कळा ज्या लागल्या जीवा
(भाग २)
(भाग २)
लेखिका - ©® स्वाती बाळूरकर देशपांडे,सखी
दिनांक ०३ . ०७. २४
दिनांक ०३ . ०७. २४
“काय झालं रूक्कू? केव्हापासून तेच पान घेऊन बसलीस . या दरम्यान तुझं अभ्यासात लक्ष नाहीये. तुझं.. .काय ?”
रुक्कुने वर पाहिल अणि आई थांबली .
“काय ग ?”
“ अगं कसं सांगावं? बारावी पास व्हायचंय की नाही तुला ? बोर्डाच्या परीक्षा चालल्यात आणि तुझं कुठेच लक्ष नाही .”
“पास व्हायचय ना, पण काय करू पास होवून ?” तिने भावाकडेही पाहिलं . तो आईचे बोलणे ऐकून आला होता.
“अग बारावी झाल्यावरती ग्रॅज्युएशन कर, तुझ्या आवडीच्या विषयामध्ये.”
“अग बारावी झाल्यावरती ग्रॅज्युएशन कर, तुझ्या आवडीच्या विषयामध्ये.”
“ त्यानंतर?”
“मग त्यानंतर काय? नोकरी करावी वाटली तर कर. स्वतःच्या पायावर तर उभी राहू शकतेस ना शिक्षण असल्यावर ?’ भावाने सल्ला दिला .
“ मग त्याने काय होईल?”
“हा काय प्रश्न झाला तुझा?” भाऊ कंटाळून खोलीबाहेर गेला .
“रुक्कू ऐक . . . नोकरी लागल्यावर लग्न कर, चांगले घर मिळेल?”
“ त्याने काय होईल ? समजा नाही मिळालं मला चांगलं स्थळ तर ?” रुक्कूने जळजळीत कटाक्ष आईकडे टाकला.
“ का नाही मिळणार? तू सुंदर आहेस, शिकलेली असशील ,नोकरी करणारी,. तर तुलाही शिकलेला व सुंदर मुलगा मिळेल !”
“मग आई , मुरली काय वाईट होता ? काय वाईट आहे, सांग ना ?”
“ हे पहा रूक्कु तो विषय नको . अग तुझं वय काय आणि तुझं चाललंय काय ? 18 सुद्धा पूर्ण झाले नाहीत आणि तू बारावीचा अभ्यास सोडून नसते कामं करायला लागलीस “ आई वैतागुन म्हणाली .
“नसते कामं म्हणायचे नाही. आई ! माझं प्रेम आहे मुरली वर “
“ आणि त्याचं?”
“ त्याचं पण आहे.” ती निर्धास्त होवून म्हणाली.
“ उगीचच भ्रमात राहू नकोस. वयात अंतर बघ . . . आणि ?"
“आणि काय ?” ती जोरात ओरडली .
“ रुक्कु . . आरडा - /ओरडा नको . आम्ही का नको म्हणतोय त्याची कारणे सुद्धा तुला माहित आहेत , तरीही तू हट्ट करते आहेस. हे सगळं अजूनही माझ्या पर्यंतच आहे तोपर्यंत ठीक आहे, बाबा पर्यंत गेलं तर काही खरं नाही .”
“ आई. तूच सांग, याला काही अर्थ आहे का? ती लोक बाबांना आवडत नाहीत म्हणून मला का अडवताय तुम्ही? मला तर काहीच प्रॉब्लेम नाहीये तिकडे. केंव्हा तरी त्यांच्या लहानपणीची, काहीतरी, कुटुंबातील भांडणं डोक्यात घेऊन ते आतापर्यंत सांगत राहतात. मी ऐकणार नाही .”
“ आता हे काय? पण रुक्कू, बाबांच्या म्हणण्याचा मान तू नाही ठेवलास तर कोण ठेवणार? त्यांच्या घरी तुझं येणं जाणं सुद्धा त्यांना आवडत नाही आणि जर हे सगळं कळालं तर. .अकांड तांडव करतील.”
“पण आई त्यांच्या इच्छेसाठी माझा बळी का ??”
“रुक्कु , तुला मी काही बोलले नाही पण मुरलीचा नेव्ही मधला मोठा भाऊ वहिनी आले होते ना , , तेव्हाही त्यांच्यासोबत दोन-तीन दिवस फिरलीस, सिनेमाला, बागेत, शॉपिंगला गेलीस . मला ते देखील अजिबात आवडलं नव्हतं. मी वेळ मारून नेली. तेव्हा तर फार मैत्री मैत्री करत होतीस आणि आता हे काय प्रेम ? खबरदार! पुन्हा हा प्रेम बीम विषय घरात काढशील तर . . “
“आई, मी कशाला काढू विषय? तू विचारलं म्हणून मी तुला सांगितलं पण तुझ्याच काय, कुणाच्याही सांगण्याने माझे मुरली बद्दलचे मत बदलणार नाही . हे लक्षात असू दे.” तिने निक्षून सांगितले .
********************************************
वृन्दाच्या घरी सकाळी सकाळी फोन आला की मुलाला मुलगी पसंत आहे आणि एकच आनंदाची लाट आली.
सगळेजण आनंदीं झाले व तिला अभिनंदन म्हणू लागले.
‘ नशीब काढलं पोरीने’ असं वाटलं काही लोकांना.
पण ती मनातून खुश नव्हतीच.
पण ती मनातून खुश नव्हतीच.
तिला तो आवडला होता, खूप आवडला होता पण हो, त्याचा होकार त्याने नाईलाजाने दिला आहे किंवा कुठल्यातरी दबावात दिला आहे असं सतत वाटत होतं.
“ आता तरी आनंदी रहा, सारखं डोळ्यात पाणी काय काढतेस?” मावशी म्हणाली.
“ कसला राजबिंडा मुलगा मिळाला आहे आणि त्याने तुला पसंत केलं आहे.” तिची आई तिला जवळ घेऊन म्हणाली.
तिला कळत नव्हतं ,तो राजबिंडा आहे म्हणजे? त्यांनी पसंत केलं म्हणून उपकार मानायचे की काय ?
माझ्यातही काहीतरी असेलच ना, जे त्याला आवडलं असेल. नाहीतर हे असंच आयुष्यभर त्याने पसंत केली म्हणून त्याच्या उपकाराखाली जगायचं का?
माझ्यातही काहीतरी असेलच ना, जे त्याला आवडलं असेल. नाहीतर हे असंच आयुष्यभर त्याने पसंत केली म्हणून त्याच्या उपकाराखाली जगायचं का?
लग्नाळू मुलींसाठी आणि मुलांसाठी असे कितीतरी प्रसंग येतात जिथे असे विचार चक्र सतत सुरू असतं.
मामांनी लगेच गुरुजींना बोलावून साखरपुड्याची तारीखही काढायला लावली. अगदी जवळची आठ -नऊ दिवसांवरची.
वडिलांच्या माघारी एकदा हिला उजवली की आपलं कर्तव्य पार पडलं असा भाव काकू काकांच्या मनात होता.
मामा व मावशी प्रेमाने करत होते सगळं .
तिचे बाबा कुठल्याशा क्षुल्लक आजारानेच पण तिच्या लहानपणीच गेले होते, तेव्हापासून तिला आईच्या तोकड्या कमाईत काटकसरीने जगण्याची सवय लागली होती.
पण आताशा कोणाचेच उपकार नकोसे वाटत होते.
********************************************
कॉलनीपासून दूर छोटीशी टेकडी आणि तिथे आसपास बरीच झाडे होती, काही झाडे लावलेली, तर काही उगवलेली .
त्यांच्या मध्यभागी एक शंकराचे देऊळ होतं. ते बरंच जुनं असावं पण गेल्या काही वर्षात त्याचा पुनरुद्धार केल्याने लोक येत जात असायचे.
त्यांच्या मध्यभागी एक शंकराचे देऊळ होतं. ते बरंच जुनं असावं पण गेल्या काही वर्षात त्याचा पुनरुद्धार केल्याने लोक येत जात असायचे.
खूप गर्दी नसायची त्यामुळे तिथे नुसते जाऊन बसले तरीही मनाला खूप शांती मिळायची.
उद्या रुक्कु चा गणिताचा पेपर होता, तीन दिवसांपासून मुरली तिला लांबूनही दिसला नव्हता .अशात दोनदा घरी जाऊनही विचारलं तर काही उत्तर मिळाले नाही .
त्याची ट्युशन घेण्याची बाजूची खोली बंद होती. त्याच्याकडे ट्युशनला गेल्यामुळे तर तिला गणित सोपं वाटत होती आणि नेमका आता बारावीचा फायनल पेपर, या अशा वेळेला त्यांने ट्युशन बंद केली होती.
दोन दिवसांपासून तिचं अभ्यासात मन लागत नव्हतं, तो का टाळतोय कळत नव्हतं. आईची कटकट वेगळी व त्यात त्याचा दुरावा !
उद्याच्या पेपरची तर वाट लागणार होती .
सगळं कळत होतं पण ती खूप हतबल होती .
तिला ते देखील नको होतं . ती जर गणितात नापास झाली तर दोष मुरलीवर येईल किंवा त्यांच्या प्रेमावर येईल.
सगळं कळत होतं पण ती खूप हतबल होती .
तिला ते देखील नको होतं . ती जर गणितात नापास झाली तर दोष मुरलीवर येईल किंवा त्यांच्या प्रेमावर येईल.
त्याने जर गणित चांगलं शिकवलं होतं मग त्याच्यावर दोष कशाला?
संध्याकाळी मंदिरात जाण्याचा विचार करून ती घरून निघाली आणि एकदा शेवटचं त्याला पाहुयात म्हणून त्यांच्या घरी गेली.
पाहते तर त्याच्या घरी आजूबाजूच्या बायका गप्पा मारत असलेल्या दिसल्या. तिने बाहेरूनच अंदाज घेतला. त्याची बहीण आणि आई काहीतरी केलेली खरेदी दाखवत होते, समोर साड्या ,ड्रेस वगैरे शॉपिंग बॅग पण दिसत होत्या.
बाजूच्या कानडे काकूंनी विचारलं,” मुरलीची आई, अंगठी कुठून घेतली मुलीसाठी ?”
“अरे हो अंगठी ना, हो तेवढीच घ्यायची राहिली आहे. आता जायचं आहे खरेदीला ,मुरली बाहेरून आला की निघू. हा मुलगा पण कुठे जाऊन बसला कोण जाणे ?”
हे वाक्य ऐकून अगोदर तिच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटल्या, जणू काही अंगठी तिच्यासाठीच घेणार आहेत .
आणि एकदम सगळ्या परिस्थितीचे गांभीर्य तिच्या लक्षात आलं .
आणि एकदम सगळ्या परिस्थितीचे गांभीर्य तिच्या लक्षात आलं .
ताईचं व मोठ्या दादाचं तर लग्न झालेलं आहे मग या घरात ही खरेदी , ही अंगठी कोणासाठी? मुरलीसाठी तर नाही ना?
या प्रश्नाने आणि या विचारांने ती अधिकच सैरभैर झाली.
जगात कुठेही काहीही झालं तर रोज त्याला भेटल्यावर सांगायची सवय लागली होती आणि अचानक हे सगळं असं घडतंय . . . हे जाऊन कुणाला सांगणार?
मग ती तिथेच मंदिराकडे निघाली .आवारात आलं की छान वाटलं . एखादा दुसरा कोणीतरी माणूस येऊन जायचा त्यामुळे गर्दी अशी नव्हती.
मंदिरात गेली, शिवलिंगाचे दर्शन घेतले ,शंभो शंभो म्हणत बाहेर आली पण मनातली अस्वस्थता अजूनच तीव्र व्हायला लागली.
क्रमशः
लेखिका - ©® स्वाती बाळूरकर देशपांडे,सखी
दिनांक ०३ . ०७. २४
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा