कलंक प्रेमाचा 2

Love Story


कलंक प्रेमाचा - 2


रविवारचा दिवस उजाडला.. तो दिवस ज्यादिवशी रोहन आणि प्रियाचा एकमेकांना बघण्याचा कार्यक्रम ठरला होता.

रोहनला आई वडील नव्हते. एक बहीण आणि तो. दोघांनाही काका काकीने सांभाळून मोठं केल होतं. रोहन लहान असतानाच रोहनच्या वडिलांनी देव आज्ञा घेतली आणि रोहनचं ग्रॅज्युएशन पुर्ण झालं तसं त्याची आई हार्ट-एटक च्या निमित्ताने स्वतःच्या दोन्ही मुलांना पोरक करून गेली. रोहनने खूप मेहनत घेऊन स्वतःच्या बळावर नोकरी मिळवली. बहिणीच लग्न लावुन एक मोठा भाऊ म्हणुन स्वतःची जबाबदारी त्याने पार पाडली. मुंबई सारख्या शहरात स्वतःच्या मेहनतीने त्याने घर घेतलं. त्यात त्याला त्याच्या काका काकूंनी खुप साथ दिली. काका काकींमुळे रोहन ने स्वतःला कधीच पोरकं समजलंच नव्हतं.


स्थळ : निंबाळकरांच घर

प्रिया तैयार होऊन बसली होती. गुलाबीसर सिल्क जरीची साडी. ज्याला सोनेरी रंगाची विण. प्रियाचा गोरा रंग त्या साडीत खुलून निघत होता. केस मोकळे सोडलेले आणि अंगावर तिने तिच्या आत्तापर्यंतच्या कमाईतून स्वतःसाठी केलेले दागिने. वहिनीने जास्तच आग्रह केला म्हणुन ओठांना गुलाबी केलेलं आणि डोळ्यांच्या किनाऱ्या तिने काजळा ने भरल्या. जेव्हा आज तिने स्वतःला आरश्यात नीट पाहिलं तेव्हा तिला स्वतःच्या सौंदर्याची जाणीव झाली.. रोहनची वाट बघत खिडकी बाहेर डोकावून ती उभी होती.

"चिवzz चिव zz " गॅलरीत असलेले लव्हबर्ड तिचं लक्ष वेधून घेऊ लागले.

त्यांची पिंजऱ्यात सुरु असणारी मस्ती बघता प्रियाच्या चेहऱ्यावर स्मित उमटले.

"किती भारी आयुष्य आहे तुमचं.. कसलंच टेन्शन नाही.." प्रिया स्वतःशीच पुटपुटली.

पण एका बंदिस्त खोलीत डांबून ठेवलेल्या जीवनात कसल आलय सुखी पण?? हा प्रश्न करायला त्या लव्ह बर्डना बोलता कुठे येत होत.

इतक्यात रोहन गाडीतून उतरला. त्याच्यासोबत त्याची बहीण, बहिणीचा नवरा आणि त्याचे काका काकी असे चार सोबती होते..

रोहनची ही पहिलीच वेळ होती मुलगी बघायची त्यामुळे तो खूप घाबरत होता.. त्यातल्या त्यात त्याची बहीण त्याला धीर देत होती.

"किती घाबरतोसरे दादू तू?? एवढं काही नसतं. हे बघ तुला मुलगी नाही आवडली की आम्ही नंतर कळवतो म्हणून आपण सरळ निघुयात आणि आवडली तर हो बोलूयात. तसं पण मी मुलीचा फ़ोटो बघितलाय.. मुलगी न आवडण्याचा प्रश्नचं येणारं नाही."

हि म्हणजे आपली सीमा... म्हणजेच आपल्या रोहनची बहिण..

आपल्या भावाला वाटणारी भीती कमी करण्याच काम ती करत होती.

"मला नको वाटतंय ग हे सगळ.. मला ना लग्नच करायचं नाही पण तू आणि काकी दोघी माझं ऐकूनच घेत नाही. " रोहन छोटंसं तोंड करत म्हणाला.

"आयुष्यभर एकटं रहाणार काय??" सीमा ने विचारलं.

"आयुष्यभर एकटं राहु नये असा कुठे रुल सुद्धा नाही ना मग काय प्रॉब्लेम आहे??" रोहन

"हाच तर प्रॉब्लेम आहे कि असा कुठे रुल च नाही. आत्ता जाऊयात? मुलीकडचे वाट बघत असतील." ओठ रुंदावतच तिने रोहनला म्हटले. सोबत भुवया सुद्धा उडवल्या..


तो पुढे काही बोलणार तोच सीमाच्या नवऱ्याने दोघांनाही टोकले, "तुम्हा भाव बहिणीच्या गप्पा गोष्टी झाल्या असतील तर चला आता."

"आत्ता पुन्हा माझ्या नवऱ्याने काही बोलायच्या आत गप्प्पपणे आत चल.." सीमा लटका राग रोहनला दाखवत पुढे निघाली..

रोहन ने वर आकाशात पाहिलं.

" वाचव रे बाबाss ही पहिलीच वेळ आहे माझी. " मनात देवाच्या धावा करतच तो म्हणाला आणि जस तो खाली बघणार तसं त्याची नजर लव्हबर्ड सोबत रमलेल्या प्रियाकडे गेली. हवेच्या झुळकेने उडणारे तिचे केस मधुनच तिचा चेहरा झाकत होते.. अधुन मधुन गुलाबी ओठांचा चंबु बनवत ती शिटी सुद्धा वाजवत होती. लवबर्डसची पिंजऱ्यात मस्ती सुरु झाली कि तिच्या त्याच गुलाबी ओठांवर स्मित उमटायच.. प्रियाला तो बघतच राहिला.. तिच्यावरून त्याची नजर हटतच नव्हती. लव्ह एट फर्स्ट साईट म्हणतात ना अगदी तसंच..

सगळ्यात महत्वाचं तर त्याला हेच माहिती नव्हतं की आपण ज्या मुलीला बघायला येणार होतो हि तिच आहे कारण रोहन साहेबांनी मुलीचा फोटो सुद्धा बघितला नव्हता. स्वतःच्या बहिणीवर आणि काकीवर आंधळा विश्वास ठेवुन तो मुलगी बघायला आला होता..


आपला भाऊ अजुनही मागेच आहे हे बघुन सीमा पुन्हा त्याच्या जवळ आली..

"दादू चलनाss " म्हणत त्याचा हात पकडत त्याला खेचत तिथुन घेऊन जाऊ लागली. रोहन पहिल्यांदाच कोणत्या तरी मुलीच्या प्रेमात पडला होता. प्रियाला बघुन अजुनही तो तिच्याच विचारात होता. हृदयाने पडकलेला वेग अजुनही तसाच होता.


घरातील सगळी मंडळी जिने चढत प्रियाचं घर गाठण्याच्या तैयारीत होती.. हिच संधी बघुन रोहनने सीमाचा हात पकडत तिला मागे ओढले..

"दादु ss काय झालं?? पडली असती ना रे मी. " सीमा ने दबक्या आवाजात विचारलं..

"आता आपण ज्या मुलीला बघायला जाणार आहोत त्या मुलीत मला काहीच इंटरेस्ट नाही. मला कोणी तरी दुसरी आवडते. आपण नको ना बघायला जाऊयात हिला." फक्त सीमाला ऐकु जाईल इतक्या हळु आवजात तो म्हणाला.

"तू वेडा झालास काय ? काल पर्यंत मी तुला विचारत होती कि तुला कोणी आवडतं असेल तर सांग पण नाही.. तुला तुझ्या बहिणीपासून सगळं लपवून ठेवायचं असतं.. " सीमा थोडीशी चिडत म्हणाली.. हाताची घडी घालुन तिने नकटा राग स्वतःच्या भावाला दाखवला.

सीमा चे गाल ओढत तिची समजूत काढतच रोहन म्हणाला, "प्लिज हेल्प मी ना बच्चा.."

त्याने केलेला केविलवाणा चेहरा बघुन सीमा लगेचच विरघळली..

 "ह्यातून तुझी सहजा सहजी सुटका काही होणार नाही.. आपण एक कामं करूयात, आत्ता आलोच आहोत तर मुलगी बघुन घेऊयात.." सीमा म्हणाली.

"जर मुलगी पसंतचं पडणार नाही मग बघण्याचा प्रश्नच नाही ना येत. काका काकींना समजव आणि त्यांना इथुन निघुयात म्हणुन सांग ना.. " रोहन अगदी लहान मुलासारखा हट्ट करू लागला.

"अचानकपणे झोपेतून जागा झालास आणि वर हट्टी पणा लावलायस.. तु बोलतोयस तसं काही करायला मी जाणार नाही आणि जरी समज तुझ्यावर असणाऱ्या प्रेमा पायी मी असं काही करायला गेलीच तरी काका काकू असं काही करायला अजिबात तैयार होणार नाहीत." सीमाने असं म्हणताच रोहनचा चेहरा बावला.

आपल्या भावाचा छोटा झालेलेला चेहरा बघता सीमा ने थेट त्याच्या गळ्यात हात टाकला. एखाद्या मित्राप्रमाणे अगदी ऐटीतच ती त्याला म्हणु लागली, " मी काय म्हणते दादु आत्ता आलोच आहोत तर आपण मुलीला बघुन टाकुयातच ना. "

"पण नाही बघितलं तर नाही चालणार का??" पुन्हा रोहन ने तेच वाक्य म्हटलं तसं सीमाचं टाळकंच जणु सटकल..

"प्रेमाने सांगितलेलं समजत नाही का तुला?" सीमा दटावत म्हणाली.

"तु दम कसली देते ग मला?? मोठा भाऊ आहे मी. " रोहन डोळे मोठे करतच म्हणाला. खरं तर आपली छोटी बहिण आपल्याला दम देतेय म्हणुन थोडासा खजिल झाला तो. पण तसं बघायला गेलं तर लहान बहिणीसमोर त्याचं काहीच चालायच नाही.. खरं तर तो स्वतःच चालवू द्यायचा नाही. खुप प्रेम करायचा तो तिच्यावर.

"डोळे मिटून खोल श्वास घे.. " स्वतः ची छाती थोडीशी फुगवतच तिने म्हटले..

रोहन ती सांगु लागली तसं करू लागला.

"आत्ता मी काय सांगते ते शांत पणे ऐक. तु मान खाली घालुन शांत बस. आत गेल्यावर मी सगळ्यांना हेंडल करते. तुझी हि लहान बहिण तुझ्या सोबत असताना तुम्हे डर किस बात का दादु??" सीमाने आपल्या लाडक्या दादुला हसवण्यासाठी डायलॉग मारला..

"तु पक्का मॅनेज करशील ना??" रोहन ने पुन्हा एकदा खात्री करून घेतली.

"हॊ रे दादु.. त्यांना आपण सांगु कि आम्ही नंतर कळवतो. नंतर कळवतो बोलल्यावर त्यांना जे समजायचं ते ती लोकं समजतील.." सीमा स्वतःच्या अनुभवाचे बोल रोहनला सांगु लागली.

दोघांची कुजबुज ऐकून रोहनचे भाऊजी म्हणाले, "तुम्ही दोघे इथेच बैठक घेत आहात काय?? चला वर्ती. काका काकू गेले सुद्धा पुढे."

रोहन आणि सीमाने एकमेकांकडे पाहिले आणि प्रियाच्या घरी येऊन बसले. प्रियाच्या भावाने आणि वडिलांनी त्याचं स्वागत अगदी छान पद्धतीने केलं..

रोहन दिसायला साधासा पण चार चौघात उठून दिसेल असा. सावळा रंग, ओठांच्या इंच भर अंतरावर असणारी त्याची बिअर्ड दाढी, सोबत त्याच रेखीव नाक आणि आकर्षित ओठ त्याच्या चेहऱ्यावर आणखीनच उठुन दिसत होत. प्रियाच्या आई वडिलांनी रोहनला फोटोत बघुनचं पसंत केलेलं पण रोहनला प्रत्यक्ष बघुन आणि भेटुन तर तो त्यांच्या आणखीनच पसंतीत उतरला. काहीही करून मुलाकडून होकार मिळाला तर आपल्या प्रियाने नशीबच काढलं असं प्रियाच्या घरच्यांना वाटु लागलं. रोहन वरून त्यांची नजर काही हटतच नव्हती. प्रियाच्या घरातील प्रत्येक मंडळी आपल्याकडेच बघतायत हि गोष्ट रोहनला अस्वस्थ करू लागली. थोडीशी भीती सुद्धा त्याला वाटु लागली. कधी आपण इथुन निघतोयस असं रोहनला झालेलं..

रोहनचे काका मुलीकडच्याना काही प्रश्न विचारत होते.

"प्रियाचं एम. कॉम झालंय आणि एका खाजगी कंपनीत ऑफिसर लेव्हलला ती काम करते. जेवण खुप स्वादिष्ट बनवते. समजूतदार आहे. " प्रियाचे वडिल म्हणाले..


प्रियाची स्तुती तिच्या घरच्यांच्या तोंडून ऐकुन तिला भेटण्याचा मोह रोहनच्या काका काकूंना झाला..


रोहनच्या काकांनी मुलीला बोलवा म्हणून सांगितले.


इथे रोहन मात्र खिडकीत बघितलेल्याच मुलीचा विचार करत बसला. प्रियाने आणून दिलेले पोहे त्याने प्रियाकडे न बघताच प्लेट मधून उचलले. प्रियाने देखील रोहनकडे बघितलं नाही. ती सगळ्यांना पोह्याने भरलेल्या प्लेट देऊन तिथेच बाजूला उभी राहिली. इकडे सीमा (रोहनची बहिण) हळूच आपला हाताचा कोपरा रोहनला मारत एकदा तरी मुलीकडे बघ म्हणून खुणावत होती. जेव्हा प्रिया चहाच कप घेऊन पुन्हा रोहनजवळ आली तेव्हा फॉर्मेलिटी म्हणून रोहनने प्रियाकडे बघू पाहिले..

ट्रे मधुन चहाचा कप उचलायला घेतलेला हात त्याचा थरथरू लागला.. त्याने कप तसाच ट्रे मध्ये ठेवत हात खाली घेतला.

त्याचा थरथरणारा हात पाहुन प्रियाने त्याच्याकडे पाहिले आणि त्याने तिच्याकडे.. दोघांचीही नजरा नजर झाली..


क्रमश :


काय होईल कळेल पुढील भागात.


(कथा परवानगी शिवाय ऑडिओ करुन युट्युब किंवा इतर कुठे टाकण्याचा प्रयत्न अजिबात करू नका.. कारण कथा @lovenovelsstudio ह्या माझ्या युट्युब चॅनल्सवर उपलब्ध आहे. पण तरीही इतर कोणी ऑडिओ करून जर ती युट्युबवर टाकण्याचा प्रयत्न केला तर कारवाई नक्कीच केली जाईल. चॅनल्स उभ करण्यासाठी केलेली मेहनत माती मोल होईल.. पण जर कथा आवडत असल्यास, फॉलो नक्की करा.. जेणेकरून कथेच्या पुढील भागाचे नोटिफिकेशन तुम्हांला मिळत जाईल. आणि सोबतच तुमच्याकडून छोटीशी कमेंट मिळाली तर खूप छान वाटेल...)

🎭 Series Post

View all