कळा या लागल्या जीवा
. भाग ३
©® सौ.हेमा पाटील
कथेच्या दुसऱ्या भागात आपण पाहिले आहे की, प्राध्यापक महाशय आणि लेखक, कवी माधव काळोखे यांच्यात फोनवर बोलणे सुरू आहे. माधवच्या लिखाणाबाबत चर्चा रंगात आली आहे. आता पुढील प्रश्न विचारुन प्राध्यापक महाशयांनी गुगली टाकली...

"एक प्रश्न विचारु? तुम्ही का लिहिता?" आता तिथून पुढे...
' आजकाल सोशल मिडियामुळे कुणीही उपटसुंभ उठतो आणि कवी बनतो. मग ते र् ला ट जोडणे आणि त्याला कविता म्हणणे म्हणजे जरा अतिच होतेय. कथा लिहिणारे तर उदंड झालेत. आपल्या मराठी भाषेचा स्वाभिमान जपत लिहिणे सर्वांनाच जमत नाही. सर्वच कामे सर्वांना जमलीच पाहिजेत असा अट्टाहास तरी का?' असे विचार प्राध्यापक महाशयांच्या डोक्यात यायला आणि तिकडचा फोनवरचा कविता वाचनाचा आवाज बंद व्हायला एकच गाठ पडली.
"सांगा ना सर, कशी वाटली माझी झेंडूच्या फुला ही कविता?" असे लेखक महाशयांनी विचारले.
" म्हणजे मगाशी आपण या विचारात होतो की, लिहिण्याचा अट्टाहास का? तेवढ्यात यांनी कविता वाचन केले म्हणायचे. बरे झाले आपले लक्ष नव्हते. नाहीतर कानांवर अत्याचार झाला असता." इति प्राध्यापक.
" म्हणजे मगाशी आपण या विचारात होतो की, लिहिण्याचा अट्टाहास का? तेवढ्यात यांनी कविता वाचन केले म्हणायचे. बरे झाले आपले लक्ष नव्हते. नाहीतर कानांवर अत्याचार झाला असता." इति प्राध्यापक.
"कविता लिहिण्यासाठी अंगी प्रतिभा असावी लागते. येरागबाळ्याचे काम नाही."
"हो.बरोबर सर, ते यमक आवडले का तुम्हाला ? सुगंध पसरवत हास ना रे आणि धुंद मला कर ना रे..."
"ही कविता पाठवलीय का तुम्ही मला?"
"होय. झेंडूचे फूल."
"तुमचा प्रियकर अगदीच गरीब आहे हो .त्याला धुंद व्हायला झेंडूचे फुलही चालते."
"बघा ना सर, गरीबांनी काय प्रेमच करायचे नाही का?"
" का करु नये? अवश्य करावे, पण प्रेमात पडल्यावर कविता केलीच पाहिजे असा काही नियम नाही."
"फिरकी घेताय ना माझी? समजले मला सर! अहो, मी खराखुरा प्रेमात पडलो नाहीय. प्रेमात पडलेल्या युवकाच्या भूमिकेत शिरुन मी कल्पनेच्या सहाय्याने कविता लिहिली आहे सर. वास्तवाच्या अगदी जवळ जाणारी आहे ना सर? आवडली ना तुम्हांलाही? मला खात्री आहे तुम्हांला नक्कीच आवडली असणार."
"माझ्या आवडीनिवडी तुम्हांला इतक्यात समजायला लागल्या? कसे काय?"
"म्हणजे काय? लेखक आहे मी सर."
" लेखक कल्पनेच्या भराऱ्या मारतात हे माहीत आहे, पण मनकवडे पण असतात हे आजच समजले बुवा."
"तुम्ही फारच विनोदी बोलता सर. तुमचे हे वाक्य मी नोटडाऊन करुन ठेवेन. कुठेतरी एखाद्या कथेत एखाद्या पात्राच्या तोंडी घालता येईल मला."
"अच्छा! म्हणजे तुम्ही असे इकडून तिकडून गोळा केलेले संवाद पात्रांच्या तोंडी घालता तर... त्यामुळेच त्यांचा एकमेकांशी बादरायण संबंध लावायचा म्हंटले तरी शक्य होत नाही."

"लेखकाने कायम आपली बुद्धी जागृत ठेवायला हवी, तरच असे शाब्दिक अमृतकण टिपता येतात. लेखक काय आईच्या पोटातून शिकून येतो थोडाच? प्रयत्न करावेच लागतात."
" पोराचे पाय पाळण्यात दिसतात अशी एक म्हण आहे आपल्याकडे."
"हो. पाळण्यात झोपवलेल्या पोराचे पाय दिसतायत का हे पाहून त्याची आई बाळ झोपलेय याची खात्री करुन घेत असेल म्हणून तसे म्हणत असावेत."
"हो. पाळण्यात झोपवलेल्या पोराचे पाय दिसतायत का हे पाहून त्याची आई बाळ झोपलेय याची खात्री करुन घेत असेल म्हणून तसे म्हणत असावेत."
"तुम्हांला खालील म्हणींचा अर्थ सांगा व वाक्यात उपयोग करा असा प्रश्न परिक्षेत असायचा का हो?"
"हो हो. असायचा ना, पण आमच्या बाई कायमच माझ्या उत्तरावर भलीमोठी काट मारायच्या आणि शुन्य मार्क द्यायच्या. खरेतर उत्तर समजून घ्यायला तसा दृष्टीकोन शिक्षकांनी ठेवायला हवा."
"म्हणजे तपासताना काय निकष लावायचे हे तुम्ही शिक्षकांना शिकवणार?"
"तसे नाही हो. आता ही म्हण बघा. असतील शिते तर जमतील भुते. मी याचा अर्थ लिहिला होता की, शेतात किंवा जंगलात गेल्यावर आपल्या डब्यातील भाताची शिते जमिनीवर सांडू नयेत. शिते जमिनीवर सांडली की भुतांना त्याचा वास येतो. मग ती आपल्या डब्याभोवती जमा होतात व आपला भात हिसकावून घेतात. याचे उत्तर बाईंनी चूक दिले आणि मला जवळ बोलावून सर्वांसमोर माझा कान जोराने पिरगाळला. सगळी मुले फिदीफिदी हसली. बाईंनी तो प्रसंग एकदा डोळ्यासमोर आणला असता तर त्यांना माझे उत्तर शंभर टक्के पटले असते."
"म्हणीचा अर्थ जो अभिप्रेत आहे तसाच यावा लागतो. तिथे दुसरे पर्याय नसतात माधवराव."
"असो. आता माझ्या या पुस्तकाचा जेव्हा प्रकाशन सोहळा असेल तेव्हा मी त्या बाईंना बोलावणार आहे. खूप प्रयत्नांनी मी त्यांचा पत्ता मिळवला आहे. मी स्वतः त्यांना आमंत्रित करायला जाणार आहे. त्यावेळी मी त्यांना पुस्तकाची प्रत देईन. ती वाचून त्या चाटच पडतील. या मुलामध्ये असलेले लेखन कौशल्य आपल्या लक्षात कसे आले नाही असे त्यांना वाटेल."
" यासाठी तुम्ही कथा लिहिल्या आहेत?" प्राध्यापक महाशयांनी मनातील खदखद व्यक्त केली.
" तुम्हीच बघा ना. कसेही उत्तर लिहिले तरी बाई चूकच द्यायच्या. निबंध स्पर्धेत मी भाग घेतला तर चुकूनही माझा नंबर यायचा नाही. याचे शल्य मनात रुतून बसले आहे. त्यामुळे मी लिहिण्याचा ध्यास घेतला होता, आणि त्यात यशस्वीही झालो. त्याचा पुरावा तुमच्याकडे आहेच...माझे लिखाणाचे बाड." लेखक महाशय उत्तरले.
"बरं आता ठेवतो मी फोन.तुमच्याशी इतका वेळ गप्पा मारल्या तर मी तुमचे साहित्य वाचणार कधी आणि त्यावर समिक्षा लिहिणार कधी? मलाही संसारासाठी नोकरी करावी लागते. काय करायचे पापी पेट का सवाल है | "
"बघा..जमले. जमले तुम्हांला पण सरमिसळ करत लिहिणे ! थोडाचवेळ माझ्या संपर्कात काय आलात तर तुमच्यात किती बदल झाला. आता एखाद्या रविवारी पूर्ण दिवस समोरासमोर बसून माझ्या लिखाणावर चर्चा करुया. माझ्या संपर्कात आल्यामुळे तुमच्यावरही साहित्यिक संस्कार होतील. मग तुम्हांला ही लिहावेसे वाटेल. तुम्ही लिहिलेत की तुमच्या लिखाणाचे समिक्षण मात्र मीच करणार बरं का सर." माधव उत्स्फूर्तपणे म्हणाला.
"हॅलो... हॅलो... आवाज येत नाही.हॅलो..."
माधवने फोन कट करुन पुन्हा चारवेळा लावला. पण मोबाईल वर फक्त एंगेज टोन ऐकू येत होती.समाप्त.
©® सौ.हेमा पाटील.
अष्टपैलू लेखक स्पर्धा - २०२५