कळत नकळत भाग 13

Marathi love story

आपण मागील भागात पाहिले की अमर आणि नेहा दोघे बाहेर गेले होते.. नेहाच्या प्रपोजला अमरने खूप छान समजावून सांगितले होते.. नेहाला माहित होते की अमरला मीरा आवडते.. म्हणून नेहा आता त्याला मदत करणार आहे... आता पुढे..

नेहा आणि अमर घरी आल्यावर पाहतात तर मीरा हाॅलमध्येच असते.. मग काय दोघेही नाटक करायला तयार.. एकमेक हातात हात घेऊन आत एंट्री करतात.. मीरा त्या दोघांकडे बघते.. "अमरने तिला होकार दिला.." ती मनात म्हणते..

नेहा मुद्दाम अमरला चिकटून उभी राहते.. अमर काहीच म्हणत नाही.. मीराला खूप वाईट वाटते.. तिचे डोळे भरून येतात.. ती लगेच उठून जाते.. रूममध्ये जाऊन खूप रडते..

"मी का रडत आहे.. मला रडायचं काहीच कारण नाही.. ते दोघे आधीपासून प्रेमात आहेत.. मी आत्ता आलेली आहे.. पण मला रडू येतंय.. मी खरंच त्याच्यावर मनापासून प्रेम केलंय.. पण त्याला काहीच नाही.. तो खूप खूश आहे.. मग मला काय होतंय.." असा मनात विचार करत मीरा रडत असते.

मीरा रूममध्ये गेल्यावर नेहा अमरला म्हणते "बघ ती नाराज होऊन गेली याचा अर्थ तिला तू आवडतोस.. माझं म्हणणं खरं आहे.. ती तुझ्या प्रेमात आहे.."

"तसे असेल तर बेस्ट.. पण या नादात आमच्यात दुरावा येऊ नये म्हणजे झालं.." अमर.

"नाही रे बाबा.. तू आता ट्रॅक वर आहेस.." नेहा.

"हमम.." अमर.

मीरा रूममधून बाहेर आलीच नाही.. ती थोडा वेळ शांत एकांतात बसून तिचं काम करू लागली.. थोडा वेळ गाणी ऐकू लागली.. मन कुणाजवळ मोकळे करायला जवळच कोणच नव्हतं.. मग ती तशीच बसून राहिली..

काकू तिला जेवायला बोलावतात पण ती भूक नाही म्हणून सांगते..

"का ग.. काय झालं.." काकू.

"काही नाही.." मीरा.

"मग अशी नाराज का आहेस.." काकू.

"काही नाही.. थोड डोकं दुखत आहे.." मीरा.

"मग उपाशी पोटी आणखी दुखेल.. चल थोड खाऊन घे.. " काकू

"नको काकू.. मन नाही करत जेवायच.." मीरा.

"बरं तू झोप मी तुझ्यासाठी सूप बनवते.." काकू.

"नको काकू.. उगाच तुम्हाला त्रास.." मीरा.

"अगं त्रास काय त्यात.. आईला कधी त्रास होतो का??" काकू.

काकू असे म्हटल्यावर मीरा त्यांना मीठी मारून रडू लागते.

"काय झालं बाळ.." काकू.

"साॅरी काकू.. मी नाही सांगू शकत.. पण मला तुमच्याजवळ येऊन रडावस वाटल म्हणून.." मीरा.

"बरं.. तुला सांगायचं नसेल तर राहू दे.. मी जबरदस्ती नाही करणार.. पण तू शांत हो बाळ.." काकू.

मीराला शांत करून काकू सूप करायला जातात.. मीराला खूप अपराधी वाटत.. आपण काकूंना त्रास दिल असे वाटत.. काकू सूप घेऊन येतात.. मीरा सूप पिऊन झोपते..

सकाळी सकाळी नेहा आवरून बाहेर बसलेली असते.. इतक्यात एक इसम तेथे येतो..

"हाय मी निरव.." तो इसम.

"हॅलो.." नेहा.

"मीरा मॅडम आहेत का??" निरव.

"नाही.. मीरा आत्ताच बाहेर गेली आहे.. येईल इतक्यात.." नेहा.

"ओहो.. मग मी तोपर्यंत बसू शकतो का??" निरव.

"हो.. बसा ना.." नेहा.

"माझ्या बहिणीच लग्न आहे.. त्याच्या अरेंजमेंटसाठी मी आलो आहे.." निरव.

"हम्म.. " नेहा.

"तुमचं नाव.." निरव.

"नेहा.." नेहा.

"नाईस नेम.." निरव.

"हॅलो.." नेहा.

थोडा वेळ दोघेही बोलत नाहीत.. निरवला नेहा बघता क्षणीच आवडलेली असते.. पण कसं बोलायचं हेच कळत नाही..

"फ्रेण्डस्.." निरव.

"काऽऽय.. आपण एकमेकांना ओळखतही नाही आणि फ्रेण्डस् म्हणे.. मी अनोळखी व्यक्तीशी मैत्री करत नाही.." नेहा.

"अनोळखी कुठे.. आता ओळख झाली ना.." निरव.

"इतकीच?? मी लगेच मैत्री करत नाही.. त्या व्यक्तीला निरखून पारखून मग मैत्री करते.." नेहा

"अरे बापरे.. मी तर आवडलेल्या व्यक्तीशी लगेच मैत्री करतो.." निरव.

"काय..." नेहा

"हे माझ कार्ड.. तुम्ही विचार करा.. आणि मला नक्की फोन करा.. मी इंजिनिअर आहे.. मला चांगला पगार आहे.. घरी मी, आई आणि बहिण जिच आता लग्न होणार आहे.. इतकेच राहतो.." निरव.

"मग.. तुमचा विचार काय आहे.. हे सगळं मला का सांगताय??" नेहा.

"नाही सहजच.. मी तुम्हाला लग्नासाठी मागणी घालतोय समजा.." निरव.

"तू समजतोस काय रे स्वतःला.. आणि आपण असं किती ओळखतो" नेहा.

"माहित नाही.. पण तुम्हाला बघून माझे मन मात्र तुमचे झाले.." निरव.

"अरे वेडा आहेस काय.." नेहा.

"तस समजा.." निरव.

इतक्यात मीरा येते.. "मीरा मॅडम. मी निरव मागे जे लग्न झालं त्यावेळी मी तुमची अरेंजमेंट बघितली होती.. म्हणून माझ्या बहिणीच्या लग्नासाठी मॅनेजमेंटचं काम तुम्हाला देण्यासाठी आलो आहे.." निरव.

"ओके.. आत या मी तुम्हाला डिटेल्स सांगते.." मीरा निरवला घेऊन आत जाते.. नेहा तिथेच मैत्रीणीशी चॅटींग करत बसलेली असते..

मीराकडून सगळे समजून घेतल्यावर निरव जातो.. थोड्या वेळाने नेहा उठून आत जात असते इतक्यात तिला तेथे एक डायरी दिसते.. ती बघते तर त्यावर निरवचे नाव होते.. "हा डायरी विसरून गेला" नेहा मनात म्हणते..

मग ती मीराला ती डायरी दाखवते.. "मी कशी देणार.. माझ्याकडे त्यांचा नंबर पण नाही.." मीरा.

"माझ्याकडे आहे.. तू फोन कर आणि दे.." नेहा.

"मी नाही देऊ शकणार.. त्यांना वाटेल मला क्लायंट म्हणून त्यांची गरज आहे.. सो तूच दे.." मीरा

"बर बघते.." नेहा.

नेहा मग रूममध्ये जाते.. तेथे ती "बघूया तर काय आहे डायरीत.. नको हे चांगलं दिसणार नाही.. पण आतुरता लागून राहिली आहे की यात काय लिहिलेलं आहे.. काही महत्त्वाचे असले तर.." असा मनात विचार करत ती डायरी उघडून बघते..

पहिला पाऊस
अन् पहिलं प्रेम
दोन्ही येताना आनंद
आणि भावना सेम

व्वा यात तर चारोळी, कविता आणि बरंच काही आहे..

नेहाला आता प्रश्न पडतो.. त्याला डायरी द्यायची की नाही.. हे आपण पुढच्या लेखात पाहू..

आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका.

*** सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क फक्त लेखीकेकडे राखीव आहेत. आपल्याला ही पोस्ट शेअर करायची झाल्यास नावासह जरूर करावी. आपला अभिप्राय हा सर्वात महत्त्वाचा ! तेव्हा कृपया लाईक सोबतच खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले मत जरूर कळवावे.

©®प्रियांका पाटील. 

🎭 Series Post

View all