कळत नकळत भाग 12

Marathi love story

आपण मागील भागात पाहिले की नेहा अमरला प्रपोज करते.. अमर तिला नकार देतो.. ती खूप रडते.. अमर तिला खूप चांगल्या प्रकारे समजून सांगतो.. आणि ती पण प्रेमासाठी आनंदी आणि शांत रहायचं ठरवते.. आता पुढे..

नेहा आणि अमर आता घरी जाण्यासाठी निघतात.. अमर गाडी घेऊन येतो.. नेहा गाडीत बसते.. दोघेही शांत बसलेले असतात..

"अम्या एक विचारू.." नेहा.

"तू कधीपासून परवानगी घ्यायला लागलीस.." अमर.

"ए मी सिरियसली बोलत आहे.." नेहा.

"बर.. बिनधास्त बोल.." अमर.

"तुला मीरा आवडते ना.." नेहा.

"तसं काही नाही.." अमर.

"माझ्याशी खोटं बोलू नकोस.. तुला माझी शपथ आहे.." नेहा.

"हो.. आवडते मला मीरा.." अमर.

हे ऐकून नेहाला खूपच वाईट वाटले.. कुणीतरी काळजात खंजीर खुपसलं की काय असं झाल.. पण ती काही बोलली नाही.. डोळ्यातील पाणी तिने लपवले.. आणि ती खिडकीतून बाहेर बघत बसली..

"ती पण करते ना तुझ्यावर प्रेम.." नेहा.

"माहित नाही.." अमर.

"म्हणजे??" नेहा आश्चर्याने विचारते.

"अगं मला ती आवडते.. पण तिला मी आवडतो की नाही हे माहित नाही.." अमर.

"अरे मग प्रपोज करायचं ना.." नेहा.

"ती नाही म्हणेल अशी भीती वाटते.." अमर.

"अरे ती कशाला नाही म्हणेल.. तुझ्यासारख्या मुलाला.." नेहा.

"काय माहित.. पण मला तिच्या तोंडून ऐकायला आवडेल.." अमर.

"अरे अम्या तुला एक सांगू काय?? अरे मुली स्वतः कधीच बोलत नाहीत.. तूच प्रपोज कर.." नेहा.

"करेन ग.. पण मला हे तर कळायला हवं की खरंच मी तिला आवडतो की नाही.." अमर.

"खरं आहे रे तुझं.. नाहीतर माझ्यासारख होणार.. कधीच कोणाला गृहीत धरायचं नाही.." अमर.

"साॅरी यार.. मला माहित आहे तू मलाच म्हणालीस.. पण तू विचार कर ना.. जर तसे फीलिंग नसतील तर एकत्र राहून काय उपयोग?? समजून घे ना यार.." अमर.

"अरे तस नाही रे.. मी माझ्या मनातल बोलले.. तुझं अगदी बरोबर आहे.. तू तसंच कर.. आणि हो माझी मदत हवी असेल तर बिनधास्त सांग.." नेहा.

"म्हणजे.. तुझ्याशिवाय मी हे करूच शकणार नाही.. तुझी मदत मी घेणारच आहे.." अमर.

"तुम्ही फक्त ऑर्डर दे.. माझं काम फत्ते असेल.. मैत्रीसाठी काय पण.." नेहा.

"बस कल नौटंकी.." अमर. मग दोघेही हसतात.

"बर मला सांग.. काय प्लॅन आहे तुझा.." नेहा.

"कशाबद्दल??" अमर.

"अरे वेड्या.. मीराबद्दल.." नेहा.

"ओह.. अजून तरी काहीच नाही.. मॅडम बोलत नाहीत.. आता तर अवघड आहे.. कळायला.." अमर.

"मी काही सुचवू काय??" नेहा दबकतच बोलते.

"हो हो.. मला सध्या तुझी गरज आहेच.." अमर.

"मला वाटतं तू तिला थोड जलस करावं.. जेणेकरून ती तुझ्याकडे आकर्षित होईल.. मुलींना त्यांच्या मागे लागलं तर फार चढून बसतात.. म्हणून आपण त्यांच्या विरुद्ध जायचं.. म्हणजे त्याहून तुमच्याकडे येतात.." नेहा.

"वाव.. खूप इंटरेस्टिंग माहिती आहे.. मग मी तिला दुर्लक्ष करणार.." अमर.

"अरे.. पूर्ण दुर्लक्ष करायचं नाही.. जे काही करायचं ते तिच्यासमोरच करायचं.." नेहा.

"ओह.. मग तू आहेस की माझ्या मदतीला.." अमर.

"नाही रे.. मी तुला थोडी मदत करेन.. पण मला जावं लागणार.." नेहा.

"अस मित्राला अर्ध्यावर सोडून.." अमर.

"तू इमोशनल ब्लॅकमेल करतोयस.." नेहा.

"तस समज.." अमर.

"तू कोणालाही बोलण्यात हरवू शकत नाही.." नेहा.

"तुझाच तर मित्र आहे.." अमर.

"हो.." नेहा.

"मग पुढे सांग काय करायचं.." अमर.

"मी तिला सांगितलं आहे की मी तुला प्रपोज करणार आहे.." नेहा.

"काय??? झालं.. सगळं संपलं आता.. ती चिडेल की.." अमर.

"चिडू दे.." नेहा.

"तू माझ पॅचअप करत आहेस की ब्रेकअप.." अमर.

"अरे तू एवढा फाॅरेनला गेलास पण तुला साधं मुलगी कसे पटवतात ते माहित नाही.. अवघड आहे.."नेहा.

"तू असल्यावर काय अवघड असणार आहे.." अमर.

"झालं.. बोललास.." नेहा.

"मग आहेसच तू तशी.." अमर.

"उगाच हरभर्याच्या झाडावर चढवू नकोस.." नेहा.

"तू चढणार आहेस.." अमर.

"नाहीच खरं.." नेहा.

"पुढे काय करायचं.." अमर.

"तिला जलस फिल करायचं.. तुझं आणि माझं पॅचअप झालंय असं दाखवायच.." नेहा.

"त्याने काय होईल??" अमर.

"ती स्वतः होऊन बोलायला येईल.." नेहा.

"मला नाही वाटत.." अमर.

"ट्राय तर कर.." नेहा.

"आणि ती लांबच गेली तर.." अमर.

"मग तू डायरेक्ट प्रपोज कर.." नेहा.

"बरं ट्राय तर करूया.." अमर.

अशा गप्पा मारत असतानाच ते घराजवळ येतात.. आता त्यांचा नविन अध्याय चालू होतो..

या पुढील भाग पुढील लेखात पाहू...

आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका.

*** सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क फक्त लेखीकेकडे राखीव आहेत. आपल्याला ही पोस्ट शेअर करायची झाल्यास नावासह जरूर करावी. आपला अभिप्राय हा सर्वात महत्त्वाचा ! तेव्हा कृपया लाईक सोबतच खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले मत जरूर कळवावे.

©®प्रियांका पाटील.





🎭 Series Post

View all