कळत नकळत भाग 11

Marathi love story

आपण मागील भागात पाहिले की अमर आणि नेहा एका हाॅटेलमध्ये जातात.. ते दोघे बालपणीच्या आठवणीत रमतात.. मग नेहा अमरला प्रपोज करते.. आता पुढे..

"अमर अगदी लहानपणापासून तू मला आवडतोस.. तुला पाहिलं की माझ्या मनात काय होत हे मला शब्दात नाही सांगता येणार.. तू माझ्यासाठी खूप स्पेशल आहेस.. माझा जीव की प्राण आहेस.. मी तुझ्या शिवाय राहू शकत नाही.." असे म्हणत नेहा अमरला मीठी मारते.

"अगं नेहा, अस काय हे.." असे तिला मिठीतून दूर करत म्हणतो.

"अरे प्रेम केलय.. त्यात काय लाजायच.." नेहा.

"हे बघ नेहा वाईट वाटून घेऊ नकोस.. मी काय सांगतो ते ऐक.." अमर.

"म्हणजे??" नेहा.

"तू पण मला आवडतेस.." अमर बोलणार इतक्यात एवढंच ऐकून नेहा आनंदाने नाचू लागली..

"हे बघ.. ऐक पहिला मी काय म्हणतोय ते.." अमर.

"ऐकलच की आता.. मी खूप खूप खूश आहे.." म्हणत नेहा आनंदाने हसू लागते.

"नेहा ऐक जरा.." अमर ओरडतो.

"अरे ओरडतोस काय मग.. बरं सांग ऐकते.." नेहा.

"हे बघ राग मानू नकोस.. तू मला आवडतेस.. फक्त मैत्रीण म्हणून.." अमर.

"कायऽऽ.." नेहा.

"साॅरी टू से.. पण माझ्या मनात तशा कोणत्याही तुझ्या बद्दल भावना नाहीत.. मला तू फक्त मैत्रीण म्हणून आवडतेस.. तेच आपल्यात नातं राहू दे.. मैत्रीच पवित्र नातं.. त्याला इतर कोणत्याही नात्यात नको बांधायला.. हे आपलं नात मरेपर्यंत आहे असंच राहू दे.." अमर.

"म्हणजे तुझं माझ्यावर.." इतकं बोलते आणि नेहाच्या डोळ्यात पाणी येत.. ती रडू लागते..

"अगं प्रेम अस ओढून ताणून होत नाही ग.. ते आपोआप व्हावं लागतं.. तुझ्या मनात जे फीलिंग आहेत माझ्याविषयी तेच माझ्या मनात असावं असं काही नाही ना ग.. आणि आपली मैत्री आहेच की.. फक्त ती टिकवून ठेऊयात.. आपण एकमेकांसाठी बनलेलो नाही.. परमेश्वराने तुझ्यासाठी माझ्यापेक्षा सुंदर जो फक्त तुझ्यावरच प्रेम करेल अशा कोणालातरी बनवलच असेल की.." अमर.

"मला दुसरा कोणी नको.. मला फक्त तूच हवा आहेस.." नेहा रडतच बोलते.

"अगं वेडे, असे जबरदस्तीने कधीच प्रेम होतं नाही.. एकीकडून प्रेम असेल तर दुसरीकडूनही असावं लागतं.. अस एकतर्फी प्रेमात कोणीही सुखी होत नाही.. ना मी तुला प्रेम देऊ शकेन.. ना तू ते उपभोगू शकशील.. दोघेही दुःखी.. यात कोणच सुखी राहणार नाही.." अमर.

"मला तुझ्यासोबत आयुष्य जगायचं आहे.. तुझ्याशिवाय आयुष्य नको आहे.." नेहा.

"अगं मी तुझ्यासोबतच आहे.. एक मित्र म्हणून तू कधीही एक हाक मार मला.. मी नक्कीच तिथे असेन.. माझी आयुष्यभर तुला साथ नक्कीच मिळेल.. पण एक मित्र म्हणून.. तुझा नवरा होण्याच्या मी लायकीचा नाही.." अमर.

"असे का रे म्हणतोस.." नेहा रडतच बोलत असते.. ती बोलते पण अश्रू काही थांबत नाहीत..

"अगं हो.. तुला मी प्रेम देऊ शकत नाही म्हणजे मी तुझ्या लायकीचा नाहीच ना.. जो तुझ्या लायकीचा आहे तो तुझ्यावर भरभरून प्रेम करेल.. त्याला तू जप.. त्याच्यावर भरभरून प्रेमाचा वर्षाव कर.. तो तुला नक्कीच सुखात ठेवेल.." अमर.

"मी कुठे कमी पडले का रे.. की मी सुंदर दिसत नाही.." नेहा.

"तू कुठेच कमी पडली नाहीस ग.. कमी तर मी पडलो.. तू माझ्यावर प्रेम करत होतीस हे मला एकदाही जाणवलं नाही.. मला तुझ्याविषयी काही वाटलं नाही.. तू अगदी सगळं करत होतीस आपलं म्हणून.. मी त्याकडेही दुर्लक्षच केलं.. माझ्या मनात तुझ्याबद्दल प्रेम हा भाव कधी शिवलाच नाही ग.. आणि सुंदर म्हणशील तर तुझ्याइतक या जगात कुणीच सुंदर नाही ग.. तुझी मैत्री.. आपुलकी.. नातं जपण्यातील तुझं कौशल्य.. तुझ्यातील गुण.. तुझ मन सगळंच सुंदर आहे ग.." अमर.

"मीरा पण.." नेहा.

"आता ही मध्येच कोठून आली.." अमर.

"हो ना.. ती मीराच आहे.. जिच्यावर तू प्रेम करतोस.." नेहा.

"तस काही नाही.."अमर.

"खोटं बोलतोस तू.." नेहा.

"नाही गं.." अमर.

"मग घे आपल्या मैत्रीची शप्पथ.." असे म्हणत नेहा अमरचा हात तिच्या डोक्यावर ठेवते.

"नाही म्हटलं ना तुला.." असे म्हणत अमर डोक्यावरून हात काढून घेतो..

"मला उत्तर मिळालं.." असे म्हणत नेहा जाऊ लागते.

"अगं नेहा.. ऐक ना.. साॅरी यार.." असे म्हणत अमर तिच्या मागेमागे जातो..

"कायऽऽ.." नेहा ओरडते..

"अरे बापरे, घाबरलोच की.." अमर.

"तुला मारायला पाहिजे.." असे म्हणत नेहा त्याला मारू लागते..

"मार मी तुझा अपराधी आहे.." अमर.

"तसं नाही रे अम्या.. पण इट्स ओके.. प्रेमात बदला घेण्यापेक्षा प्रेमात बलिदान दिलेल कधीही चांगलंच.." नेहा.

"मग तू काय बलिदान देणार.." अमर हसत म्हणतो..

"अरे तुला दुसर्याच्या हवाली केलं ना.." नेहा.

"वेडाबाई.. असंच हसत रहा.." अमर नेहाचे डोळे पुसत म्हणतो..

"हो सरकार.." नेहा.

"एक सांगू.." अमर.

"हो सांग ना.." नेहा.

"आपल्याला एखादा आवडतो त्यापेक्षा आपण कुणाला आवडतो.. अर्थात आपल्यावर कोण प्रेम करत त्याच्यावर प्रेम करावं.." अमर.

"हे तुला पण लागू आहे.." नेहा चेष्टेत म्हणते..

"हो.. पण मी तेच करतोय.." अमर.

"म्हणजे ती पण तुझ्यावर.." नेहा.

"माहित नाही.." अमर.

"म्हणजे अजून चांन्सेस आहेत.." नेहा.

"अजून आहे का तुझं.." अमर.

"होय तुझीच मैत्रीण आहे.. खेचणारच.." नेहा असे म्हणत हसू लागते.

"अशीच हसत रहा.. छान दिसतेस.." असे म्हणत अमर तिच्या डोक्यावर हात ठेवतो..

क्रमशः

🎭 Series Post

View all