कलम तीनशे चोपन्न
भाग ७
भाग ७
या सगळ्या प्रकारामागे शहाचा हात आहे हे साकेतला कळून चुकले आहे. आपली लढाई आपण लढायची असा निश्चय साकेत व रश्मीने केला. आता पुढे...
सकाळी त्याने विवेकला फोन केला. काल पोलिस स्टेशनमध्ये नंतर काय घडले ते सगळे सांगितले. अगदी तो निघताना पवार त्याच्याजवळ बाहेर उठून आले होते ते पण सांगितले.
विवेकने विचारले,
"बाहेर आल्यावर पवार काय म्हणाले?"
"काही नाही. सहजच बाहेर आलोय म्हणाले."
तू विचारलेस का त्यांना काही?"
" हो. मी म्हणालो, आता काय राहिलेय?"
" अरे ते तुझ्याकडून काही चिरीमिरी मिळतेय का ते पहायला आले होते. तू त्यांच्या हातावर काही टेकवले असतेस तर तुला सलाम करुन त्यांनी याबाबत तुला काही क्ल्यू दिला असता. समोरच्या पार्टीकडून तर ते घेऊन बसलेतच, आता तुझ्याकडून काही निघतेय का ते पहात होते."
" पण त्या पार्टीकडून जर पैसे घेतलेत तर त्यांच्याबद्दल मला का सांगतील?"
" त्यांना काही देणेघेणे नसते. चार पैसे मिळाले की ते अशा पद्धतीने बोलतात की ऐकणाराला वाटते, आपल्याबद्दल यांना किती कणव आहे. प्रत्यक्षात त्यांच्यासाठी फक्त हरी पत्ती महत्त्वाची असते. गुलाल तिकडं चांगभलं ही म्हण यांच्याकडे पाहूनच तयार झाली असावी. नितीमत्ता वैगेरे गोष्टी यांनी कधीच बासनात गुंडाळून ठेवल्या आहेत."

" असं कसं? कायदा आहे, त्याचे पालन तर त्यांना करावेच लागणार ना? कायद्याचे रक्षक आहेत ते."
" बरं... आता आलाच आहेस कायद्याच्या कक्षेत. बघ आता कायदा कसा तुझ्याभोवती फिरतो ते." विवेकने हे बोलणे ऐकून साकेत गोंधळून गेला.
" ऐ बाबा, काल आधीच मी त्या पोलिस स्टेशनमध्ये इथे सही करा, तिथे सही करा यामुळे वैतागलोय. त्यात असे काही बोलून तू माझ्या डोक्यातला गुंता अजून वाढवू नकोस. आधीच ती बाई कोण आहे आणि मी विनयभंग न करताही ती माझा विनयभंग केला असे का बोंबलतेय या प्रश्नाने डोके आऊट झालेय. खरंच विनयभंग झाला तर आपली बेअब्रू होऊ नये म्हणून खूपदा बायका गप्प बसतात. लपवून ठेवतात, अन् ही बाई पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करतेय. तेही मी विनयभंग न करता. एकतर तुझ्या वहिनीला आवरता आवरता नाकीनऊ आलेत. त्यात तुला चेष्टा सुचतेय?"
" आता वहिनींना काय झाले मध्येच?"
" काय झाले? अरे, ते पोलिस स्टेशनमध्ये मला पवारांनी त्या बाई सोबत फोटो दाखवले होते ना, त्याचे मी हळूच मोबाईलवर फोटो काढले होते. ते मी तिला दाखवले आणि काय सांगू, इतकी बडबड सुरु झाली तिची की बोलता सोय नाही. मी असे काही केले नाही यावर तिचा विश्वासच बसेना."
" हा हा हा... मग काय केलेस तू? "
" तुला हसायला येतेय. बरोबर आहे. तुला कुठे सोसायला लागतेय? मी जात्यात आहे ना! "
" बरं बाबा, नाही हसत. सिरियसली विचारतोय, वहिनींना कसे पटवलेस मग?"
" रागावलो मी . मग आली गाडी रुळावर. अरे, आधीच माझे डोके सुन्न झाले होते, त्यात हिचा असा गैरविश्वास! ही जेव्हा शांत झाली तेव्हा कुठे मी विचार केला. त्यावेळी माझ्या लक्षात आले की हे कदाचित शहाचे काम असावे. आणि याला पुष्टी मिळाली. शहाचा फोन आला. त्याच्या सूचक बोलण्यावरुन लक्षात आले की याच्यामागे शहाचा हात आहे. माझी जमीन मी त्याला विकावी यासाठी त्याने हा डाव रचला आहे."
" ओह...! असे आहे तर! बरं. बघूया पुढे काय करायचे ते. संध्याकाळी ऑफीस सुटल्यावर माझ्या ऑफीसमध्ये ये. आज मी कोर्टातून गुन्हा दाखल केल्याची एफ. आय. आर. ची प्रत मागून घेतो. त्यात काय लिहिले आहे, कुठली कलमे लावली आहेत ते पाहू आणि त्याच्या अनुषंगाने कुठले वकील द्यायचे ते ठरवू. जमेल ना आज संध्याकाळी यायला? "
" जमलेच पाहिजे. काय यार, माझ्या अब्रूचे धिंडवडे निघाले नाहीत म्हणजे बास. आजवर कधीच असे वेडेवाकडे वागलो नाही. आज मात्र माझ्या नावावर हा कलंक लागला. दुःख याचे होतेय की मी काहीही न करता मला यात गोवले गेलेय. यातून माझी निर्दोष सुटका झाली तरीही लोकांचा माझ्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलेल. लोक असेही म्हणतील की पैश्याच्या जोरावर हा सुटला. समाजात माझी काय किंमत राहील? ते फोटो पाहून बायको गैरविश्वास दाखवू शकते, तर समाज माझ्यावर कसा विश्वास ठेवेल? असे वेगवेगळे विचार येऊन माझे डोके सुन्न झाले आहे. काय करावे तेच सुचेनासे झाले आहे."

" साकेत, एवढा विचार करु नकोस. तू काही केलेले नाहीस मग का घाबरतोस? अजिबात घाबरु नकोस. आपण चांगले तज्ञ वकील देऊ. तू आता शांतपणे ऑफीसमध्ये जा. संध्याकाळी मला भेट. मग आपण समोरासमोर या विषयावर बोलू. "
"ओके. ठीक आहे." असे म्हणत साकेतने फोन कट केला.
त्याने आपला डबा उचलला आणि तो ऑफीसला गेला. ऑफीसमध्ये भरपूर काम होते; त्यामुळे दिवसभरात तो सगळे विसरुन गेला होता.ऑफीस सुटल्यावर मात्र त्याला आठवले , आपल्याला विवेककडे जायचे आहे. टेबल आवरुन तो बाहेर पडला. आता तिथे आपल्या पुढ्यात काय वाढून असेल अशा चिंतेतच तो विवेकच्या ऑफीसमध्ये पोहोचला.
क्रमशः
काय होईल पुढे? विवेक काय सांगेल त्याला?

सदर कथा मालिकेचे लिखाण सुरु आहे.याचे पुढील भाग नियमितपणे ईरान फेसबुक पेजवर येतील. त्यामुळे पेजला फाॅलो करुन ठेवा ही विनंती.
सदर कथेचे कुठलेही भाग काॅपी करु नयेत. अगर अभिवाचनासाठी वापरु नयेत. असे आढळल्यास काॅपीराईट कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल.
कथा आवडल्यास कमेंट्स नक्की कराव्यात ही विनंती.
अष्टपैलू लेखक स्पर्धा - २०२५