कलम तीनशे चोपन्न
भाग १५
©® सौ.हेमा पाटील.
गेल्या भागात आपण पाहिले, रश्मी इन्स्पेक्टर महेश यांच्या सांगण्यावरून जिल्हा पोलिस प्रमुखांना जाऊन भेटली व तिने निवेदन दिले. आता तिथून पुढे...
तिघेजण वडापाववर ताव मारत होते, एवढ्यात साकेतच्या मोबाईलची रिंग वाजली. त्याने बाहेर जाऊन मोबाईल उचलला. अननोन नंबर होता.
" हॅलो, कोण बोलतेय?" असे तो म्हणाला.
" मी इन्स्पेक्टर दळवी बोलतोय. काय साहेब, तुम्ही तर डायरेक्ट जिल्हा पोलीस प्रमुखांचे ऑफिसच गाठलेत. त्या दिवशी पवार कॉन्स्टेबल बाहेर आले होते. त्यांच्याशी मात्र तुम्ही काहीच बोलला नाहीत."

" काय बोलायचे होते?" असे साकेतने विचारले.
" मी त्यांना विचारले होते की; अजून काही बाकी राहिले आहे का? यावर त्यांनी "नाही" असे सांगितले. मी सहज बाहेर आलो आहे असे ते म्हणाले होते." यावर इन्स्पेक्टर दळवी म्हणाले,
" जाऊ दे, आता काय बोलणार ? पण पोलीस प्रमुखांकडे जायच्या आधी आमच्याशी संपर्क तरी साधायचा." यावर साकेत म्हणाला,
" मलाच आत्ता घरी आल्यावर समजले की, माझी पत्नी जिल्हा पोलीस प्रमुखांना जाऊन भेटून आली. मग मी तुम्हाला कधी सांगणार?" यावर इन्स्पेक्टर दळवी म्हणाले,
" बरं, असु दे . तुम्ही आत्ता जो मोबाईल वापरता तोच मोबाईल तुमच्याकडे नेहमी असतो ना हे विचारण्यासाठी मी तुम्हाला फोन केला आहे. तुमच्या मोबाईलचे लोकेशन आम्हाला चेक करायचे आहे."
यावर साकेत म्हणाला,
" गेली पाच वर्षे माझा हाच मोबाईल नंबर आहे. त्या दिवशी सुद्धा माझ्याकडे हाच मोबाईल होता."
हे ऐकल्यावर इन्स्पेक्टर दळवी म्हणाले,
" ठीक आहे. फक्त मोबाईल लोकेशन पुरेसे नाही. सीसीटीव्ही कॅमेरा बॅकअप सुद्धा चेक करायचे आहे." यावर साकेत म्हणाला,
" ठीक आहे साहेब. तुमचे काम तुम्ही करा. तुमच्या कामात आम्ही अजिबात ढवळाढवळ करणार नाही."
" ती तर तुम्ही ऑलरेडी केलेली आहे. साहेबांकडे जाऊन आमची तक्रार करायला नको होती." इन्स्पेक्टर दळवींच्या नाराजीचा सूर लक्षात आला म्हणून साकेत म्हणाला,
" हे बघा साहेब, आम्ही जिल्हाप्रमुखांकडे कोणाचीही तक्रार केलेली नाही. आम्ही फक्त सत्य काय आहे ते त्यांना सांगितले. यापेक्षा वेगळे आम्ही काहीही सांगितलेले नाही. आम्हाला न्याय हवा आहे. सत्य काय आहे ते आम्हाला माहित आहे. आमच्या विरुद्ध खोटी तक्रार दाखल केलेली आहे त्याच्या विरुद्ध आम्ही शक्य असेल तो लढा देत आहोत."
" ठीक आहे , तुमच्या पद्धतीने तुम्ही चाला. आमचे काम आम्ही करतो." असे इन्स्पेक्टर दळवी म्हणाले.
इन्स्पेक्टर दळवींचे बोलणे ऐकून रश्मी म्हणाली,
" जिल्हा पोलीस प्रमुख म्हणाले की; आमचे पोलीस खाते खालपासून वरपर्यंत भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे. शक्य आहे तेवढे प्रयत्न आम्ही करतो. याचा अनुभव आपल्याला आला आहे; परंतु आता आपण जिल्हा पोलीस प्रमुखांकडे गेल्यामुळे इन्स्पेक्टर दळवींचे हात बांधले गेले आहेत. तसेच मोबाईल लोकेशन आणि सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज या गोष्टी तांत्रिक आहेत. यात काही बदल करता येणार नाही. त्यामुळे जे काही सत्य आहे ते त्यांना जिल्हा पोलिस प्रमुखांपुढे ठेवावे लागेल. त्यांनी समोरच्या पार्टीकडून जरी पैसे घेतलेले असले तरीही आता ते काहीही करू शकत नाहीत. त्यांना कसलीही मदत करू शकत नाहीत."

हे ऐकल्यावर साकेत म्हणाला,
" खरंच आपल्या देशातील ही अशी अवस्था पाहून परदेशातच स्थायिक व्हावे असा विचार खूपदा मनात येतो; पण आपल्या देशाबद्दल असणारी तळमळ हा निर्णय घेऊ देत नाही." रश्मी म्हणाली,
" माझी बहीण उल्का सुद्धा असेच म्हणत होती. त्यामुळेच जर्मनीत स्थायिक व्हायचा निर्णय तिने घेतला आहे. देश सोडून जाणे हे मलाही पटत नाही . हे योग्य नाही. आपली बुद्धी, ज्ञान आपल्या देशासाठी वापरावे असेच मलाही वाटते. असो.
आत्ता आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे त्याचा विचार करुयात.
आपण जास्त प्रयत्न करू, पण यश मात्र खेचून आणू असा निग्रह मी केलेला आहे. पाहूया पुढे काय होते ते!" असे ती म्हणाली.

दोघे असे बोलत आहेत तोपर्यंत शहाचा फोन आला. साकेतने शहाचा फोन उचलला. शहा म्हणाला,
" तू तर फारच पोचलेला आहेस. डायरेक्ट जिल्हा पोलीस प्रमुखांशी संधान साधलेस." त्याची सभ्य भाषा जाऊन तो आता अरे तुरे वर उतरला आहे हे साकेतच्या लक्षात आले. साकेत म्हणाला,
" माझी सत्याची बाजू आहे, त्यामुळे शक्य होईल तेवढे प्रयत्न मी करणार." हे ऐकून शहा म्हणाला,
" तू कितीही लढलास तरीही अंतिम विजय माझाच होणार आहे हे लक्षात ठेव. अजूनही शहाणा हो, अन् ती जमीन माझ्या ताब्यात दे. मोबदला घेऊन सुखाने बाजूला हो. नाहीतर तुझी जमीन फुकापासरी जाईल. हे सांगायला फोन केला आहे. परत सांगितले नाही म्हणू नकोस."
हे ऐकून साकेत म्हणाला,
" मी तुला आजपर्यंत अनेक वेळा सांगितले आहे की; मला जमीन विकायची नाही."
यावर शहा म्हणाला,
" आता ती जमीन तू विकणार नाहीस. ती जमीन मी कशी बळकवतो ते तू डोळे उघडे ठेवून बघ." यावर साकेत म्हणाला,
" माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी ती जमीन माझ्या हातून जाऊ देणार नाही."
यावर शहा म्हणाला,
" मग इथून पुढे स्वतःच्या जीवाला सांभाळ." साकेत म्हणाला,
तू मला धमकी देत आहेस का?" यावर शहा म्हणाला ,
" नाही, मी तुला फक्त सांगतोय. तुझा भविष्यकाळ काय आहे त्याची तुला जाणीव करून देतोय." हे ऐकल्यावर रश्मी जवळ आली, आणि तिने मोबाईलच्या टॅपिंगचे बटन दाबले. तिने साकेतला खुणावले, पुढे बोल. त्यामुळे साकेत म्हणाला,
" आत्ता तुम्ही मला सांगितले, जमीन विकणार नसेल तर मी कशी बळकवतो ते बघ." शहा रागाने म्हणाला,
" हो बरोबर आहे. बघच तू! तूच राहिला नाहीस तर जमिनीचे काय झाले हे तुला कसे कळणार? आजपासून स्वतःच्या जीवाला कसे सांभाळता येईल ते बघ." यावर साकेत म्हणाला,
" याला धमकी देणे म्हणतात."
" तुला जे समजायचे असेल ते समज; पण आज पासून काउंटडाऊन सुरू झाला आहे एवढे नक्की!"
क्रमशः

काय होईल पुढे? गर्जेल तो पडेल का? शहा खरंच साकेतच्या जीवाचे काही बरेवाईट करेल? हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.
सदर कथा मालिकेचे लिखाण सुरु आहे.याचे पुढील भाग नियमितपणे ईरान फेसबुक पेजवर येतील. त्यामुळे पेजला फाॅलो करुन ठेवा ही विनंती.
सदर कथेचे कुठलेही भाग काॅपी करु नयेत. अगर अभिवाचनासाठी वापरु नयेत. असे आढळल्यास काॅपीराईट कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल.
कथा आवडल्यास कमेंट्स नक्की कराव्यात ही विनंती.
अष्टपैलू लेखक स्पर्धा - २०२५