कलम तीनशे चोपन्न
भाग १६
©® सौ.हेमा पाटील.
मागील भागात आपण पाहिले, शहाचा साकेतला धमकीचा फोन आला होता. आता तिथून पुढे...
साकेतने फोन ठेवला आणि तो रश्मीकडे पाहू लागला. रश्मी म्हणाली,
" या शहाने तर सरळसरळ धमकी दिली. आपण जिल्हा पोलिस प्रमुखांना जाऊन भेटलो हे चोवीस तासांच्या आत त्याला समजले पण. कुणी सांगितले असेल?"
" त्याचा शोध घेण्याची काही गरज आहे का? सरळसरळ समजतेस कुणी सांगितले असेल ते." साकेत म्हणाला.
रश्मीने तिच्या मोबाईल वरुन फोन लावला. हे पाहून साकेतने विचारले,
"आता कुणाला फोन करतेयस?"
तेवढ्यात पलिकडून फोन उचलला.
" बोल गं रश्मी. मी तुझा निरोप यांच्यापर्यंत पोहोचवला होता. "
" त्यासाठी मी फोन केला नाही. दुसरे काम होते. जरा त्यांना फोन देतेस का?"
वृषाली म्हणाली,
"देते हं. जरा थांब."
" हॅलो. मला वृषालीने मगाशी सांगितले. बघा बरं गेलात ते बरे झाले की नाही?"
" हो. तुम्ही जो सल्ला दिलात त्यासाठी धन्यवाद. आता जरा काळजी कमी झाली होती, तोपर्यंत दुसरे संकट समोर उभे राहिले आहे."
" आता काय झाले?" इन्स्पेक्टर महेशनी विचारले.
" अहो, त्या शहाचा फोन आला होता. त्याने धमकी दिली आहे की, आता तुझा काऊंटडाऊन सुरु झाला आहे. स्वतःच्या जीवाची काळजी घे. आता तुझी जमीन कशी बळावतो ते बघ. ते बघण्यासाठी तू जिवंत असणार नाहीस. आम्ही घाबरुन गेलो आहोत. जीवापेक्षा जमीन जास्त आहे का? शहाने साकेतला काही केले तर? मग ती जमीन असून काय उपयोग?"
" घाबरुन जाऊ नका. एवढे सोपे असते का एखाद्याचा जीव घेणे? उद्या सकाळी जाऊन पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करा. फोन वरुन धमकावले आहे. माझ्या नवऱ्याच्या जीवाला धोका आहे अशी तक्रार दाखल करा."
" मी मोबाईल वर बोलणे टेप केले आहे. "
" तेही जाताना घेऊन जा. त्याचा पुरावा म्हणून वापर करता येणार नाही, पण तक्रार दाखल करताना त्याचा उपयोग होईल. तक्रार दाखल केली की त्याची एक प्रत तुम्हांला मिळेल. त्याची झेरॉक्स काढून त्यासोबत एक अर्ज जोडून तोही जिल्हा पोलिस प्रमुखांना देऊन या. म्हणजे प्रसंगाचे गांभीर्य त्यांच्या लक्षात येईल. पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करताना शहाचे नाव नक्की सांगा. मोघमपंचे कुणाचा तरी फोन आला होता असा पोलिस उल्लेख करतील. त्याकडे लक्ष द्या. एन. सी. आधी नीट वाचून पहा, मग सही करा."
रश्मी म्हणाली,
" होय. तुम्ही जे जे सांगितले आहे ते मी लक्षात ठेवेन. उद्या सकाळी जाते मी."
" ठीक आहे. काही अडचण आली तर मला फोन करा. माझा नंबर वृषाली तुम्हाला वाॅटस्अप वर पाठवेल."
रश्मीने फोन ठेवला. काळजीत असणाऱ्या साकेतला तिने फोनवर जे काही बोलणे झाले ते सांगितले. यासोबतच तिने सांगितले,
" आपण हलगर्जीपणा करायचा नाही. त्याने सरळसरळ धमकी दिली आहे. तू पुढचे काही दिवस कंपनीच्या बसने ऑफीसला जा. गाडी वरुन जा ये करु नकोस. तसेच कायम सावध रहा. अवतीभवती लक्ष असू देत."
" तुझे काय? तो तुलाही काही करु शकतो." साकेत म्हणाला.
" माझी काळजी करु नकोस. मी तर ट्रेनने प्रवास करते. त्यामुळे माझ्या बाबतीत तू निश्चिंत रहा. तसेच घरापासूनच माझ्या सोबत लीना असते. माझ्या जीवाला काही बरेवाईट करुन त्याचा काय फायदा? त्यामुळे असले काही तो नक्की करणार नाही. "
दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे आटपून रश्मी ऑफीसला गेली. तिथे गेल्यावर तिने हाफ डे टाकला व दुपारी ती सिटी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी आली. तिथे इन्स्पेक्टर दळवी बसले होते. रश्मी त्यांच्यासमोर जाऊन उभी राहिली.
" बोला मॅडम, काय काम आहे?" त्यांनी रश्मीला विचारले.
" तक्रार दाखल करायची आहे."
" कुणा विरुद्ध? नवऱ्याविरुद्ध? की सासू आणि नणंदेविरुद्ध? लग्नाला किती वर्षे झाली?"
" मला घरातील कुणा विरुद्ध तक्रार दाखल करायची नाही."
" मग काय विनयभंगाची तक्रार दाखल करायची आहे का?"
" नाही. माझ्या यजमानांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्याविरुद्ध तक्रार दाखल करायची आहे."
" कुणी दिली आहे धमकी?"
" बिल्डर शहा यांनी धमकी दिलेली आहे." शहांचे नाव ऐकताच इन्स्पेक्टर दळवींच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले हे रश्मीच्या लक्षात आले.
" शहा? तुमचे नाव काय मॅडम?" इन्स्पेक्टर दळवींनी रश्मीला विचारले.
" रश्मी साकेत देशमाने."
" अच्छा! तुम्ही साकेत देशमाने यांच्या मिसेस आहात तर..."
" हो." असे रश्मी म्हणाली.
" तुमच्या साहेबांना जरा समजावून सांगा. या बड्या माणसांशी वैर धरणे बरे नव्हे. काय तो जमिनीचा व्यवहार आहे तो करुन टाका. चार पैसे मिळतील. नाहीतरी चार वर्षांनी तरी विकणारच ना ती जमीन? मग आत्ताच विकून टाका. शहाला मी तुम्हाला एक फ्लॅट पण द्यायला सांगतो. आपण सर्वसामान्य माणसे. आपण यांच्या पासंगाला पण पुरणार नाही." इन्स्पेक्टर दळवी म्हणाले.
" माझी तक्रार तुम्ही दाखल करुन घेणार आहात की नाही?" रश्मीने विचारले.
"घेतो मॅडम, पण मी सांगतोय त्यावर पण विचार करा. पाण्यात राहून माशाशी वैर करु नये." एवढे सांगून ही रश्मी बधत नाही हे पाहून इन्स्पेक्टर दळवींनी तिला तक्रार दाखल करण्यास घेऊन जाण्यासाठी लेडी काॅन्स्टेबल रुपाला हाक मारली. रुपा सोबत ती आत गेली. तिची रितसर तक्रार नोंदवून घेतली. तिने ते काळजीपूर्वक वाचले आणि मग सही केली. त्याची एक प्रत घेऊन ती पोलिस स्टेशनच्या बाहेर पडली. त्याच्या चार झेरॉक्स काढून तिने तिथेच बसून अर्ज लिहिला व ती तडक जिल्हा पोलिस प्रमुखांच्या कार्यालयात गेली. सुदैवाने तिथे फारशी गर्दी नव्हती. ती आपला नंबर येण्याची वाट पाहत बसून राहिली.
क्रमशः ©® सौ.हेमा पाटील.

सदर कथा मालिकेचे लिखाण सुरु आहे.याचे पुढील भाग नियमितपणे ईरान फेसबुक पेजवर येतील. त्यामुळे पेजला फाॅलो करुन ठेवा ही विनंती.
सदर कथेचे कुठलेही भाग काॅपी करु नयेत. अगर अभिवाचनासाठी वापरु नयेत. असे आढळल्यास काॅपीराईट कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल.
कथा आवडल्यास कमेंट्स नक्की कराव्यात ही विनंती.
अष्टपैलू लेखक स्पर्धा - २०२५