प्रिया दारात उभ्या असलेल्या ऋषीला बघतच राहिली.
शेजारच्या साने काकु नुकत्याच मार्केट मधुन आलेल्या.. स्वतःच्या दाराच कुलूप उघडत होत्या त्या. त्यांच्या दरवाजाच्या कडीचा कर्कश आवाज त्या शांततेत घुमला..
"काय ग प्रिया आज कामावर नाही गेलीस. " प्रियाला बघुन त्यांनी प्रश्न केला.
"नाही काकु आज सुट्टी घेतली. कामावर जायचा कंटाळा केला मी. " साने काकूंसोबत बोलताना तिची नजर मात्र तिच्या समोर उभ्या असलेल्या ऋषीवर होती.
"अग हा तुझा पत्ता मला विचारत होता. मी म्हटलं त्याला ह्या वेळेला तुला कोणी भेटणार नाही.. कारण दोघेही नवरा बायको ऑफिस मध्ये जातात.. तरी वर जाऊन बघतो म्हणाला तो.. म्हणुन बरं झालं.." असं म्हणत साने काकू हसल्या..
जबरदस्तीच हसु ओठांवर आणत प्रिया सुद्धा हसली.
"आणि काय ग रोहन आहे कुठे.? कधीच फोन लावते त्याला. उचलतच नाही.. माझं महत्वाचं काम होत ग त्याच्याकडे. " साने काकू उदास पणेच म्हणाल्या..
"ते मीटिंगमध्ये असतील. मिटिंग मधुन फ्री झाल्यावर तूमचे मिस कॉल बघून ते करतील तुम्हाला फोन.." प्रिया साने काकूंना म्हणाली.
"बरं.. त्याच्या फोनची वाट बघते मी.. तू बघ पाहुण्यांना.." साने काकू म्हणाल्या आणि स्वतःच्या घरात गेल्या.
पण साने काकूंच्या घराचा दरवाजा सदानकदा उघडाच..
ह्यावेळेस सुद्धा..
बाहेर तमाशा नको म्हणून प्रियाने ऋषीला आत घेतलं. आणि त्याच्यासोबत स्वतः सुद्धा आत गेली. प्रियाने दरवाजा मेन डॉर बंद केलाच नाही. उगाच संशयाला कारण नको म्हणुन.
घरी येताच ऋषी ऐटीतच सोफ्यावर बसला.
ज्या ऋषीला भेटण्यासाठी प्रियाचा जीव तिळमिळ तुटायचा.. त्याच ऋषीला बघुन प्रियाला संताप झाला होता.
"का आलास तू इथे? आणि माझा पत्ता कसा मिळाला तुला.?? " प्रियाने रागातच विचारलं.
"तुला काय वाटल तू नंबर बदलास तर मला तू परत भेटणार नाही का. " डावी भुवई वर उचलत त्याने प्रियाला विचारल.
"हे सगळ सोड ग... काय काय शॉपिंग केलीस मग आज.? आज काही स्पेसिअल आहे का..? नाही म्हणजे केक शॉपमधून बाहेर पडताना बघितलं मी तुला म्हणुन विचारतोय.." ऋषी अगदी नॉर्मल होतच प्रियाकडे बघत होता पण प्रियाला नॉर्मल रहाता येत नव्हतं..
"आत्ताच्या आता इथून निघायचं ऋषी." तर्जनी तिने दरवाजाच्या दिशेने दाखवतच तिला म्हटले.
"काय ग प्रिया तू?? साधं पाणी सुद्धा विचारत नाहीस. निदान पाणी तरी देशील की नाही? खुप लांबून आलोय मी.. निदान पाणी देऊन तरी माझी तहान भागव.. चहा नाही दिलास तरी चालेल" दोन्ही हात प्रियासमोर धरतच ऋषी म्हणाला.
प्रिया पाय आपटतच किचनमध्ये पाणी आणायला गेली,
तिच संधी साधून ऋषीने दरवाजा बंद केला...
"तु पाणी पिऊन निघू शकतोस आणि तू दरवाजा का बंद केलायस.?" प्रियाने थोडं घाबरतच त्याला विचारलं.
"मला घरी पाठवायची एवढी काय घाई आहे ग तुला..? मी तर विचार करत होतो कि एवढ्या लांबून आलोय तर भाऊजींना भेटुनच जातो.. "मिश्किल हसु ओठांवर आणतच ऋषी प्रियाला म्हणाला.
"का करतोयस तू असं??" रडवलेल्या सुरातच तिने त्याला विचारलं..
"तुझ्यासाठी. मग काय ठरवलंस??" स्वतःचं पाऊल प्रियाच्या दिशेने टाकतच तो म्हणाला.
" कश्याबद्दल?? " ती स्वतःची पाऊले मागे घेतं होती.. ऋषी आणि आपल्यातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न प्रियाचा सुरू होता..
ह्या गडबडीत प्रियाचा फोन वाजत होता. फोन रोहनचा आहे हे कळायला प्रियाला वेळ लागला नाही. कारण प्रियाने रोहनच्या नंबरसाठी वेगळीच ट्यून ठेवलेली. पण आत्ताच्या घडीला रोहनचा दोन उचलायच्या मनस्थितीत प्रिया नव्हती..
"मी कश्याबद्दल बोलतोय हि गोष्ट तुला न कळायला लहान आहेस का ग प्रिया तु..?" गालातल्या गालात तो हसत होता..आणि प्रियाच्या जवळ जात होता.
" ऋषी पुढे येऊ नकोस. आहेस तिथेच थांब. " प्रियाने रागातच त्याला म्हटले पण तो थांबत नव्हता..
हे बघुन प्रिया पळतच किचनमध्ये शिरली. मांडणीमधील एका रकाण्यात अडकलेली सूरी प्रियाने हातात घेतली.
पुन्हा रोहनचा फोन वाजला.. फोन आता सारखा रिंग होत होता. पण प्रियाच लक्ष फोनकडे नव्हतंच. ऋषीने प्रियाचा रिंग होणारा फोन हातात घेतला. मिश्किल पणे हसतच तिचा फोन त्याने स्विच ऑफ केला. आणि पुन्हा प्रियाच्या दिशेने येऊ लागला.
"ऋषीं माझ्याजवळ येऊ नकोस.. माझ्यापासून लांब हो.. नाही तर.. नाही तर.." भीतीने प्रियाची बोबडीच वळली होती.. तिला शब्दच सुचतं नव्हते..
"नाही तर काय करशील? मारशील मला... ते पण ह्या सुरीने. ? " असं म्हणत ऋषी घाबरलेल्या प्रियावर खळखळून हसु लागला.
" तुला नाही मारू शकली तरी स्वतःला तर मी मारूच शकतेना.? " स्वतःच्या मनगटावर सूरी ठेवतच तिने ऋषीला धमकवले..
"एवढी हिंमत आहे तुझ्यात..? " प्रियाला असा प्रश्न करताना ऋषीच्या दोन्ही भुवाय उंचावलेल्या..
तिच्या शरीराचे लचके तोडण्यासाठी तो एक एक करुन स्वतःची पाऊले तिच्या दिशेने टाकू लागला.
"ऋषी पुढे येऊ नकोस... तू थांब तिथे..." ती त्याच्या समोर गयावाया करू लागली.. पण ऋषी विरघळणार नव्हता..
एक एक पाऊल मागे घेत प्रियाची पाठ भिंतीला येऊन टेकली. आता ह्यातून आपली सुटका नाही हे तिला कळून चुकलं होत..
पुढचा मागचा विचार न करता प्रियाने सूरी स्वतः च्या डाव्या हातावरून फिरवली. थोडक्यासाठी तिची नस बचावली. पण मनगटातुन रक्ताची धार वाहू लागलीम.रक्तप्रवाह होऊ लागला.
"ये अजून पुढे..." आत्ता प्रियाने समोरूनच ऋषीला आव्हाण केल.
वेदनेने येणार रडू आता रुद्र अवतारात उतरू लागलं. ह्या वेळेला ती पुढे पाऊले टाकत होती आणि ऋषी माघार घेतं होता मागे अशी काहीशी अवस्था होती.
"प्रिया प्लिज थांब.. " ऋषी घाबरतच प्रियाला म्हणाला.
"का थांबु.??
फक्त माझं शरीर हवय ना तुला. ते ह्या जन्मात कदापि शक्य नाही ऋषी. माझ्या शरीरावर फक्त आणि फक्त रोहनचाच हक्क आहे." असं म्हणत प्रियाने धारदार सूरी पुन्हा एकदा स्वतःच्या हातावरून फिरवली.
फक्त माझं शरीर हवय ना तुला. ते ह्या जन्मात कदापि शक्य नाही ऋषी. माझ्या शरीरावर फक्त आणि फक्त रोहनचाच हक्क आहे." असं म्हणत प्रियाने धारदार सूरी पुन्हा एकदा स्वतःच्या हातावरून फिरवली.
रक्ताने मागत चाललेला तिचा हात बघुन ऋषी तिच्या पासुन दुर जाऊ लागला. ज्या सोफ्यावर तो रुबाबात बसलेला त्याच सोफ्यावर येऊन पडला. प्रियाचा अवतार पाहून ऋषी चांगलाच घाबरला. सोफ्यावरून उडी मारून तो दरवाजाच्या दिशेने पळत सुटला.. दरवाजाची कडी उघडून त्याने तिथुन पळ काढला. प्रियाने तडक येत दरवाजा बंद केला..
सोफ्यावर बसुन ती रडू लागली. हातातून असह्य वेदना तिला येत होत्या.
आणि तोच पुन्हा बेल वाजली..
प्रियाने लगेच दरवाजा बंद केला. आणि हातातील सूरी पण तिने रडतच खाली फेकली. तोच दारावरची बेल वाजली. प्रियाने पुन्हा धीर एकवटून सूरी हातात पकडली आणि तिने दरवाजा उघडला. साने काकूंना दारात बघून तिने सूरी मागे लपवली आणि स्वतःचा तो हात सुद्धा जो रक्ताने माखला होता..
"काय झालं काकु.?" आवाजात थोडा बदल उतरवतच तिने त्यांना विचारलं..
"अग रोहन तुला फोन करतोय. फोन स्विच ऑफ येतोय म्हणे.." स्वतः चा हातातला फोन तिला देऊन साने काकु निघून गेल्या.
" ह ह हॅलो,.. " प्रिया घाबरतच फोनवर बोलू लागली.
" प्रिया काय हे..? " रोहन ने विचारल.
रोहन कश्याबद्दल बोलतायत हे प्रियाला कळत नव्हतं.. ती पुरती घाबरून गेली..
" क क काय झालं?" अडखळतच तिने विचारलं.
"अग राणी तुझा फोन का बंद येतो आणि मी तुला कामावर सोडलेलं तू घरी कशी.? बर वाटत नाही का?" रोहन काळजी करत होता तिची.
" तुम्हाला कस कळलं मी घरी आहे ते.? " प्रियाने त्याला प्रश्न केला..
"अग साने काकूंना थोडे पैसे हवे होते ग. पुढच्या महिन्यात देतो बोलले आणि सहज बोलता बोलता तुझ्या बद्दल त्यांनी विचारलं.. तु आज घरी कशी म्हणुन.." रोहन ने म्हटले.
"बरं रोहन ऐकणा... घरी आल्यावर बोलूयातना आपण. . मी फोन स्विच ऑन करते. ठिक आहे.?" प्रियाने विचारल..
"तू बरी आहेस ना.? " रोहनने काळजी करतच विचारल..
"हो रोहन. तुम्ही उगाच टेन्शन नका घेतं बसु.. तुम्हांला जमलं तर थोडं लवकर या. ठेवतेमी.. बाय...."
असं म्हणत प्रियाने फोन कट करून साने काकूंना दिला. आणि दरवाजा बंद करून घेतला. ती बेडरूम मध्ये शिरली.
धाड sss !! " प्रियाने बेडरूमचा दरवाजा आपटाला.
हातात असणारा धारदार चाकू तिने बाजुला फेकला. शॉकेस मध्ये ठेवलेल्या रोहनच्या फोटोकडे एकटक ती बघु लागली आणि नंतर तोच फोटो हृदयाशी कवटाळत धायमोकलून ती रडू लागली. रोहन आपल्यापासुन दूर निघुन जाईल अशी अनामिक भीती तिच्या मनात दाटून आली. हातातुन देखील तिला खूप वेदना होत होत्या.पण काही वेळाने तिची तिच शांत झाली. मनात काही तरी ठरवून ती उठली. तोंडावर पाणी मारलं.
प्रत्येक क्षणाला हातातून उभरून बाहेर येणारी कळ तिला आज घडलेल्या घटनेची आठवण करून देत होती. तिने कापटावर ठेवलेली स्वतः ची बेग काढली. त्यात स्वतः चे कपडे तिने भरून ठेवले आणि ती बॅग तिने दरवाजाच्या मागे लपवून ठेवली. तिला काहीही करून रोहनचा बर्थडे खूप थाटात करायचा होता. आजचा दिवस त्याच्या साठी स्पेशियल असला पाहिजे असं काहीसं तिला करायचं होत आणि तिच खुप काही ठरलं सुद्धा होत..
तिने मनगटावर बेंडेज गुंडाळली व त्यावर पट्टी बांधली. त्याच हाताने तिने संपूर्ण घर सजवलं. रोहनच्या आवडी निवडी ह्या दोन महिन्यात ती जाणून गेलेली. त्याच्या आवडीचं सर्व पदार्थ तिने बनवले. आणि स्वतः सुद्धा सुंदर अशी तैयार होऊन बसली. तैयार होताना तिने हाताला लावलेली बेंडेज रोहनला दिसु नये म्हणून संपूर्ण हातभार बांगड्या भरल्या..
रोहनच्या गाडीचा आवाज आला.
प्रियाने घरातील सर्व दिवे बंद केले आणि काळोख करून ती बसली. खूप वेळ झाला तरी प्रिया दरवाजा उघडत नाही हे बघून रोहन ने स्वतः जवळ असलेल्या किल्लीने दार उघडले. घर भर काळोख बघून रोहन ने दरवाजा शेजारीच असणारे लाईट आणि पंख्याचे बटणं प्रेस केले.
पंखा फिरताच गुलाबाच्या पाकळ्या रोहनवर बरसू लागल्या. संपूर्ण घरभर प्रियाने रोहनचे आणि तिच्या लग्नाचे फोटो चिकटवलेले. घराचा बदललेला नक्षा रोहन बघतच राहिला..
" बार बार दिन ये आये....
बार बार दिल ये गाये....
तुम जिओ हजारो साल
ये मेदि हे आरझु" प्रिया गाणं बोलतच रोहन जवळ आली. हातात हार्ट शेप मधला कॅक होता..
ज्या वर HAPPY BIRTHDAY HUSBAND असं ठळक क्रिम मध्ये लिहिलेल.
केक तिने टीपोयवर ठेवला. रोहनचा हात धरून तिने रोहनला सोफ्यावर बसवले. देव्हाऱ्यातील दिवा तिने एका ताटात घेऊन रोहनचे औक्षण केले. आणि गिफ्ट म्हणून घेतलेलं ब्रेसलेट रोहनच्या मनगटावर घातलं. नकळत का होईना रोहनचे डोळे पाणावले. प्रियाने आज जे केलेलं जे रोहनची आई दरवर्षी त्याच्या वाढदिवसाला करायची.
"रोहन तुम्ही अस रडता का. आवडलं नाही का माझं गिफ्ट.? " रोहनला रडताना पाहुन आपण काही तरी चुकीचं केल असं तिला वाटु लागलं..
" खूप आवडल ग राणी. मला सकाळपासून खूप वाईट होत तु मला वाढदिवसाच्या शुभेच्छा नाही दिल्या म्हणून. पण आता खरच खूप छान वाटतय. " रोहन हसतच म्हणाला..
" मला तुम्हाला सरप्राईज द्यायच होत.. म्हणुन एवढा खटाटोप केला मी. " असं म्हणत ती हसु लागलीम.
प्रियाने टीपॉय रोहनच्या पुढ्यात घेतला ज्यावर तिने केक ठेवलेला..
रोहनचा हात पकडून त्याला केक कापायला लावला आणि त्याला केक भरवला. फक्त एवढच नाही तर एक गोड किस रोहनच्या गालावर दिल.
रोहन प्रियाकडे बघतच राहिला. आय लव्ह यु रोहन.. अस बोलून प्रियाने रोहनच्या बर्थडे दिवशी खूप छान गिफ्ट त्याला दिल. रोहनला तर आपण स्वप्नात हरवून गेल्यासारखं वाटत होतं.
"खरच प्रिया.. एवढं प्रेम करतेस माझ्यावर...?" रोहन ने विचारलं.
प्रियाने लाजतच हो मान डू लवली.
"ऐकाणा तुम्ही फ्रेश होऊन याना.. अजून एक सरप्राइज बाकी आहे." प्रिया थोडं लाजतच म्हणालीम.
"अजून सुद्धा बाकीच आहे. ?" प्रश्न करताना रोहनचे डोळे मोठे होते..
"येस बर्थडे बॉय.." प्रिया म्हणाली..
आजची प्रिया रोहनला खरच खुप वेगळीच वाटली.. अगदी तशीच जशी त्याला ती पाहिजे होती..
"ठिक आहे राणी सरकार.. मी हा गेलो नि हा आलो.." प्रियाचे गाल ओढतच तो म्हणाला.
आणि फ्रेश होण्यासाठी निघूनही गेला..
रोहन फ्रेश होऊन बाहेर आल्यावर बघतो तर पुन्हा घरभर काळोख..
" प्रिया..." त्याने तिला आवाज दिला..
"तुम्ही हॉलमध्ये याना रोहन.." प्रिया म्हणाली..
रोहन हॉलमध्ये येऊन बघतो तर काय.??
प्रियाने डायनिंग टेबले सुंदर पद्धतीने सजवलेलं आणि हॉलमध्ये प्रत्येक ठिकाणी मेणबत्ती लावून तिने हॉलचा नक्षा पुन्हा एकदा बदलेला..
कॅण्डल लाईट डिनरचा प्लॅन होता मॅडमचा..
समोर दिसणाऱ्या नजऱ्यावरून रोहनची नजर काही केल्या हटतच नव्हती.. रोहनकडे बघतच प्रियाने बाजुलाच असलेल म्युझिक सिस्टीमचा रिमोट हातात घेतलं..
रिमोटच बटन दाबून गाण चालू केल तिने.. तेसुद्धा . दोघांच्याही आवडीचं गाणं लावते..
प्यार हुआ
इक़रार हुआ है
प्यार से फिर क्यों डरता है दिल
इक़रार हुआ है
प्यार से फिर क्यों डरता है दिल
कहता है दिल,
रस्ता मुश्किल
मालूम नहीं है कहाँ मंज़िल
रस्ता मुश्किल
मालूम नहीं है कहाँ मंज़िल
गाण्याचे बोल चालू असतात.. तेच गुणगुणत प्रिया मात्र रोहनजवळ गेली आणि स्वतःचा उजवा हात त्याच्या पुढ्यात तिने धरला.
"रोहन कॅन वी डान्स.. इफ यु डोन्ट माईंड?" तिने त्याला विचारलं.
रोहन तिला नाही बोलूच शकत नव्हता. मेणबत्तीच्या प्रकाशात प्रिया खुपच सुंदर दिसत होती. तो तिला बघतच राहिला... प्रियाने रोहनचा उजवा हात स्वतःच्या हातात पकडला आणि त्याचा डावा हात तिने स्वतःच्या कंबरेवर ठेवला. दोघेही जुन्या गाण्यावर ताल पकडून नाचू लागलेले.. ते सुद्धा एकमेकांच्या डोळ्यात डोळे रोवत..
गाणं संपलं.. दोघांनाही चांगलीच धाप लागलेली.
प्रियाने रोहनचा हात पकडून त्याला खुर्चीवर बसवलं. जेवण घेऊन येते बोलून ती किचनमध्ये गेली. रोहनला तिने जेवण वाढलं. स्वतःच्या आवडीचा मेनु बघुन रोहन खुप खुश झाला.
"थँक्स प्रिया.. किती केलंस तू आज माझ्यासाठी." प्रियाच कौतुक करण्यावाचून रोहन स्वतःला अडvuच शकला नाही.
"थँक्स.?? " प्रियाने लटक्या रागात रोहनला म्हटले.
"सॉरी ग राणी.. मी विसरलो.." स्वतःचे दोन्ही कान धरतच रोहन प्रियाला म्हणाला.
" पुन्हा सॉरी...? " प्रियाने म्हटले..
तसं क्षणभर रोहन गोंधळला.. त्याचा गोंधळलेला चेहरा बघुन प्रिया खळखळून हसु लागली त्याच्यावर.. आणि तिला हसताना बघुन तो सुद्धा..!
"रोहन... तुम्हांला खरच आवडलना माझं सरप्राईज गिफ्ट,?" प्रियाने विचारलं.
"हो ग राणी. आत्ता पर्यंतच सर्वात सुंदर बर्थडे गिफ्ट आहे हे माझ्यासाठी.." रोहन म्हणाला.
"खरच...? " त्याला प्रश्न करताना प्रियचे डोळे मोठे झालेले.. आनंद तिच्या डोळ्यांतून ओसांडून वाहत होता..
दोघेही एकमेकांकडे बघतच जेवू लागले..
दोघांचं ही जेवून झाल, तसं प्रिया सगळ आवरू लागली. डायनिंग टेबलवरील पातेलं एक एक करुन ती आत किचनमध्ये नेऊन ठेवु लागली. रोहन हात धुवून येऊन तसाच खुर्चीवर येऊन बसून प्रियाकडे बघतच होता
प्रियाने त्याच्या आवडीची बडीशेप आणलेली.. ती त्याच्या हातावर तिने टेकवली..
त्याला स्मित देत ती किचनच्या दिशेने पुन्हा वळणार तोच रोहनने तिचा हात खेचला आणि नेमका त्याने डावा हात तिचा खेचला.. मनगटावर झालेल्या सुरीच्या घावाने एक कळ प्रियाच्या संपुर्ण नसात भिनली..
"आई ग.." प्रिया मोठ्यानेच किंचाळली. स्वतःचा हात धरत ती खालीच बसली. डोळ्यांतून पाणी आणि हातातून रक्ताची धार वाहू लागली तिच्या..
रोहन खूप घाबरला..
" प्रिया काय झालं..? " त्याने तिला प्रश्न केला.
पण ती बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती.
तो घाबरतच दरवाजाच्या दिशेने गेला. रूममधील सगळ्यांना लाइटी त्याने लावल्या.. आणि पुन्हा प्रियाजवळ तो आला.
प्रिया आत्ता चांगलीच घाबरली. कारण जे व्हायला नको तेच झालं. तिने भीतीने लगेच हात मागे लपवला.. डोळ्यातील पाणी पुसले . पण रोहनच्या नजरेपुढे तिची कोणतीच हालचाल सुटली नाही..पूर्ण फरशी प्रियाच्या हातातून पडणाऱ्या रक्ताने माखली होती.. रोहन पुरता घाबरून गेला..
"ए राणी.. काय झालंय तुला. हात दाखव तूझा इथे.." तिने मागे लपवलेला हात तो ओढू लागला.
"काही नाही झालंय रोहन.. तुम्ही नका टेन्शन घेऊन.." प्रिया रोहनला हात काही दाखवत नव्हती.. स्वतःचा हात ती मागेच दडवून ठेवुन होती..
"प्रिया हात दाखव.." नजरेत राग आणतच रोहनने तिला म्हटले..
ह्या दोन महिन्यात प्रिया पहिल्यांदाच रोहनला अस रागाने बोलताना बघत होती. आत्ता भीतीने तिला आणखीनच रडू येऊ लागलं.
तिने रडतच रोहन पुढे हात केला. हातातील बांगड्यामुळे प्रियाला झालेली झालेली जखम रोहनला दिसत नव्हती. त्याने अलगद तिच्या हातातील बांगड्या उतरवल्या. खोल वर गेलेले ते सुरीचे घाव बघून त्याचे डोळे पानावले.. पाणावलेल्या नजरेने त्यासने प्रियाकडे पाहिले..
" प्रिया हे सगळ काय आहे. ? " त्याचा कापरा स्वर थेट तिच्या हृदयाला भिडला..
"रोहन मला माफ करा. " असं म्हणत प्रिया धायमोकलून रडू लागली.
रोहन ने पळतच बेडरूममध्ये गेला.. फस्ट एड बॉक्स तो घेऊन आला. प्रियाच्या हातावर झालेली जखम डेटॉल ने क्लीन करुन त्याने त्यावर मलम पट्टी केली. तिच्या गालावरून ओंघळणार पाणी पुसत त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले.
" माझं काही चुकल का ग राणी?जे तू अस पाउल उचललस? " रोहन ने विचारलं.
प्रियाने नाही मध्ये मान डोलवली..
"मग? का असं केलंस..? प्लिज जे काही आहे ते सांग मला.." रोहन ने म्हटले..
प्रिया हुंदके देतच रडू लागली.
"मला तुमचा बर्थडे असा खराब करायचा नव्हता रोहन. मला माफ करा. आणि विश्वास ठेवा मी तुम्हाला सगळं खरं खर सांगणार होती.." रोहनला विश्वासात घेतं ती म्हणाली.
" तू अशी रडू नकोस.. शांत हो.. " पुन्हा त्याने तिच्या डोळ्यांवरून हात फिरवला..
"माझा एड्रेस शोधत आज तो इथे आलेला.." एक एक शब्द जोडतच प्रिया रोहनला म्हणाली..
"तो कोण प्रिया?? " रोहनने विचारल.
"ऋषी.. माझा भुतकाळ...!"
प्रियाने ऋषीसोबत अलिप्त असलेला तिचा भूतकाळाल रोहनच्या कानावर घातला.
ऋषी बद्दल सांगताना एका वेगळाच आक्रोश ती करत होती.तिचा तो आक्रोश, तिच ते हमसून हमसून रडणं रोहन बघतच राहिला. आज तो कसा वागला हे ही तिने रोहनला सांगितलं..
रोहन तिच बोलणं ऐकतच राहिला.
"तू चल माझ्याबरोबर.." रोहन म्हणाला.
"रोहन मला माहित होतं, तुम्हाला हे सगळ कळल्यावर तुम्ही माझ्यासोबत कधीच नाही रहाणार. मी तुमच्या पासुन हे सगळ लपवलं म्हणुन मला माफ करा रोहन. " एवढं बोलून प्रिया बेडरूममध्ये गेली.
दरवाजाच्या मागे लपवून ठेवलेली कपड्यांची बेग स्वतः सोबत घेऊन ती रोहनच्या पुढे आली. रोहनने एक नजर तिच्यावर आणि एक नजर बॅगेवरून फिरवली.
"आता हे काय आहे प्रिया.?" रोहनने विचारलं.
"मी दुपारीच बॅग भरून ठेवलेली. आजचा दिवस तुम्हाला फक्त आनंदी बघायचं होत आणि उद्या माझा भूतकाळ तुम्हांला सांगून मला ह्या सगळ्यातून मुक्त व्हायचं होत रोहन.. मला अजुन हि लपवा छपवी नव्हती जमणार. मी प्रेम खरं केलेलं रोहन. पण तेच प्रेम कलंक बनून माझ्या संसारात आलं.. तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य आहे. " रोहन समोर दोन्ही हात जोडून ती रडत होती.
रोहन तिचा उजवा हात पकडला आणि तिचा हात ओढतच तिला घेऊन घराबाहेर पडला..
पार्किंग लॉटमध्ये पार्क केलेली गाडी त्याने प्रियासमोर उभी केली.
"प्रिया गाडीत बस.. " कडक आवाजात तो म्हणाला.
प्रिया रडतच गाडीत बसली..
"रोहन माझ्या आई पप्पांना ह्या बद्दल खरच काहीही माहिती नाही. प्लिज तुम्ही त्यांना नकाना काही सांगू. ते हा धक्का पचवू शकणार नाही. प्लिज रोहन.." गाडीत बसल्यापासून रोहनला विनवणी करण्याचं काम प्रियाच सुरू होत.
रोहनने तिच्या बोलण्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही..
रोहनने स्वतःचा मोबाईल कानपाशी धरला आणि त्याने फोन वर बोलायला सुरुवात केली.
"तू आहेस ना तिथे? मी 10 मिनिटांत येतोय." एवढं बोलून रोहन फोन कट केला.
प्रिया अजुनही रडतच होती. अधुन मधुन रोहनवर नजर टाकत होती ती. पण तो तिच्याकडे बघत नव्हता..
रोहनने गाडी एका ठिकाणी थांबवली. रोहन कार बाहेर पडला आणि त्याने प्रियाच्या शेजारील दरवाजा उघडला. तिला बाहेर यायला सांगितले. तिचा हात धरतच तो तिला पोलिस स्टेशनमध्ये घेऊन जाऊ लागला.
"आपण इथे का आलोत रोहन? " प्रियाने घाबरतच विचारलं.
"ते आत गेल्यावर कळेल तुला. " रोहन ने असं बोलुन प्रियाला आणखीनच घाबरवलं.
रोहनचा मित्र किरण जो क्राईम ब्रांच मध्ये कामाला असतो तो त्याच्या आधी पोलिस स्टेशन मध्ये हजर होता..
रोहनने घडलेला प्रकार किरणच्या कानी घातला.
"वहिनी ऋषीचा नंबर किंवा त्याचा एड्रेस आहे का तुमच्याकडे? रोहनने विचारलं.
"नंबर माहितीय 980*******. पण पत्ता नाही माहीत मला..
"ऑफिसर्स नंबर ट्रेकिंगला टाका जिथे असेल तिथुन साल्याला पकडून माझ्यासमोर हजर करा." किरण ने ऑफिसर्स वर ऑर्डर सोडली.
येस सर म्हणत ऑफिसर्स त्याच्या समोरून निघुन गेले..
ते सगळं बघुन प्रिया आणखीनच घाबरून गेली.
जवळ पास एक दोन तासाने ऋषीला पोलिसांनी पकडून प्रियासमोर हजर केलेलं. रोहन ने प्रियाचा हात घट्ट पकडला आणि ती रोहनच्या मागे स्वतःला लपवू लागली. ऋषीचा दुपारचा अवतार आठवुन तिला अजुनही धडधडायला होत होतं..
किरण ने ऋषीला खुर्चीवर बसायला सांगितले.
"तु हिला ओळखतॊस? " किरण ने प्रिया वर नजर टाकतच ऋषीला विचारलं.
"हो.. हि प्रिया.." " ऋषी निर्धास्त होतं उत्तरला.
"आज का घरी गेलेलास तिच्या.? " किरण ने दुसरा प्रश्न केला तिला..
"हिनेच मला फोन करून बोलवून घेतलेलं साहेब." दोन्ही हात खिश्यात खुपसत ऋषी खुर्चीवरचा उठला आणि रोहन समोर येऊन उभा राहिला..
"हिचा हा नवरा कामावर गेल्यावर हि मला नेहमी घरी बोलवुन घेते.. तसंच आज सुद्धा तिने बोलवलं. होणार प्रियु? " रोहन मागे लपवलेल्या प्रियाला डोकावून बघतच तो विचारू लागला.
"रोहन हा खोट बोलतोय. मी असं काहीच नाही करत. तुमची शप्पथ.." प्रिया रडतच रोहनला सांगू लागली.
रोहनने प्रियाला पंजा दाखवला.. आणि तिला शांत बसायला सांगितले.
खरं तर रोहनला राग अनावर वर झालेला. आणि त्याचा हात उठला तो थेट ऋषीच्या गालावर. ऋषीच्या तोंडातून रक्त येऊ लागलं इतका जोरात प्रहार होता रोहनचा..
"माझा माझ्या प्रियावर पूर्ण विश्वास आहे. मी तिला ह्या ह्या 2 महिन्यात इतकं ओळखु लागलोय कि जे तु गेल्या 5 वर्षात ओळखू नाही शकलास. तु खूप कमनशिबी निघालास, जे ती तुझी बायको म्हणून तुझ्या आयुष्यात नाही. खर प्रेम करत होती तुझ्यावर पण तू त्या लायकच नाही निघालास. तिच प्रेम कलंकित करुन तु मोकळा झालास. आणि आत्ताही तेच करतोयस.. तु तिच्यावर लावलेला पहिल्या प्रेमाचा कलंक मी पुसून टाकतोय. मला ती जशी आहे तशीच कायम स्वरूपी माझ्या आयुष्यात हवीय..
"आत्ता काय बोललास?माझी प्रिया तुला फोन करून बोलवून घेते. दाखव बघू नंबर. ? " रोहनने विचारलं.
"ते ती पीसीओ मधुन फोन करायची. " ऋषी घाबरतच उत्तरला.
" ए आता खर सांगतो का दाखवू तुला खाकी मधली ताकद? " किरणने डरकाळी फोडली.. ऋषीं चांगलाच घाबरला.
" मला माफ करा साहेब. मला फक्त प्रिया आवडायची पण तिच्या पेक्षा तिची फिगर जास्त आवडायची. पण ती स्पर्श सुद्धा करू द्यायची नाही.. लग्न झाल्याशिवाय स्पर्श करायचा नाही अशी अट तिने ठेवलेली पण मला हिच्यासोबत लग्न नव्हतं करायचं. हिच लग्न झालं कळताच तिला ब्लॅकमेल करायच आणि आपला डाव साधायचा एवढाच हेतू होता माझा. म्हणून कालच बेंगलोर वरून आलो. हिने नंबर बदलला पण ऑफिस नाही. सकळी हिच्या ऑफिसच्या बाहेर जाऊन उभा राहिलो. प्रिया गाडीतून बाहेर उतरताच ती ऑफिसला जायचं सोडून दुसरीकडेच कुठे तरी जाऊ लागली. मी हिचा पाठलाग करत करत तिच्या घरी पोहचलो. घरी ती एकटीच होती ह्याची चौकशी मी तिच्या शेजारी राहणाऱ्या काकूंकडे केली. त्यांना फक्त मी प्रिया कुठे राहते विचारलं पण ह्या वेळेला ती कामावर असेल असं त्यांनी सांगितलं. घरी कोणीच नसेल अस त्या काकु बोलल्या. पण तरीही मी जाऊन बघतो एकदा म्हणून मी मुद्दामून पुढे आलो कारण मला माहित होतं प्रिया घरीच आहे. घरी जाताच मी हिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. पण ह्या शरीरावर फक्त आणि फक्त रोहनचाच हक्क आहे. जर मी रोहनची नाही तर कुणाची नाही म्हणून तिने स्वतःच तिचा हात कापला. मी घाबरून पळून आलो. बाकी मी हिच्यासोबत काहीही केलेलं नाही.. तुम्ही हिला विचारू शकता तसं.. " ऋषीने स्वतःचा गुन्हा कबूल केला.
"हवालदार हा जे बोलला ते त्याच्याकडून लिहून घ्या आणि आत टाका ह्याला. ह्याच पुढे काय करायच ते मी बघतो. " किरणने हवलादारावर हुकूम सोडला.
"तुम्ही दोघेही निघालात तरी चालेल.. " किरण ने रोहन आणि प्रियाला घरी जायला सांगितलं.
रोहन प्रियाला घेऊन पोलिस स्टेशनमधून बाहेर पडला. पोलिस स्टेशन मधुन बाहेर पडताच प्रिया रोहनला मिठी मारून रडू लागली.
"रोहन मला माफ करा. मी तुमच्यापासून हे सगळ लपवायला नको होतं. पण तुम्ही मला सोडुन जाल ह्या भीतीने मी नाही सांगितलं.." त्याच्या छातीवर डोकं टेकतच ती रडू लागली.
"अग राणी ह्यात तुझी काहीच चूक नाही. आणि हो.. आता तुला पहिल्या प्रेमाचा कलंक स्वतः सोबत घेऊन फिरायची काही गरज नाही." तिच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवतच रोहन म्हणाला.
"आय लव्ह यु रोहन.. मी खूप नशीबवान आहे जे तुम्ही माझ्या नशिबात आलात." तिने त्याला म्हटले..
"मीही कमनशिबी नाही ग प्रिया.. जे तुझ्यासारखी बायको मिळाली.. जी माझी खुप काळजी घेते आणि प्रेम तर माझ्यावर भरभरून करते हे आज मला कळलं." रोहन ने असं म्हणताच प्रिया गोड हसली आणि पुन्हा त्याच्या मिठीत शिरली.
दोघेही हसत एकमेकांच्या संसारात आता खऱ्या अर्थाने गुंतले आणि नवीन संसाराला लागले सुद्धा...
रोहन ने ऋषीला सहज सोडले नाही, सेक्शन आय पी सी 354, सेक्शन आय पी सी 354 बी द्वारे केस चालू झाली.
2 वर्षांनी,
रोहन आणि प्रियाच्या आयुष्यात गोड छकुलीच आगमन झाले आहे. प्रियाने तिच्या संगोपनासाठी घरीच राहण्याचा निर्णय घेतला जो रोहनला सुद्धा मान्य होता. रोहन प्रिया आणि त्या च्या छकुलीची खूप काळजी घेतो. जसा तो सुरुवातीपासून प्रियाशी वागायचा अजुनही तसाच आहे.
©भावना विनेश भुतल
कथा आवडली तर कमेंट नक्की करा.. @lovenovelsstudio ह्या माझ्या युट्युब चॅनल्सवर कथा ऑडिओ स्वरूपात उपलब्ध आहे. ज्यांना ही कथा ऐकायला सुद्धा आवडेल त्यांनी नक्कीच ऐका..
कथा इतरत्र शेअर करताना लेखकाच्या नावानेच करा..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा