कलंक... स्टोरी ऑफ फोर्स मॅरेज... भाग : ४
मागील भागात :
ती खाली पडणार हे बघून देवांश तिच्याकडे बघत तीला एकाच हातात झेलतो... चेहरा निरखून बघतो तर चेहरा अगदी मलूल पडला होता तिचा... डोळे जरी बंद असले तरी डोळ्यांतुन ओघळलेल्या अश्रुंचे सुकलेले थेंब तिच्या गालावर दिसत होते... थोड्यावेळासाठी तर तो पण तिचा तो मलूल निरागस चेहरा बघून तिच्यात हरवून जातो... तसच तीला दोन्ही हातात उचलून घेत तो तीला गाडीत बसवतो... आणि सुसात त्याचा ताफा सुटतो ते त्याच्या महालाकडे !!
***
देवांशला त्याच्या मेन्शन मध्ये येऊन जवळ जवळ दोन तास झाले होते...
तो कादंबरीबरोबर लग्न करून आला तर होता... पण तिचा गृहप्रवेश करायला कोणीच नव्हतं... आणि तो तीला घेऊन आला होता ते बेशुद्ध अवस्थेतच !!
तो कादंबरीबरोबर लग्न करून आला तर होता... पण तिचा गृहप्रवेश करायला कोणीच नव्हतं... आणि तो तीला घेऊन आला होता ते बेशुद्ध अवस्थेतच !!
तो खाली त्याच्या स्टडी रूममध्ये बसून रॉबिन बरोबर काहीतरी महत्वाचं बोलत होता... आज त्याने जे काही केल होत त्याचा जराही पचतावा त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता...
" रॉबिन !! काय वाटतंय तुला ? आता यावेळी परांजपे कोणत्या अवस्थेत असतील ? विराज परांजपे आता रागात असेल की रडत असेल... तडफडत असेल ना त्याच्या प्रेमासाठी !! " देवांश त्याच्या चेअरवर रेलून बसला होता... एकप्रकारच समाधान पसरल होत त्याच्या चेहऱ्यावर...
" येस बॉस !! आपण हॉल मधून बाहेर पडत होतो तेव्हाच किती तुटला होता तो विराज परांजपे... मासा जसा पाण्यावाचून तडफडतो तशीच अवस्था होती बॉस त्याची..." रॉबिन बोलतो... तस देवांशच्या ओठांवर समाधानाच हसू पसरत...
" ही तर सुरुवात आहे रॉबिन !! आता तर विराज परांजपेच्या बरबादीला सुरुवात झाली आहे... त्याला आणि त्याच्या बापाला असा तडफडत ठेवेन ना की भिख मागतील माझ्याकडे जगण्यासाठी... आणि त्यावेळी मी त्यांना लाथाडून लावेल... जस त्या दिगंबर परांजपे ने माझ्या आईला लाथाडलं होत..." अतीत आठवून आता परत देवांशच्या डोळ्यांत अंगार फुलला होता...
" बॉस... तुम्हाला राग येणार नसेल तर एक विचारू !!" रॉबिन जरा घाबरत घाबरतच देवांशला बोलतो...
" हम्म..." तसा देवांश त्याच्याकडे एक नजर बघून फक्त हुंकारतो...
" बॉस दुश्मनी तर विराज परांजपे आणि दिगंबर परांजपेशी होती ना... मग यात शिक्षा त्या मॅडमला का ?" रॉबिन नजर झुकवून कशी तरी हिंम्मत करून देवांशला विचारतो खरं...
पण त्याच बोलणं ऐकून इकडे देवांशच्या कपाळावर आठ्या पडतात...
पण त्याच बोलणं ऐकून इकडे देवांशच्या कपाळावर आठ्या पडतात...
" तुला का एवढा पुळका येतोय तिचा ? तुझी कोण लागती का ती ? " देवांश रागातच रॉबिनवर डाफरतो...
" नो बॉस !! सॉरी बॉस..." त्याचा त्रागा बघता रॉबिन लगेच माफी मागून मोकळा होता... आणि तिथेच बाजूला खाली मान घालून उभा राहतो...
देवांश रागाचा एक कटाक्ष त्याच्याकडे टाकून डोळे बंद करून मागे चेअरवर डोकं टेकवतो... एक मिनिट झाला नसेल की जोरजोरात आरडा ओरडा आणि धडाधड दरवाजा आपटल्याचा आवाज त्याच्या कानावर पडतो... तसा तो पुन्हा कपाळावर आठ्या पाडून रॉबिनकडे बघू लागतो...
तर रॉबिन पण त्याच्याकडे बघत आवाज येतोय त्या दिशेला बघू लागतो...
" मी चेक करतो..." तो देवांशला बोलून पटकन बाहेर पडणार की...
" स्टॉप... तीला तर मी सरळ करतो... " देवांश रागात बोलतच त्याच्या जागेवरून उठतो आणि तडतड पावलं टाकत त्या रूमकडे जाऊ लागतो ज्या रूममध्ये कादंबरीला बंद करून ठेवलं होत...
" खोला... खोला दरवाजा... कोणी आहे का बाहेर... प्लीज दरवाजा उघडा .... मी इथे बंद झाली आहे... खोला दरवाजा..." कादंबरीला बेशुद्ध अवस्थेतच देवांश त्याच्या मेन्शन मध्ये घेऊन आला होता... आणि आल्यापासून तीला एका खोलीत टाकून जे दरवाजा बंद केला होता ते तो परत तिच्याकडे फिरकला नव्हता....
आतून येणारा आवाज त्या मेन्शन मध्ये काम करणारे बरेच नोकर ऐकत होते... पण साहेबांच्या परवानगी शिवाय कोणाचीच हिंम्मत होत नव्हती दरवाजा उघडायची... ती मात्र आतून जिवाच्या आकांताने ओरडत होती...
"प्लीज खोला... माझा जीव गुदमरतोय इथे... कोणी आहे का? प्लीज दरवाजा खोला !! " तीला मात्र आता परत रडू कोसळल होत... रडत रडतच ती दरवाजा वर जोरजोरात थाप मारत होती सोबत ओरडत पण होती... बराच वेळ दरवाजा वाजवूनही कोणी दरवाजा उघडत नाही हे बघून तीच तर आवसानच गळून पडत... तशीच दरवाजाला डोकं टेकवून ती आता जोरजोरात रडू लागते...
तेच बाहेरून देवांश तिथे येत आजूबाजूला उभ्या राहिलेल्या नोकरांवर एक नजर टाकतो... तसे सगळे नोकर खाली मान घालून तिथून निघून जातात.
लॅच उघडल्याचा आवाज येतो तशी कादंबरी पटकन दरवाजातून उठून उभी राहते... दरवाजा उघडला गेला म्हणून त्या परिस्थिती मध्येही तिच्या ओठांवर हलक हसू पसरत...
दरवाजा उघडला जातो तशी एवढा वेळ घाबरलेली कादंबरी पळत बाहेर जाणार की दारात उभा राहिलेल्या देवांशला बघून जागीच थबकते... त्याच्या दिशेने पडलेली पावलं पुन्हा मागे पडू लागतात...
देवांश मात्र अजूनही दारात उभ राहूनच तिच्याकडे रागीट नजरेने बघत होता... त्याची ती नजर बघूनच कादंबरी नखशिकांत थरथरू लागली होती...
" तुझा प्रॉब्लेम काय आहे ? कशाला एवढा आरडा ओरडा चालू आहे तुझा ? " देवांश रागातच मोठी मोठी पावलं टाकत एकदम तिच्या समोर येऊन उभा राहतो...
पण त्याला एवढ्या रागात आपल्याकडे येताना बघून कादंबरी एवढी घाबरून जाते की तिचे डोळेच पांढरे पडतात...
उंदीर वाघाच्या तावडीत सापडावा आणि त्याची जशी भीतीने हालत व्हावी तशीच आता कादंबरीची अवस्था झाली होती...
उंदीर वाघाच्या तावडीत सापडावा आणि त्याची जशी भीतीने हालत व्हावी तशीच आता कादंबरीची अवस्था झाली होती...
देवांश अंगकाठीने एवढा भारदस्त होता की त्याच्या आड ती एवढीशी कादंबरी दिसून पण येत नव्हती... या देवांश नावाच्या वाघापुढे ती पण एखाद्या छोट्या चिचुंद्री सारखी थिजून गेली होती... आताही तोंडावर अशी हात ठेवून त्याच्याकडे मान वर आणि मोठे मोठे डोळे करून बघत होती... तिचे फक्त डोळेच त्याला दिसत होते... बाकी चेहरा तर तिने हाताने लपवून ठेवला होता जणू... त्या डोळ्यांत फक्त भीती आणि भीतीच दिसून येत होती...
" कशाला एवढा आरडा ओरडा चालू आहे... काय झालंय ?" तिच्या भीतीचा त्यावर मात्र काहीच परिणाम झाला नव्हता... तो पुन्हा तिच्यावर ओरडतो... तशी ती दचकतेच आणि पुन्हा रडायला सुरुवात करते.. लहान मुलीला ओरडल्यावर ती जशी बारीक तोंड करते अगदी तसच तोंड आता कादंबरीच झालं होत...
ती पुन्हा रडायला सुरुवात करणार हे बघून देवांशच मात्र डोकं सटकत...
" शट अपss... शट अपss... नाही तर... " चिडून तो तिच्यावर ओरडतो आणि पुन्हा तिच्यावर हात उगरतो... आणि तो मारणार या भीतीने कादंबरी लगेच तिच्या गालावर हात ठेवून तिची मान दुसरीकडे वळवते... आता तिची नजर खाली होती... पण डोळ्यांतून सतत पाणी वाहतच होत....
देवांश बद्दल तिच्या मनात चांगलीच भीती बसली होती...
देवांश बद्दल तिच्या मनात चांगलीच भीती बसली होती...
तिची ही रिऍकशन बघून देवांश तिच्याकडे बघतच त्याने तिच्यावर उगरलेला हात हळू हळू खाली घेतो... तीला मात्र काही केल्या तिचे हुंदके आवरता येत नव्हते... अडवायचा प्रयत्न केला तरी तिचे हुंदके फुटतच होते...
तिची अवस्था बघून देवांश केसांतून हात फिरवत त्याचा राग कंट्रोल करत होता... तीच मात्र आता पूर्णपणे आवसान गळून पडलं होत... तशीच हुंदके देत देत अंगाभोवती हात गुंफुन ती खाली बेडला टेकून बसते... डोळ्यांतून अजूनही पाण्याच्या धारा वाहतच होत्या...
" लूक !! जे काही तुझ नाव असेल....तुला शेवटच वोर्न करतोय... माझ्या रागाला बळी पडायचं नसेल ना तर जस मला हवं आहे तसच वागायचं.... नाहीतर माझं मलाही माहित नाही मी रागात काय करून बसेन... " देवांश तिच्यासमोर पंज्यावर बसत तीला वोर्निंग देतो...
त्याची गहिरी नजर आता तिच्यावरच स्थिर झाली होती...
त्याची गहिरी नजर आता तिच्यावरच स्थिर झाली होती...
थोड्यावेळासाठी का होईना पण तिचे ते एकसारखे फुटणारे हुंदके त्याला अस्वस्थ करून गेले होते... तिच्या डोळ्यांतून टपकणारे ते अश्रुंचे मोती त्याला बेचेन करत होते...
तस त्याच्याही नकळत त्याचा हात तिच्याकडे सरकला जातो... अलगद तिच्या गालावर लागलेली पाण्याची धार तो त्याच्या अंगठ्याने टिपून घेतो...
तस त्याच्याही नकळत त्याचा हात तिच्याकडे सरकला जातो... अलगद तिच्या गालावर लागलेली पाण्याची धार तो त्याच्या अंगठ्याने टिपून घेतो...
त्याच्या नाजूक स्पर्शासाठी तयार नसलेली ती मात्र त्याच्या बोटाचा स्पर्श गालावर होताच जास्तच थरथरते आणि तीच अंग आकसून घेते... यावरूनच कळत होत ती किती घाबरत होती त्याला...
तिच्या शरीराची झालेली थरथर बघून त्याला पण आपण आता काय करत होतो हा विचार करून स्वतःचाच राग येऊ लागतो... आणि त्याच रागात तो हाताची मूठ आवळत तिच्यापासून बाजूला होतो...
तिच्या शरीराची झालेली थरथर बघून त्याला पण आपण आता काय करत होतो हा विचार करून स्वतःचाच राग येऊ लागतो... आणि त्याच रागात तो हाताची मूठ आवळत तिच्यापासून बाजूला होतो...
प्लीज ड्रॉप युअर कंमेंट्स... अँड फॉलो मी...
©®Pooja jadhav.
©®Pooja jadhav.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा