कलंक... द स्टोरी ऑफ फोर्स मॅरेज... भाग : २
मागच्या भागात...
" देवांश..." तो व्यक्ती विराजच्या अगदी समोर येऊन उभा राहतो. आणि त्याला बघत इकडे विराज तोंडातल्या तोंडात त्याच नाव पुटपुटतो आणि घाबरून अवांढाच गिळतो. पण त्याची ही भीती बघून कादंबरी तर पुरती स्तब्ध होऊन जाते. तशी आता ती पण तिच्या बाजूला उभा असलेल्या त्या व्यक्तीकडे एक नजर बघते.
आणि बस्स काळीज गोठून जातं तीच भीतीने...
आणि बस्स काळीज गोठून जातं तीच भीतीने...
पुढे :
ती त्याच्याकडे बघण्यात गुंग असतानाच तिच्या कानांवर त्याचा भारदस्त आवाज पडतो...
" हॅलो ब्रो !! काय यार तू... लग्न करतोयस आणि मला साधं इन्व्हिटेशन पण दिल नाहीस... " तो नवरदेवाकडे बघत खोचक शब्दात बोलतो...मंडपातील सगळेच भेदरलेल्या नजरेने त्या दोघांकडे बघत होते...
तर विराजची हालत सगळ्यात खराब झाली होती... भीतीने जणू कापर भरलं होत त्याच्या अंगात !!
तर विराजची हालत सगळ्यात खराब झाली होती... भीतीने जणू कापर भरलं होत त्याच्या अंगात !!
" देवांश ... तू... इथे... कसा ?" शब्द फुटत नव्हते त्याच्या तोंडातून... कपाळावर घाम जमा झाला होता...
तो त्याला एवढा का घाबरत आहे याच कारण मात्र कादंबरीला समजत नाही...
ती फक्त संभ्रमित होऊन त्या घाबरलेल्या विराजकडे बघत होती...
तो त्याला एवढा का घाबरत आहे याच कारण मात्र कादंबरीला समजत नाही...
ती फक्त संभ्रमित होऊन त्या घाबरलेल्या विराजकडे बघत होती...
" ये !! तुझी हिंम्मत..." विराजला एवढं घाबरलेलं बघून विराजची आई शकुंतला देवी काही बोलायला जाणार की देवांश क्षणात त्याच्या हातातील गन त्यांच्यावर ताणतो... लोडींगचा आवाज येतो तसा शकुंतला देवींचे पुढचे शब्द घश्यातच खुंटले जातात...
" सायलेन्स !! डोन्ट मेक नोईस..." देवांश गन बरोबर त्याची ती थंड नजर पण त्यांच्यावर रोखत बोलतो... त्याच्या आवाजात एक प्रकारची दहशत होती... जागेवर समोरच्याला जाळून खाक करेल असे अंगार फुलले होते त्याच्या डोळ्यांत...
" रॉबिन... सगळे दरवाजे बंद कर... एकही इथून बाहेर पडता कामा नये... " सिंहाची गर्जना व्हावी तसा त्याचा आवाज त्या संपूर्ण हॉल मध्ये घुमतो...
त्याच्या आदेशाप्रमाणे रॉबिन पण गार्डच्या मदतीने सगळे दरवाजे खिडक्या पटापट बंद करतो.. आता त्या हॉलमधून चिटपाखरूही बाहेरून जाऊ शकत नव्हतं...
त्याच्या आदेशाप्रमाणे रॉबिन पण गार्डच्या मदतीने सगळे दरवाजे खिडक्या पटापट बंद करतो.. आता त्या हॉलमधून चिटपाखरूही बाहेरून जाऊ शकत नव्हतं...
" देवांश... बिझनेस आपल्या जागी आणि पर्सनल लाईफ वेगळी... तू माझ्या शुभ कार्यात अडथळा आणत आहेस..." विराज पुढे येत बोलतो...
" तुझ्या तोंडून या सगळ्या गोष्टी शोभत नाहीत विराज परांजपे... आणि खेळी खेळायची सवय तुला आहे... आठवतंय मी तुला बोललो होतो.... तू रचलेला खेळ... शेवट मी करणार... " देवांश त्याला खुन्नस देत कुस्तिक हसत बोलतो...
" लग्नकार्य चालू आहे ना... हे सगळे लोक अक्षदा टाकायला इथे जमले आहेत तर... लग्न होणार !! नक्कीच होणार..." देवांश विराजच्या गळ्यात असलेला उपर्ण काढून घेत स्वतःच्या गळ्यात टाकतो... आणि आता तिथे उपस्थित सगळ्यांचेच डोळे विस्फरतात... पुन्हा सगळे लोक कुजबुज करू लागतात...
कादंबरी आणि तिचे काका काकू तर सुन्न झाले होते... काय चालू आहे हेच त्यांना समजत नव्हतं... सगळेच संभ्रमित होऊन फक्त पुढे जे चालू आहे ते बघत होते... पण जसा देवांश उपर्ण स्वतःच्या गळ्यात टाकतो.. तस इकडे कादंबरीला मात्र भीतीने कापर भरत...
" आता तुला कळेल... आपली माणसं आपल्यापासून दुरावली जातात त्याच दुःख काय असत... " देवांश विराजच्या एकदम जवळ जातं त्याच्या नजरेला नजर भिडवत बोलतो... राग... अफाट राग दिसून येत होता त्याच्या डोळ्यांत...
" देवांश !! तू... तुझा... राग... माझ्यावर आहे... यात कादंबरीला मध्ये ओढू नको.. तुझा.. तुझा गुन्हेगार मी आहे तर शिक्षा फक्त मलाच मिळाली पाहिजे... आय बेग यू लेट हर गो !!" विराजच आवसान गळून पडलं होत त्याच बोलणं ऐकून...
कादंबरी पहिली मुलगी होती त्याच्या आयुष्यात आलेली जिच्यावर तो जीवापाड प्रेम करू लागला होता... म्हणजे त्याला तरी असं वाटत होत...
मिळवायचं होत तीला !! आणि ती सहज त्याची होणार पण होती... पण मध्येच देवांशने त्याच्या या सुखाच्या क्षणात मोडता घातला होता...

इकडे देवांश मात्र कुस्तिक हसत विराजकडे बघतो आणि तशीच त्याची पावलं कादंबरीकडे वळवतो... त्याला आपल्याकडे येताना बघून ती नाही मध्ये मान हलवतच मागे मागे जाऊ लागते...
शब्द फुटत नव्हता तिच्या मुखातून... एवढी घाबरली होती ती... देवांशची पावलं मात्र तिच्याकडेच गतीने पडत होती. कादंबरी चालत चालत स्टेजच्या अगदी काठावर येऊन उभी राहिली होती... अजून एक पाऊल आणि ती आहे तशी स्टेजवरून खाली कोसणार !!

देवांश एक क्षण जागीच थांबतो... त्याच सगळं लक्ष तिच्या पावलांकडेच होत... अजूनतरी त्याने तिच्या चेहऱ्याकडे बघितलं नव्हत... तो थांबताच कादंबरीची पण पावलं जागीच थबकतात.
तीला थांबलेलं बघून देवांश परत तिच्या दिशेने पाऊन टाकतो.. आणि त्याला परत आपल्याकडे येताना कादंबरी तीच पाऊल मागे घेते... तोल जाऊन ती खाली पडणार की देवांश पटकन तिचा हात पकडून तीला स्वतःकडे खेचतो...
हलक्या अंगाची कादंबरी हवेच्या वेगाने त्याच्याकडे ओढली जाते...
हलक्या अंगाची कादंबरी हवेच्या वेगाने त्याच्याकडे ओढली जाते...
क्षणात काय झालं तीला तर कळतच नाही... पडण्याच्या भीतीने तर तिचे डोळेच बंद झाले होते... डोळे उघडून समोर बघते तर एक भारदस्त छाती होती... त्याच्या उंचीच्या तुलनेने तिची उंची खूपच कमी होती... त्यामुळे त्याच्या जवळ ती अगदीच छोटी मुलगी वाटत होती... जेमतेम त्याच्या दंडाला तीच डोकं लागत आसाव.
ती मान वर करून त्याच्याकडे बघते तर तो दातओठ खात समोर बघत होता... त्याला एवढ्या जवळ बघून ती झटका लागावा तशी त्याच्यापासून लांब होते... पण पुन्हा त्याच्याकडे ओढली जाते... कारण अजूनही तिचा हात त्याच्या हातात होता....
पण यावेळी तो तिच्याकडे लक्ष न देता तीला ओढतच अग्निकुंडाकडे घेऊन जातो...
स्वतःच तिच्या साडीच्या पदराला त्याच्या गळ्यातील उपर्ण बांधून तो जबरदस्ती तीच मनगट हातात पकडतो...
" तुला काय आमंत्रण देऊ लग्नाच्या विधी सुरु करायला... " पंडित अजूनही घाबरून कोपऱ्यात उभे राहिले... त्यांच्याकडे बघत देवांश बोलतो...
" विराज...." देवांशने कादंबरीचा हात पकडून सातफेरे घ्यायला एक पाऊल पुढे टाकलंच होत की मागून त्याला कादंबरीचा पुसटसा आवाज त्याच्या कांनावर पडतो... तशी तिच्या हातांवर असलेली त्याच्या हाताची पकड आपोआप आवळली जाते...
त्याच्या हातांच्या घट्ट पकडीत तिच्या हातातील चुडा पण येतो... आणि तिथेच तिच्या हातातील चूड्याला तडा जातो...
" स्स्स्स्सsss..." बांगड्या हातात रुतल्या मुळे हलकी रक्ताची धार तिच्या मनगटावरून ओघळू लागते...
" स्स्स्स्सsss..." बांगड्या हातात रुतल्या मुळे हलकी रक्ताची धार तिच्या मनगटावरून ओघळू लागते...
" देवांश... प्लीज स्टॉप इट... तीला त्रास होतोय !!" विराज तिच्या काळजीने तिच्याकडे धाव घेणार की देवांश रागातच मागे खेचून ठेवलेली गन काढून सरळ विराजच्या खांद्यावर गोळी झाडतो...
सगळ एवढ्या लवकर होत कोणाला काही कळायच्या आत विराज स्टेजवरून खाली पडलेला असतो... इकडे कादंबरी मात्र जागीच गोठून जाते. त्या गनच्या आवाजाने तिच्या हृदयाचे ठोकेच चुकतात...
बाकी सगळे पण घाबरून जातात... एवढा वेळ चालू असलेली कुजबुज आता मात्र टाचणी पडलेल्याचा आवाज पण येत नव्हता त्या हॉलमध्ये...
एकाएकी अगदी स्मशान शांतता पसरली होती हॉलमध्ये...
बाकी सगळे पण घाबरून जातात... एवढा वेळ चालू असलेली कुजबुज आता मात्र टाचणी पडलेल्याचा आवाज पण येत नव्हता त्या हॉलमध्ये...
एकाएकी अगदी स्मशान शांतता पसरली होती हॉलमध्ये...
" विराज... " विराजला खाली खांदा धरून बसलेलं बघून त्याचे आई वडिल लगेंच त्याच्याजवळ येऊन बसतात... पूर्ण खांदा रक्ताने माखला गेला होता... त्याचा तो रक्त बंबाळ झालेला हात बघून कादंबरीला पण आता फक्त भोवळ यायची बाकी राहिली होती...
" अहं... आss !!" हलकी खांद्याची हालचाल होताच विराज जिवाच्या आकांताने ओरडू लागतो... त्याची ती किंचाळी ऐकून सगळ्यांचच हृदय हेलावून जातं...
" वी...." त्याला वेदणेत बघून कादंबरी त्याच्याकडे पाऊल टाकणार की देवांश तिच्या हाताला हिसका देऊन तीला स्वतःकडे वळवतो...
" तुझ एक जरी पाऊल त्याच्या वाटेकडे पडलं तर या हॉलमध्ये रक्ताचे पाट वाहतील... आणि सुरुवात तुझ्या या लहान भावापासून होईल... " देवांश आता हातातील गन कोपऱ्यात उभा राहिलेल्या तिच्या भावाकडे पॉईंट करत बोलतो... कादंबरी एक नजर त्याच्याकडे बघून तिच्या चुलत भावाकडे बघते तर... बिचारा ती गन बघून खूपच घाबरून गेला होता... काका आणि काकी पण त्याच्याजवळ उभा राहून रडत होते... देवांशचे काही बॉडीगार्ड पण त्यांच्या मागे गन धरून उभे होते...
त्यांना रडताना बघून आता कादंबरीला पण रडू कोसळत...शेवटी हार मानून नाईलाजाने ती रडतच देवांशबरोबर साथफेरे घेते...
प्रत्येक फेऱ्यागणीस तिच्या डोळ्यांतील अश्रूच्या धारा जास्तच वाहू लागल्या होत्या... तिच्या हुंदक्यांचा आवाज पण देवांशला स्पष्ट ऐकू येत होता...
पण त्याला आता कशाचीच पर्वा नव्हती...
पण त्याला आता कशाचीच पर्वा नव्हती...
एकट्या देवांशने पूर्ण हॉल सुन्न करून टाकला होता...
तिथे उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यांत पाणी होत... कादंबरीची अवस्था बघून विराजच मन मात्र पिटाळून निघत होत... बदल्याच्या आगीत देवांशने कादंबरीची आहुती दिली होती... कस असेल कादंबरीच लग्नानंतरच आयुष्य !!
तिथे उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यांत पाणी होत... कादंबरीची अवस्था बघून विराजच मन मात्र पिटाळून निघत होत... बदल्याच्या आगीत देवांशने कादंबरीची आहुती दिली होती... कस असेल कादंबरीच लग्नानंतरच आयुष्य !!
***
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा