"ते रोहन... ते... मी सिमकार्ड काढायला गेली आणि तुटलं. म्हणून..." प्रिया अडखळतच उत्तर देत होती कारण खोट तिला बोलताच येत नव्हतं..
"नक्की हेच कारण आहे का? " रोहन ने असं विचारल्या बरोबर ती थोडी घाबरली..
"तुझे डोळे खुप वेगळेच दिसतायत म्हणुन विचारलं. तु रडली आहेस का? आय मिन तु खरच माझ्यापासून काही लपवत नाहीस ना प्रिया...? मला काळजी वाटतेय तुझी म्हणुन मी विचारलं.." रोहनच्या आवाजात प्रिया बद्दल असणारी अफाट काळजी तिला दिसून येत होती.
"थोडंसं डोकं दुखतय माझ.. बाकी काही नाही.. आपण निघुयात का? घरी सगळे वाट बघत असतील." प्रियाने टाळाटाळ करत विषय बदलला.
"ऐकणा प्रिया... मी पप्पांना फोन करून कळवलं की मी तुला न्यायला रविवारी येतो म्हणून. मला उद्या दिल्लीला जावं लागतंय ऑफिसच्या कामासाठी. पुन्हा तू घरी एकटीच रहाणार. मग माझं तिथे मीटिंगमध्ये लक्ष लागणार नाही ग.
खरं तर दुपारी तुला ह्याचसाठी कॉल करत होतो की, तुला रविवारी न्यायला आलं तर चालेलं का? पण तु कॉलच उचलला नाहीस.. म्हणुन मी पप्पांना कॉल करुन विचारलं, ते चालेलं म्हणाले. तुला पण चालेलं ना? " रोहन ने तिचं मत जाणून घेणं सुद्धा योग्य समजले.
प्रियाने हो मध्ये मान डोलवली.
"आपण एक काम करू, तुझं सिमकार्ड बनवून घेऊ आणि मग मी तुला घरी सोडतो आणि मग घरी जातो. तुला चालेलना? " रोहन ने विचारलं
"हो चालेल. पण नवीनच सिमकार्ड घेऊ.." प्रिया लगेचच उत्तरली.
नंबर तोच ठेवला तर ऋषी पुन्हा कॉल करुन त्रास देईल हि भीती तिच्या मनात होती.
"अग पण हा नंबर तुझा सगळ्यांकडे आहेना.? " रोहन ने विचारलं.
"हो.. पण तरीही... नवीनच घेऊयात ना.. " तिने म्हटले.
"बरं... ठिक आहे. " असं म्हणत रोहनने प्रियाला गाडीत बसायला सांगितलं. गाडीत एसी मुळे खूप थंडावा होता. प्रियाचे अंग तापाने चांगलच फनफनू लागलं.
"रोहन... एसी बंद करा ना.. " असं ती रोहनला सांगणार पण तोच रोहनचा फोन रिंग होऊ लागला.
"ऐकणं राणी कामावरून फोन आहे, मला उचलावाच लागेल." असं म्हणत रोहनने गाडी बाजूला घेतली आणि तो फोन वर बोलत राहिला.
दुसऱ्या दिवशी असणाऱ्या महत्वाच्या मीटिंग संदर्भात फोन असल्यामुळे रोहनने जवळपास 15 मिनीटांनी फोन ठेवला.
"सॉरी.. " प्रियाकडे बघतच तो म्हणाला.
पण प्रिया गाढ झोपी गेली होती..
त्याने तिला डिस्टरब नाही केल. पण प्रियाच आजच बदललेलं वागणं आणि बोलणं त्याला थोडं वेगळ वाटलं.. तिच्यात झालेला बदल रोहनच्या नजरेतून सुटला नाही. ती आपल्यापासून काही तरी लपवतेय असं त्याला आधी पासूनच जाणवू लागलेलं पण आज मात्र त्याची खात्री होतं होती.. प्रिया नक्की काय लपवत असेल आपल्यापासून असा विचार तो करू लागला.
वाटेत त्याला सिमकार्डच दुकान उघड दिसल.. तसं त्याने गाडी बाजुला घेतली.
प्रियाला आवाज देतच स्वतःचा सिट बेल्ट त्याने काढला. पण प्रियाला खूप गाढ झोप लागली होती. तिने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. प्रिया उठत नाही म्हणून रोहनने तिच्या हाताला स्पर्श करत तिला जागे करण्याचा प्रयत्न केला.
प्रियाला ताप भरलाय असं त्याला जाणवलं. खात्री करुन घेण्यासाठी त्याने तिच्या कपाळावर हात टेकवला. कपाळ चांगलंच तापलं होतं. आत्ता मात्र त्याच्या हृदयाची धडधड थोडी वाढली. त्याने गाडी लगेच क्लिनिकच्या दिशेने वळवली. क्लिनिक बाहेर गाडी पार्क करुन त्याने प्रियाला उठवलं.
किलकिल्या डोळ्यांनी प्रियाने बाहेर डोकावून पाहिलं..
"आपण कुठे आलोत.? " तिने विचारलं.
बोलताना स्वतःचं डोकं तिने धरलेल. अशक्तपणा भरपूर जाणवू लागलेला तिला.
"आपणं डॉक्टरकडे आलोय.. तू सांगायचस ना मला बर वाटत नाही म्हणून. किती ताप आहे बघ अंगात. मी तुला उठवायसाठी तुझा हात पकडला तेव्हा मला जाणवलं की तुला ताप आहे." रोहनने असं म्हणताच प्रिया रोहनकडे बघतच बसली. तिच्या डोळ्यांतून पाणी येऊ लागले.
"सॉरी,मी तुला अस न विचारताच हात लावला. तुला आवाज दिलेला मी.. पण तू उठत नव्हतीस. आणि तु अस आजारपण अंगावर काढलेलं मला अजिबात चालणार नाही. तुला काय झालं तर मी कसा जगेल जरा तर विचार कर...." रोहन ने असं म्हणताच प्रियाला थोडं आणखीनच भरून आलं. ती शांतच बसुन राहिली. खर तर रोहनच प्रेम बघून प्रियाला रडू आलेलं.
रोहन गाडी बाहेर पडला आणि तिच्या जवळ आला. तिला धरतच त्याने कार मधुन बाहेर काढले..
डॉक्टरांकडे पेशंटची वर्दळ नव्हती. प्रियाच्या हाताला धरूनच त्याने तिला आतमध्ये आणले.
डॉक्टरांनी औषध लिहुन दिली. औषधानी बर वाटेल अस देखील सांगितलं.
रोहन डॉक्टरांशी बोलत असताना प्रिया मात्र रोहनकडे एकटक बघत होती. डॉक्टरांसोबत बोलणं जसं आटोपलं तसं रोहनने तिचा हात पकडून पुन्हा तिला गाडीत बसवले. आणि गाडी सगळ्यात आधी हॉटेलजवळ आणली.
तीपण पोटभर जेवू घातलं आणि त्याच्याच पुढ्यात औषध देखील घ्यायला सांगितले. तो सांगेल तसं त्याच ती ऐकत होती.
जेवण आटोपून तो तिला घरी सोडायला निघाला..
गाडीत प्रिया शांत बसुन होती. थोडं बरं वाटु लागलेलं तिला. खरं तर रोहनच तिच्यावर ओतू जाणाऱ्या प्रेमाने तिच्या तापाला कुठे तरी दुर पळवून लावलेलं.
"आता बर वाटत का प्रिया तुला ?" तिच्या नकळत त्याने तिच्या हातावर हात ठेवतच तिला विचारलं.
खरं तर ताप कितपत कमी झालाय हे त्याला बघायचं होतं.
" हम्म जरा जरा.." ती त्याला स्मित देतच उत्तरली. तिच्या चेहऱ्यावर आत्ता कुठे तेज आलेलं..
"एक विचारू का प्रिया? " रोहन ने थोडं अवघडतच विचारलं.
"हम्मम.." तिने हुंकार भरतच त्याला अनुमती दिली..
"तुला खरच कसला त्रास नाही ना. म्हणजे मला सारख अस वाटत की तू माझ्या पासून काहीतरी लपवतेस." त्यान्स त्याच्या मनातील शंका तिला विचारलीच..
"नाही तस काही नाही." ती उत्तरली.
"सिम कार्डच काय? ते तर राहूनच गेल.." रोहन म्हणाला.
खरं तर प्रियासोबत बोलल्याशिवाय त्याला चैन पडणार नव्हती.. म्हणुनच तिचं सिमकार्ड बनवुन घ्यायच्या मागे तो लागलेला..
"डोन्ट व्हरी..ते मी उद्या कामावर जाताना घेईल.. " त्याला स्मित देतच ती म्हणाली..
"उद्या आराम कर ना ग राणी. तब्येत बघ कशी झालीय? " त्याने काळजीतच म्हटले.
"हम्म बघते.." तिने म्हटले..
"आणि नवीन नंबर मला पाठव.." रोहन म्हणाला.
"घेतल्या घेतल्या तुम्हांला फोन करते आधी.." ती म्हणाली.. तसं तो हसु लागलं..
रोहनने प्रियाला घरी सोडले आणि स्वतःच्या घरी निघुन आला. घरी आल्यावर मात्र प्रिया रोहनच्याच विचारात हरवून गेलेली. त्याचा हाताला झालेला स्पर्श तिच्या गालाला गुलाबी करत होता. आत्ता कितीही काही झालं तरी प्रियाला रोहनला गमवायचं नव्हतं..
ऋषी आपल्याला कोणत्याच प्रकारे त्रास देणार नाही याची पूरेपूर काळजी ती घेऊ लागली. सोसिएल मीडियावर असणाऱ्या तिच्या सर्व अकाउंट्सला तिने कायमचा रामराम ठोकला.
असच महिना सरला..
ऋषीने ह्या दोन महिन्यात प्रियाला कधीही त्रास दिला नाही. पण हा महिना प्रिया आणि रोहनसाठी सुखद होते. रोहन प्रियाचा बेस्ट फ्रेंड तर झालेला.. पण तिने नवरा म्हणुन त्याचा स्वीकार देखील केलेला.. दोघांचेही नातं मैत्रीच्या पुढे आणि नवरा बायकोच्या अलीकडच्या सीमारेषेवर येऊन पोहचल होतं.
अश्यातच रोहनचा वाढदिवस जवळ आलेला. प्रियाने रोहनला सरप्राईस द्यायचं ठरवलं. पण तिने रोहनला जराही जाणवू दिल नाही की तिला त्याचा वाढदिवस माहिती आहे.
सकाळी ती नेहमी प्रमाणे रोहनसोबत कामाला निघाली. रोहनला खूप वाईट वाटलं प्रियाने त्याला बर्थडे विश नाही केलं. जसं रोहन प्रियाला सोडून कामावर गेला तसं प्रियाने टेक्सि पकडली आणि पुन्हा घरी निघुन आली.
घरी येता येतात, तिने रोहनसाठी सोन्याचं ब्रेसलेट घेतले. त्याच्यासाठी केकची ऑर्डर दिली. घर सजवण्याच्या फुगे घेतले व इतर डेकोरेशनच सामान सुद्धा घेतलं.
सगळ्यात मोठं सरप्राईज ती त्याला देणार होती आणि ते म्हणजे रोहनला तिचं त्याच्यावर असणाऱ्या प्रेमाची कबुली..
सकाळपासून सगळं अगदी प्रियाच्या प्लॅन नुसार चाललं होतं. सगळं सामान व्यवस्थित घेत प्रिया घरी आली.
क्षणभर सुद्धा विश्रांती न घेता तिने थेट बेडरूममध्ये स्वतःचा मोर्चा नेला. गुलाबाच्या पाकळ्या तिने बेडवर पसरवल्या. आज पुर्ण पणे रोहनमय होऊन जायचं असं तिने ठरवलं होतं.
खुप वेळ स्वतःने सजवलेला बेड ती बघत होती. हे सगळ बघुन रोहन कसा रिएक्ट होईल , हा विचार करुन ती गालातल्या गालात हसत होती..
रोहनच्या आवडीचा जेवणाचा थाट ती घालणार होती..
जेवणबनव्यासाठी किचनमध्ये ती वळणार तोच दरवाजाची बेल वाजली..
"ह्या वेळेला कोण आलं असेल? रोहन तर नाही..?
शट..! रोहनला माझा प्लॅन कळला का? " दरवाजा उघडायला पोहचेपर्यंत मनात येऊन गेलेल्या नको त्या विचारांनी तिला नाराज केल..
शट..! रोहनला माझा प्लॅन कळला का? " दरवाजा उघडायला पोहचेपर्यंत मनात येऊन गेलेल्या नको त्या विचारांनी तिला नाराज केल..
तिने नाराज होतच दरवाजा उघडला तर समोर ऋषी. त्याला बघून ती स्तब्धच झाली.
क्रमशः
काय होईल पुढे? कळेल पुढील आणि शेवटच्या भागात.. कथा आत्ता पर्यंत कशी वाटली हे नक्की कळवा. शेवटचा भाग वाचायला आवडेल कि नाही हे सुद्धा कळवा..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा