कलम तीनशे चोपन्न
भाग १७
©® सौ.हेमा पाटील.
गेल्या भागात आपण पाहिले,रश्मीने पोलिस स्टेशनमध्ये जाऊन शहाच्या विरोधात तक्रार दाखल केली. आता ती जिल्हा पोलिस प्रमुखांच्या कार्यालयात पोहोचली आहे. आता पुढे...
लवकरच रश्मीचा नंबर आला. ती आत गेल्यावर साहेबांनी तिला ओळखले. ते रागावून बोलले,
" काल तुमच्यासमोर मी फोन करुन सांगितले आहे तरी आज परत आलात?"
यावर रश्मीने हातातील प्रत त्यांच्यासमोर ठेवली व म्हणाली,
" साहेब, आज मी वेगळ्या कामासाठी आले आहे. या विनयभंगाच्या तक्रारीच्या मागे जो आहे, त्या बिल्डर शहाने काल रात्री माझ्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्याची तक्रार मी पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. त्याची प्रत घेऊन मी आले आहे."
" हा कोण शहा? याचा आणि तुमच्या विनयभंगाच्या तक्रारीचा काय संबंध?"
" साहेब, तेच तुम्हाला सांगतेय. आमची सावर्ड्याला रस्त्याला लागून शेतजमीन आहे. तिथे अवतीभवती शेतकऱ्यांनी गुंठावारी जमिनी विकल्या आहेत. आमची जमीन शहाला त्याच्या प्रोजेक्टसाठी हवी आहे. ती आम्ही विकत नाही म्हणून तो आमच्या मागे हात धुवून लागला आहे. काल मी तुम्हाला येऊन भेटल्याचे त्याला समजले. रात्री रागारागाने तो माझ्या यजमानांशी फोनवर बोलत होता. त्यावेळी त्याने यांना जीवे मारण्याची धमकी दिली. आम्ही सामान्य माणसे आहोत साहेब. सिक्युरिटी मागवणे आम्हाला परवडणार नाही. मी फक्त एवढेच सांगायला आले आहे की, माझ्या नवऱ्याच्या जीवाला काही अपाय झाला तर याला जबाबदार शहा असेल. तसे मी अर्जात नमूद केले आहे."

" बरं, मॅडम मी बघतो काय करायचे ते. या पैशेवाल्यांना आलेला माज उतरवला पाहिजे. स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांना बेघर करणे नवीन नाही. मी लक्ष घालतो. तुम्ही ही काळजी घ्या. मिस्टरांनाही काळजी घ्यायला लावा. त्यांचा एखादा फोटो असेल तर द्या." तिने आपल्या मोबाईल मधला साकेतचा फोटो त्यांना दाखवला. त्यांनी शेजारी उभ्या असलेल्या पोलिस अधिकाऱ्याला तो फोटो मोबाइलवरून घ्यायला सांगितले व त्याची प्रिंट काढायला सांगितली.
" आता तुम्ही जाऊ शकता ताई. मी या प्रकरणात लक्ष घालतो." असे आश्वासन त्यांनी दिले.

रश्मी तेथून कॅब करुन घरी गेली. तिने साकेतला फोन केला. तोही निघाला होता. जपून ये असे त्याला सांगून ती स्वयंपाकघरात शिरली.
तिच्या मागोमाग छोटु आला. त्याला दूध देऊन तिने खेळायला पाठवले. काही वेळातच तो परत घरी आला.
" मला एक काका विचारत होते, तुझा डावा पाय मोडू की उजवा?" हे ऐकल्यावर रश्मी चमकली. ती म्हणाली,
" चल, मला दाखव कोण असे म्हणाले ते." ती त्याला घेऊन बाहेर आली तर रस्त्याच्या पलिकडे टु व्हिलरवर एक माणूस बसला होता. छोटुने त्याच्याकडे अंगुलीनिर्देश केला. ती रस्ता क्रॉस करून तिकडे निघाली होती, तेवढ्यात त्या माणसाने गाडीला स्टार्टर मारला आणि तो निघून गेला.
ती छोटुला घेऊन घरी आली." परत असे कुणी अनोळखी व्यक्ती काही बोलली तर ताबडतोब घरी निघून यायचे" अशी तिने छोटुला ताकीद दिली. नाही म्हंटले तरी ती घाबरली होती. तेवढ्यात साकेत घरी पोहोचला. साकेत फ्रेश होऊन येईपर्यंत तिने चहा ठेवला होता. त्याच्या हातात चहाचा कप देऊन तिने विचारले,
" आजचा दिवस कसा होता?"
साकेत म्हणाला,
" ठीक होता. काही विशेष घडले नाही."
तेव्हा तिने तक्रार दाखल करायला गेल्यावर इन्स्पेक्टर दळवी काय म्हणाले ते सांगितले. तसेच जिल्हा पोलिस प्रमुखांच्या कार्यालयात काय झाले तेही सांगितले. छोटुला धमकावलेले सुद्धा सांगितले.
ते ऐकून साकेत म्हणाला,
" आपल्याला काही झाले तरी चालेल, पण छोटुला काही होता कामा नये. तसे काही झाले तर मी स्वतःला माफ करु शकणार नाही. मला वाटतं आता आपला अट्टाहास पुरे झाला. देऊन टाकूया ती जमीन. आपल्यासाठी आपला छोटु हीच मोठी दौलत आहे. माझ्या बाबांच्या आत्म्याची मी माफी मागेन की त्यांनी सोपवलेली इस्टेट मला सांभाळता आली नाही."

यावर रश्मी म्हणाली,
" अरे, थोडी कळ काढ. जरा विश्वास ठेव. जगात सगळी माणसे वाईट नसतात. पोलिस स्टेशनमध्ये जरी वाईट अनुभव आला असला तरी जिल्हा पोलिस प्रमुखांनी यात लक्ष घालतो असे आश्वासन दिले आहे. त्यांनी तुझा फोटो मागून घेतला आहे. आपण त्यांच्यावर थोडा विश्वास ठेवायला हवा."
साकेत म्हणाला,
" ठीक आहे. तू सांगतेयस तर ठेवतो विश्वास, पण माझा आता कुणावरही विश्वास उरलेला नाही."

" बरं, तुम्ही दोघेजण आता छोटुचा होमवर्क उरकून घ्या. मी पटकन भाकरी करते. मग आपण जेवून घेऊ." असे म्हणत रश्मी किचनमध्ये शिरली.
तिने आज डाळकांदा,भात आणि भाकरी बनवल्या होत्या. आज परत शहाचा फोन येतो का याकडे साकेतचे लक्ष होते, पण कुणाचाच फोन आला नाही. जेवण झाल्यावर तिघेही शतपावली करण्यासाठी बाहेर पडले तर खाली कोपऱ्यावर एक नवीन माणूस उभा असलेला दिसला. त्याला पाहिल्यावर रश्मीने व साकेतने एकमेकांकडे पाहिले. त्या माणसाला क्राॅस करुन ते दोघे पुढे गेले. सहजच रश्मीने मागे वळून बघितले तर काही अंतर ठेवून तो माणूस त्यांच्या मागे येत होता. कोपऱ्यावरच्या दुकानात तिघांनी मॅंगो कुल्फी घेतली व ते परत घराकडे निघाले. तो माणूस आडोशाला उभा राहिला हे रश्मीने पाहिले. ते तिघे तिथून सरळ घरी आले. घरी आल्यावर रश्मीने दार किलकिले करुन पाहिले तर तो माणूस उभा असलेला दिसला. तिने साकेतला सूचना दिली की; "ऑफीसला जाताना इकडेतिकडे पहात चाल. बसपर्यंत पोहोचेपर्यंत सावध रहा."
छोटुला स्कूल बसपर्यंत सोडायला जेव्हा ती गेली, तेव्हाही तो माणूस तिथेच उभा होता.
त्यानंतर आवरुन ती जेव्हा ऑफीसला जाण्यासाठी बाहेर पडली तेव्हा ही तो तिथेच उभा होता.

क्रमशः ©® सौ.हेमा पाटील.
कोण होता तो माणूस? शहाने यांच्या पाळतीवर माणूस ठेवला होता का? काय होईल पुढे? शहा त्यांच्या प्लॅनमध्ये यशस्वी होईल? हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.
सदर कथा मालिकेचे लिखाण सुरु आहे.याचे पुढील भाग नियमितपणे ईरान फेसबुक पेजवर येतील. त्यामुळे पेजला फाॅलो करुन ठेवा ही विनंती.
सदर कथेचे कुठलेही भाग काॅपी करु नयेत. अगर अभिवाचनासाठी वापरु नयेत. असे आढळल्यास काॅपीराईट कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल.
कथा आवडल्यास कमेंट्स नक्की कराव्यात ही विनंती.
अष्टपैलू लेखक स्पर्धा - २०२५