कलंक... भाग : ५
पुढे :
देवांश रागातच रूममधून बाहेर पडतो... कादंबरी मात्र तो निघून गेल्याची चाहूल लागताच... पुन्हा जोरजोरात रडू लागते....
सकाळपासून ना तिथे काही खाल्लं होत ना पाणी पिल होत... आणि त्यात दिवसभरात जे काही घडलं त्यामुळे खुपच थकून गेली होती ती... रडता रडता कधी तिची तशीच खाली फरशीवर झोप लागून जाते तीच तिलाही समजत नाही....
देवांश खाली आल्यावर थेट त्याच्या स्टडी रूममध्ये गेला होता...
पण इथे आल्यापासून त्याची जास्तच चिडचिड होत होती... आणि ती का हे त्याच त्यालाही कळतं नव्हतं... कामात मन गुंतवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होता तो.. पण डोळ्यांसमोर आता सारखा कादंबरीचा तो रडून रडून लाल झालेला चेहरा येत होता... आणि उगाचच त्याच्या मनात कालवाकालव होत होती....
पण इथे आल्यापासून त्याची जास्तच चिडचिड होत होती... आणि ती का हे त्याच त्यालाही कळतं नव्हतं... कामात मन गुंतवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होता तो.. पण डोळ्यांसमोर आता सारखा कादंबरीचा तो रडून रडून लाल झालेला चेहरा येत होता... आणि उगाचच त्याच्या मनात कालवाकालव होत होती....
" मी खरच तिच्याबरोबर चुकीचं करतोय का ? " सहज त्याच्या मनात विचार चमकून जातो... तिचा तो निरागस चेहरा.... ते बोलके डोळे... नाजूक आवाज... भाग पाडत होत त्याला विचार करायला....
तसाच विचार करत तो डोळे बंद करून मागे चेअरवर डोकं टेकवतो... दिवसभरात घडलेल्या सगळ्या घटना त्या बंद डोळ्यांच्या पटलांमागे जश्यास तश्या फिरू लागतात... त्याच विराजच्या लग्नात जाण , बंधूकीच्या धाकावर सगळ्यांना घाबरवण, आणि नंतर जबरदस्तीच लग्न...
पण तो एक क्षण !! अग्निफेरे घेण्यासाठी जेव्हा तो कादंबरीचा हात पकडून पुढे चालत होता... पण लग्नाचे सात फेरे घेताना पण तिच्या मनात विचार मात्र विराजचे होते... तिच्या डोळ्यांत साफ साफ विराजसाठी असलेली तळमळ दिसत होती...
आणि त्यातच तिच्या तोंडून बाहेर पडलेल त्याच नाव... जणू मनापासून साद घातली होती तिने विराजला...
पण तो एक क्षण !! अग्निफेरे घेण्यासाठी जेव्हा तो कादंबरीचा हात पकडून पुढे चालत होता... पण लग्नाचे सात फेरे घेताना पण तिच्या मनात विचार मात्र विराजचे होते... तिच्या डोळ्यांत साफ साफ विराजसाठी असलेली तळमळ दिसत होती...
आणि त्यातच तिच्या तोंडून बाहेर पडलेल त्याच नाव... जणू मनापासून साद घातली होती तिने विराजला...
तो एक क्षण डोळ्यांसमोर येताच खाडकन देवांशचे डोळे उघडले जातात. माहित नाही का पण पुन्हा चेहऱ्यावर राग उभा राहतो त्याच्या... विराज बरोबर यावेळी कादंबरीचा पण राग आला होता त्याला !!
नेमकं तो रागात असतानाच तिथे रॉबिनची एन्ट्री होते... बिचारा खूपच चुकीच्या वेळेत आला होता त्याच्या समोर... कर्म त्याच !!
" बॉस..." कादंबरीच्या विचारात गुंग असलेला देवांश पेपरवेट हातात घेऊन फिरवत असतानाच त्याच्या कांनावर रॉबिनचा आवाज पडतो...
" बोल..." त्याच्याकडे न बघताच देवांश त्याला बोलतो...
" बॉस... मी तुमच एक काम करून टाकलं... " रॉबिन काहीश्या खुशीत देवांशला बोलतो... आणि त्याचा आनंद बघता आता कुठे देवांश पूर्णपणे त्याच्याकडे लक्ष देतो...
" कोणत काम ? " देवांश विचारतो... यावेळी त्याच्या कपाळावर एक सूक्ष्म आठी उभारून आली होती...
" सारिका मावशी येत आहेत... मी त्यांना तुम्ही लग्न केल आहे ही न्यूज सांगितली... " सांगतानाही रॉबिनच्या चेहऱ्यावर इअर टू इअर स्माईल होती... देवांशचे मात्र डोळे मोठे झाले होते त्याच बोलणं ऐकून...
" व्हाट ?? आर यू मॅड रॉबिन... तुला ही गोष्ट त्यांना सांगायला कोणी लावली होती... बिनडोक !! आतापर्यंत तर सगळी खबर आप्पाआजोबांपर्यंत पोहचली असेल... " देवांश भयंकर रागात दिसत होता...
पण आता त्याच्या रागाच कारण कादंबरी नसून रॉबिन होता... इव्हन आता रॉबिनला पण कळून चुकलं होत की चांगल करण्याच्या नादात आपण माती खाऊन बसलो आहोत... आणि देवांशकडे बघता तो आता भयंकर रागात दिसत होता...
" सॉरी बॉस !! मला वाटलं... आज ना उद्या तुम्ही हे त्यांना सांगणारच.... म्हणून मीच फोन करून सांगितलं..." रॉबिन खाली मान घालून देवांशला बोलतो... बिचारा खूप घाबरला होता... हा देवांश नावाचा बॉम्ब आज त्याच्यावर जे बरसत होता...
" सॉरी !! सॉरी माय फूट... " देवांशचा राग मात्र क्षणोक्षणी वाढतच चालला होता...
" शीट !! आता पर्यंत तर तांडव घालून मोकळे झाले असतील आप्पाआजोबा तिकडे... एक... एक गोष्ट माझ्या मनासारखी घडत नाहीयेsss... सगळे डोक्यावर चढून बसायला बघतायत.... आधी ती मुलगी आणि आता तू... " देवांश टेन्शन मध्ये आता बडबड करू लागला होता...
आता पुढे काय कराव त्याला सुचत नव्हतं...
आता पुढे काय कराव त्याला सुचत नव्हतं...
" गाढव !! " रॉबिन अजूनही खाली मान घालून एका बाजूला उभा होता त्याच्याकडे लक्ष जाताच देवांश त्याला सुनावतो...
" सॉरी बॉस..." देवांशच्या तोंडून स्वतःसाठी निघालेले उद्गार ऐकून रॉबिन पुन्हा माफी मागतो... पण याउलट देवांश त्याच्याकडे जळजळीत रागाने भरलेली कटाक्ष टाकून स्टडीरूममधून बाहेर पडतो...
त्याच्या मागोमाग रॉबिन पण पळत येतो.... रॉबिनने पसरवून ठेवलेला पसारा आता कसा निस्तरायचा याच विचारात देवांश त्याच्या हाताच्या स्ली्व्ज वरती फोल्ड करत पुढे चालत असतो.... आणि त्याच्या अगदी चार पावलांच्या अंतरावर रॅबिन त्याच्या मागे येत असतो....
" बॉस... नॉव व्हॉट टू डू...? " भेदरलेल्या स्वरात रॉबिन बोलतो खरं पण दुसऱ्या क्षणी त्याचा आवाज त्याच्या घश्यात अडकला जातो....
कारण समोर देवांशने अगदी क्षणात मागे खोचलेली गन काढून त्याच्यावर पॉईंट आऊट केली होती.... त्याचा राग रॉबिनला चांगलाच माहित होता.... सनकी होता देवांश काय करेल याचा नेम नव्हता.... आणि तो जो करायचा त्याचा जराही पचतावा त्याच्या चेहऱ्यावर दिसून येत नव्हता कधी !!
" नॉव जस्ट कीप शट युअर माऊथ... एल्स आय विल शूट यू.... अँड यू क्नो व्हेरी वेल... आय नेव्हर मिस माय टार्गेट..." त्या शांत वातावरणात देवांशचा रागीट आवाज संपूर्ण हॉल मध्ये घुमतो....
त्याच्या आवाजाने रॉबिन तर हादरतोच.... पण त्याच्याबरोबर अजून एक व्यक्ती तिथे होती जी की देवांशच हे रुप बघून फक्त चक्कर येऊन पडायची बाकी होती... त्याचा तो रागीट अवतार आणि त्याच्या हातातील ती गन बघून पाय नुसते लटलट कापायला लागले होते तिचे....
ती व्यक्ती दुसरी कोणी नसून कादंबरीच होती... देवांश तिच्या रूममधून जेव्हा रागात बाहेर पडला होता तेव्हा त्याच्याकडून रूमचा दरवाजा उघडाच राहिला होता.... याच संधीचा फायदा घेऊन कादंबरी तिथून निसटण्याच्या बेतात होती....
वरच्या फ्लोवर वरून खाली नजर फिरवून जेव्हा तिने बघितलं तेव्हा तीला खाली कोणीच दिसलं नव्हतं.... घाईगडबडीत ती पायऱ्या भरभर उतरवून खाली येतच होती की नेमका तेव्हाच देवांश त्याच्या स्टडी रूममधून बाहेर आला होता ....
प्लीज ड्रॉप युअर कंमेंट्स... अँड फॉलो मी...
©®Pooja jadhav.
©®Pooja jadhav.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा