कळत नकळत भाग 7

Marathi love story

आपण मागील भागात पाहिले की मीरा, अमर आणि मनाली, जयंत यांनी मिळून लग्नाच्या हाॅलची सजावट केली होती. सगळेच खूप दमलेले होते. मग घरी जाऊन झोपले कारण उद्या लवकर जायचे होते.. आता पुढे..

सकाळी मीरा लवकरच उठली. सगळी तयारी करून झाल्यावर, आवरून ती खाली आली. अमर तिची वाट बघत उभा होता. त्याने मीराला पाहिले. ती गुलाबी साडीमध्ये खूप सुंदर दिसत होती. अमर तिच्याकडेच पाहत होता. त्याची नजरच हटेना. मीरा आपल्या तंद्रीत साडी सावरत खाली आली.

तिने समोर पाहिले तर अमर होता. तो पण फेंट गुलाबी रंगाचा शेरवाणी घालून तयार झाला होता. मीराने त्याला पाहिले आणि त्याला विचारले "मी कशी दिसत आहे. खूप डार्क तर मेकअप नाही ना झाला?"

तरीही अमर काहीच बोलेना. तो फक्त तिच्याकडेच पाहत होता. शेवटी मीरा त्याच्याजवळ जाऊन तोंडाजवळ हात नेते. मग तो भानावर येते.

"काय कुठे लक्ष आहे?" मीरा.

"काही नाही. मी आलो तर चालेल का? या विचारात होतो." अमर असे काही तरी उगाचच सांगतो.

"मग इतका का तयार झाला आहेस?" मीरा.

"नाही म्हणजे तुला चालेल की नाही म्हणून म्हणालो. बरं तू काय म्हणत होतीस?" मीरा.

"हा अरे, मी कशी दिसत आहे. मेकअप जास्त झालाय काय? असे म्हणत होते." मीरा.

"खूप सुंदर दिसत आहेस.." आणि पुढे बोलणार इतक्यात काकू येताय. त्या दोघांनाही बघून "काय सुंदर दिसताय दोघेही. दृष्टच काढायला हवी."

"आई काहीही असतय हं तुझं." अमर.

"अरे काहीही काय? खरं तेच बोलतेय. बरं चला मी गरम गरम नाश्ता केला आहे. खाऊन घ्या. नाहीतर उशीर झालाय म्हणून तसेच जाल." काकू.

"होय ग आई. चल लवकर दे नाहीतर उशीर होईल." अमर.

असे म्हणून ते दोघे नाश्ता करून लग्न मंडपात जातात. तेथे गेल्यावर अजून कोणी पाहुणे आलेले नसतात. मीरा सर्व तयारी कशी झाली आहे हे एकदा परत चेक करते. थोड्या वेळाने हळूहळू पाहूणे यायला सुरवात होते.

लग्न कार्यात सगळी व्यवस्थित तयारी बघून सर्व पाहुणे खूप कौतुक करतात. अमर आणि मीराला तर सगळे नवरा बायकोच समजत असतात. लग्न कार्यात अगदी स्वागतापासून पाठवणी करण्या पर्यंत सगळी तयारी मीराने अगदी व्यवस्थित केलेली असते.

केटरिंगमधील मेनू बघून तर पाहुणे खूपच आकर्षित झाले. काहीजण मीराचा नंबर घेऊन गेले तर काहीजण ऍडव्हान्स ऑर्डर देऊनच गेले.

सगळे लग्न पार पडल्यावर मीरा तिच्या कामाचा मोबदला मिळाला. अर्थात तिला चेक मिळाला. ती खूप खूश झाली. कारण हे तिचं पहिलच पेमेंट होतं. सगळं लग्न पार पडल्यावर सगळे आपापल्या घरी गेले. सगळेच खूप दमलेले होते. घरी जाऊन झोपणे हा एकच पर्याय सगळ्यांनी पसंत केला आणि त्याप्रमाणे सगळे झोपी गेले ते सकाळीच उठले.

सकाळी मीरा थोडी उशीराच उठली. कारण ती खूप दमली होती. उठल्यावर काल काय काय झालं ते आठवून गालातच हसत होती. लग्नात त्यांनी खूप धमाल केली होती. अमर सोबतचे ते क्षण आठवूण ती हळूच लाजत पण होती.

"मला हे काय होतंय. मी त्याला आठवून लाजत का आहे? मीरा यामधे तू पडू नकोस. काका काकूंचा जो विश्वास आहे तो तोडू नकोस. किती प्रेम दिलंय त्यांनी? आईवडीलांच्या पेक्षा जास्त प्रेम करतात ते. मी अस काही केले तर त्यांना आवडणार नाही. तू वेळीच सावध रहा." असे ती मनातच बडबडत असते.

मीरा तिचं सगळं आवरून खाली येते. आज ती खूप खूश असते. तिचं पहिलच काम अगदी चांगल्या प्रकारे यशस्वी झाला होता. जयंत आणि मनाली आलेलेच होते. कारण लग्नासाठी जे काही यांच स्वतःचं सामान होतं ते आणायच असतं. ते विचारायला आलेले असतात.

मीरा त्यांना सगळ्या गोष्टी सांगते आणि दोघांना दोन चेक अर्थात त्यांचे पेमेंट देते. दोघेही खूश होऊन सामान आणण्यासाठी जातात. मग मीरा परत अमरकडे येते आणि त्याला काही पैसे देते.

"हे काय?"अमर.

"अरे लग्नासाठी तुझी खूप मदत झाली. त्यामुळे तुला काही तरी देत आहे." मीरा.

"अच्छा म्हणजे तू आपल्या मैत्रीची किंमत केलीस. हेच ओळखलीस काय मला?" अमर रागाने ओरडतो.

"अरे समजून घे ना. माझ्या तसे काही मनात नाही. तुझा वेळ वाया गेला. त्या वेळेची किंमत आहे. प्लीज वाईट वाटून घेऊ नकोस." मीरा.

"मी माझा वेळ सोडून तुझ्याकडे आलो नव्हतीच. मलाही काही काम नव्हते. रिकामाच होतो. तशी आपली मैत्री पण झाली होती. म्हणून तुला मदत करण्यासाठी आलो होतो. कोणत्याही अपेक्षेने आलोच नव्हतो. तू माझ्या मैत्रीची किंमत पैशात केलीस." अमर रागानेच बोलतो.

"सारी रे, माझ्या मनात तसे काही नाही. तू समजून घे." मीरा.

"नाही प्रत्येक वेळी मी का समजून घ्यायचं. आजचं हे मला काही आवडलेल नाही." अमर.

"बस मग. प्रत्येक वेळी तू असाच करतोस. जरा डोकं शांत ठेवत जा." मीराला पण आता राग येत असतो. कारण अमर काही ऐकायलाच तयार नसतो.

दोघेही खूप भांडतात. काकू दोघांना पण समजावत असतात. त्यांचे कोणच ऐकून घेत नाही. एकमेक चिडतात.. त्यांचे भांडण सुरू असतानाच दारावरची बेल वाजली. अमर जाऊन दार उघडला.

"हाय अमर.. कसा आहेस??" असे म्हणत एक मुलगी त्याच्या मिठीत जाते.

"तू.... इकडे कशी??" अमर मिठी सोडवत म्हणतो.

"तू आला आहेस हे समजल म्हणून भेटायला आले आहे.." ती म्हणजेच नेहा अमरची बालमैत्रीण. लहानपणापासून दोघेही एकत्र खेळायचे, एकाच शाळेत होते, अभ्यास एकत्र करायचे.. नेहाला अमरला सोडून एक दिवस सुध्दा करमत नसे. इतकी त्यांची मैत्री घट्ट होती. हळूहळू दोघेही मोठे होत होते. एका क्षणाला नेहाला अमर खूप आवडू लागला. तिचं प्रेमच होतं अमरवर..

तेव्हाच नेहाच्या बाबांची बदली दुसर्या ठिकाणी म्हणजेच लांबच्या ठिकाणी झाली.. दोघेजण काही वेळा भेटायचे, बोलायचे पण नंतर अभ्यास, मित्रमैत्रिणी, वेगवेगळ्या वेळा यामुळे भेटणे बंद झाले. मग संपर्क काही काळासाठी बंद झाला..

पण नेहाच्या मनात अमरविषयीच्या भावना काही कमी झाल्या नव्हत्या.. तर ही नेहा.. ही आली आणि मीराचा चेहराच पडला..

यापुढील भाग आपण पुढच्या लेखात पाहू..

आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका.

*** सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क फक्त लेखीकेकडे राखीव आहेत. आपल्याला ही पोस्ट शेअर करायची झाल्यास नावासह जरूर करावी. आपला अभिप्राय हा सर्वात महत्त्वाचा ! तेव्हा कृपया लाईक सोबतच खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले मत जरूर कळवावे.

©®प्रियांका पाटील.






🎭 Series Post

View all