कलंक... स्टोरी ऑफ फ़ोर्स मॅरेज... भाग : ३
मागील भागात :
एकट्या देवांशने पूर्ण हॉल सुन्न करून टाकला होता...
तिथे उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यांत पाणी होत... कादंबरीची अवस्था बघून विराजच मन मात्र पिटाळून निघत होत... बदल्याच्या आगीत देवांशने कादंबरीची आहुती दिली होती... कस असेल कादंबरीच लग्नानंतरच आयुष्य !!
तिथे उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यांत पाणी होत... कादंबरीची अवस्था बघून विराजच मन मात्र पिटाळून निघत होत... बदल्याच्या आगीत देवांशने कादंबरीची आहुती दिली होती... कस असेल कादंबरीच लग्नानंतरच आयुष्य !!
***
पुढे :
देवांश जबरदस्ती कादंबरीशी लग्न तर करतो... रागाच्या भरात देवांशने त्या बिचाऱ्या निरागस कादंबरीचा तर विचारही केला नव्हता... त्याला डोळ्यांसमोर काही दिसत होत तर तो फक्त विराजचा कादंबरीसाठी तडफडत असलेला जीव !!
आणि त्याची तडफड बघून त्यावेळी देवांशच्या मनाला शांती मिळत होती... त्याची एवढ्या दिवसांची आग जी त्याच्या मनात धगधगत होती आता कुठे जरा शांत होऊ लागली...
समोर विराजच हतबल होऊन एकटक फक्त कादंबरी कडे बघत होता... ती त्याची होता होता आज त्याच्या डोळ्यांसमोर दुसऱ्या कोणाची तरी झाली होती...
कादंबरीकडे बघता बघता तो एकाएकीच रागात देवांशकडे बघतो... तर देवांश त्याच्याकडेच बघून कुस्तिक हसत होता...
त्याच्याकडे बघतच देवांश कादंबरीच्या गळ्यात तिच्या नावाचं मंगळसूत्र घालतो... मंगळसूत्र गळ्यात पडताच कादंबरी मात्र पूर्णपणे कोलमडून पडते...
त्राण निघून गेले होते जणू तिच्या पायातून...
त्याच्याकडे बघतच देवांश कादंबरीच्या गळ्यात तिच्या नावाचं मंगळसूत्र घालतो... मंगळसूत्र गळ्यात पडताच कादंबरी मात्र पूर्णपणे कोलमडून पडते...
त्राण निघून गेले होते जणू तिच्या पायातून...
" महाशय त्यांच्या भांगेत कुंकू भरा... " पुढे पंडितजी घाबरत घाबरतच त्याला बोलतात... तसा देवांश एवढा वेळ विराजवर गाडलेली नजर हटवतो... आणि पंडितजींनी हातात पकडलेल्या सिंदूरच्या डबीतून चिमटीत सिंदूर घेत कादंबरीकडे वळतो...
तर ती मान खाली झुकवून उभी होती... तो तिच्याकडे बघतच तिच्या भांगेत कुंकू भरतो.... आणि त्याच वेळी तिच्या डोळ्यांतून अश्रुंचे काही थेंब खाली निसटून पडतात... जे देवांशच्या पण नजरेतून सुटत नाही...
विराज आणि त्याचे आई बाबा मात्र राग भरल्या नजरेने देवांशकडे बघत होते...
" तु का माझ्या मुलाच्या जीवावर उठला आहेस ? त्याला सुखाने जगूच देणार नाहीयेस का ?" विराजची आई शकुंतला रागातच देवांशला ओरडते...
" तु का माझ्या मुलाच्या जीवावर उठला आहेस ? त्याला सुखाने जगूच देणार नाहीयेस का ?" विराजची आई शकुंतला रागातच देवांशला ओरडते...
" काय आहे ना शकुंतला देवी... हा देवांश परांजपे कोणाच उसणं ठेवत नाही...गेले वीस वर्षांपूर्वी तुम्ही आमचं सर्वस्व हिरावून घेतल होत... " देवांशचा आवाज काहीसा कापरा झाला होता... गेले वीस वर्ष जे त्याने भोगलं होत ते विसरण्यासारखं नव्हतंच मुळी !!
" तेवढ्यावरही भागलं नाही तुमच तर तुमच्या मुलाने पुन्हा माझ्या काळजावर घाव घातला... तेव्हा मी दुबळा होतो... लढू शकलो नाही तर तुम्ही सगळ्यांनी फायदा घेतलात त्या गोष्टीचा... पण आता नाही... आता माझा टर्न !! नाही तुम्हाला सगळ्यांना रस्त्यावर भिख मागायला लावली तर नाव नाही देवांश... " देवांश त्या तिघांवरही नजर टाकून रागातच बोलतो...
" देवांश !! प्लीज मी तुला हवं ते द्यायला तयार आहे... प्लीज माझ्या कादंबरीला सोड..." विराज रक्तबंबाळ झालेला खांदा दाबून धरत कसा बसा उठून उभा राहतो आणि देवांश समोर उभा राहत बोलत असतोच की... त्याच्या तोंडून माझी कादंबरी ऐकून इकडे देवांशच डोकंच सटकट...
तो तसाच पुढे येत सरळ त्याच्या जखमी झालेल्या खांद्यावर जोरदार लाथ मारतो... तसा विराज परत व्हिवळत जमिनीवर पडतो... दुखऱ्या जखमेवर परत वार झाल्याने विराजचा जीव तर जायला झाला होता...
आणि इकडे त्याच दुखणं बघून कादंबरी पण रडायला लागली होती... तिचा पण जीव तुटत होता त्याच्यासाठी पण नाईलाज होता बिचारीचा... अजूनही तिच्या भावाच्या डोक्यावर बंदूक ताणून उभी होती त्याची माणसं...
तीच रडणं बघून देवांश तिच्याकडे बघतो... तर तिची नजर विराजवर स्थिरावली होती... आणि तीला विराजसाठी रडताना बघून देवांश गालात क्रूर हसतो...
आणि एकदम तिचा हात करकचून पकडून तो तीला ओढतच स्टेजवरून खाली घेऊन जातो...
त्याच्या मागे जाता जाता तर कादंबरी पडता पडता राहते...
आणि एकदम तिचा हात करकचून पकडून तो तीला ओढतच स्टेजवरून खाली घेऊन जातो...
त्याच्या मागे जाता जाता तर कादंबरी पडता पडता राहते...
" तु जिला तुझी कादंबरी बोलत आहेस ना... ती आता माझी बायको आहे... त्यामुळे पुन्हा तीच नाव तुझ्या या घाणेरड्या जिभेवर येऊ पण द्यायचं नाही... नाहीतर जीभ हासडून ठेवीन तुझी !! "
देवांश कादंबरीला स्वतःच्या जवळ अगदी मिठीत ओढतच तिच्या कंबरेवर हाताची बोटे रुतवतो आणि एक नजर तिच्याकडे बघून तो विराजकडे थंड नजरेने बघत बोलत असतो...
शेवटचं वाक्य बोलताना तर तो विराजच्या समोर बोट पॉईंट करून बोलतो...
देवांश कादंबरीला स्वतःच्या जवळ अगदी मिठीत ओढतच तिच्या कंबरेवर हाताची बोटे रुतवतो आणि एक नजर तिच्याकडे बघून तो विराजकडे थंड नजरेने बघत बोलत असतो...
शेवटचं वाक्य बोलताना तर तो विराजच्या समोर बोट पॉईंट करून बोलतो...
कादंबरी तर त्याच्या स्पर्शाने पुरती भांबावून गेली होती... अस्वस्थ झाली होती... असहाय्य झाला होता आता तीला त्याचा स्पर्श... आणि त्यातच ती त्याच्यापासून लांब होण्याच्या प्रयत्न करत होती... पण देवांश तिची धडपड बघून अधिकच अधिक तिच्या कंबरेवर बोट रुतवत होता...
आता त्याला कादंबरीचा पण राग येत होता...
आता त्याला कादंबरीचा पण राग येत होता...
" तुम्ही रचलेल्या खेळाचा नवीन अध्याय सुरु मिस्टर परांजपे... " शेवटी देवांश विराजचे वाडिल दिगंबर यांच्याकडे बघत बोलतो... आणि कादंबरीला घेऊन तडक तिथून बाहेर जाऊ लागतो...
विराज, त्याचे आईवडील आणि कादंबरीचे काका काकू बघण्याखेरीस काहीच करू शकले नव्हते...
***
इकडे कादंबरी देवांशच्या हातातून स्वतःचा हात सोडवून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होती... काही करून त्याच्या तावडीतून सुटायचं होत तीला म्हणून धडपडत होती...
" सोडा मला !! मला नाही यायचं तुमच्याबरोबर... सोडा... " ती त्याच्या मागून बोलत होती खरं... पण तिचा आवाज त्याच्या कानापर्यंत पोहचत तरी होता का ? चिमणी सारखी ती आणि चिमणीसारखा तिचा तो आवाज...
मच्छर कानापाशी गुणगुणावे तसा आता तिचा आवाज देवांशला इर्रिटेट करत होता... तसा तो चालता चलता अचानक मागे वळतो आणि तिच्या दोन्ही दंडाना करकचून पकडून तीला जवळ ओरडतो...
" शट अपsss..." तीला एकाएकी जवळ ओढून तो तिच्यावर जोरात ओरडतो.... एवढ्या जोरात की तीला तर धडकीच भरते... आणि घाबरून ती तोंडावर हात ठेवून त्याच्यापासून चार पाच पावलं मागे सरकते.... भीतीने डोळे फक्त बाहेर यायचे बाकी राहिले होते...
" आता आवाज निघाला ना तोंडातून तुझ्या... तर कानपाड रंगवीनss.." तो दोन पावलं तिच्याकडे टाकत पुन्हा तीला धमाकावतो तशी ती जागीच थिजून जाते... तिची भीती बघता तो तिच्याजवळ न जाता जागीच थांबतो...
" मुकाट्यानं सोबत चालायचं.... कळलं ना !!" तो तिच्यावरून नजर हटवत आधी तर मोठा श्वास घेतो... आणि नंतर परत तिच्यावर नजर रोखत तीला एकदम थंड आवाजात बोलतो...
त्याने माझ्यासोबत चालायचं म्हणताच कादंबरी इकडून तिकडे नाही मध्ये मान हलवू लागते... हळू हळू पावलं पण मागे घेत होती ती...
याच्यावरूनच त्याला समजत की ती आता इथून पळून जाण्याच्या बेतात आहे....
याच्यावरूनच त्याला समजत की ती आता इथून पळून जाण्याच्या बेतात आहे....
तिची पावलं मागे पडायला लागली होती तर तो तिच्या दिशेने पावलं टाकत होता... कादंबरी आता मागे वळून तिथून धूम ठोकणार की त्या आधीच देवांश त्यांच्यात असलेलं ते चार पाच पावलांचं अंतर मिटवत तीच्या हाताला धरून तीला स्वतःकडे खेचतो... आणि तसच तिच्या कानाखाली ठेवून देतो...
तसे त्यांच्या आजूबाजूला असलेल्या त्याच्या बॉडीगार्डचे डोळेच मोठे होतात...
तसे त्यांच्या आजूबाजूला असलेल्या त्याच्या बॉडीगार्डचे डोळेच मोठे होतात...
त्याने मारलेल्या कानाखालीचा जोर एवढा जास्त होता कादंबरी त्याच्याच मिठीत जाऊन निपचित पडते... आजच्या दिवसात एवढा सगळा ड्रामा घडला होता की तिच्या शरीर आणि मेंदू दोन्ही जणू थकून गेलं होत... आणि आता तिच्या गालावर उठलेली त्याची पाच बोट अनपेक्षित होती... तयार नसलेली ती त्याने मारल्यामुळे बेशुद्ध पडते...
ती खाली पडणार हे बघून देवांश तिच्याकडे बघत तीला एकाच हातात झेलतो... चेहरा निरखून बघतो तर चेहरा अगदी मलूल पडला होता तिचा... डोळे जरी बंद असले तरी डोळ्यांतुन ओघळलेल्या अश्रुंचे सुकलेले थेंब तिच्या गालावर दिसत होते... थोड्यावेळासाठी तर तो पण तिचा तो मलूल निरागस चेहरा बघून तिच्यात हरवून जातो... तसच तीला दोन्ही हातात उचलून घेत तो तीला गाडीत बसवतो... आणि सुसात त्याचा ताफा सुटतो ते त्याच्या महालाकडे !!
***
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा