कलंक प्रेमाचा 6

Love Story


प्रिया स्वतःच्या धुंदीत असताना कधी घर आलं हे तिला कळलंच नाही. गाडी तिच्या सोसायटीच्या गेटजवळ येऊन थांबली तरी तिच लक्ष नव्हतं. रोहन बाहेर उतरला आणि त्याने तिच्याजवळील दरवाजा उघडला. तशी प्रिया दचकली. प्रियाने सीमाला आणि रोहनला घरी चला म्हणून विचारले पण उशीर होईल म्हणून ते दोघेही तिला नाही म्हणाले.

"बाय.. गुड नाईट..! " असं म्हणत प्रिया तिथुन निघणार तितक्यात रोहनने तिला आवाज दिला. 

"प्रिया... ऐकणा..."

रोहनचा आवाज ऐकुन प्रिया जागीच थांबली आणि तिने पाठी मागे वळत रोहनकडे पाहिलं..

"तु हे विसरलीस. " रोहन तिला कॅरीबॅग दाखवतच म्हणाला.

रोहन आणि सीमा सोबत शॉपिंग केलेली साडी व अंगठीची पिशवी ती गाडीतच विसरली.

"ओहह, थँक्स...! " प्रिया म्हणाली.. आणि रोहनच्या हातुन तिने पिशवी काढुन घेतली..

"तुला नक्की आवडलीना ग साडी.? " रोहनने विचारलं..

"हो आवडली. " ती उत्तरली..

पुढे रोहन आणखीन काही बोलणार तितक्यात त्याला बाय करत ती तिथून निघुन गेली. रोहन तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिला. प्रियाने मागे वळून पाहिलेच नाही.. कारण आत्ता ती पुन्हा एकदा ऋषीकडे वळत होती.

आपल्याला काय होतंय हेच तिला कळत नव्हतं.. पण आपल वागण चुकलंय ह्याची जाणीव मात्र तिला होतं होती..

घरी आल्यावर स्वतःच्या आई पप्पांसोबत जुजबी बोलणं झालं तिचं..

नंतर स्वतःच्या रूममध्ये येऊन बेडवर आडवी झाली. दिवसभर अती विचार करून, रडून आणि शॉपिंग करुन तिला लगेचच झोप लागली.


दुसऱ्या दिवशी,

आरश्यात बघतच ती तयार होतं होती..


      प्रियाला वाटु लागलेलं कि ऋषीने आपल्या स्वतःहुन फोन केला.. म्हणजे त्याच आपल्यावर प्रेम आहे. आपल्यामुळेच थोडी चिडचिड झाली असणार. आपणच त्याला समजुन घ्यायला कुठे तरी कमी पडलो असु असं सुद्धा तिला वाटु लागलं..


नेहमी प्रमाणे तयार होऊन ती ऑफिसला निघुन गेली..

ऋषीला भेटणार म्हणुन एका वेगळ्याच जोमात तिने आज काम केलं..

कधी एकदाचे 6 वाजतायत आणि आपण ऑफिस आहेर पडतोय असं तिला झालं..

6 वाजले तसं ती ऑफिस बाहेर पडली..

नेहमीच्या ठिकाणी येऊन ती ऋषीची वाट पाहु लागली.

जवळ जवळ अर्धा तास उलटून गेला पण ऋषीकाही आला नाही.. त्याला भेटायला येताना जो उत्साह तिच्यात होता तो आत्ता हळु हळु कमी होऊ लागला.


तिने त्याला कॉल लावला..

"अजुन अर्धा तास लागेल.. अर्जेन्ट काम आलंय.."असं सांगुन ऋषीने कॉल कट केला..


जवळ पास अर्ध्या तासाने ऋषी आला.


"आय एम सॉरी...! " तिच्या बाजुला येऊन बसतच तो म्हणाला.


प्रियाने काहीच रिएक्ट केलं नाही.. शांत बसुन राहिली ती.. नेहमी प्रमाणे ती त्याच्यावर रागवली सुद्धा नाही.

तिला स्वतःच्या मिठीत घ्यायला तो जाणार त्या आधीच प्रियाने त्याला पंजा दाखवला.. व थांबण्याचा इशारा केला.

"अस काय करतेस ग प्रिया. सॉरी बोललो ना ग मी.." केविलवाणा चेहरा करतच तो म्हणाला.


"लग्न कधी करतोस ते सांग माझ्याशी.?" प्रियाने मुळ मुद्यात हात घातला..


"तू काय नुसत लग्नाच घेऊन बसलीस. दुसरा विषयच नाही का तुझ्याकडे.. बघावं तेव्हा लग्न आणि लग्न.. " ऋषीने चिडतच म्हटले..


"मग अजून मी काय बोलू?
पुढच्या आठवड्यात माझा साखरपुडा ठरला आहे.
मला हा साखरपुडा करायचा नाही असं नाही बोलू शकत मी. तू समजुन का नाही घेतं..? " प्रिया व्याकुळ होतच बोलत होती.


"मग तू करणार हा साखरपुडा ?" ऋषी गंभीर झाला.

ऋषीच्या चेहऱ्यावर उमटलेले गंभीर भाव बघुन प्रिया त्याला म्हणाली, "मला करावा लागणार आहे हा साखरपुडा. नाही तर मग पळून चल. आपण पळून जाऊ लग्न करूयात. खरं प्रेम करतोस ना माझ्यावर मग तेवढी हिंमत ठेव नि चल पळून. पुढच पुढे बघू."


"तुला वाटत तेवढ सोप्प आहे का हे सगळ ??" ऋषी असंच काही तरी बोलेल ह्याची जाणीव प्रियाला होती..


ती हुंदके देतच रडू लागली.


"रडतेस का? " तो तिला शांत करु लागला.


"तुला सोडुन इतर कोणासोबत तरी साखरपुडा करण हे सोप्प वाटतय का तुला. काल जवळपास दोन आठवड्यानी तू मला फोन करतोस. कसं वाटलं असेल मला?
ह्या दोन आठवड्यांत हजार वेळा मरणाचे विचार येऊन गेले रे मनात. किती फोन लावले तुला पण नाही. तुला माझ्याशी संबंध ठेवयचाच नव्हताना मग आता का आलास माझ्याजवळ?

म्हणजे तुला वाटेल तेव्हा बोलशील आणि वाटेल तेव्हा भांडून मोकळा होशील. पण आता नाही हा ऋषी. बस झालं.. माझ्याने हे सगळ अजुन नाही सहन होतं.." तिने स्वतःला शांत करत म्हटले...


" हे बघ प्रिया.... मी पण नाही नीट राहिलो ग ह्या दोन आठवड्यात.. " प्रियाची खोटी समजुत काढण्याचा प्रयत्न ऋषीचा सुरू होता..


"हे दोन आठवडे तू कसा राहिलास हे दिसलं मला.. तुझ्या इन्स्टा आणि फेसबुकवरचे स्टेटस पाहिलेत मी. कुठे कुठे गेलेलास मग फिरायला?" प्रिया पुर्णपणे तयारीनिशीरच आलेली.


"हे बघ प्रिया ते सगळं सोड. मला एक शेवटची संधी दे. प्लिज..! " ऋषीने विषय बदलला..


"देते तर आहे मी.

आत्ताच्या आत्ता लग्न कर माझ्यासोबत..

तुला लग्न करायला जमणार नसेल तर इट्स ओके.. तू सेटल झाल्यावर लग्न करूयात.. पण तु तुझ्या आई वडिलांना माझ्या आई वडिलांशी बोलायला तरी सांग. मग तर झालं." प्रियाने दुसरा मार्ग निवडला.

पण ऋषीला तिचा हा निर्णय सुद्धा पटला नव्हता..

"माझे मॉम डॅड अस करायला रेडी होतील असं वाटत नाही ग. ते सहजा सहजी नाही ऐकणार. तू का नाही समजत.." ऋषी आत्ता रडकुंडीला आलेला.. खरं तर प्रिया सोबत लग्न न करण्यासाठी एक एक मार्ग तो काढत होता..

"ओके.. मग पळून लग्न करू.. संसार तर आपल्याला करायचाय. नंतर तुझे आई वडील देखील समजुन घेतील आपल्याला.." प्रिया अजुनही लग्नाचाच हट्ट धरून होती..

आत्ता मात्र ऋषीला राग आला.

"पुन्हा तुझं तेच. तुला समजत नाही का प्रिया.? मला एवढ्यात लग्न नाही करायचंय.

माझंच चुकलं.. मीच मूर्ख... जो तुला भेटायला आलो." ऋषी चिडला तिच्यावर..

त्याचा रागात बघुन तिला येणारा हुंदका आवरण कठीण होऊन बसल.


"ऋषी माझा साखरपुडा ठरलायरे. तू जस तुझ्या आई वडिलांना दुखवू शकत नाही तस मीही नाही दुखवू शकत. मी खर प्रेम करतेरे तुझ्यावर म्हणून बोलते चल पळुन." त्याचा हात स्वतःच्या हातात धरत तिने त्याला विनवनी केली.

त्याने तिच्या हातुन स्वतःचा हात सोडवून घेतला.


"ठिक आहे.. तुला तुझ्या आई वडिलांना दुखवायचं नाही.. मग तू कर लग्न.. मी राहील एकटा.
तु खुश रहा. काळजी घे स्वतःची आणि होणाऱ्या नवऱ्याची..

एडवान्समध्ये काँग्रेच्यूलेशन..! "

ऋषी त्याला जे बोलायचं ते बोलुन मोकळा झाला.

डोळ्यांतून बाहेर पडणारे पाणी प्रियाने पुसले.

"हेच ऐकायचं होत मला. thanks.! " असं म्हणत ऋषीने तिला दिलेलं महागडं घड्याळ आणि एक लॉकेट तिने दोघांच्याही मध्ये ठेवलं.


" तुझ्याकडून मी अजून कसलीच अपेक्षा करुन नाही शकत. काळजी घे स्वतःची. गुड बाय.. " " असं बोलत प्रिया तिथुन निघते. 

ऋषीने प्रियाला अडवण्याचा प्रयत्न देखील केला नाही. प्रियाने सुद्धा ह्यापुढे कधीही ऋषीला फोन न करण्याचा निर्णय घेतला.

कारण तिला साधा आणि सरळ स्वभाव असलेल्या रोहनला फसवायचे नव्हते.

तिने पुढे वाटचाल करण्याचा निर्णय घेतला..

अश्यातच प्रिया आणि रोहनचा साखरपुडा झाला.

क्रमशः


(काय होईल पुढे..? कळेलच पुढील भागात..)

@lovenovelsstudio ह्या माझ्या युट्युब चॅनल्सवर कथा ऑडिओ स्वरूपात उपलब्ध आहे. ज्यांना ही कथा ऐकायला सुद्धा आवडेल त्यांनी नक्कीच ऐका.. कथा इतरत्र शेअर करताना लेखकाच्या नावानेच करा..

🎭 Series Post

View all