालणे आणि सर्व व्यवस्थित एकत्र करून घेणे.
१०) गोड लोणच हवे असल्यास त्यात पावकिलो गुळ घालणे नंतर.
हे लोणचे दहा पंधरा दिवसाने थोडे मुरल्यावर खायला छान लागते.
धन्यवाद
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा