कलम तीनशे चोपन्न
भाग ९
©® सौ.हेमा पाटील.
बारमध्ये बसलेल्या साकेतला आपल्या वडिलांचे शब्द आठवले,
" काळ्या आईचा कधी लिलाव करु नकोस. जमीन कसणे तुला जमले नाही तर बाॅण्ड करुन खंडाने एखाद्या चांगल्या माणसाला कसण्यासाठी दे. जमीन विकण्याचा विचार कधी करु नकोस." त्यामुळे त्याने मनाशी निश्चय केला, कितीही त्रास झाला तरीही जमीन बिल्डरच्या घशात जाऊ द्यायची नाही. आपण लढा द्यायचा."
तो बार मधून उठला व घराकडे निघाला.
तो बार मधून उठला व घराकडे निघाला.
घरी आल्यावर त्याच्याकडे पाहून रश्मीला समजले, हा दोन चार पेग टाकून आलेला आहे. तिने काही न बोलता जेवण गरम केले व त्याच्या पुढ्यात जेवणाचे ताट ठेवले. काही न बोलता त्यानेही चार घास खाल्ले व तो झोपायला गेला. दारुचा अंमल चढला होता, त्यामुळे तो लगेच झोपी गेला. रश्मीला मात्र बराच वेळ झोप लागली नाही. या प्रकरणामुळे आपल्या घरातील शांती ढळू न देता याला तोंड दिले पाहिजे असा विचार तिच्या मनात आला. यासाठी आपणच आपले डोके शांत ठेवून यावर काय मार्ग काढता येईल ते पाहिले पाहिजे. साकेत आधीच त्याच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे गोंधळून गेलेला आहे. आपण जर खंबीरपणे त्याच्यासोबत उभे राहिलो नाही तर आपली शेतजमीन हातची जाऊ शकते. यासाठी फक्त साकेतवर सगळे न सोपवता आपण यात लक्ष घातले पाहिजे असा निश्चय करून ती झोपायला गेली.
रश्मीला खूप वेळ झोप लागली नाही. 'आपण या घरात बाहेरुन आलो आहोत. तरीही घराची जी काही इस्टेट आहे ती जपण्याची जबाबदारी साकेतइतकीच आपलीही आहे. नाही तर आपल्या मुलाला आपण वडिलोपार्जित संपत्ती म्हणून काय प्रदान करणार?' असा विचार मनात आला आणि हा लढा निकराने लढायचा असा विचार तिने केला.
सकाळ रोजच्या सारखीच उगवली असली तरीही साकेतला आश्चर्य वाटले. रात्री आपण ड्रिंक घेऊन आलो होतो तरीही रश्मी नेहमीसारखी त्यावरुन अजून भांडण उकरुन का काढत नाहीय? म्हणून तो अधूनमधून तिच्या चेहऱ्याकडे पहात होता. ती शांतपणे आपली सकाळची कामे उरकत होती. साकेतचा डबा आणि चहा घेऊन ती त्याच्याजवळ आली तेव्हा साकेतला वाटले, आली आता ॲटमबाॅम्ब फुटण्याची वेळ! पण तिने शांतपणे डबा ठेवला. चहा त्याच्या हातात दिला व ती म्हणाली,
" काय म्हणाले वकीलसाहेब? झाले का बोलणे?"
संध्याकाळी काय बोलणे झाले ते सगळे त्याने तिला सांगितले. ते ऐकून ती म्हणाली,
" आपण हा लढा लढायचा. अजिबात माघार घ्यायची नाही. जमीन तर शहाच्या ताब्यात अजिबात जाऊ द्यायची नाही. केस अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत लढायची वेळ आली तरी चालेल, पण लढायचे. आपल्या मुलासाठी वडिलोपार्जित संपत्ती राखण्यासाठी काहीही करावे लागले तरी चालेल, पण माघार घ्यायची नाही. तुमच्या सोबत मी उभी आहे. पैसे कमी पडले तर माझे दागिने मोडू, पण आता मागे हटायचे नाही."
हे रश्मीचे बोल ऐकून साकेतला खूप बरे वाटले. तिचा हात हातात घेऊन तो म्हणाला,
"साॅरी, मी रात्री ड्रिंक घेऊन आलो, पण मी खूप सैरभैर झालो होतो."

" त्यावर ड्रिंक हा पर्याय नसतो. आता काळजी करु नकोस. शांत डोक्याने विचार करुन यावर मार्ग काढूया. आपली सत्याची बाजू आहे. ते सिद्ध करण्यासाठी जीवापाड प्रयत्न करु. यश आले तर ठीक! अपयश आले तर आपले बॅडलक; पण आधीच हातपाय गाळून शरणागती पत्करायची नाही. शहाचा हेतू तोच आहे. तुझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले की तू नरमशील व जमीन विकायला तयार होशील. काहीही झाले तरीही जमीन विकणार नाही हे शहाला दाखवून देण्यासाठी जी लढाई लढायची आहे ती जोडीने लढू. चारित्र्य अशा गोष्टींमुळे कलंकित होईल हा विचार मनात आणू नकोस. सत्य काय आहे ते तुला माहित आहे, परमेश्वराला माहित आहे. जगाचा विचार करु नकोस. या प्रसंगी तरी करु नकोस; कारण समोरच्याने तुला बरोबर त्याच पेचात पकडले आहे. समाज काय म्हणेल हा विचार करुन तू तयार होशील असाच त्याने शह दिलेला आहे. याला आपण काटशह द्यायचा. या गोष्टीचा माझ्यावर काहीही परिणाम झालेला नाही असेच आपले वागणे ठेवायचे. त्याने तुझ्या अवतीभवती काही माणसे पेरली असतील. जी सगळी बित्तंबातमी त्याच्यापर्यंत पोहोचवत असतील. रात्री तू बारमध्ये गेलेली बातमी पण त्याच्यापर्यंत पोहोचली असेल. त्यामुळे बाहेर वावरताना काही घडलेच नाही असे आपले वर्तन ठेवायचे. पूर्वी सारखेच सगळे रुटीन सुरु ठेवायचे. असे केलेस की पहिली लढाई आपण जिंकू. गुन्हा दाखल करुनही आपल्यावर काहीच परिणाम होत नाही हे पाहून शहा चक्रावून गेला पाहिजे." हे रश्मीचे बोलणे ऐकून साकेतला धीर आला. तिचा हात हातात घेऊन त्याने दाबला.
"तू म्हणतेस ते बरोबर आहे. इथून पुढे या बाबतीतील प्रत्येक बारीकसारीक गोष्ट मी तुला सांगत जाईन. दोघे मिळून विचारपूर्वक निर्णय घेत जाऊ. त्या शहाला यात यश मिळू द्यायचे नाही म्हणजे नाही." साकेत म्हणाला.
"बाबा, मी काय करायचे ते पण सांगा ना." छोटू म्हणाला. यावर रश्मी म्हणाली,
" तू फक्त स्वतःची काळजी घ्यायची. शाळेत अगर घरी, रस्त्यावर कुणी अनोळखी व्यक्ती तुला काही विचारु लागली अगर सोबत घेऊन जाऊ लागली तर जायचे नाही. कुणीही काही दिले तर खायचे नाही. तुला पळवून नेणे ही पुढची पायरी असू शकते." रश्मी म्हणाली.
"अगं, त्याला कशाला घाबरवतेस?" साकेतच्या या म्हणण्यावर रश्मी म्हणाली,
" घाबरवत नाही. त्याला सत्य परिस्थितीची जाणीव करून देतेय. असा प्रसंग उद्भवला तर काय करायचे याची कल्पना देऊन ठेवतेय, कारण काहीही होऊ शकते. जिथे दोन व्यक्ती जवळ आलेल्या नसताना विनयभंग केला आहे असा गुन्हा दाखल होऊ शकतो; तर छोटुच्या बाबतीतही काहीही होऊ शकते."
" जाऊदे, मग रिस्कच नको. देऊन टाकूया शहाला जमीन. छोटुला काही झाले तर मी स्वतःला माफ करु शकणार नाही." साकेत म्हणाला.

" एवढी काय मोगलाई लागून गेली आहे का? आपण आज संध्याकाळी विवेक भाऊजींकडे जाऊ. याविषयावर सखोल चर्चा करु. छोटुच्या बाबतीत कशी काळजी घेता येईल ते पाहू. लढायच्या आधीच शस्त्र खाली ठेवू नकोस." हे ऐकून साकेतने मान डोलावली, पण तो काळजीत पडला होता.
क्रमशः ©® सौ.हेमा पाटील.
क्रमशः ©® सौ.हेमा पाटील.
प्रिय वाचकहो, क्षमस्व. मी गेले दहा दिवस वैष्णोदेवी, अमृतसर येथे ट्रीपला गेले होते, त्यामुळे भाग पाठवण्यास उशीर झाला. आता सगळे भाग लवकर पोस्ट करेन. तसदीबद्दल मनापासून माफी मागते.
सदर कथा मालिकेचे लिखाण सुरु आहे.याचे पुढील भाग नियमितपणे ईरान फेसबुक पेजवर येतील. त्यामुळे पेजला फाॅलो करुन ठेवा ही विनंती.
सदर कथेचे कुठलेही भाग काॅपी करु नयेत. अगर अभिवाचनासाठी वापरु नयेत. असे आढळल्यास काॅपीराईट कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल.
कथा आवडल्यास कमेंट्स नक्की कराव्यात ही विनंती.
अष्टपैलू लेखक स्पर्धा - २०२५
सदर कथेचे कुठलेही भाग काॅपी करु नयेत. अगर अभिवाचनासाठी वापरु नयेत. असे आढळल्यास काॅपीराईट कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल.
कथा आवडल्यास कमेंट्स नक्की कराव्यात ही विनंती.
अष्टपैलू लेखक स्पर्धा - २०२५