काळजी(भाग2)वयात आलेल्या मुलीच्या आई ची कथा)

A story about relationship between mother and her daughter

काळजी भाग 2 

(माघील भागात आपण पाहिले आई च्या सांगण्यावरून बाबा स्नेहा ला उठवण्यासाठी जातात )

पहिल्या आवाजात स्नेहा काही दरवाजा उघडत नाही 
बाबा पुन्हा आवाज देतात मग ती दरवाजा उघडते 
व दोघेही बाप लेक किचनमध्ये येतात. 

खबरदार खाण्याच्या कशाला हात लावशील तर 
अगोदर अंघोळ कर 
मग 
मी बजावून सांगितले.
तितक्यात सुरज देखील आला 

माझ्या किचनमध्ये प्रवेश करण्याचे काही नियम आहे व ते मी स्वतः देखील पाळते मला अस्वच्छ पणा बिल्कुल चालत नाही. 

मी घालून दिलेले नियम सर्वाना बंधनकारक असतात. 
 
सुरत आवाज देत म्हणाला 
आई खुप भूक लागली आम्ही आतमध्ये येऊ शकत नाहीत पण निदान तू तरी बाहेर ये 
हे देवा नाहीतर ती पोह्याची प्लेट तरी बाहेर पाठव 
तो मला चिडवण्यासाठी बोलला. 

हो देवाला दुसरे काम नाही उरले तुला पोहे द्यायला 
माझे बोलणे ऐकुन सगळे हसायला लागले. 

अंघोळ केल्याशिवाय काही हाती लागणार नाही हे कळताच 
तिघे अंगोळीला निघून गेले.


मी लागले माझ्या कामाला 
मनात विचार केला मी नसते तर काय केलं असत यांनी 
खरच घराला घरपण बाई मुळेच येते. 

मी टेबल वर सर्वांसाठी नाश्त्या ची  तयारी केली 
माझे आवरले हे कळले की मग हे तिघे हळूहळू येतात 
कारण लवकर आले 
व मी कामाला लावले तर या धाकाने.

मला त्यांचे सगळे डावपेच माहीत असतात पण मी पण काही कमी नाही 
कळून न कळल्यासारखे करते ,

आम्ही सगळे नाष्टा करण्यासाठी बसलो 
तश्या आमच्या जागा फिक्स असतात कसे रोज भांडण नको.
नाहीतर बाबा च्या कोणत्या बाजूला कोण बसेल यावरून स्नेहा व सुरज मध्ये रोज वाद.

मुलीने असा वाद घालू नये 
तिला तिच्या मर्यादा काळाव्यात असे मला वाटते 
पण पुन्हा ते समानतेचे धडे नको 
व आपल्या डोक्याला ताप नको म्हणून मी आपली 
शांतच राहते.

दोन घास खाऊन झाले व स्नेहा ला कदाचित आवडले नसावे पोहे 
आई माझे झाले 
म्हणून ती ताटावरून उठली 
अरे असे कसे झाले 
पूर्ण संपव मी दम देत बोलले 

बघा ना बाबा 
नकोय मला 
ती बाबा चा आसरा घेत म्हणाली.

नकोय काय 
मी आपला तोंडाचा पट्टा चालू केला 
लोकांना ते पण मिळत नाही 
असे अन्न वाया गेलेलं मला चालणार नाही 
भूक नव्हती तर अगोदरच सांगायचं 
असे फेकून दिले जाणार नाही. 

स्नेहा 
मला न जुमानता निघून गेली रूम मध्ये 
मग बापा चे प्रेम पण गेले माघे माघे पोरीच्या. 

माझ्या तोंडाचा पट्टा चालूच होता 
आजकालच्या पोरी ना 
काहीच भान नसते जरा मोकळीक दिली की डोक्यावर बसता 
व वडील त्यांना अजून फूस लावता.

अहो सासरी जा 
लेकिसोबत आंदण म्हणून 
मी यांना ओरडून म्हणाले. 

वेळ पडली तर तेही करेल 
आतून प्रतिउत्तर आले.

जाऊ दे 
यांचे बाप लेकीचे 
मला तरी काही समजत नाही.

मी माझी कामाला लागले 
काम करता करता 
टिव्ही बघावा म्हणाल 
गाणे वैगरे ऐकायला मला आवडत नव्हते म्हणून मी बातम्या लावल्या 
पहिलीच बातमी होती 
एका 16 वर्ष वयाच्या मुलीचा बलात्कार करून खून. 
काळीज सुन्न झाले होते 
अश्या काही बातम्या ऐकल्या की मी मूर्खा सारखा विचार करायचे 
कित्येकवेळा तर मी झोपेतून दचकून उठायचे स्नेहा च्या नावाने.
सतत एक वेगळीच काळजी वाटायची 
माझी मुलगी नाही चुकणार 
पण समोरच्याचा काय भरोसा. 

तेवढ्यात स्नेहा व हे हॉल मध्ये आले 
आई मी उर्मिला कडे जातेय थोड्या वेळाने येते 
थांब स्नेहा 
ऐक तर 
मी किचन मधून बाहेर येईपर्यंत 
ती दिसेनाशी झाली 
बाहेर येताच यांनी मला हटकले मीच परवानगी दिली तिला जाऊ दे ग 
जवळच तर राहते 
ती येईल भेटून 
लवकरच 
ते शांतपणे म्हणाले.

पण काय गरज होती तुम्हाला तिला एकटीला जाऊ द्यायची 
मी रागात म्हणाले. 

ये सुनीता 
मी खुप दिवसाचा बोलेन बोलेन म्हणतो तुला या विषयावर 
तू पण बाकी त्या टिपिकल आई सारखी वागू लागलीये 

तुला स्नेहा वर भरोसा नाही 
की बाकी लोकांप्रमाणे तुलाही मुलगी ओझं वाटतेय 
ते म्हणाले. 

आता मात्र मला राग आला 
पण मी त्यांना कसे समजावणार ना आईपण काय असत ते.

आणि मुलगी 
व आई ला ओझं 

मुळीच नाही 
मुलगी आई च ओझं नसते तर स्वास असते.
आई तिचं बालपण पुन्हाजगते तिच्या मुलीच्या रूपाने. 
जेव्हा तिची 5 वर्षाची मुलगी आई च्या मेकअप किट ने तोंड रंगवते ना तर आई ला ती विश्वसुंदरी पेक्षा सुंदर भासते 
आई प्रत्येक क्षण जगते तिच्या मुलीच्या रुपात.
आई ही साडी घाल 
ती घालू नको 
आई अशी वेणी घाल 
आई केस कट कर 
आई ही नवीन फॅशन आली आहे हेच घे 
तिला जन्म मी दिलेला असतो पण ती माझी आई होते. 

तुझे बाबा ना माझे कधीच ऐकत नाहीत 
थांब मी सांगते बघू कसे ऐकत नाहीत असे जेव्हा ती म्हणते ना तेव्हा स्वर्ग सुखाची अनुभूती येते.

मुलगी म्हणजे ओझं नाही ओ मुलगी म्हणजे ते अनमोल रत्न जे प्रत्येकाच्या नशिबात नसते. 

पण हल्ली या रत्ना ला कुणाची नजर लागली काय माहीत. 
मुलगी म्हणाल की फक्त काळजी च वाटते 

क्रमशः ............

का वाटत असेल सुनीता ला इतकी काळजी.
जाऊन घेण्यासाठी सोबत राहा माझ्या 
व मला फॉलो करा 
धन्यवाद.

🎭 Series Post

View all