कलंक प्रेमाचा 5

Love Story

रोहनने ऋषी कोण असं विचारल्यावर काय सांगायचं त्याला? हातात पकडलेली अंगठी सुद्धा थरथरू लागली.. तरीही तिने घाबरतच रोहनकडे पाहिले..

दोघेही भाऊ बहिण तिच्यापासून थोडे दुरच उभे होते.. दोघांचीही दुसऱ्या दुकानात जाऊयात ह्यावर चर्चा सुरू होती.

म्हणजे रोहन ने काही ऐकलं नाही.. असं म्हणत प्रियाने सुटकेचा श्वास सोडला..

पण तिच्या मनात विचार आला कि, ऋषी बद्दल रोहनला सगळं सांगुण टाकावे पण त्यांनी समजुन नाही घेतल आणि आपल्या घरी सांगितलं तर??

प्रिया थोडी घाबरली.. आणि तिने शांत बसण पसंत केलं.

तरीही मनात येणारे विचार काही केल्या थांबत नव्हते..

सीमा प्रिया जवळ आली..

"वहिनी.. दादालाना इथे काहीच पसंत पडत नाही.. आपण दुसरीकडे बघुयात..? सीमाने प्रियाला विचारलं..

"मलाना त्यांच्यासाठी एक अंगठी आवडली.. " असं म्हणत प्रियाने रोहनसाठी पसंत केलेली अंगठी तिला दाखवली.

"छान आहे ग.." असं म्हणत सीमा अंगठी न्याहाळू लागली.

"त्यांना विचार ना. जर त्यांना पसंत पडणार असेल तर घेऊयात.." प्रियाने अवघडतच सीमाला विचारलं..

"दादु... तुझ्या होणाऱ्या बायकोने तुझ्यासाठी अंगठी पसंत केलीय.. तुला आवडते का बघ.." सीमा इतक्या मोठ्याने ओरडली कि सोनाराच्या दुकानात जमलेल्या इतर मंडळींना सुद्धा ऐकु गेलं..

रोहन लगेचंच त्याला दोघींजवळ आला.

"बच्ची... किती मोठ्याने ओरडते ग तू.. सगळेच इथेच बघु लागलेत. " संपुर्ण दुकानावर नजर फिरवतच रोहन सीमाला म्हणाला.

"सगळ्यांना मार गोळी.. आणि ही अंगठी बघ.. तुला आवडली तर हिच फायनल करूयात.." स्वतःच्या भावाच्या खांद्यावर हात टाकतच तिने म्हटले.

रोहनने प्रियाकडे पाहिले.

त्याच्या पासुन स्वतःची नजर चोरून प्रिया उभी होती. रोहन आपल्याकडेच बघतोय ही गोष्ट तिला अस्वस्थ करत होती.

का माहिती का?? पण तो जवळ जरी आला तरी हृदय धडधड करू लागायच तिचं..

तो तिच्याकडे बघु लागला तरी तिच धडधड...

आणि तो तिच्या सोबत बोलू लागला तरी तेच.....!

"मला आवडली अंगठी.. हिच घेऊयात.. " प्रियाकडे बघतच रोहन म्हणाला.. बोलताना रोहनच्या ओठांवर स्मित होतं..

तसं प्रियाने नजर वर करुन त्याच्याकडे पाहिले..

"मला पण एक अंगठी तशी आवडलीय तुझ्यासाठी.. तुला पसंत पडत असेल तर तिच घेऊ, नाहीतर दुसऱ्या दुकानात बघुयात.." रोहन म्हणाला.

त्याने त्याला पसंत पडलेली अंगठी तिला दाखवली.

"छान आहे.. हिच घेऊयात..! "
नजर खाली ठेवतच ती म्हणाली. रोहनकडे बघायची हिंमतच तिची होतं नव्हती..

"नक्की? " त्याने प्रेमानेच विचारलं.

तिने हो मध्ये मान डोलवली..

फायनली दोघांच्याही अंगठ्या घेऊन झाल्या तसं तिघेही निघाले.

ह्या सगळ्या गडबडीत रात्रीचे 9 वाजून गेले..

"मी निघु इथुनच.. तुम्ही दोघे डीनर करूनच जावा.." सीमा म्हणाली.

नाही म्हणायला गेलं तर तिला सुद्धा स्वतः च्या घरी जायचं होतं.

"जेवून जा ना.." रोहन बोलण्याआधीच प्रिया म्हणाली.

सीमा प्रियाची समजूत काढण्यासाठी काही बोलणार तोच...
रोहन म्हणाला, "बच्ची.. प्लिज... आज माझ्यासोबत घरीच चल. हव तर मी भाऊजींसोबत बोलतो. "

रोहन पण सीमाला मस्का पॉलिश करू लागला.

"ओके.. परमिशन घे मग माझ्या नवऱ्याकडुन.. तो हो बोलला मग मला काहीच प्रॉब्लेम नाही.." हाताची घडी घालत सीमा ऐटीतच म्हणाली..

स्वतःच्या लहान बहिणीचा अटीट्युड रोहन बघतच राहिला..

"घ्याना परमिशन.." प्रिया सुद्धा रोहनला विनवणी करत म्हणाली..

सीमाने आपल्यासोबतच रहावं असं तिला सुद्धा वाटु लागलं.

रोहनने दोघींवरून नजर टाकली आणि स्वतःचा मोबाईल खिश्यातून बाहेर काढत तो दोघींपासून थोडा लांब जाऊन फोनवर बोलू लागला.

प्रिया आणि सीमा दोघीही दुर दिसणाऱ्या रोहनकडे बघत होते.

रोहन बोलणं आटोपून दोघींजवळ आला.

"भाऊजी तर बोलले, त्यांनी तुला असं सांगितलंय कि...उशीर झाला तर तिथेच रहा.. घरी यायची गडबड करु नकोस म्हणुन.. "

रोहन ने सीमाला तिच्या नवऱ्याचा निरोप सांगितला..

"असं बोललेले ते पण तू विचारलेलं बरं ना.. फॉर्मेलिटी तो बनता हेना दादु.. तू पण ना. लहान असुन तुला सगळं काही मलाच शिकवावं लागत... आत्ता अजुन उशीर नका करू.. चला मस्त पैकी जेवूयात.. एका हातात तिने रोहनचा हात कोपर धरला नी एका हातात प्रियाचा..

दोघांना सोबत घेऊन ती एका हॉटेलमध्ये आली..

हॉटेलमध्ये आल्यावर आल्या वेटर ने मेनु कार्ड टेबलवर आणून ठेवल.

"प्रिया तुला जे आवडत ते ऑर्डर कर.." रोहन म्हणाला अजिबात त्याने मेनु कार्ड तिच्या पुढ्यात सरकवलं.

प्रिया थोडीशी गोंधळली..

"सीमाला जे आवडेल ते चालेल मला" असं म्हणत प्रियाने मेनू कार्ड सीमाकडे वळवल.

"तुझी चॉईस कळू दे ग आम्हांला. तुच ऑर्डर कर. तुझ्या आवडीचं मी खाईल.." सीमाने पून्हा मेनु कार्ड तिच्या पुढ्यात ठेवल..

आत्ता प्रियालाच मेनू निवडावा लागणार होता. तिने जास्त विचार न करता मंनचाव सूप मागवलं.

तसं सीमा लगेचच रोहनकडे बघत म्हणाली, "चॉईस मेच होतेरे दादु.."

"म्हणजे? " प्रियाने प्रश्न केला.

"अग वहिनी माझा दादु सुद्धा स्ट्रेटर्स मध्ये हेच मागवतो.. त्याच हे ठरलेलं आहे.." सीमा ने असं म्हणताच प्रिया आणि रोहनची नजरा नजर झाली.

प्रियाने लगेचंच त्याच्यावरून नजर हटवली आणि स्वतःच्या मोबाईल मध्ये डोकावून बसली. ऑफिसमधुन सुटल्यापासून तिने मोबाईल हातातच घेतला नव्हता. त्यामुळे मोबाईल मधील नोटिफिकेशन बघण्यात ती तपासू लागली..

ऋषीचे 4 मिस कॉल आलेले तिला दिसले आणि सोबतच त्याचे मॅसेज सुद्धा होते.

सॉरी… स्विट हार्ट...

असा मॅसेज ऋषी ने प्रियाला केलेला..

प्रिया इथेच आता फसणार होती. सीमा सोबत राहुन जे हसरे भाव तिच्या चेहऱ्यावर आलेले तेच भाव ऋषीचा मॅसेज वाचुन क्षणभरातच बदलले.. उदासीनतेने तिच्या चेहऱ्यावर साम्राज्य केलं..

वेटर ने सूप आणुन तिच्या पुढ्यात ठेवल.

" वहिनी मेन कोर्स पण ऑर्डर करुन टाक. सुप पिये पर्यत येईल.. "

सीमा म्हणाली..

पण तिच बोलणं प्रियाच्या कानांपर्यंत पोहचलच नव्हतं..

सीमा प्रियाला स्पर्श करत तिला लागलेली तंद्री दुर करणार पण रोहनने तिला अडवलं..

"तुच ऑर्डर कर.." असं त्याने स्वतःच्या बहिणीला इशाऱ्यातच सांगितलं..

प्रियाने मॅसेज वाचलाय हे ऋषीला कळल्या बरोबर ऋषीचा फोन तिला आला..

"इम्पॉर्टन्ट कॉल आहे.. उचलू का? "

रोहन आणि सीमाकडुन परमिशन घेतंच प्रियाने विचारलं.

"उचलना.. त्यात विचारायचं काय.." रोहन सहजपणे म्हणाला.

तसं प्रिया उठुन रेस्टोरंट बाहेर आली आणि तिने ऋषीचा कॉल उचलला..

" हॅलो.. प्रिया... " फोन उचलल्या बरोबर ऋषीचा आवाज तिला आला..

"आत्ता का फोन करतोस तू? " प्रियाने रागातच बोलायला सुरुवात केली..

"सोरी ना जान.. " प्रियाची समजूत काढण्याचा प्रयत्न ऋषी करत होता.

"एक मिनिट ऋषी.! तू प्रियासोबत बोलतोस आणि नीट बोलायचं. हे जान वैगेरे वापरलं नाहीस तर बरं होईल.." तिच्या बोलण्यावरून ती आपल्यावर किती रागावलीय ह्याची कल्पना आत्ता ऋषीला आली होती..

"मला माहिती तू रागवलीस. पण मी काय करू सांग.. तूझा रागात शांत करण्यासाठी तू जे बोलशील ते करेल. मी तुझ्यासाठी.." ऋषी म्हणाला..

"लग्न ठरलंय माझं. लग्नाला ये माझ्या.. तेवढं केलंस तरी खुप आहे.." ती म्हणाली..

"अस बोलू नकोस प्रिया. मला थोडा वेळ दे ना ग.. " ऋषीची गाडी अजुनही तिथेच अडकून होती..

"अजून किती वेळ देऊ मी तुला ऋषी?? " प्रियाला आत्ता चिड येऊ लागलेली..

"उद्या भेटून बोलूयात प्लिज.." तो स्वतःचा निर्णय सांगुन मोकळा झाला.

"आता नाही जमणार मला भेटायला.." ती शांतपणेच म्हणाली..

"ओके.. मग मी तुझ्या ऑफिसमध्ये येतो तुला भेटायला." ऋषीने तिला धमकी दिली..

"धमकी देतोस.? " प्रियाने रागातच विचारलं.

"तुला आता माझ्या बोलण्यात धमकी दिसते का.?मी नीट बोललो ना. तुला भेटायला वेळ नाही मग मी तुझ्या ऑफिसमध्ये येतो तुला भेटायला.." प्रियाची समजूत काढतच ऋषी म्हणाला..

ऋषीला आत्ता काय बोलावे हेच प्रियाला कळत नव्हतं..

"प्रिया प्लिज एकदा भेट प्लिज…" प्रियाला लाडी गोडी लावतच तो म्हणाला.

"ओके.." एवढ बोलुन प्रियाने फोन कट केला.

नकळत तिच्या डोळ्यांच्या कडा पाणावलेल्या होत्या. त्या पुसत ती पुन्हा स्वतःच्या जागेवर येऊन बसली.

"सर्व काही ठिक आहेना.? " तिचा उदास चेहरा बघुन रोहनने तिला विचारलं..

"अहहह??? " रोहनने केलेल्या प्रश्नाने प्रिया थोडीशी गोधळून गेली..

"नाही... म्हणजे तूझा थोडा चेहरा वेगळा वाटला.. कसलं टेन्शन नाही ना.? " रोहनला तिची काळजी वाटु लागली..

"नाही.." त्याला स्मित देतच प्रिया म्हणाली.

आणि पुढ्यात असलेलं सूप पिऊ ती पिऊ लागली.

"ते सूप थंड झालं ग वहिनी.." सीमा म्हणाली..

"प्रिया.. आपण तुझ्यासाठी दुसर मागवू.. ते राहू दे." रोहन म्हणाला.

"इट्स ओके रोहन.. मला अन्न वाया गेलेल आवडत नाही.." असं म्हणत थंडगार सूप प्रियाने संपवुन टाकलं.

"दादु, वहिनी पण तुझेच डायलॉग बोलते. वहिनी दादूला सुद्धा अन्न वाया गेलेलं आवडत नाही.." असं म्हणत सीमा रोहनला हसु लागली..

जेवण आटोपल तसं रोहन आणि सीमा प्रियाला तिच्या घरी सोडायला जातात.. प्रिया गाडीत तर बसली होती पण शून्यात नजर हरवून होती ती..

ऋषी की रोहन?? ह्या विचारात ती हरवून गेली होती... रोहन मात्र फ्रंट मिरर मध्ये दिसणाऱ्या प्रियाच्या प्रतिबिंबाकडे अधुन बघत होता..

(कोणाची निवड करेल प्रिया? कळेल पुढील भागात.. हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा..)

🎭 Series Post

View all