संध्याकाळी ते दोघ निवांत पणे बाल्कनी मध्ये बसले होते. हातात चहाचा कप घेत समोर पडणारा पाऊस एन्जॉय करत होते. असच सहज बोलता बोलता तो म्हणाला.
" काहीही म्हण हां ! पण काळ बदलला आहे."
" काहीही काय बोलतो ! काळ अजिबात बदलला नाही."
" असं कस म्हणते ? "
" तुला काय म्हणायचं आहे ?"
" आता हेच बघ ना , आपण दोघ आलो. तेव्हा कार तू ड्राईव्ह केलीस. काळ बदलला आहे.तरी तुला म्हणायचं आहे , काळ बदलला नाही ! आश्र्चर्य आहे बुवा ! "
" तु मला सांग, केअरिंग अँड लव्हिंग कोण आहे.?"
" मी."
" माझी काळजी कोण घेत ? "
" मी "
" चांगला मुलगा कोण आहे ? "
" मी "
" चांगला भाऊ कोण आहे ? "
" मी "
" मला शॉपिंग करायला कोण नेत ? "
" मी"
" घर कोण चालवतो?"
" मी"
" सगळ्यात संस्कारी सद्गुणी समजूतदार कोण आहे?"
" मी तुझा नवरा."
तो आनंदून म्हणाला. बायको त्याची स्तुती करत होती. कोणाला आवडत नाही असं कौतुक केलेलं.
" बरोबर बोलत आहे ना ?" तिने विचारल.
" आता हेच दुसरीकडे बघ बर ? म्हणजे दुसरी रे ? " त्याच्या चेहऱ्यावरचे काहीसे मस्ती खोर भाव बघून तिने त्याला आधीच रोखल.
" डेंजरस् कोण आहे ?"
" चेहऱ्यावर दिसतं तूझ्या.मनातलं बोल. बरं असू दे मीच बोलते."
" डेंजरस् कोण आहे ?"
" बायको "
" हट्टी कोण आहे ?"
" बायको "
" जास्त खर्च कोण करत ?"
" बायको "
" शॉपिंग जास्त कोण करत ? "
" बायको "
" काम चुकार कोण आहे ?"
" बायको "
" घरात भांडणं कोणामुळे होतात ? "
" बायको "
" नवऱ्याला मित्रांच्या पासुन दूर कोण ठेवत?"
" बायको "
" आई बाबांच्या पासुन दूर कोण करते ?"
" बायको "
" सगळ्यात जास्त राग कोणाला येतो ? "
" बायको "
" सारखं सारखं नाक आणि गाल फुगवून रुसून कोण बसत?"
" बायको "
" पन्नास वर्षांपूर्वी परिस्थिती पण तिच होती. आणि पन्नास वर्षांनंतर परिस्थिती पण तशीच आहे."
" असं काय बघतो ? खरचं तर बोलतं आहे."
ती चहाचा घोट घेत, शांत आवाजात म्हणाली.
ती चहाचा घोट घेत, शांत आवाजात म्हणाली.
त्याला बिचाऱ्याला समजत नव्हत तिने त्याची स्तुती केली की त्याला टोमणे मारले ?
तुमचं मत कमेंट मध्ये सांगा.
समाप्त.
©® वेदा
कथा आवडल्यास कॉमेंट मध्ये सांगा.
या कथेचा वापर यू ट्यूब किंवा इतर कुठेही आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा