कलंक प्रेमाचा 7

Love Story

प्रियाने पुढे वाटचाल करण्याचा निर्णय घेतला..

आणि अश्यातच प्रिया आणि रोहनचा साखरपुडा झाला..

साखरपुडा झाल्यानंतर रोहन प्रियाला फोन करू लागला. प्रिया रोहनच्या प्रश्नांची त्यातल्या त्यात उत्तर द्यायची. पण जी आवड रोहनला तिच्यासोबत बोलण्यात होती ती आवड त्याच्यासोबत बोलण्यात तिला अजिबात नव्हती.. जी ओढ तिच्या मनात ऋषीला घेऊन होती ती रोहनळा घेऊन अजुन तरी निर्माण झाली नव्हती..

तिने एकदा दोनदा सुयशला फोन करून ऋषी बद्दल चौकशी सुद्धा केली. तो बरा असल्याचं तिला त्याच्याकडुन कळत होतं. त्यातच तिला समाधान.


प्रिया आपल्यासोबत मोजकच बोलते म्हणून रोहनने तिला ह्या बद्दल विचारल.

"तु मनापासून हे लग्न करत नाही का? " असं सुद्धा त्याने तिला विचारलं..

"तुम्हांला समजुन घ्यायला मला थोडा वेळ द्या.." असं प्रियाने रोहनला सांगितले.

रोहनने तिला तो वेळ दिला सुद्धा कारण तो मनापासून तिच्यावर प्रेम करू लागलेला..

आपण रोहनला फसवतोय असे प्रियाला वाटत होते. ऋषी बद्दल रोहनला सगळ सांगावे असे देखील वाटत होतं. एखादं दुसरी संधी बघून आपण रोहनला सांगु असा विचार करुन दिवस पुढे ढकलत होती ती आणि योग्य संधीची वाट पाहु लागली.. पण स्वतः चा भूतकाळ रोहनला सांगण्याची योग्य संधी प्रियाकडे कधी आलीच नाही..


    उद्या रोहन आणि प्रियाच लग्न.. आज हळदीचा दिवस. प्रिया खूप रडली. ऋषीला शेवटचा फोन करावा अस तिला वाटत होत पण तिने तस अजिबात केलं नाही. फक्त त्याच्या आठवणी पुन्हा जाग्या होऊ नये म्हणून मनसोक्त रडून घेतलं. तिला खर तर मनस्ताप होत होता, आपली निवड ऋषीच्या बाबतीत चुकली असं तिला वाटत होतं. तो किती सहज बोलला की कर लग्न म्हणून पण त्याला सोडुन रोहन सोबत लग्न करताना तिला खूप जड जाणार होत.


फायनली दोघांचही लग्न झालं. लग्नात उपस्थिती लावायला आलेली लांबची पाहुणे मंडळी रोहनच घर रिकामी करुन आपापल्या घरी परतली. रोहनचे काका काकू त्यांच्या सोबत होते.. पण शेतीची काम म्हणून 4 दिवस थांबून ते सुद्धा स्वतःच्या गावी जायला निघाले. हळूहळू घर खाली झालं. वहिनीला मदत म्हणून सीमा 15 दिवस तीच्यासोबत थांबली. अगदी बहिणी प्रमाणे तिने प्रियाच सर्व काही केलं. पण तिला सुद्धा घरी जान भाग होतं..

ती सुद्धा स्वतःच्या घरी जायला निघाली. सीमा सुद्धा आपल्याला सोडुन जाते हे बघून प्रियाला गहिवरून आलं. ती तिच्या गळ्यात पडून रडू लागली. प्रियाच सीमावर असणार प्रेम बघून रोहनला त्याची निवड चुकली नाही ह्याची खात्री झाली. 

  आता पूर्ण घरात फक्त रोहन आणि प्रिया एकटेच.

संध्याकाळचा स्वयंपाक बाकी होता. तो करायला म्हणुन प्रिया किचनमध्ये आली.. कांदा चिरायला घेतलेला तिने..


तिला आवाज देत रोहन किचनमध्ये आला.


"प्रिया..."

रोहनच्या आवाजाने प्रिया स्तब्ध उभी राहिली. भीतीची एक लहर तिच्या अंगात संचारली.


"ऐकतेस ना? " त्याने असं म्हटल्यावर तिने त्याच्याकडे वळून पाहिले.


तिच्या अगदी मागेच उभा होता तो..

लग्नानंतर जे मिलन दोघांत व्हायला हवं ते झालंच नव्हतं. दोघांना पाहिजे तसा एकांत मिळालाच नव्हता. प्रियाला वाटलं रोहन त्यासाठीच तिला आवाज देत तिथे आलेला..

"त्यांनी शरीर सुखाची मागणी केली तर काय करायचं? नाही म्हणुन सांगायचं का? " नको नको ते विचार ती करू लागली..


"ऐकलंस? " प्रियाने काहीच प्रतिक्रिया दिली नाही हे बघुन रोहनने पुन्हा त्याला आवाज दिला.

"हम्म..." त्याच्या दिशेने ती वळली.


"उद्या आपल्याला गावी जावं लागेल. कुलदैवतेच दर्शन घेऊयात आणि तिथून 2 दिवस काकांकडे जाऊयात.. त्यांच्याकडे सुद्धा रहावं लागेल. दर्शन करुन थेट मुंबईत आलो कि काका काकींना वाईट वाटेल. तुला काय वाटत? जाऊयात ना उद्या? आय मिन तुला चालेलंना? " रोहन ने तिला तिच मत विचारल.

प्रिया रोहनच्या शब्दांनी भारावून जात होती. रोहन एखादा निर्णय घेताना आपल्याला किती महत्व देतो हे बघून ती हळूहळू रोहनमध्ये गुंतत होती.

"प्रिया.. सांग ना ग. तसं मला माझ्या बॉसला कळवायला.. अजुन दोन दिवसाची सुट्टी वाढवून घेतो मी.." विचारांत गुंतून गेलेल्या प्रियाला रोहनने पुन्हा विचाराल..


"हो चालेल. " एवढं बोलून प्रिया पुन्हा कामात पुन्हा गुंतली.


"तुला चालणार असेल तर आत्ताच निघूयात का? म्हणजे रात्री पर्यंत पोहचू. जेवण बाहेरच करू.. दगदग कमी होईल.. पण तुला चालणार असेल तर.."

प्रत्येक वाक्याच्या शेवटी रोहन जे वाक्य एड करायचंय ना ते तिला खुप आवडायचे..

"तुला चालणार असेल तर" प्रिया स्वतःशीच पुठपुटली आणि गालातल्या गालात हसु लागली..

त्याच्यात अतीप्रमाणात ठासून भरलेल्या नम्रपणाच्या ती तिच्याही नकळत प्रेमात पडत चाललेली.

रोहन आपल्याकडुन उत्तराची वाट बघतोय ह्याची जाणीव तिला झाली तसं ती उत्तरली..

"हो चालेल.."

"ठिक आहे..! काकांना कळवतो मी तस. "असं म्हणत रोहन किचन मधुन बाहेर आला..

आणि तोच..

तिच्या किंचळण्याचा आवाज रोहनला आला.. रोहन पळतच पुन्हा किचनमध्ये शिरला..

"प्रिया काय झालं..? " रोहन ने विचारलं..

प्रियाच्या किंचाळण्याने रोहनच्या हृदयाचे ठोके चांगलेच वाढले होते..

रोहनला किचनमध्ये बघुन प्रिया पळतच त्याच्या जवळ आली आणि त्याला बिलगली.. घट्ट मिठी मारली तिने त्याला.

प्रियाला काय झालं हे रोहनला कळलंच नाही..

रोहनने स्वतःचे दोन्ही हात मात्र वर घेतले.. तिच्या मनाविरुद्ध तिला स्पर्श करण त्याने टाळलं.. पण तिने स्वतःहुन केलेला स्पर्श त्याला आवडलेला..

"काय झालं प्रिया? " त्याने तिला विचारलं..

प्रिया त्याला बोट दाखवून काही तरी दाखवायचा प्रयत्न करत होती..


"तू झुरळाला घाबरलीस होय.? तु अशी किंचाळलीस मला वाटलं कि हात वैगेरे कापून घेतलास कि काय.. " असं म्हणत रोहन ने सुटकेचा श्वास सोडला.


"मला... भीती वाटते खूप झुरळाची.. तुम्ही त्याला इथुन जायला सांगाना.." घाबरतच ति त्याला बोलत होती.. आणि रोहनला मारलेली मिठी प्रियाने आणखीन घट्ट केली..


"तू थांब इथे.." असं म्हणत त्याने प्रियाला आहे तिथेच उभं केलं.. हातात झाडू घेऊन त्याने झुरळाला तिथुन पळवून लावलं. खरं तर त्याला मारणार होता तो पण त्या झुरळा मुळेच तर प्रियाने त्याला पहिल्यांदा मिठी मारली होती.. म्हणुन त्याला त्याने जीवनदान दिलं..

हात स्वच्छ धुऊन त्याने पाण्याने भरलेला ग्लास प्रिया समोर धरला..


"तू तैयार हो मी हे सगळं आवरतो. " रोहन म्हणाला.

प्रिया रोहनकडे बघतच राहिली. तिने जे काही ऐकलेलं त्यावर तिचा खरं तर विश्वासच बसत नव्हता..

"मी आवरतो हे.. डोन्ट व्हरी.." तो हसतच म्हणाला..

रोहन तिच्याच सगळं आवरत होता आणि ती पाणी पित एकटक त्याच्याकडे बघत होती.

नंतर तिच तिनेच स्वतःला सावरलं.. आणि बेडरूमकडे वळली.

तिने रोहनला मारलेली मिठी आणि त्याच्या शरीराचा तिच्या शरीराला झालेला स्पर्श आठवून ती थोडी सुखावून जात होती.. पण तिला रोहनमधील अजुन एक गोष्ट आवडली आणि ती म्हणजे झुरळाला घाबरतेस म्हणून त्याने तिला हिनवले नाही. जे नेहमी ऋषी तिच्यासोबत करायचा.


ऋषी जर रोहनच्या जागी असता तर त्याने आपल्या मनाला लागतील असे विनोद नक्कीच केले असते.." प्रिया स्वतः शीच बोलत होती.


हळूहळू रोहन त्याच्या चांगल्या स्वभावाने प्रियाच्या हृदयात जागा निर्माण करत होता.

क्रमश :


काय होईल पुढे?


🎭 Series Post

View all