कळत नकळत भाग 20

Marathi love story

आपण मागील भागात पाहिले की अमर त्याच्या बाबांना त्याचं आणि मीराच प्रेम असल्याचं सांगतो.. तेव्हा त्याच्या बाबांनी त्याच्यासाठी एक मुलगी पसंत केल्याच सांगतात.. मग अमर नाराज होतो.. आणि त्याच्या बाबांना उलट उत्तर देतो.. त्या वादात अमरच्या बाबांना सौम्य अटॅक येतो.. मीरा ते सगळं स्वतःवर ओढवून घेते आणि अमरच्या आयुष्यातून कायमची निघून जाते.. आता पुढे..

अमर त्याच्या बाबांची काळजी व्यवस्थित घेत होता.. त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून तो खूप प्रयत्न करत होता.. रात्री त्याच्याजवळ उशीरा पर्यंत बसून असायचा.. त्यांना झोप लागल्यावरच तो झोपायला जायचा..

त्याच्या आईची तब्बेत आता पुर्ववत झाली होती.. बाबांना अजून आरामाची गरज होती.. बाबा अमर किती चांगल्याप्रकारे सगळं करतो म्हणून आनंदी होत.. पण त्याचवेळी आपण किती चुकलो.. एका गोष्टीने त्याला विचारलो नाही म्हणून दुःखी होत..

ते अमरपुढे ती गोष्ट काढत पण अमर टाळायचा.. "तुमची तब्येत बरी होऊ दे मग बोलू.." असे तो म्हणायचा.. त्यांना घरी आल्यापासून मीरा दिसली नाही.. ते सारखे तिची चौकशी करत पण अमर त्यांना काहीतरी सांगून टाळायचा..

इकडे मीरा गेल्यापासून अमरला एक क्षण करमेना.. तो कशात तरी मन रमवू लागला.. पण त्याला तिची खूप कमतरता जाणवू लागली.. तो तिला फोन करायचा पण ती त्याचा काॅल उचलायची नाही..

आता बाबांची तब्बेत सुधारत होती.. आता ते बाहेर जाणे, बागेत सिनियर सिटीझन सोबत बसून गप्पा मारणे.. करू लागले.. त्यामुळे अमरची काळजी मिटली..

एक दिवस अमरचे बाबा अमरला हाक मारतात..
"अमर ए अमर.. जरा इकडे ये बाळ.."

"काय बाबा.." अमर

"बस.. मला तुझ्याशी बोलायचं आहे.." अमरचे बाबा.. अमर बसतो..

"काय बाबा?? बोला ना.." अमर

"मला माफ कर बाळ.. मी तुला न विचारताच निर्णय घेतला.." अमरचे बाबा

"बाबा.. तुम्ही माफी वगैरे मागायची नाही ह.. आणि मी तुमचा मुलगा आहे.. तुम्ही निर्णय घेतला तर काहीच हरकत नाही.. बस आता हा विषय परत नको.." अमर

"असू दे.. मला आताच बोलायचं आहे.. मला सांग तू अजून किती दिवस सुट्टीवर आहेस.." अमरचे बाबा

"अजून दोन तीन महिने आहेत.. पण तुम्हाला पूर्ण बरं वाटल्याशिवाय मी कोठेच जाणार नाही.." अमर

"बरं बाबा.. मग मला सांग मीरा कुठे आहे.." अमरचे बाबा

"माहित नाही.." अमर

"म्हणजे??" बाबा

"ती मला कोठे जाणार हे न सांगताच गेली.. मी फोन केला तरी ती माझा फोन उचलत नाही.." अमर

"एकदा फोन कर बघू मी बोलतो.." बाबा

अमर परत फोन करतो पण ती फोन उचलत नाही.. दोन तीन वेळा फोन करूनही ती फोन उचलत नाही..

"राहू दे बाबा.. ती ऐकणार नाही.. तुम्ही माझ्यासाठी कोणती मुलगी पसंत केला होता.." अमर

"राहू दे रे.. मी तिच्या बाबांना काहीतरी सांगेन.. तू मीराला शोध.. पुढच मी बघेन.." बाबा

"नको बाबा.. मीराला ते आवडणार नाही.. ती काही ऐकणार नाही.." अमर

"बरं.. पण तू राग मानू नकोस हं.." बाबा

"नाही बाबा.. मीरा म्हणाली आई बाबांचे मन कधी दुखवू नकोस.. त्यांची काळजी घे.. आणि त्यांच्या मनाप्रमाणेच लग्न कर.." अमर

"इतकी चांगली मुलगी.. पण आम्हीच चुकलो.. तुला न विचारता परस्परच मुलगी पसंत केली.." बाबा

"कोण आहे ती मुलगी बाबा.." अमर

"अरे आपली नेहा.. तुमची मैत्री बघून माझ्या मनात तसा विचार आला.. आणि मी तिच्या बाबांना सांगितले.. त्याच्याकडून वचनही घेतले.. पण मला काय माहित?? आता मी माझ्या मित्राला कसे सामोरे जावू.. तेच कळेना.. आतापर्यंत नेहाला पण कळालं असेल.. ती बिचारी खूश असेल.. आमचच चुकलं.. तुला तुझं प्रेम विचारायला हवं होतं.." बाबा

"काय??" अमर एकदम करंट लागावे एवढ्या आश्चर्याने ताडकन उठून उभा राहिला.. आणि आनंदाच्या भरात आई बाबांना मीठी मारला..

आई बाबांना काहीच कळेना.. हा इतका का खूश झाला.. अचानक आम्हाला मीठी मारला.. याच्या मनात नेमकं कोण आहे.. मीराच आहे की नेहा.. इतके दिवस मीराच्या नावाने नाराज होता.. आता नेहाचे नाव घेतले तर ताडकन उठून उभा राहिला.. नक्की काय चाललंय..

"काय झालं.. इतका खूश का आहेस?? म्हणजे तुला नेहा.." बाबा पुढे बोलणार इतक्यात..

"नाही माझं मीरावरच प्रेम आहे.." अमर

"मग??" दोघेही प्रश्नार्थक नजरेनं त्याच्याकडे पाहतात..

"बरं बरं सगळं सांगतो..ज्या दिवशी नेहा जाणार होती.. त्या दिवशी जो निरव तिला सोडायला गेला होता.. त्या दोघांच एकमेकांच्या वर प्रेम आहे.. आणि निरव तिला काही दिवसात मागणी घालायला जाणार आहे.." अमर

हे ऐकून सगळेच खूप खूश होतात.. अमर तर नेहाला सगळं सांगण्यासाठी फोन करत असतो.. कारण तिच्यावरच तर सगळं अवलंबून असतं..आणि तिच्या बाबांना सगळं व्यवस्थित सांगायच असतं.. पण नेहा फोन उचलत नव्हती.. खूप वेळा फोन करूनही ती फोन उचलेना म्हणून तो निरवला फोन करतो..

"तिचा कालपासून फोन लागत नाही.." निरव म्हणाला.. "तिच्या बाबांना फोन करून बघतोस का?? मला खूप टेन्शन येत आहे.. असे कधी होत नाही.. ती लगेच फोन घेते.."

अमर "बरं " म्हणून नेहाच्या बाबांना फोन करतो.. तेव्हा नेहाचे बाबा "काल तिचा खूप मोठा ऍक्सिडेंट झाला आहे.. डोक्याला खूप मोठा मार लागला आहे.. आताच आय. सी. यू. मधून बाहेर शिफ्ट केले आहे.. आता थोडी बरी आहे.." असे सांगितले..

हे ऐकताच अमरला खूप वाईट वाटले.. त्याने लगेच निरवला ही गोष्ट सांगितली.. मग अमर आणि निरव दोघेही तिला भेटण्यासाठी हाॅस्पिटलमध्ये जातात..

"काका नेहा आता कशी आहे.." अमर

"आता थोडी बरी आहे.. मघाशीच शुद्धीवर आली आहे.. थोडा विकनेस आहे.. पण आता घाबरण्याचे काहीच कारण नाही असे डाॅक्टर म्हणाले आहेत.." नेहाचे बाबा

"आम्ही भेटू शकतो का??" अमर

"हो हो भेटा की त्यात काय एवढं.." नेहाचे बाबा

मग अमर आणि निरव दोघेही तिला भेटण्यासाठी जातात.. ती जागीच असते.. एकटीच बसलेली असते.. दोघेही तिच्याजवळ जातात.. ती त्यांना बघून स्माईल देते..

"कशी आहेस??" अमर

"कशी वाटते??" नेहा

"लवकर बरी हो.. खूप बोलायचं आहे तुझ्याशी.." अमर

"मलाही.." नेहा

"मी पण लवकरच तुझ्या बाबांना भेटणार आहे.. तू फक्त लवकर घरी ये.. माझी आई तर तुझी वाटच बघत बसली आहे.." निरव

"अमर हे कोण आहेत.. मी यांना कशी ओळखते.." नेहा

"अगं हा निरव.. तुला आठवत नाही.." अमर

"निरव.. मला नाही आठवत.." असे म्हणत नेहा आठवण्याचा प्रयत्न करते.. इतक्यात डोक्यावर ताण आल्यामुळे तिला चक्कर येते..

लगेच डाॅक्टर येतात.. आणि तिला इंजेक्शन देतात..

"डाॅक्टर.. ही मला का ओळखत नाही.." निरव

"डोक्याला मार लागल्यामुळे मधला काही काळ त्यांच्या डोक्यातून पुसला गेला आहे.. ते पुर्ववत होण्यासाठी किती अवधी लागेल सांगता येत नाही.. कदाचित महिना.. कदाचित वर्ष.. कदाचित थोडा वेळ किंवा कधीच नाही.." डाॅक्टर

हे ऐकताच अमर आणि निरवच्या पायाखालची जमीनच सरकते.. किती आशेने ते दोघे आलेले पण आता सगळं आणखीनच कठीण झालं होतं..

आता पुढे काय होतंय ते पुढच्या लेखात पाहू..

आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका.

*** सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क फक्त लेखीकेकडे राखीव आहेत. आपल्याला ही पोस्ट शेअर करायची झाल्यास नावासह जरूर करावी. आपला अभिप्राय हा सर्वात महत्त्वाचा ! तेव्हा कृपया लाईक सोबतच खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले मत जरूर कळवावे.

©®प्रियांका पाटील.



🎭 Series Post

View all