Login

कलंक प्रेमाचा 10

Love Story


संपुर्ण फ्लोरवर प्रियाच्या हातुन निसटलेल्या गिफ्टच्या कांचाचा आवाज घुमला. प्रिया घाबरतच जमिनीवर अस्तव्यस्त पकडलेल्या त्या काचा पाहु लागली.

सगळे जण तिच्या डेस्कवर जमा झाले..

"काय ग, काय झालं? " तिच्या एका कलीगने तिला प्रश्न केला..

"अग सहजच हातुन निसटल.." असं तिने उत्तर दिलं.

"नक्कीना? " पुन्हा एकीने विचारल.

"हो ग.." जबरदस्तीच स्मित ओठांवर आणतच ती म्हणाली.

"ए बॉस आले.." जमलेल्या गर्दीतून एकाने म्हटले.. तसे सगळे पळतच स्वतःच्या डेस्कवर जाऊन बसले..

लँडलाईन वरून तिने पिऊनला कॉल लावुन बोलवून घेतले. तिच्या पायाजवळ पडलेल्या सगळ्या काचा उचलुन तिने त्याला फेकुन द्यायला सांगितल्या..

गिफ्ट सोबत असलेली चिट्ठी तिने उघडली आणि त्यातील मजकूर ती वाचू लागली. जे ऋषीने तिच्यासाठी लिहिलेले..

  आता खुश असशील ना लग्न करून. जे हवं ते मिळालं तुला. काय कमी होती माझ्या प्रेमात.? मी तुला इतक्या सहज सहजी विसरू नाही शकत जितक्या सहज तू मला विसरलीस. 

तुझं पाहिलं प्रेम

ऋषीने लिहिलेली चिट्ठी प्रियाने रागाने फाडली. आणि तडक उठुन वॉशबेसिनमध्ये तोंड धुवायला म्हणुन गेली. डोळ्यांतुन पुन्हा अश्रू वाहू लागले. सगळं संपल. मी रोहनला विश्वासात घेऊन सांगायला हवं होतं. रोहन ने मला समजून माफ केले असते. मी का अस नाही केलं. म्हणून प्रिया स्वतःला दोष देत बसली.


ती डेस्क वर येऊन बसली.. पण तिच कामात लक्षच लागणार नव्हतं. डेस्कवर डोकं ठेवून बसणार तोच मोबाईल रिंग झाला. घाबरतच तिने फोन हातात घेतला. पप्पांचा नंबर बघून तिचा जीव भांड्यात पडला.


"हो पप्पा... मी कामावरून सुटल्यावर थेट घरी येते.." पप्पांशी मोजकं बोलून तिने फोन कट केला...

कामात लक्ष लागतच नव्हतं पण काम करावं तर लागणार होतं. पण मनात ऋषीने भीती निर्माण केलेली, जी तिला स्वस्थ बसु देत नव्हती..

तिने वेळ न दवडता थेट सुयशला फोन फिरवला.

सुयश सोबत बोलल्यावर तिच्या मनातील भीती थोडी कमी झाली, कारण सुयशकडुन तिला असं कळलेलं की, ऋषी बंगलोरला गेलाय. तो मुंबईत येऊन तिला काही त्रास देईल अस त्याला तरी वाटत नाही..

थोडं मन शांत झालं , तसं ती कामात गुंतली.. कसाबसा कामावर दिवस भरून ती घरी जायला निघाली. घरी गेल्यावर खूप दिवसांनी आई बाबांना बघून तिला बर वाटल. दिवसभर मेंदूने घेतलेला त्राण ती पुर्णपणे विसरली.


"आतु..." तिच्या छोट्या भाच्या तिच्या नावाचा जप करत तिच्या जवळ येतच तिला बिलगल्या. वहिनीला आणि दादाला देखील प्रियाने स्वतः जाऊन मिठी मारली. प्रियात झालेला बदल बघुन दोघांनाही खूप बरं वाटलं. प्रिया माहेरपणासाठी आल्यामुळे निंबाळकरांच्या घराश वातावरण हस्त खेळत झालं.

दिवस कसे सरले हेच तिला कळलं नाही.. आठवडाभर तरी ती स्वतःच्या आई पप्पांजवळ राहिली होती. आत्ता पुन्हा रोहनजवळ जायचं म्हणुन आदल्या रात्रीच ती स्वतःची बॅग भरत होती. सकाळी उगाचच घाई नको म्हणुन..


तोच मोबाईल मध्ये मेसेज आल्याची ट्यून वाजली. येणारा मेसेज अनोळखी नंबरवरून जरी असला तरी तो नंबर प्रियाच्या पूर्ण लक्षात होता. प्रियाने घाबरतच मेसेज वाचला.


"सॉरी प्रिया.. पण तू आयुष्यातून निघून गेल्यावर तुझी किंमत मला कळाली प्रिया. मला एक वेळ माफ कर. " असा मॅसेज टाईप करुन सोबत रडवा स्माईली सुद्धा त्याने एड केला होता..

त्याने केलेल्या मेसेजची प्रियाला चीड आली.


तिने रागातच त्याला रिप्लाय द्यायला सुरवात केली..


"ह्या पुढे मला मेसेज आणि कॉल करणं बंद करायचं ऋषी." असा मॅसेज करुन प्रिया पुन्हा त्याच्या रिप्लायची वाट बघत बसली.. आणि ऋषीचा मॅसेज आला सुद्धा


"प्लिज अस नको बोलुस" प्रत्येक मॅसेज सोबत रडव स्माईली तो आठवणीने पाठवत होता..


" हे बघ ऋषी, तुला एकदा नाही असं हजार वेळा मी माफ केले पण आता नाही. आणि प्लिज मला मेसेज करण बंद कर.  आणि लगेच त्याचा फोन नंबर ब्लॉक लिस्टवर टाकला. आता तिला फक्त आणि फक्त रोहनच हवा होता. तिला अजून त्याला धोका द्यायचा नव्हता. एक मन सांगत होत की ऋषी बद्दल रोहनला सांगावं आणि एक मन तिला तसं करण्यापासून अडवत होतं.


प्रियाने नंबर ब्लॉक केल्या नंतर ऋषी कडून येणारे मेसेजेस बंद झाले. पण रात्रभर तिला झोप काही लागली नाही. विचारांच्या तंद्रीत ती हरवून गेली. ऋषी पुन्हा काय करेल?


हा नंबर तर ब्लॉक केलाय मी त्याचा पण त्याने दुसऱ्या नंबरवरून फोन किंवा मेसेज केला तर.? भीतीची एक लहर तिच्या सर्वांगातून फिरू लागली. भीतीने प्रियाची झोप कुठे तरी दुर पळाली होती. नुसत कूस बदलण्याच काम तिचं सुरू होतं..

6 वाजता अलार्म झाला,

म्हणजे रात्रभर ती झोपलीच नव्हती. स्वतःची तैयारी करून ती कामावर जायला निघाली. आज रोहन तिला न्यायला येणार होता. पण काल घडलेल्या प्रसंगावरून ती हे पूर्णपणे विसरून गेली. कामावर येऊन तिने स्वतःला कामात झोकून दिलं..

आणि तोच एका अनोळखी नंबर वरून तिला फोन आला. हा तर ऋषीचा नंबर नाही तिने स्वतःलाच प्रश्न केल. आणि सहन म्हणुन तिने कॉल उचलला..


" हॅलो... " ती म्हणाली..

" प्रिया मला तुझ्याशी बोलायचं आहे ग. 

तिचा संशय खराब ठरला. समोरून ऋषीचाचच आवाज तिला आला.. प्रिया फोन कट करणार तोच ऋषी म्हणाला.

" एक मिनिट प्रिया, तु हा नंबरसुद्धा ब्लॉक केलास तर मी दुसऱ्या नंबर वरून फोन करेल. " त्याने तिला थेट धमकावलं..

" तु आता मला ब्लॅकमेल करणार ऋषी.?" प्रियाने रागातच विचारलं.


"ह्याला ब्लॅकमेल नाही, ह्याला प्रेम म्हणतात प्रिया. जे माझं तुझ्यावर आणि तुझं माझ्यावर आहे."

"एक मिनिट ऋषी. माझ तुझ्यावर प्रेम होतं असं म्हणायचं का तुला.?? प्रेम कश्याला म्हणतात हे कळत का तुला? तु प्रेमाच्या गोष्टी नाही केल्यास तर तेच बरं होईल.." प्रिया म्हणाली.. तिच्या आवाजात भरपूर वेदना होत्या..


" मला एक चान्स देऊन बघ प्रिया.. मी तु बोलशील ते करेल. " प्रियाला गयावया करण्याच काम ऋषी करत होता..


"माझं लग्न होईपर्यंत तर तू काहीही करू शकला नाहीस.. मग तू आता काय करणार.?" प्रिया स्पष्ट शब्दातच बोलत होती..


"प्रिया प्लिज. " ऋषी कापऱ्या सुरातच बोलत होता. जणु तो रडत आहे असं प्रियाला भाष्लेम पण त्याच्या रडण्याने प्रियाला काहीही फरक पडणार नव्हता.


"ह्यापुढे मला त्रास द्यायचा नाही हा ऋषी." स्वतः चा निर्णय ऋषीला सांगुन प्रिया मोकळी झाली..

"मला तुला भेटायचं आहे प्रिया. कारण मला तू हवी आहेस. एक दिवसासाठी का होईना पण मला तू हवीच आहेसं." असं बोलुन ऋषीने स्वतःची लायकी दाखवली..


"शी.... तूझ्याकडून अजून काय अपेक्षा ठेवू मी ऋषी.??
स्वप्नात सुद्धा ह्या गोष्टीचा विचार करणं तू सोडून दे. अरे एवढीच जर स्त्रियांच्या शरीराची भूक असेल तर जाऊन कुठे तरी तोंड काळ कर. मला पुन्हा कॉल करू नकोसं.." एवढं बोलून प्रियाने फोन कट करून टाकला..


तिला आता पुरे पूर कळलं होतं की, ऋषीने कधी तिच्यावर प्रेम केलंच नव्हतं.. त्याला फक्त आणि फक्त तीच शरीर हवं होत. जे तीन वर्षांच्या रिलेशनशिपमध्ये त्याला मिळालं नव्हतं. त्याने ह्या आधी सुद्धा खूप प्रयन्त केलेले.. पण जे करु ते लग्नानंतरच ह्या स्वतःच्या विचारांवर प्रिया ठाम असायची..

शारीरिक संबंध नाही बोलताच ऋषीच बदललेलं वागण.. तिची त्याच्यासोबत होणारी भांडण तिला आठवू लागली. तिला त्या दोघांचीही भेट सुद्धा आठवत होती.., ती त्याच्या सोबत मनसोक्त गप्पा मारत असायची पण तो आणि त्याची नजर मात्र तिच्या शरीरावरून फिरत असायची. तिची उभर छाती तर तो टक लावुन पहायचा..


का कळलं नाही तेव्हा मला..? असं म्हणत तिने स्वतःला दोश द्यायला सुरुवात केली.


खर तर तिला तेव्हा सुद्धा कळत होतं, पण तिचं आंधळं प्रेम... जिथे पाहिजे तिथे वळत नव्हतं.


  पुन्हा ऋषीचा फोन तिला आला... प्रिया फोन कट करत होती, पण ऋषी तिला पुन्हा पुन्हा कॉल करुन त्रास देत होता. शेवटी तिने मोबाईलमधल सिम काढलं आणि पुढचा मागचा विचार न करताच तोडून टाकुन दिल. तेव्हा कुठे ऋषीचे कॉल येणं थांबले..


रात्रभर रडून, जागरण करून प्रियाला अंगात कणकणी जाणवत होती. कसबस ती काम आटपून घरी जायला निघाली.. ऑफिसच्या गेट जवळ तिला रोहन दिसला. खुप दिवसांनी रोहन ला बघून प्रियाला खूप बरं वाटलं. ओठांवर गोड स्मित उमटल तिच्या..

"अग फोन का बंद.?" रोहनने प्रियाला प्रश्न केला.

"ते मी.. ते...." रोहनला काय सांगावं हे प्रियाला सुचत नव्हतं.

ती काही बोलणार पण त्या आधी रोहननेच बोलायला सुरुवात केली.

"अग सकाळपासून तुला फोन लावत होतो तुला पण तूझा स्विच ऑफ येत होता. मला थोडं घाबरायला झालं म्हणून मी संध्याकाळी 4 वाजल्यापासून इथे येऊन उभा आहे. घरी पप्पांना फोन केला, ते बोलले नेहमीच्या तु वेळेत ऑफिसला गेलीस. पण तू मला पोहचलीस म्हणून मेसेजच केला नाहीस. म्हणून न राहवून मी फोन केला तर स्वीच ऑफ. काही प्रॉब्लेम आहे का प्रिया.? " प्रियाच्या काळजीने रोहन पॅनिक झाला होता..

प्रिया बद्दल असणारी काळजी त्याच्या चेहऱ्यावर झळकून येत होती..


"ते रोहन... ते... मी सिमकार्ड काढायला गेली आणि तुटलं. म्हणून..." प्रिया अडखळतच उत्तर देत होती कारण खोट तिला बोलताच येत नव्हतं..


"नक्की हेच कारण आहे का? "रोहन ने असं विचारल्या बरोबर ती थोडी घाबरली..


क्रमशः

ऋषीने रोहनला सगळ काही सांगितलं तर नसेलना? काय होईल पुढे? कसा मार्ग काढेल प्रिया ह्या सगळ्यातून कळेल पुढील भागात..
0

🎭 Series Post

View all