कलंक प्रेमाचा 4

Love Story


प्रियाची नजर एका पिसिओ बूथवर येऊन थांबली.


पिसिओ बूथ वरून ऋषीला कॉल करुन बघुयात असा विचार तिच्या डोक्यात आला आणि तिने त्याला कॉल लावला सुद्धा..

आश्चर्य म्हणजे समोरून कॉल उचलला गेला..

"हॅलो... " इतक्या दिवसांनी तिने ऋषीचा आवाज ऐकला.. समोरून ऋषीचा आवाज तिला आला.

"हॅलो, हॅलो..." ऋषी समोरून हॅलो हॅलो करत होता.

पण प्रिया मात्र निःशब्दच होती. तिला फक्त नी फक्त फक्त रडूच येत होतं.. प्रियाने फोन सरळ कट करुन टाकला.

"सुयश बोलतो तेच खरे आहे. ह्यालाच माझ्याशी बोलायचंच नाही. मग मीच का मागे मागे पळते ह्याच्या. प्रिया स्वतःशीच बोलत रस्त्याने चालत होती. अश्यातच तिला एक अनोळखी नंबरवरून कॉल आला. प्रियाने तो उचलला. फोन वर तिची होणारी नणंद होती. म्हणजेच आपली सीमा..!


"हॅलो वहिनी..."

प्रियाने सीमाचा आवाज ओळखला नाही. ओळखणार तरी कसं..? एकदाच तर भेट झाली होती त्यांची..


" सॉरी.. मी नाही ओळखलं तुम्हांला? कोण बोलतंय..?" प्रियाने नम्रतेनेच विचारल.


"अग मी सीमा. तुझी होणारी नणंद.

सॉरी...
तुम्हाला अस अरे तुरे केलेलं चालेल ना?? "
प्रियाकडून तीने परमिशन मागितली.. आपण डायरेक्टली मैत्रीण असल्यासारखं बोलू लागलोय हे कळल्यावर सीमाने लगेचच तिची चूक सुधारली.. प्रियाकडुन प्रतिसाद मिळण्याची वाट पाहु लागली ती..


इथे प्रिया मात्र थोडी घाबरली,
अचानक सीमाचा फोन कसा काय आला आपल्याला.. आणि आपला नंबर कसा मिळाला असे हजार प्रश्न तिच्या डोक्यात फिरु लागले.


"हॅलो, हॅलो..."


सीमाचा आवाज आला तसं ती प्रश्नमंजूषेतून बाहेर पडली..


"हो चालेलना. मी विचार करत होती तुम्हाला नंबर कसा मिळाला ते .. " प्रिया म्हणाळी.


"तुम्हांला नकोना बोलूस.. तुला बोल.. मी लहान आहे ग तुझ्यापेक्षा.." सीमाने तिला छोटीशी रिक्वेस्ट केली..


"बर बर.. तुला.. मी विचार करत होती तुला नंबर कसा मिळाला.??"


"त्याच काय झालं माझ्या काकांनीच तुझ्या वडिलांकडून नंबर मिळवून दिला तूझा... दादाने ना साखरपुड्याची सारी आणि अंगठी पसंत केली. पण तुला आवडेल तीच साडी घेऊया अस त्याच म्हणणं आहे. माझा दादा खूप सादा आणि लाजरा आहे. त्याला तुझ्यासोबत ह्या विषयी बोलायला जमणार नाही म्हणून मीच लावला फोन. तुला जमेल का यायला आज.?? " सीमाने प्रश्न केला..


"आज?? " प्रिया ने उलट प्रश्न केला तिला..


"प्लिज बघना ग माझ्यासाठी. हे बघ आम्ही तुला पिकअप करू आणि घरी ड्रॉप पण करू. प्लिज नाही नको बोलूस... " सीमाने इतकं लाडात विचारल्यावर प्रियाला तिला नाही बोलायला जमानारच नव्हतं...


"बरं.. ठिक आहे... पण मी एकदा घरी पण विचारून बघते. पप्पांची परमिशन घ्यावी लागेलना मला.." प्रिया म्हणाली..


"अग वहिनी त्याची काहीही गरज नाही ग. मी तुझ्या पप्पांकडून तशी परमिशन घेतलीय.." सीमाने पुर्ण प्रिपेर होऊनच प्रियाला कॉल केलेला..


"बरं.. ठिक आहे मग.. मी कुठे येऊ.? " प्रियाने विचारलं..


"तू आहेस तिथेच थांब... आम्ही येतोय तुला न्यायला." सीमा म्हणाली..

प्रियाने त्यांना ती कुठे आहे ते सांगितलं आणि ऑफिसच्या बिल्डिंग बाहेर असलेल्या एका बाकड्यावर बसुन त्यांची वाट पाहु लागली..

खरं तर ती स्वतःच्याच विचारात हरवून गेलेली. प्रियाला स्वतःच्या वहिनीची आठवण झाली. जी नेहमी प्रियाला अहो जावो करते. जसं सीमाने तिला अरे तुरे करायचू परमिशन दिलेली तसं प्रियाने केलेलं नव्हतं.

"मला अहो जाओ करू नकोस.. " असं सुद्धा ती बोलली नव्हती..

आणि एवढ्या आपुलकीने साधा फोन सुद्धा तीने कधी आपल्या वहिनीला केला नव्हता.

आयुष्यात येणार प्रत्येक नातं वेगवेगळे अनुभव देऊन जात तसं प्रियाला आज वाटु लागलेलं..


"आपण किती नशीबवान आहोत जे अस घर आपल्याला मिळाले." असं सुद्धा तिला वाटलं..

त्यातल्या त्यात तिला ऋषीची बहीण आठवली. एकदा सहज ऋषी फोन उचलत नव्हता म्हणून तिने तिला फोन लावला..

आणि तुला ऋषी कुठे आहे? माहीत आहे का?? म्हणून विचारलं. तर तिने डायरेक्ट…

"तुला? व्हॉट यु मीन तुला? तुम्हांला बोल. " असं म्हणत तिचा अपमान तर केला आणि

"वर मी त्याच्यावर पारख ठेवून नसते?? " असे कटू शब्द वापरत रागातच फोन कट केला.

त्यानंतर तिने कधीच ऋषीच्या बहिणीला फोन केला नाही.


प्रिया त्याच विचारात असताना कोणी तरी गाडीचा हॉर्न वाजवल.. ती तिच्या विचारांतुन बाहेर पडली.. समोरच फॉर व्हीलर उभी होती..

गाडीच्या मागील विंडोची काच तिच्या होणाऱ्या नंदेणे खाली केली आणि तिला हात दाखवून तिथे यायला सांगितलं.

प्रिया उठून लगेच तिथे गेली. कार मधुन रोहन बाहेर पडला. रोहनला बघताच प्रियाच हृदय जोरात धडधडू लागलं.

रोहनला बघताच प्रियाच हृदय जोरात धडकू लागलं. प्रियाची घाबरलेली अवस्था रोहनला कळली.


म्हणून त्याने तिला विचारलं "तू सीमासोबत मागे बसशील? तुला चालणार असेल तर? "

प्रियाने घाबरतच त्याला हो म्हणून उत्तर दिलं.

रोहनने कारचा डॉर उघडला तसं प्रिया आत जाऊन बसली.

ती आत बसली तसं गालातल्या गालात हसतच रोहनने डॉर बंद केला आणि ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसला.


प्रिया आत येऊन बसली तसं सीमाने तिला प्रेमाने मिठी मारली. प्रियाला खूप गहिवरून आलं. सीमाच्या मिठीत एक वेगळीच जादु होती. आपुलकी तर ठासून भरली होती. तिच्या प्रेमाने प्रियाच्या हृदयावर प्रेमाचे पडसाद उमटवले.


सीमा आणि तिच्यात जुजबी बोलणं झालं..

गाडीने थोडं अंतर पार केलं नाही तसं रोहनने गाडी बाजुला घेतली आणि दोघींनाही गाडीतून उतरायला सांगितलं.

दोघींनी खिडकी बाहेर स्वतःच्या माना काढल्या. आजू बाजूला ना साडीच दुकान होत ना सोनाराच.


सीमाने रोहनला विचारलं, " दादु... कुठे रे गाडी थांबवलीस?? "

त्यावर रोहन उत्तर देत म्हणाला, " ती आत्ताच सुटली ऑफिसमधून.. भुक लागली असेल. थोडं खाऊन घेऊया आणि मग जाऊया पुढे."

स्वतःचा सिट बेल्ट उघडत तो गाडी बाहेर पडु लागला.

गाडी बाहेर पडणाऱ्या रोहनकडे प्रिया बघतच राहिली.


"चालेलना तुला.? " गाडीचा दरवाजा अर्धवट उघडा ठेवत रोहनने तिला प्रेमानेच विचारलं.


"हम्म...! " प्रिया उत्तरली.


रोहन मागोमाग दोघीही कार बाहेर पडल्या.

तिघांनीही पोटभर नाश्ता केला व तिथुनच शॉपिंगला गेले.


साडी घेताना दुकानदार खुप साड्या दाखवत होता. सगळ्या साडीवरून प्रियाची नजर फिरत होती पण तिच्या पसंतीती एकही साडी उतरत नव्हती.

आपण दुसर दुकान बघुयात का? असं ती विचारणार तितक्यात रोहनला एक साडी पसंत पडली. त्याने दुकानदाराला ती दाखवायला सांगितली. प्रियाला आणि सीमाला देखील ती साडी आवडली.

"हि साडी आवडली का प्रिया तुला.? रोहनने विचारले.

प्रियाने लाजतच हो म्हणून सांगितले.

"खरच चालेलना तुला. नाही तर दुसरी बघुयात.. जबरदस्ती नाही.." रोहन ने पुन्हा खात्री करुन घेतच विचारलं.

त्याच्या आवाजात एक वेगळाच आपलेपणा होता. जो तिच्या हृदयावर छाप पाडत होता..

आत्ता खर तर प्रियाची वेळ होती रोहनच्या प्रेमात पडायची पण अजूनही तिला वाटत होतं कि ऋषीच बेस्ट...

काश ऋषीने एवढं जरी केलं असत माझ्यासाठी तरी किती भारी वाटलं असतं माल.. ती पुन्हा ऋषीच्या विचारात हरवून गेली.

तितक्यात सीमा म्हणाली, "चला तर मग हाताबरोबर अंगठी ही घेऊन टाकूया"

तिघेही साडीच्या दुकानातून बाहेर पडले..

साडीच्या दुकानाच्या समोरच सोनाराच दुकानं होतं. सीमाच्या ओळखीतलेच सोनार होते म्हणुन दागिण्यांची शॉपिंग तिथूनच करावी असं त्यांचं ठरलं होतं..

प्रिया दुकानात पाऊल टाकाणार तोच तिला घरून फोन आला. फोन तिच्या वडिलांचा होता..

समोरून वडिल म्हणाले, "सोनारकडे जाणार असशील तर जावई बापूंना पण अंगठी घेऊन टाक. पैसे मी पाठवतो."

प्रियाने वडिलांना हो म्हटले आणि तीने फोन कट केला..


ती फोन वर बोलत असताना रोहन आणि सीमा तिच्याकडेच बघत होते. दोघेही तिच्यासाठी दुकाना बाहेरच थांबून होते.


"ते... पप्पांचा फोन होता.. " ती घाबरतच म्हणाली.

"त्यांना सांगितलंसं ना अंगठी घ्यायला येतो म्हणुन? " रोहन काही विचारणार त्या आधीच प्रियाने विचारलं.

रोहन खरं तर हेच तिला विचारणार होता.. पण त्याच्याआधी सीमा विचारून मोकळी झाली.. म्हणुन रोहनच तोंड छोटं झालं.

तू मला काही बोलायलाच देत नाही असे भाव नजरेत उतरवत तो स्वतःच्या बहिणीला नजरेने खुणावत होता..

दोघा भाऊ बहिणींचे इशारे सुरू झाले..


प्रियाने दोघां भावा बहिणीवरून नजर टाकली आणि थोडं घाबरतच विचारल, "तुम्हाला आवडलं नाही का..?


"तसं नाही ग.. दादु मला तुला विचारायला सांगतोय कि शॉपिंग करुन मग जेवूनच घरी जाऊयात असं तुला सांगायला. ते काय आहे ना, माझा दादु थोडा लाजाळू आहे. "
स्वतःच्या भावाला त्रास द्यायचं कामं सुरू होतं..


"मला चालेलं. म्हणजे मी घरी तसं फोन करुन कळवते पण पप्पा बोलले कि हाताबरोबर तुम्ही पण अंगठी घेतली असती तर बरं झालं असतं. "

प्रियाने रोहनकडे बघत म्हटले.


रोहन ने तिला लगेच हो म्हटले आणि तिच्यासाठी दरवाजा उघडून दिला..


तसं प्रिया आत शिरली आणि तिच्या मागोमाग सीमा आणि रोहन..


तिघेही अंगठी पाहु लागले..

रोहनला. मात्र ह्या वेळेला काहीच पसंत नव्हतं पडत..


तिथे प्रियाला एक अंगठी खूप आवडली. नाजुक आणि आकर्षित.. बघताच कोणालाही आवडेल अशी..


ती खूप एक्साईटमेंटमध्ये म्हणाली, "ऋषी ही बघ कशी?"


आपण अचानकपणे ऋषीच नाव घेतल ज्याची तिला जाणीव झाली तसं ती थंडच पडली.. रोहनकडे बघायची तिची हिंमतच होतं नव्हती हातात.. रोहनने ऋषी कोण असं विचारल्यावर काय सांगायचं त्याला? हातात पकडलेली अंगठी सुद्धा थरथरू लागली.. तरीही तिने घाबरतच रोहनकडे पाहिले..


क्रमशः

@lovenovelsstudio ह्या माझ्या युट्युब चॅनल्सवर कथा ऑडिओ स्वरूपात उपलब्ध आहे. ज्यांना ही कथा ऐकायला सुद्धा आवडेल त्यांनी नक्कीच ऐका.. कथा इतरत्र शेअर करताना लेखकाच्या नावानेच करा..

🎭 Series Post

View all