Login

सून जेव्हा कैवारीण होते

Kaivarin
सून जेव्हा कैवारीण होते


दीपाली सासरी आली तेव्हा सासर बद्दल खूप काही मनात ऐकीव कहाण्या घेऊन आली होती, सासर असे सासर तसे असते, तिथले लोक माहेरच्या लोकांच्या पेक्षा खूप विचित्र वागणूक देत असतात ,आणि खास करून सासू , ती तर दुष्मन असते सुनेची ,ती सतत छळत असते, तिच्याशी विचार जुळले तर ठीक नाही तर वाद वाद नुसते वाद हे डोक्यात सारख फिरत होत तिच्या ,पण तिला काही हे कुछ कामी कथा पटत नव्हत्या हे विचार जितक्या वेळा कोणी तिला ऐकवत तितक्या वेळा तिला मनात हसू येई.


ती ह्या सगळ्या सासर बद्दल आणि सासरच्या मंडळी बद्दल सांगितलेल्या भरीव आणि वाढून चाढुन सांगितलेल्या गोष्टी  मानतच नसत. शेवटी ती ही post graduate होती एक sports person होती.

एका चांगल्या शिकलेल्या मोठ्या हुद्द्यावर असलेल्या आई बाबाची ती लेक होती. तिच्या घराला एक सामाजिक लौकीकची आणि सामाजिक कार्याची जोड ही होती. शहरात आणि गावात त्यांचे मोठे नाव होते. मोठ्या घराण्यात जास्त members असल्यामुळे तिला मोठ्या कुटुंबाची सवय होती, आजोबा राजकारणी होते म्हणून जरा राजकारणी लोकांचे स्वभाव ही चांगलेच जाणून होती . ती एका नजरेत लोक ओळखत असत हा तिचा एक चांगला गुण होता, आणि एकदा का कोणी तिच्या पसंतीस उतरले की ती त्याची बाजू कधीच सोडत नसत, दुसरे म्हणजे कोणी तिचे कान भरलेले तिला आवडत नसत. तिच्या ह्या स्वभावाची एक अजून चांगली गोष्ट म्हणजे मनात काही ही राग ठेवत नसत, एकदम स्पष्ट बोलणारी होती ती . कोणाला ही सहज आवडेल अशी . आईने तिला शिक्षणाची मोकळीक दिली पण अति काही करण्याची नाही. मोठ्या कॉलेज मध्ये शिक्षण, गाडी,  तिला हवे ते शिकण्याची संधी दिली . पण तिला स्वयंपाक कधी करावा हे कधीच बंधन घातले नाही . हो पण लग्न मात्र आई वडिलांच्या पसंतीच्या मुलाशी करावं लागणार हे तिने ठरवले होते. तिला कशी ही व्यक्ती असली तरी तिला तिच्या नुसार वळते करणे चांगलेच माहीत होते.

तिला प्रदीपचे स्थळ आले होते, त्यांच्या नात्यातला होता, ज्याचे शिक्षण दिपालीच्या कॉलेज मध्येच झाले होते. मुलगा तसा गुणी वाटला होता, दिसायला देखणा, हुशार ,त्याची ही शेतीवाडी, घरदार होते,मेहनती होता म्हणून खास तिच्या आई वडिलांनी त्याला पसंत केले होते. त्याचे घर जरी तोलामोलाची नसले तरी फार काही वाईट नव्हते. त्यांनी फक्त मुलगा पसंत करणे योग्य समजले ,बाकी घरदार तर त्या घरात राहणाऱ्या माणसांमुळे होत असते, हे आईचे बाबाचे आणि दिपालीच्या ही होते.

लग्नानंतर दीपाली सासर घरी आली , सगळ्यांसाठी इतकी मोठ्या घरातील मुलगी सून म्हणून येणे म्हणजे खूप आदराची गोष्ट होती, मानाची गोष्ट होती, प्रदीपच तर नशीब निघाले असे काही जण म्हणत होते, त्याला ही मनापासून खूप आनंद जगाला होता.

नवं दाम्पत्याने आई वडिलांचे आशीर्वाद घेतले. सासूने आपल्या सुनेची संध्याकाळी दृष्ट काढली. तिला चार हित गुजाच्या गोष्टी सांगितल्या, आणि काही त्रास होणार नाही तुला इथे ही ग्वाही दिली. दिपालीच्या डोळ्यात अश्रू आले तिला सासू आई समान दिसली होती . एका नजरेत माणसे ओळखणारी दीपाली सासूला ओळखून चुकली होती.

दोघे आत गेले, त्याने तिला तिच्या बद्दल विचारले, तिने आपल्या घराबद्दल आणि सासरच्या मंडळीबद्दल आवर्जून प्रदीप कडून जाणून घेतले, खास करून आई बद्दल म्हणजे तिच्या सासूबाई बद्दल. सासूबाईंना काय केले म्हणजे मी आवडू लागेल . तेव्हा प्रदीप म्हणाला तिला काही खास आवडत नाही ग, तिची काही खास आवड आहे असे मला वाटत नाही. दिपालीच्या प्रदीपच्या ह्या बोलण्याचा राग आला. म्हणजे त्याला त्याची आई तिची आवड क्षुल्लक असल्या सारखे वाटले. जणू काही आईची ह्या घरात काही किंमत नाही असं हा गृहीत धरून आहे.

दीपाली सकाळी उशिरा उठली, तोपर्यंत आईने सगळे आवरा आवर केली होती, सगळ्यांना चहा नाश्ता करून स्वयंपाक घरात गेल्या होत्या.सगळी कामे त्याच करत होत्या ,काकू सासू ह्या गप्पा मारत होत्या ,अण्णा म्हणजे सासरे ही बाहेर जायची तयारी करत होते.  तिघी नंदा काकू सोबत गप्पा मारत होत्या हे तिने पाहिले.

ती लगेच स्वयंपाक घरात आईच्या मदतीला गेली, तिने हळूच विचारले आई काही मदत करते द्या, तुम्ही बसा जरावेळ,तुम्हाला चहा देते, आणि उरलेले काम मी करते.
सासू बाई हसून म्हणाल्या," अग ही माझी रोजचीच कामे आहेत, मला सवय आहे ह्या सगळ्यांची, आणि तू तर नवी नवरी आहेस. तू सद्या तरी काहीच करायचं नाही हळद फिटू पर्यंत . तुला सवय ही नसणार तू राहू दे ".

आज सकाळ पासून दिपाच्या सासूबाई तिला आजारी वाटत होत्या, तरी कोणी ही त्यांना मदतीला आल्या नाहीत ह्याचे नवल वाटले, मुलगा ही आईला गृहीत धरणारा वाटत होता, आणि इतर ही सगळे तसेच वाटले.

नवीन लग्न झालेल्या जोडप्याला आज देव दर्शनाला जायचे होते, एक गाडी बोलवली होती, सगळे तयार झाले काकू काका,अण्णा, तीन नणंदा, नवरा बायको, मग आई ही तयार झाली, पण आता गाडीत जागा नव्हती, मग सगळे तयार झालेले पाहून आईच म्हणाली मी नाही येत ,माझी जरा तब्येत ही ठीक नाही तुम्ही जा. म्हणजे तिने नेहमीच माघार घ्यायची हे सगळ्यांनी गृहीत धरले होते. सगळे एका सुरत म्हणाले बर ठीक आहे ,तुला परत कधी घेऊन जाऊ ग. हे पाहून दीपालीला अजून जास्त वाईट वाटले. तीच होती जिला कळले होते की ,लग्नाच्या सगळ्या कामाचा शिण आईंना आला होता, आणि म्हणून त्या एक बहाणा करून घरी राहिल्या होत्या.

देवदर्शन करून सगळे आजीच्या घरी आले होते, नव्या सुनेला आजीच्या भेटीला घेऊन गेले होते, आजी म्हणजे दिपालीच्या सासुबाईच्या सासू ज्या सध्या मोठ्या मुलाकडे रहात होत्या. दीपाली पाया पडली आणि आजी सोबत तिने ही गप्पा मारल्या .तेव्हा आजी हस्त म्हणाली काय ग सासू त्रास देते का, तिने त्रास दिला तर मला सांग चांगली सरळ करते बघ. जरी गम्मत होती तरी तिला आपल्या सासूची अशी कोणी गम्मत करेन असे वाटले नव्हते ,तिला वाईट वाटलं की हा काय प्रकार आहे. आज ही सासू ह्या सगळ्यांना निमूठ पणे कसे सहन करू शकते . सगळे आजीच्या ह्या बोलण्यावर हसू लागले होते, जणू अशींची गम्मत करणे त्यांना नवीन नव्हते.

दीपाली आता हे सगळे सहन करू शकत नव्हती तिने प्रदीपला इथून निघायला सांगितले, तिने सांगितले सासू बाईंची तब्येत ठीक नाही आणि त्या घरी एकट्या आहेत,आपल्याला जायला हवे लवकर. प्रदीप लगेच म्हणाला ,अग आईला काही झाले नाही, ती बरी आहे ,तिचे हे नेहमीच असते, गाडी जागा नसेल म्हणून ती असे म्हणाली.

तरी दीपाली ने न ऐकून सगळ्यांना घरी परत आणले होते, इकडे ती घरी आल्यावर लगेच सासूबाईंच्या खोलीत गेली ,बघते तर काय त्या चक्कर येऊन पडल्या होत्या.
तिने प्रदीपला आवाज दिला आणि डॉक्टरांना बोलवायला सांगितले.

आज तिच्या ह्या काळजीमुळे ती घरी लवकर आली होती आणि वेळीच येऊन त्यांना दवाखान्यात admit करू शकली होती, त्यांना low bp चा त्रास झाला असल्यामुळे त्या चक्कर येऊन पडल्या होत्या.

दीपालीच्या मनात सासू काय असते हे तिच्या सासूला पाहिल्यावर समजले होते, तिला कळले होते की सगळ्याच सासू वाईट नसतात तर काही अजूनही सासुरवास भोगत असतात नुसता सासूचा नाही तर खुद घरातील जवळच्या लोकांचा ही. तिचे मन समजून घरणारे  कोणी असेल तर ती का सासुरवास करेल ,जर नसेल तर स्वतःचे अस्थित्व ही नकोसे वाटत असेल अश्या वेळी.

तिने घराची सूत्रे हाती घेतली होती, जोपर्यंत आई बऱ्या होत नाही तोपर्यंत तिने सगळ्यांना आप आपली कामे वाटून दिली होती, काकू ही काम करत होती आणि तिघी नणंदा ही कामाला जुंपल्या होत्या. आता सगळी जने आप आपली कामे स्वतः करत होती. तिने सगळ्यांना सवय लावली होती घरातल्या कामा प्रति निष्ठा ठेवण्याची.
©® कृपया कथा आवडल्यास ती नावासहीत share करावी. कथेतील विषय किंवा कथा चोरी झाल्यास त्यावर साहित्य चोरी कायद्या अन्वेय कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कथेतील मांडणी आणि विचार हे लेखिकेचे स्वतःचे आहेत.