कलम तीनशे चोपन्न
भाग बारावा
©® सौ.हेमा पाटील.
रश्मी झोपायला गेली पण तिची झोप काही लवकर लागली नाही: कारण तिच्या डोक्यात विचारांचे चक्र सुरू होते. विचार करत असतानाच तिला आठवले, आपले मैत्रीण वृषाली हिच्या यजमानांची स्पर्धा परीक्षा देऊन इन्स्पेक्टर म्हणून नेमणूक झालेली आहे. तिने त्यांची निवड झाल्याबद्दल पार्टी दिली होती. त्या पार्टीला तिने रश्मीला बोलावले होते. तेव्हा तिची त्यांच्याशी ओळख झाली होती. त्यांच्याशी बोलून काही होते का पहावे असे तिला वाटले.
वृषाली तिची बाल मैत्रीण होती. तसेच ओळख झालेली असल्याने तिच्या यजमानांशी रश्मी मोकळेपणाने बोलू शकली असती. उद्या सकाळी वृषालीला फोन करायचा असे तिने ठरवले. सकाळी उठल्यावर रोजची कामे पटापट उरकून रश्मीने मोबाईल हातात घेतला आणि वृषालीला फोन लावला.
वृषालीने विचारले,
" हाय रश्मी, कशी आहेस? आज एवढ्या सकाळी फोन केला आहेस. सगळे ठीक आहे ना?" यावर रश्मी म्हणाली,
" हो, मी ठीक आहे, पण मला जरा मदत हवी आहे."
" बोल ना! काय मदत हवी आहे?"
" अगं तुझी नाही, तुझ्या मिस्टरांची मदत मला हवी आहे. मला त्यांच्याशी एका केसच्या संदर्भात चर्चा करायची आहे." वृषाली म्हणाली,
" घरी येतेस का?" यावर रश्मी म्हणाली,
" घरी यायला कुठला गं वेळ? जरा अर्जंट काम आहे. त्यापेक्षा त्यांच्याकडे फोन दे. त्यांच्याशी मी फोनवरच बोलते. जर गरज असेल तर मग घरी येईन."
" काय झाले आहे गं? एनिथिंग सिरियस?" वृषालीने काळजीने विचारले.
" तुला परत सांगते निवांतपणे. आता त्यांच्याकडे फोन दे." असे रश्मी म्हणाली. वृषालीने तिच्या यजमानांना सांगितले की,
" माझ्या मैत्रिणीला, रश्मीला तुमच्याशी केसच्या संदर्भात काही तरी महत्वाचे बोलायचे आहे." असे म्हणत तिने महेश रावांच्या हातात फोन दिला. महेश रश्मीला ओळखत होते. कधी कधी एकमेकांकडे कार्यक्रमाच्या निमित्ताने जाणे येणे होत असे.
" हॅलो," असे महेश राव म्हणाले." काय काम काढले आहे माझ्याकडे?" यावर रश्मी म्हणाली,
" तुमचा सल्ला हवा आहे."
जे काही घडले होते ते सगळे थोडक्यात मुद्देसूदपणे रश्मीने महेश रावांच्या कानावर घातले. काल तिला सुचलेला मुद्दाही तिने सांगितला. यावर महेश राव म्हणाले,
" मी तुम्हाला एक सल्ला देऊ शकतो. तुम्ही एक काम करा. तुम्ही एसपी ऑफिस मध्ये एक अर्ज करा. त्या अर्जात तुम्ही लिहा की; सदर एफ. आय. आर. मध्ये जी विनयभंगाची तक्रार केली गेली आहे ती खोटी आहे. असे काहीही घडलेले नाही. आपला हेतू साध्य करण्यासाठी समोरच्या पार्टीने खोटी विनयभंगाची तक्रार दाखल केलेली आहे. कोर्टात जर एफ. आय. आर. नुसार आरोपी म्हणून संबंधित व्यक्तीला सादर केले गेले तर संभावित आरोपी म्हणून त्यांना समजले जाईल. याचा परिणाम त्या व्यक्तीच्या करिअरवर घडेल. त्यामुळे सदर एफ. आय. आर. मध्ये तपास करताना पोलीसांनी आरोपीचे मोबाईल लोकेशन, आणि सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज यांची तपासणी केली जावी. त्यामध्ये जर आरोपी त्या वेळेत त्या ठिकाणी हजर नसेल, दुसऱ्या ठिकाणी हजर असेल तर सदर एफ. आय. आर. कोर्टात दाखल करण्यात येऊ नये. त्या ऐवजी खोटी तक्रार दाखल केली आहे म्हणून समोरच्या पार्टीला दंड आकारण्यात यावा.तसेच त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्यात यावा. अर्जात गुन्हा घडल्याची एफ. आय. आर. मध्ये दिलेली तारीख आणि वेळ अवश्य नमूद करावी. सोबत एफ.आय.आर.ची झेरॉक्स जोडा. त्या अर्जात लिहा की; अशी तक्रार कोर्टात जर दाखल केली गेली तर त्याचा परिणाम संबंधित व्यक्तीवर होऊ शकतो. त्यांचा पासपोर्ट जप्त केला जाऊ शकतो. पुढच्या महिन्यात कामाच्या संदर्भात कंपनी त्यांना जर्मनीला पाठवणार आहे. अशी एफ. आय. आर. दाखल झाली तर संबंधित व्यक्तीला परदेशी जाण्यास प्रतिबंध केला जाऊ शकतो. अशा वेळेस चूक नसताना त्या व्यक्तीला फार मोठ्या नुकसानास सामोरे जावे लागेल. तुम्ही स्वतः याचा विचार करावा आणि आपले उत्तर मला व संबंधित पोलीस स्टेशनमध्ये कळवावे ही विनंती."
रश्मी बारकाईने सगळे बोलणे लक्षपूर्वक ऐकत होती. ती म्हणाली,
" खरंच असे होऊ शकते?" यावर इन्स्पेक्टर महेश म्हणाले ,
"हो, होऊ शकते. सर्वसामान्य कुणीही व्यक्ती एस. पी. साहेबांना जाऊन भेटू शकते. आपली तक्रार त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकते. त्यामुळे आजच्या आज तुम्ही त्यांना जाऊन भेटा." हे ऐकल्यावर रश्मीला बरे वाटले.
तिने थोडा विचार केला आणि मनाशी ठरवले की; आपण आजच एस.पी. ऑफिसला जाऊयात. ऑफिसमध्ये आज आपण येणार नाही असे तिने कळवून टाकले. तिने रात्री ॲडव्होकेट विवेक यांच्याकडून एफ. आय. आर. ची एक झेरॉक्स कॉपी आणली होती. ती तिने समोर ठेवली. ती समोर ठेवून तिने अर्ज लिहायला घेतला.

माननीय जिल्हाप्रमुख,
मी सौ रश्मी साकेत देशमाने,
अर्ज करते की, माझे पती श्रीयुत साकेत देशमाने यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा खोटा असून वैयक्तिक लाभासाठी तो करण्यात आलेला आहे. सदर तक्रारीमुळे घाबरून जाऊन माझे पती समोरच्या व्यक्तीची मागणी पूर्ण करतील यासाठी त्यांनी अशी एफ. आय. आर. दाखल केलेली आहे. यासोबत जो फोटो जोडला आहे त्या व्यक्तीला माझे यजमान ओळखत नाहीत. याआधी त्यांनी त्या महिलेला कधी पाहिलेले ही नाही. या तक्रारी मध्ये दिलेली वेळ संध्याकाळी साडेचार अशी आहे. त्या दिवशी माझे यजमान त्या ठिकाणी हजर नव्हते हे मी खात्रीपूर्वक सांगू शकते.

त्यामुळे सदर पोलीस स्टेशनमध्ये जिथे हा गुन्हा दाखल केलेला आहे त्या अधिकाऱ्यांना आपण सीसीटीव्ही कॅमेरा आणि मोबाईल लोकेशन तपासून खात्री करून घ्यावी आणि मग गुन्हा दाखल करावा अशी सूचना द्यावी ही विनंती करत आहे. जर सीसीटीव्ही कॅमेरा आणि मोबाईल लोकेशन बरोबर आले तरच आरोपीला कोर्टात दाखल करावे, अन्यथा संबंधित व्यक्तीला कोर्टासमोर आरोपी म्हणून सादर करु नये. त्याऐवजी जो तपास केला आहे, त्याची प्रत सादर करुन खोटा गुन्हा दाखल केला आहे हे कोर्टाच्या निदर्शनास आणून द्यावे. कोर्टात संबंधित तक्रारदार महिलेवर खोटा गुन्हा दाखल केला आहे म्हणून पोलिसांतर्फे गुन्हा दाखल करण्यात यावा अशी विनंती मी करत आहे.
असे निवेदन मी सौ. रश्मी साकेत देशमाने देत आहे. कृपया याचा साकल्याने विचार करण्यात यावा ही विनंती.
असा अर्ज लिहून तिने खाली स्वतःची सही केली आणि सोबत एफ. आय. आर. ची प्रत जोडली. कॅब बोलावून ती जिल्हा प्रमुखांच्या कार्यालयाकडे निघाली.
क्रमशः ©® सौ.हेमा पाटील.
काय होईल जिल्हा प्रमुखांच्या कार्यालयात? रश्मीच्या अर्जाचा उपयोग होईल? की इथेही शहा आपल्या बळाचा उपयोग करेल? हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.

सदर कथा मालिकेचे लिखाण सुरु आहे.याचे पुढील भाग नियमितपणे ईरान फेसबुक पेजवर येतील. त्यामुळे पेजला फाॅलो करुन ठेवा ही विनंती.
सदर कथेचे कुठलेही भाग काॅपी करु नयेत. अगर अभिवाचनासाठी वापरु नयेत. असे आढळल्यास काॅपीराईट कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल.
कथा आवडल्यास कमेंट्स नक्की कराव्यात ही विनंती.
अष्टपैलू लेखक स्पर्धा - २०२५