कलम तीनशे चोपन्न
भाग २०
©® सौ.हेमा पाटील.
इन्स्पेक्टर दळवी यांनी फोन करून साकेतला त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही असे सांगितले. तिथून पुढे...
फोन ठेवल्यावर साकेतने रश्मीला त्यांच्यात जे काही बोलणे झाले ते सांगितले. त्यानंतर त्याने ॲडव्होकेट विवेक याला फोन केला. गेल्या चार-पाच दिवसात ज्या काही घडामोडी झाल्या, जे काही घडले ते सगळे त्याला सविस्तरपणे सांगितले. जे काही ऐकले ते विवेकसाठी अनपेक्षित होते. तो म्हणाला,
" वहिनींनी तर सिक्सरच मारला की राव! थेट जिल्हा पोलीस प्रमुखांना जाऊन भेटल्या. बरे झाले, त्यामुळे पोलिस यंत्रणा हलली. तुला कोर्टाची पायरी चढायची वेळ आली नाही. तुझे टेन्शन कमी झाले. नाही तर सुरवातीला प्रत्येक तारखेला कोर्टात हजर रहावे लागले असते. भलेही केस खोटी असली तरीही ते सिद्ध करेपर्यंत लढावे लागलेच असते. शहाचे दात वहिनींनी पद्धतशीरपणे त्याच्या घशात घातले. मस्त! वहिनींचे पुन्हा एकदा अभिनंदन!"

हे ऐकल्यावर साकेतला छान वाटले. तो म्हणाला,
" जे घडले ते चांगलेच झाले; परंतु पोलिसांनी त्या महिलेवर खोटी विनयभंगाची केस दाखल केली म्हणून गुन्हा दाखल केला आहे. त्या संदर्भात मला माहिती हवी आहे. त्या माझ्यावर दाखल झालेल्या केस चे अहवाल व पुरावे पोलिसांनी कोर्टासमोर हजर केले आहेत. ही एफ. आय. आर. खोटी आहे असा अहवाल दिलेला आहे. त्याची कॉपी आपल्याला मिळेल का?" यावर विवेक म्हणाला,
" ते सगळे तुला कशासाठी हवे आहे ?" यावर साकेत म्हणाला,
" जेव्हा मला पोलीस स्टेशनमध्ये अटकवाॅरंटवर सही घेण्यासाठी बोलावले होते; त्यावेळी बोलता बोलता कॉन्स्टेबल पवार म्हणाले होते की, हा विनयभंगाचा गुन्हा घडताना प्रत्यक्ष पाहणारे साक्षीदार आहेत. आता मला हा प्रश्न पडला आहे की, सदर गुन्हा घडलाच नाही तर हा गुन्हा घडला अशी साक्ष कोणी दिली होती?"

यावर विवेक हसला आणि म्हणाला,
" अरे, असे पैशाला पासरी माणसे भेटतात, जे खोटी साक्ष देतात."
" यासाठीच मला ती कोण माणसे आहेत हे पहायचे आहे. तसेच त्या महिलेने माझ्यावर खोटी विनयभंगाची तक्रार केली होती. त्या महिलेवर मला अब्रू नुकसानीचा दावा दाखल करायचा आहे. यासाठी काय कागदपत्रे लागतील त्याचा तपास कर आणि ते सगळे गोळा करून माझे कुठे सही लागणार असेल किंवा माझी काही कागदपत्रे लागणार असतील तर मला सांग. हा दावा तूच दाखल करायचा आहेस.

तत्पूर्वी पोलिसांनी त्या महिलेवर जो गुन्हा दाखल केला आहे त्याच्या पहिल्या तारखेस मला कोर्टात हजर राहायचे आहे. त्या महिलेविषयी सगळी माहिती तू तुझ्या हस्तकांकरवी काढायची आहेस. याचा उपयोग आपल्या अब्रू नुकसानीच्या दाव्यासाठी होईल." यावर विवेक म्हणाला,
" अरे साकेत, तू तर वकीली भाषा बोलायला लागलास. हे सगळे आमचे काम आहे."
यावर साकेत म्हणाला,
"माणसावर वेळ आली की सगळे आपोआप सुचते. रश्मीला नाही का सुचले तिच्या मैत्रिणींशी बोलावे असे? तिच्या मैत्रिणीचे यजमान इन्स्पेक्टर आहेत. त्यांनीच तिला योग्य सल्ला दिला आणि जिल्हा पोलिस प्रमुखांना भेटायला सांगितले. कसा अर्ज करावा हेही सांगितले. त्या दिवशी तुझ्याकडून एफ. आय. आर. ची एक झेरॉक्स रश्मी मागून घेऊन आली होती, त्याचा उपयोग झाला. तीच झेरॉक्स जोडून तिने जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयात अर्ज केला होता. त्यांनी जातीने लक्ष घालून इन्स्पेक्टर दळवी यांना सर्व सूचना दिल्या त्यामुळे हे सगळे घडले."

यावर ॲडव्होकेट विवेक म्हणाला,
" अरे सगळीच माणसे वाईट नसतात. ठीक आहे, तू जे सांगितले आहेस, त्या मार्गाला मी लागतो. जेव्हा गरज लागेल तेव्हा मी तुला फोन करेन आणि कुठली कागदपत्रे लागणार आहे ती तयार ठेवायला सांगेन. सगळे पूर्ण झाले की तुला सही करायला बोलावेन. तसेच तू सांगितलेस ती केस कोर्टात कधी आहे याचाही मी तपास करतो." हे ऐकल्यावर साकेतने फोन ठेवला.

रश्मी त्याचे बोलणे ऐकत होती. ती म्हणाली,
" जाऊ दे ना. आपण या सगळ्या झंझटीतून सुटलोय ना? कशाला पुन्हा यात वेळ घालवायचा?" यावर साकेत म्हणाला,
" असे कसे? जर निर्दोष सुटलो नसतो तर किती त्रास झाला असता? आणि आधीचे चार दिवस किती मानसिक त्रास झाला? या महिलेला याची जाणीव झाली पाहिजे. चार पैसे घेऊन विनयभंगाचा गुन्हा कुणावरही दाखल करणे सोपे आहे, पण त्या मानसिकतेतून जाणाऱ्या माणसाला किती त्रास होत असेल याची जाणीव तिला तेव्हा होईल जेव्हा तिच्यावर गुन्हा दाखल होईल. यासाठीच मला तिच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करायचा आहे."

हे साकेतचे बोलणे रश्मीला पटले. तिने त्यास अनुमोदन दिले.
" ठीक आहे. यातही मी तुझ्या सोबत आहे."
त्यानंतर इन्स्पेक्टर दळवी यांचा पुन्हा फोन आला. आता हे काय म्हणतात असा प्रश्न साकेतच्या मनात आला. इन्स्पेक्टर दळवी यांनी सांगितले,
" तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये यावे लागेल." हे ऐकल्यावर साकेत गडबडला. तो म्हणाला,
" थोड्या वेळापूर्वीच तुम्ही फोन करून सांगितले आहे ना की; तुमच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही. मग मला कशासाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलावत आहात?" हे ऐकल्यावर इन्स्पेक्टर दळवी म्हणाले,
" हा वेगळा मॅटर आहे. तुमच्या घराजवळ संशयितपणे फिरणाऱ्या एका इसमाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याची ओळख पटवण्यासाठी तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये बोलावत आहे. सोबत तुमचा मुलगा आणि तुमची पत्नी यांनाही घेऊन या. तुमच्या मुलाला एका व्यक्तीने तुझा पाय तोडतो असे म्हंटले. ती व्यक्तीही आमच्या ताब्यात आहे. त्यामुळे तुम्ही तिघेजण पोलीस स्टेशनमध्ये येऊन जा. उद्या दिवसभरात कधीही आलात तरी चालेल." हे ऐकल्यावर साकेत म्हणाला,
" आम्ही तर तक्रार दाखल केली नाही, तरीही तुम्ही आमची एवढी काळजी घेत आहात?"
" आम्हांला वरुन आदेश आले आहेत." हे ऐकल्यावर साकेत म्हणाला,
"ठीक आहे. येतो आम्ही उद्या सकाळी."
हे ऐकल्यावर रश्मी म्हणाली,
" त्यादिवशी साध्या कपड्यातल्या पोलिसांनी सांगितले होते की; या इसमाला मी पोलीस स्टेशन मध्ये घेऊन निघालो आहे. तो माणूस शहाचा होता याची मला खात्री आहे. पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावर आपण दोघांनी तसाच जबाब द्यायचा हे लक्षात ठेव." हे ऐकल्यावर साकेतनेही मान डोलावली.

शहाने लावलेल्या कलम तीनशे चोपन्नच्या जाळ्यात साकेत सापडला नाही, म्हणून त्याने त्याला भीती घालण्यासाठी तो माणूस त्याच्या घराजवळ उभा केला होता. जेणेकरून त्याला घाबरून साकेत जमीन विकायला तयार होईल; परंतु भलतेच घडले. त्या इसमाला पोलिसांनी पकडून नेले. आता तो जे काही बोलेल त्यामुळे शहा अडचणीत येण्याची दाट शक्यता होती. अशा तऱ्हेने शहाचा साकेतच्या जमिनीवर ताबा मिळवण्याचा बेत धुळीस मिळाला. आपल्या वडिलोपार्जित इस्टेटीला धक्का लागण्याची वेळ आली होती, पण धाडसाने संकटाला सामोरे गेल्यामुळे ती वेळ टळली. कलम तीनशे चोपन्नचा साकेतने जो धसका घेतलेला होता, त्यातून तो सही सलामत बाहेर पडला. आलेल्या या संकटातून तावूनसुलाखून बाहेर पडल्याने त्याचा आत्मविश्वास अधिक दुणावला होता. आता आपल्या वडिलांच्या स्मृतीला वंदन करुन तो अधिक जोमाने संकटाला सामोरे जाण्यास तयार झाला होता...
समाप्त.©® सौ.हेमा पाटील.
प्रिय वाचकहो, कथा कशी वाटली ते कमेंट्स द्वारे नक्की कळवा ही विनंती.

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा