कलंक प्रेमाचा 8

Lovestory

रोहन आणि प्रिया प्रवासाला निघाले. थोडा वेळ शांततेत गेल्यावर रोहनने प्रियाला विचारले, तुला कोणती गाणी आवडतात.

"मला जुनी गाणी आवडतात. आणि तुम्हाला?"

"जुनीच..." एवढं बोलून त्याने त्याच्या कारमध्ये ठेवलेले जुन्या गाण्यांचे कलेक्शन तिला दाखवले..

प्रिया दिसावी म्हणुन रोहन फ्रंट मिरर सेट करायचा. पण आत्ता मात्र उलट होतं. आता प्रिया फ्रंट मिरर मधुन रोहन दिसेल अश्या पद्धतीने तो सेट करुन बसली होतीस..


रोहन ने म्युझिक सिस्टीमवर जुनी गाणी लावली. प्रिया आणि रोहन दोघेही त्या गाण्यावर धून पकडून गाणी गाऊ लागले.

प्यार हुआ

इक़रार हुआ है

प्यार से फिर

क्यों डरता है दिल

कहता है दिल,

रस्ता मुश्किल

मालूम नहीं है कहाँ मंज़िल


खरं तर दोघांनाही कळलं नव्हतं कि दोघे इतक सुरु पकडत गाणी गाण्यात कधी आणि कसे गुंतले.  

प्रवास भरपूर लांबचा होता म्हणून रोहन आणि प्रियाने एका हॉटेलमध्ये जेवण केले व पुढच्या पुन्हा पुढच्या प्रवासाला लागले. जेवण करून आल्यावर प्रियासोबत काय बोलावं ह्या विचारात रोहन असताना काही मिनिट अशीच शांततेत गेली.


"जेवण छान होत ना " रोहनने प्रश्न केला.. पण प्रियकडून काहीच उत्तर आलं नाही..

प्रिया आपल्या प्रश्नाच उत्तर देत नाही हे बघत रोहनने प्रियाकडे पाहिले..


"प्रिया..." त्याने तिला आवाज सुद्धा दिला..

पण प्रिया मॅडम गाढ झोपी गेलेल्या. रोहन फ्रंट मिरर मधुन तिच्या निरागस चेहऱ्याकडे बघत रहातो आणि गालातल्या हसतो. झोपेत खुप गोड दिसत होती ती.. आणि मुळात मन भरेपर्यंत तिला निरखून बघायला त्याला मिळत होतं..

रोहनची जशी गाडी उजव्या बाजुने कडे वळली तसं प्रियाच डोक त्याच्या खांद्यावर येऊन टेकल. रोहनला खूप भारी वाटल.


"धकधक.. धकधक.." त्याच्या हृदयाने सुद्धा गाडीसोबत वेग पकडला.

तो तिला तसच झोपू देतो. तिच्या बंद डोळ्यांवर वळवळणारे केस.. ज्याच्या तो प्रेमात पडलेला.. त्यांना त्याने अलगदपणे बाजुला केले.. पण प्रियाला त्याच्या बोटांचा स्पर्श होणार नाही ह्याची काळजी त्याने घेतली.

जवळ पासून 9 तासांचा प्रवास पार पाडून अखेर तो काकांकडे पोहचला.. पण प्रिया मात्र अजुनही झोपलीच होती..

खरं तर आज ती पुर्ण पणे ऋषीला विसरून गेलेली आणि मनसोक्त रोहन सोबत गप्पा मारलेल्या म्हणुन रोहन तिला नीट कळलेला.. मनावर असलेला भार तिचा कुठे तरी कमी झालेला आणि म्हणुनच तिला गाढ झोप लागली..

रोहनला तर तिला उठवावस वाटत नसत.


"प्रिया, उठतेस...?? " रोहनने हळु आवाजात तिला विचारलं..


पण प्रियाला त्याचा आवाज ऐकूनच गेला नाही.


"ए राणी उठतेस का...? " असं म्हणत रोहनने हळूच तिचा हात हलवला..

तस प्रियाला जाणवलं की ती रोहनच्या खांद्यावर आहे. ती लगेच उठुन सरळ बसली.


"आपण गावी पोहचलो पण? " तिने रोहनला विचारलं.


"हो.. बाहेर बघ.." रोहन म्हणाला तसं प्रियाने कार बाहेर पाहिले..

कार बाहेर रोहनची काकी हातात भाताचा गोळा आणि तांब्यात पाणी घेऊन दोघांची नजर काढायला उभी होती.. सोबत गावातील इतर मंडळी सुद्धा प्रियाला बघण्यासाठी गर्दी करुन होती. रोहनने त्याच्या स्वभावाने खूप माणस जोडली होती.


रोहनच्या काकीने दोघांचीही नजर काढली आणि त्यांना आत घेतल..

सगळी मंडळी प्रियाला भेटायला येऊ लागली.


"नशीब काढलस लेकी आमच्या रोहनसारखा मुलगा मिळाला. शोधूनही कुठे सापडणार नाही.. " गावातील प्रत्येक जण तिला असं बोलुन जात होती..

प्रत्येकाच्या तोंडून रोहनची होणारी स्तुती ऐकुन प्रिया खरकच आतल्या आत सुखावत होती. सगळी जण रोहन आणि प्रियाचा निरोप घेऊन आपापल्या घरी निघुन गेले.


तसं काकीने दोघांनाही जेवायला वाढले. रोहन गाडी ड्राइव्ह करुन इतका थकला होता कि, तो बाहेर हॉलमध्येच एक उशी घेऊन आडवा झाला. प्रिया काकींना मदत करत किचनमध्येच होती.


"माझ्या लेकाने खुप वाईट दिवस काढलेत लेकी. आता कुठे मुलगा माझा सुखात आहे. खूप साद आहे ग बाळ माझं. माझ्या पदरी देवाने मुल दिलंच नाही. पण रोहन ने मला त्या गोष्टीची कमी कधी भासूच दिली नाही. कधी दुखवू नकोस ग माझ्या लेकाला. त्याच्याजवळ फक्त तुला प्रेम मिळेल. राग हा माझ्या रोहनला माहीतच नाही.." एवढं बोलताना काकींचे डोळे पानावले..


" काकी तुम्ही असे रडू नका. " काकींच्या खांद्यावर हात ठेवतच प्रिया म्हणाली.


"रडत नाही ग.. लेकाचा सुरू झालेला संसार बघुन खुप छान वाटतय बघ. मला सून पण खूप लाडाची आणि गोड भेटली." अस म्हणत काकीने प्रियाला मिठी मारली.


"चल आता रात्र खूप झालीय झोपुयात.. " असं म्हणत काकी प्रियाला घेऊन बाहेर येऊ लागली.


हॉलमध्ये असलेल्या सोफ्यावर उशी घेऊन झोपलेला रोहन प्रियाला दिसला..


"बघितलंस किती दमलेला ते. मगाशी चेहऱ्यावर दाखवल सुद्धा नाही.. कसं निरागस होऊन झोपलय माझं बाळ.." गाढ झोपी गेलेल्या रोहनचा मुका घेतच काकी म्हणाल्या..


प्रियासाठी आणि स्वतःसाठी खाली जमिनीवरच त्या अंथरून घालु लागल्या.


प्रिया मात्र रोहनकडे बघत राहिली.

"आपण मस्त पैकी गाडीत झोपुन गेलो आणि रोहन मात्र गाडीच चालवत राहिले.. खरच खुप दमले असणार.. " प्रिया स्वतःशीच बोलत होती.

काकींकडुन एकदा चादर घेत प्रियाने रोहनच्या अंगावर टाकली.

रोहन जणु चादरीचीच वाट बघत होता असं वाटलं. प्रियाने चादर टाकताच रोहनने चादरीत संपूर्ण अंग लपवल आणि कूस बदलली..

"म्हणजे माझा अंदाज खरा ठरला.. रोहनला थंडी वाजत होती.." प्रिया स्वतःशीच पुटपुटली.

आपण रोहनला हळूहळु ओळखू लागलोय म्हणून गालातल्या गालात ती हसत होती.


" उद्या देवदर्शनाला जायचंय तुम्हाला.. झोपुन घे लवकर.."काकी प्रियाला म्हणाली.


प्रवासात प्रियाने चांगलेच ताणून दिलेले त्यामुळे तिला झोप काही येत नव्हती.. पण तरीही ती झोपण्याचा प्रयत्न करत होती. दिवसभर घडलेले प्रसंग तिच्या डोळ्यां समोरून तरंगत होते. तिला खरच रोहन आवडू लागलेला. मंद दिव्याच्या प्रकाशात ती रोहनकडेच बघत झोपली. त्याला बघता बघता तिचा डोळा कधी लागला हे तिचं तिला सुद्धा कळलं नाही.

   दुसऱ्या दिवशी,

प्रिया आणि रोहन दोघेही देवदर्शनासाठी जायला निघाले..

प्रिया रोहनच्या काका काकींजवळ त्यांच्यासोबत सोबत देवदर्शनाला चला म्हणून हट्ट करू लागली..

काकीने आधी तर खूप आढेवेढे घेतले पण... प्रियाच्या हट्टीपणा पुढे त्यांनी हार मानली.. आणि त्या सुद्धा त्यांच्यासोबत देव दर्शनासाठी जाण्यास तयार झाल्या.. सोबत काका सुद्धा..

आपल्या काका काकीजवळ हट्टीपणा करणाऱ्या प्रियाकडे रोहन बघतच राहिला.. जर रोहनने काका काकूंना आमच्यासोबत चला असे सांगितले असते तर ती दोघ आलीच नसती. प्रियाच त्याला कौतुक वाटु लागलं. चौघेही देवदर्शन करून घरी आले.


ठरल्याप्रमाणे दोन दिवस काका काकुंकडे मुक्काम करून दोघेही पुन्हा मुंबईला निघाले. रोहनने गाडी चालू केली. प्रिया मात्र काका काकुंच घर दिसेनासे होईपर्यंत त्यांना हात हलवून बाय करत होती. नेहमी रोहन दोघांत संभाषण व्हावं म्हणून विषय चालू करायचा. पण आज मात्र प्रियाने बोलायला सुरवात केली..

"किती छान आहेत तुमचे काका काकु?? मला खुप आवडले.." प्रिया म्हणाली..

"हम्मम.." रोहन ने फक्त हुंकार भरला.

"एक बोलू? " त्याच्याकडे परमिशन घेतच तिने विचारलं.

"बोलणं ..." तो म्हणाला.

"मला अजून थोडे दिवस इथे राहवस वाटत होतं. किती सुंदर निसर्ग आहे हा. असा निसर्ग मुंबईत थोडीना बघायला मिळतो.." खिडकी बाहेर बघतच प्रिया म्हणाली..


"तू असं म्हणतेस तर मी गाडी परत फिरवतो.." रोहनला प्रियाच मन मोडायला जमणार नव्हतं..

"खरच..? " उत्साहीत पणे तिने विचारलं.

"हो खरच. पण उद्यापासून तुला तुझ्या कामावर रुजू व्हायचं. बघ सुट्टी मिळत असेल तर.. माझी काही हरकत नाही. मला काय मी इथे बसून पण काम करू शकतो.. मी लॅपटॉप सुद्धा सोबत आणलाय.." असं म्हणत रोहनने तिला एका महत्वाच्या गोष्टीची आठवण करुन दिली..

"नको... राहू दे.. जाऊयात आपण..." प्रिया उदास चेहऱ्याने खिडकी बाहेर दिसणारे डोंगर आणि दऱ्या बघू लागली.

"ऐकणं... आता पुढच्या महिन्यात जत्रा आहे. खूप धमाल असते इथे तेव्हा येऊया का. पण तुला चालणार असेल तर.??" रोहन ने असं म्हटल्यावर प्रियाची नाराजी दुर झाली..


"हो चालेलना.." रोहनला गोड हसुन दाखवतच ती म्हणाली..

क्रमशः


@lovenovelsstudio ह्या माझ्या युट्युब चॅनल्सवर कथा ऑडिओ स्वरूपात उपलब्ध आहे. ज्यांना ही कथा ऐकायला सुद्धा आवडेल त्यांनी नक्कीच ऐका.. कथा इतरत्र शेअर करताना लेखकाच्या नावानेच करा..


🎭 Series Post

View all