Login

कलंक... स्टोरी ऑफ फोर्स मॅरेज

बदल्याच्या भावनेत जबरदस्ती बांधली गेलेली लग्नगाठ...
कलंक... स्टोरी ऑफ फोर्स मॅरेज...

एका बंद खोलीत आरश्यासमोर एक मुलगी नववधूच्या वेशात बसून होती. आज लग्न झाल होत तीच. पण त्या लग्नाचं तेज, एका नववधूच्या चेहऱ्यावर असणारी चमक, आनंद काहीच दिसून येत न्हवत तिच्याकडे बघून. दिसत होते ते फक्त तिच्या गालांवर सुकलेल्या अश्रुंचे डाग. आणि पाण्याने तुडुंब भरलेल्या नजरेत फक्त आणि फक्त दुःख.!!
सकाळी तर किती खुश होती ती. आज तीला पसंत असलेल्या मुलाशी विवाह होणार होता तिचा. मनातच सुखी संसाराची स्वप्न बघू लागली होती ती. सगळ्याच मुलींची आपल्या लग्नाबदल आपल्या आयुष्यभराच्या होणाऱ्या जोडीदाराबद्दल काही नां काही स्वप्न असतातच की. तशीच तिचेही काही स्वप्ने होती.. आणि आज तेच स्वप्न पूर्ण होणार होती.
कादंबरी...
एका साधारण घरात जन्माला आलेली कादंबरी चार वर्षाची होती त्यावेळी तिचे आई वडील एका कार अपघातात मरण पावले. कोवळ्या मनाची पोर ती. या घटनेचा खूप मोठा आघात झाला होता तिच्या कोवळ्या मनावर. नुकतच कळायला लागलं होत तीला त्यावेळी तिच्यावर हा दुःखाचा डोंगर कोसळला होता. पार तुटून गेली होती पोर. पण यातून तीला तिच्या काका काकूंनी बाहेर काढले. आई वडिलांनंतर त्यांनीच तिचा सांभाळ केला होता. अगदी स्वतःच्या मुलीप्रमाणे त्यांनी आजपर्यंत तीला जपलं होत.
आता ती वीस वर्षाची झाली होती. समोरून चालून एवढं मोठ्या घरच स्थळ आलं होत तर त्यांनी पण तीला या लग्नासाठी राजी केल होत. कादंबरी ज्या कंपनी मध्ये कामाला होती त्याच कंपनीचा सीईओ तिचा हात मागायला आला होता...

विराज देशमुख...
सी ई ओ ऑफ व्हिडी कंपनी... त्याने स्वतः कादंबरीच्या काका काकूंकडे तिचा हात मागितला होता. लग्नासाठी मागणी घातली होती. काका काकूंची परिस्थिती बघता तिने पण स्वखुशीने या लग्नाला होकार दिला होता. अश्यातच वारंवारच्या भेटीत कुठेतरी तिच्या मनात पण विराजबद्दल भावना निर्माण झाल्याच होत्या. तिचा होणारा नवरा होता तो. आता ती त्याचा विचार नाही का करणार.
आरश्यासमोर बसून कादंबरी तिच्या वैवाहिक जीवनाची स्वप्न रंगवत होती. पुढच्या प्रवासाचा विचार करून उगाचच मन उडू उडू होऊ लागलं होत तीच. असंख्य भावना मनात दाटून आल्या होत्या. विराजचा विचार करून तर गालांवर लाजेची लाली चढू लागली होती. जे तिच्या सौंदर्यात चार चांद लावत होती. कादंबरी तिच्याच विचारत हरवलेली असताना तिची मैत्रीण नीता तिच्याजवळ येते.
" आये हाये.!! काय दिसतीयेस राव तू कादंबरी. एकदम टवका. आज जीजूचं काय खरं नाही बाबा. आज तर जीजू क्लीन बोल्ड होणार आहेत तुझ हे रूप बघून. " नीता कादंबरीजवळ येत बोलते. तीच बोलणं ऐकून तर कादंबरी जास्तच लाजून जाते. लाजताना गालांवर आलेलं नितळ हसू आणि त्या हसण्यामुळे तिच्या दोन्ही गालांवर खुललेली ती खळी... खरंच किती सुंदर दिसत होती कादंबरी. अगदीच स्वर्गातील अप्सराच जणू.!!
" चल तुझा नवरदेव तुझी वाट बघतोय लग्नमंडपात.!! जास्त वाट नको ग बघायला लावू आमच्या जिजुंना. आधीच आतुरतेने तुझ्या वाटेकडे नजर लावून बसले आहेत. " नीता बोलते आणि तीला बाहेर घेऊन जाऊ लागते. कादंबरी तिच्याबरोबर जाऊ तर लागते. पण मनात आता अनामिक भीती दाटून आली होती..
'अनोळखी माणसं, नवीन नाती, लग्नासारखं नाजूक बंधन. जमेल का आपल्याला सगळं सांभाळून घ्यायला.' तिच्या मनात विचार चमकून जातो. आधीच थोडीशी भित्री असलेली कादंबरी हा विचार करूनच काळजाची धडधड वाढली होती तिच्या. या विचारतच ती लग्नमंडपात जाऊन पोहचते.
पंडितजींनी आधीच अंतरपाठ मध्ये धरला होता . आता ती एका बाजूला तर विराज दुसऱ्या बाजूला उभे होते. दोघांनाही एकमेकांना बघायची ओढ लागली होती. ती तर खाली मान घालून उभी होती. अश्यातच पंडितजी मंगलाष्टाका म्हणायला सुरुवात करतात.
स्वस्ति श्री गणनायकं गजमुखम, मोरेश्वरम सिद्धीधम ।
बल्लाळो मुरुडम विनायकमहम चिन्तामणि स्थेवरम।
लेण्याद्री गिरीजात्मकम सुरवरदम विघ्नेश्वरम् ओझरम ।
ग्रामो रांजण संस्थीतम गणपति।
कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।१।।
पाहिली मंगलाष्टाका होताच हॉलमध्ये उपस्थित असलेली सगळी लोक त्यांच्यावर अक्षदांचा वर्षाव करणार त्या आधीच सगळ्यांच्या कानात एक जोरदार आवाज घुमतो. तो आवाज एवढा मोठा असतो की सगळेच घाबरून हॉलच्या एंट्रन्सकडे बघू लागतात. तर समोर वीस तीस ब्लॅक सूट बूट घातलेली माणसं उभी होती. ते पण हातात गण घेऊन. ते दृश्य बघून तर तिथे उपस्थित सगळ्यांच्याच तोंडच पाणी पळालं होत.
कादंबरी पण समोर त्या माणसांना बघून हदरलीच होती. त्यात आता हलकी कुजबुज पण तिच्या कानावर पडत होती. तिथे उपस्थित प्रत्येक माणूस दंग होऊन एकमेकांशी कुजबुज करू लागला होता. कादंबरी आता घाबरून परत नजर खाली करते. तेच...
" टक टक.. टक टक.." बुटांचा आवाज तिच्या कानात घुमतो. समोरून एक व्यक्ती अगदी रुबाबात चालत येत होता. ग्रे कलरचा थ्री पीस सूट, जेल लावून सेट केलेले केस, एका हातात ब्रँडेड वॉच तर दुसऱ्या हातात ब्रँडेड ब्रेसलेट. चेहऱ्यावर दिसणारा अटीट्युड शोभून दिसत होता त्याला.
तो जशी जशी त्याची पावलं लग्नमंडपाकडे टाकत होता. तस इकडे पाठावर उभा राहिलेला विराज मात्र त्याची पावलं मागे घेत होता. समोरच्या व्यक्तीला बघून तो एवढा घाबरला होता की त्याच्या तोंडून आवाज निघत न्हवता. त्याची ही भीती बघून कादंबरी त्याच्याकडे बघू लागते. तर विराजचा पूर्ण चेहरा भीतीने पांढरा पडला होता.
" मिस्टर परांजपे..." तो व्यक्ती विराजच्या अगदी समोर येऊन उभा राहतो. आणि त्याला बघत इकडे विराज तोंडातल्या तोंडात त्याच नाव पुटपुटतो आणि घाबरून अवांढाच गिळतो. पण त्याची ही भीती बघून कादंबरी तर पुरती स्तब्ध होऊन जाते. तशी आता ती पण तिच्या बाजूला उभा असलेल्या त्या व्यक्तीकडे एक नजर बघते.
***
या कथेप्रमाणेच मी पण नवीनच आहे या प्लॅटफॉर्मवर. आशा करते की तुम्हाला माझी ही कथा नक्की आवडेल. आणि तुमच्याकडून या कथेसाठी मला भरभरून प्रतिसाद भेटेल.
कथा आवडली तर नक्की लाईक आणि कंमेंट करा. आणि डेली अपडेट साठी मला फॉलो करा.
©️®️पूजा जाधव