कळत नकळत भाग 2

Marathi love story

आपण मागील भागात पाहिले की अमर आला होता पण मीरा त्याला घरात घेत नव्हती.. कारण तिला माहित नव्हतं की तो काका काकूंचा मुलगा आहे.. अमर खूप चिडतो.. तिला पण थोडा राग येतो.. मीरा संध्याकाळी काही कामासाठी बाहेर जाते.. सगळे तिची जेवण्यासाठी वाट बघत असतात.. आता पुढे..

"अगं आई किती उशीर? बसा आता जेवायला. तिची वाट बघायला ती काही महाराणी नाही. येईल तेव्हा जेवेल ती. तुम्ही बसा बघू." अमर आई बाबांना जेवण्यास सांगत असतो.

"अरे थांब ना. येईल ती. तुला भूक लागली असेल तर तू चालू कर ना बाळा." अमरची आई म्हणाली.

"अच्छा म्हणजे मी इतक्या दिवसांनी आलोय तर माझ्या सोबत तुम्ही बसायचं सोडून ती कुठली कोण तिची वाट बघत बसला आहात? ती बाहेर जेवून येईल आणि तुम्ही बसा तिची वाट बघत." अमर.

"नाही रे. येते म्हणाली म्हणजे येईल. काहीतरी महत्वाचं काम असेल. येईल इतक्यात." अमरची आई.

"त्या जागी जर मी असतो तर तुम्ही मला किती ओरडला असता आणि आता तिला उशीर झाला तर काय काम असेल महत्वाचं. व्वा तुम्ही नक्की माझेच आई बाबा आहात ना." अमर.

"अरे तू मित्रांबरोबर असतोस. तेव्हा तू कोणतं काम करतोस? ती बिचारी कामासाठी गेली आहे." अमरची आई म्हणाली.

"बिचारी म्हणे. बिचारी बिचारी काही नाही बरं का? एक दिवस कळेल तुम्हाला." असे अमर म्हणतो इतक्यात मीरा येते....

"आल्या महाराणी...." अमर मनात म्हणतो.

"साॅरी साॅरी काकू. मला थोडा उशीर झाला. काय झालं एक महत्वाचं काम आल. मग जावे लागले. साॅरी." मीरा आत येतच म्हणते.

"अगं हो हो. असू दे ग. तू जा आवरून ये. मी वाढायला घेते." अमरची आई म्हणाली.

"हो आले." म्हणत मीरा आवरायला जाते.

मीरा फ्रेश होऊन येते. मग सगळे जेवायला बसतात. मीरा काका काकूंच्या बरोबर दिवसभरात काय काय झाले ते सांगत, गप्पा गोष्टी करत जेवत असते. काका काकू पण तिच्याशी बोलत जेवत असतात. अमरला खूप बोरं होत आणि रागही येतो. "माझे आई बाबा माझ्याशी बोलायचं सोडून हिच्याशी बोलत आहेत. हिने काय जादू केली आहे काय माहित?" असा तो मनात विचार करतो.

अमर लवकर लवकर जेवण संपवतो आणि रागाने आपल्या खोलीत निघून जातो. अमरच्या आईला ते समजते आणि ती सगळं आवरून झाल्यावर त्याच्या खोलीत जाते.

"काय झालं बाळ तुला?" अमरची आई.

"काही नाही." अमर रागातच म्हणतो.

"मग हे गाल का फुगलेत?" अमरची आई.

"काही नाही म्हणालो ना." अमर परत रागात.

"बरं ठिक आहे, तू झोप आता. मी जाते." असे म्हणून ती जात असते तोच अमर तिला "आई" म्हणून हाक मारतो.

"बोल बाळ, काय झालंय तुला?" अमरची आई.

"काही नाही थोडा राग आला होता." अमर.

"कोणाचा?" अमरची आई.

"माझाच" अमर.

"मला माहित आहे. असू दे. तू झोप आपण नंतर या विषयावर बोलू." असे म्हणून अमरची आई जाते.

इकडे मीराला खूप वाईट वाटते. "आपण किती रूढ वागलो त्याच्याशी? त्याच्याच घरात राहून त्याच्यावरच दादागिरी केली." असे ती मनात विचार करत असते.

"उद्या जाऊन त्याला साॅरी बोलूया आणि इथेच सगळा विषय संपवून टाकू." परत ती मनात विचार करते आणि असा विचार करत ती झोपते.

सकाळी मीरा तिचं सगळं आवरून अमरला साॅरी म्हणायला त्याच्या खोलीत जाते. ती दाराला हात लावते तोच दरवाजा उघडतो. ती आत जाते. तोच अमर नुकताच अंघोळ करून आलेला असतो. ती त्याला बघून वळते आणि तिचा पाय टेबलाला लागतो आणि त्यावर चालू असलेला लॅपटॉप जोरात खाली पडतो.

झालं मग काय ती काही बोलायच्या आत परत अमर जोरात तिच्यावर ओरडतो. तिला काहीच सुचले नाही. ती रडू लागली. अमर मात्र लॅपटॉप बघू लागला. तर तो बंद पडला होता. आता त्याच्या रागाचा पारा जास्तच चढला. कारण त्याला एक प्रेझेंटेशन बनवायचे होते आणि लॅपटॉप दुरूस्त करून कधीपर्यंत मिळणार काही माहिती नव्हते?

काका काकू तेथे आले. पण एकूण परिस्थिती पाहता ते दोघे काहीच बोलले नाहीत. मीरा रडतच तिच्या खोलीत जाते. काका काकू पण काही न बोलता निघून गेले.

"काय काम होतं काय माहित? बाहेरून आवाज देऊन मग आत यायचं असतं. इतकंही मॅनर्स नाही. असे कुणी दुसर्याच्या रूममध्ये डायरेक्ट जात का? काय मुलगी आहे?" असे मनात बडबडत तो सगळं आवरून घेतो.

आवरून झाल्यावर तो नाष्टा करायला खाली येतो. मीरा आलेली नसते. काका काकू पण तसेच बसून असतात. अमर नाष्टा करून लॅपटॉप दुरूस्त करायला जातो. नंतर काकू मीराच्या रूममध्ये जातात.

"आत येऊ का?" काकू.

"अहो काकू, विचारताय काय? या ना." मीरा डोळे पुसतच म्हणते.

"अगं अमरच म्हणणं इतकं मनावर घेऊ नकोस. त्याला राग लगेच येतो पण नंतर त्याची चूक समजली की आपण होऊन माफी मागतो. मनात काही नसत गं त्याच्या. फक्त डोकं तेवढं लवकर तापत." असे काकू मीराला म्हणतात.

"हमम" मीरा.

"चल बघू आता नाष्टा करायला. मी पण केला नाही अजून." काकू.

"तो असेल ना." मीरा.

"नाही तो लॅपटॉप दुरूस्त करायला गेला आहे." काकू हसून बोलतात.

"मग चला" असे म्हणून दोघी नाष्टा करायला जातात.

या पुढचा भाग पुढील लेखात पाहू....

आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका.

*** सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क फक्त लेखीकेकडे राखीव आहेत. आपल्याला ही पोस्ट शेअर करायची झाल्यास नावासह जरूर करावी. आपला अभिप्राय हा सर्वात महत्त्वाचा ! तेव्हा कृपया लाईक सोबतच खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले मत जरूर कळवावे.

©®प्रियांका पाटील.





🎭 Series Post

View all