कळत नकळत भाग 4

Marathi love story

आपण मागील भागात पाहिले की मीरा अमरला प्रोजेक्ट करण्यासाठी लॅपटॉप देते आणि साॅरी म्हणते. अमरला त्याची आई सांगते की मीरा अनाथ आहे. हे ऐकून अमरला खूप वाईट वाटले... आता पुढे..

रात्री अमर मीराला तिचा लॅपटॉप द्यायला जातो. तो दारापाशी जाऊन दरवाजा ठोठावता.
"कोण आहे?" मीरा.

"मी अमर." अमर.

"अरे ये ना आत." मीरा अमरला आत बोलावते. अमर आत येतो.

"तू अजून झोपली नाहीस?" अमर.

"नाही रे थोडं काम होतं." मीरा.

"हमम.. हा घे तुझा लॅपटॉप. थॅन्क्यू सो मच." अमर.

"अरे इतक्यात द्यायलाच पाहिजे असं काही नाही. तुझं काम असेल तर राहू दे तुझ्याकडे. मला आता लागणार नाही." मीरा.

"अगं मी दोन दिवस काम घेतलेलच नाही. मग तुझा लॅपटॉप घेऊन तर काय करू. म्हणून परत दिला. थॅन्क्यू आणि साॅरी बर का." अमर.

"साॅरी कशासाठी?" मीरा.

"मी तुझ्यावर विनाकारण ओरडलो म्हणून." अमर.

"इट्स ओके." मीरा.

"फ्रेण्डस् " असे म्हणत अमर हात पुढे करतो.

"ओके" म्हणून मीरा त्याच्या हातात हात देते आणि दोघेही स्मित हसतात.

"बरं तू तुझं काम कर. मी जातो. गुड नाईट." म्हणत अमर जात असतो तोच त्याला मीराच्या टेबलवर लग्नाच्या मंडोळ्या, रूखवत सजावटीसाठी लागणारे सामान आणि लग्नात लागणारे थोडे फार सामान दिसते. मग तो परत वळून "हे काय आहे?" असे मीराला म्हणतो.

"अरे ते होय. परवा माझे लग्न आहे ना त्यासाठी तयारी करत आहे." मीरा चुकून माझे लग्न असे म्हणाली.

"काय?? परवा." अमर आश्चर्याने विचारतो.

"हो. तू मला मदत करणार का?" मीरा.

"नाही. मला थोडं काम आहे." अमर नाराजीने म्हणाला. त्याला खूप वाईट वाटलं. सुरू होण्याआधीच सगळं संपलं असे त्याला वाटू लागले.

"आई आणि बाबांना माहित आहे का??" अमर.

"हो. मी त्यांना सांगितले आहे. का रे? " मीरा

"काही नाही. असंच विचारले." असे म्हणून अमर जातो. त्याला खूप वाईट वाटले. कुणीतरी त्याच्या हृदयावर घाव घातला असे त्याला वाटू लागले. "जरा उशिरच झाला. माझंच चुकलं मी तिच्याकडे लक्षच दिले नाही. नाहीतर ती आज माझी असती." असे तो मनात म्हणत असतो.

रूममध्ये आल्यावर तो झोपायचा प्रयत्न करतो पण त्याला झोप येत नाही. तो फक्त मीराचाच विचार करत असतो. त्याला खूप वाईट वाटत असते. शेवटी "असू दे ही मिळाली नाही तर काय झालं. दुसरी मिळेल." असा विचार करत तो झोपतो.

दुसर्या दिवशी सकाळी अमरला उशीराच जाग आली. कारण रात्रभर तो मीराचाच विचार करत होता. सकाळी उठून तो खाली येतो. मीराची गडबड चालू असते. ते बघून अमरला आणखीनच वाईट वाटते.

"आई परवा तिचे लग्न आहे. तुला माहित आहे काय ग?" अमर.

"होय. तिने मला सांगितले आहे. का रे?" अमरची आई.

"काही नाही सहज." अमर.

"हमम... बघ ना लग्न दुसर्याचे पण स्वतःचं असल्यासारखं तयारी करत आहे." अमरची आई.

"म्हणजे???" अमर.

"अरे ती मॅरेज मॅनेजमेंटचं काय म्हणतात तसल काम करते ना. तेथे लग्न आहे परवा. ती त्याचीच तयारी करत आहे." अमरची आई.

"काय?? मला वाटलं....." अमर असे म्हणत असतो तोच मीरा तेथे येते. अमरला खूप आनंद होतो. तो हसत असतो. कालची त्याची घालमेल संपलेली असते. त्याला खूप मोकळं वाटत असतं.

"काकू मी येते." मीरा.

"अगं नाष्टा तर करून जा." अमरची आई.

"नको काकू, खूप काम आहे. आज जयंत (तिचा मदतनीस. तो आणि मनाली दोघे तिला या कामात मदत करत असतात.) मला आणि मनालीलाच सगळं करावं लागणार आहे. मनालीला दुसरं काम मी सांगितले आहे त्यामुळे बाकीची काम मला एकटीलाच करावी लागणार आहेत. आता नाष्टा करत बसले तर खूप वेळ होईल. नको मी जाते." असे म्हणून मीरा जात असते..

"अगं थांब, अमर येईल तुझ्याबरोबर. तू कर नाष्टा. काय अमर जाशील ना?" अमरची आई.

"आऽऽ चालेल तू सांगतेस तर जाईन मी." अमरच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत असतात. पण तो तसे दाखवून देत नाही.

"बरं पण लवकर निघावे लागेल." मीरा.

"तू नाष्टा कर. मी लगेच आवरून येतो." असे म्हणून अमर आवरायला जातो.

अमर आवरून आल्यावर दोघेही जातात.

या पुढील भाग पुढील लेखात पाहू...

आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका.

*** सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क फक्त लेखीकेकडे राखीव आहेत. आपल्याला ही पोस्ट शेअर करायची झाल्यास नावासह जरूर करावी. आपला अभिप्राय हा सर्वात महत्त्वाचा ! तेव्हा कृपया लाईक सोबतच खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले मत जरूर कळवावे.

©®प्रियांका पाटील.



🎭 Series Post

View all