कळत नकळत या कथेला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात.. ती कथा संपली पण काही वाचकांना, माझ्या मैत्रीणींना ती कथा थोडी अपूर्ण वाटली.. तर त्या कथेचा पर्व दोन मी घेऊन येत आहे.. या कथेलाही तुम्ही तितकाच प्रतिसाद द्याल.. अशी आशा करते..
"ए मीरे.. अग कुठ आहेस पोरी.." एक व्यक्ती अचानक अमरच्या घरी येतो.. आणि मीराला हाक मारू लागतो..
"कोण आपण.. काय पाहिजे??" अमर
"मीरा इथेच राहते नव्ह.." ती व्यक्ती
"हो.. पण आपण कोण??" अमर
"मी तिचा काका.." ती व्यक्ती
"काय?? तिला तर कोणी नातेवाईक नाहीत.." अमर
"तुम्हाला काय माहित?? बोलवा तिला.." ती व्यक्ती
"मीराने आम्हाला खोटं तर सांगितलं नसेल.. ही व्यक्ती नेमकी कोण आहे.. आणि मीराकडे काय काम आहे.." अमर मनातच म्हणतो
"ए मीरा.. अग येती का ग??" ती व्यक्ती
आवाज ऐकून मीरा लगेच पळत येते.. ती त्या व्यक्तीला निरखून पाहते.. तिला कळेना हा कोण आहे?? आणि मला का बोलावत आहे..
"कोण तुम्ही??" मीरा आश्चर्याने
"अगं मी तुझा काका.." ती व्यक्ती
"मला कोणी काका नाहीत.." मीरा
"अगं तुला माहीत नाही.. पण मला माहित आहे की तू आमची लाडकी मीरा आहेस.. आमची गुणाची पोरं.." ती व्यक्ती
"उगाच काहीतरी बडबडू नका.." मीरा
"अगं तुला माहीत नाही.. तुझा बाप माझा भाऊ आहे.. बिचारे दोघे ऍक्सिडेंटमध्ये गेले.." ती व्यक्ती असे म्हणून डोळे पुसू लागला..
"मग माझा पत्ता कोण दिला.." मीरा
"अनाथ आश्रमात गेलो होतो तुला भेटायला.. तेव्हा त्यांनी इथला पत्ता सांगितला.." ती व्यक्ती
"अच्छा.. म्हणजे तुम्ही तिथे धडकून आलात तर.. मग मला सांगा मी तुमची पुतणी आहे ना.. मग आईबाबा गेल्यावर तुम्ही मला अनाथ आश्रमात का ठेवले??" मीरा
"तुझे आजी आजोबा.. त्यांना मी नको म्हटलं.. तर त्यांनी कोणालाही न सांगता परस्पर तिथे ठेवल तुला.." ती व्यक्ती
"कशावरून.." मीरा
"हे बघ.. ही जमिनीची कागदपत्रे आहेत.. तुझ्या बाबाच्या नावाने आहे.. बघ जरा.. मग तुझी खात्री पटेल.." ती व्यक्ती
मीरा ती कागदपत्रे बघते.. तर तिच्या वडिलांच्या नावाने वीस एकर शेती असते.. तिला त्यात वडीलांच नाव दिसल्यावर ती खूप भावूक होते.. पण लगेच सावरते..
"आता काय काम आहे.." मीरा
"तुला घेऊन जायला आलोय.." ती व्यक्ती
"आताच का बरं??" मीरा
"अगं आपली सगळी भावकी तिकडं आहे.. सगळी तुझी आठवण काढत आहेत.. चल सामान भर लवकर.." ती व्यक्ती
"मी येणार नाही.." मीरा
"काय?? आणि का??" ती व्यक्ती
"माझे मन तयार होत नाही.." मीरा
"तस करू नको बाळ.. चल बघू.." म्हणत ती व्यक्ती मीराचा हात धरणार तोच अमर मधे जातो..
"ती नाही म्हणत आहे ना.. मग जबरदस्ती का करताय??" अमर
"ए हिरो.. तू कोण रे मधे मधे येणारा.." ती व्यक्ती
"मी मीराचा होणार नवरा.." अमर
"काय?? मीरा अगं तू लग्न ठरवलेस??" ती व्यक्ती
"हो.. का??" मीरा
"अग पण तुझे आई बाबा तुझं लहानपणीच लग्न जमवले आहेत.. त्याच्या बरोबरच तुला लग्न करावं लागेल.." ती व्यक्ती
"काय?? हे कसे शक्य आहे??" मीरा
"का शक्य नाही?? अगं तुझ्या आई बाबान तुझा विचार करूनच ठरवलं आहे.. आणि तुला ते मान्य करावं लागेल.." ती व्यक्ती
"नाही.. माझे आईबाबा तसे करू शकणार नाहीत.. आणि मी अनोळखी मुलाशी का बरं लग्न करायचं.. आता जर ते असते तर माझ्या पसंतीच्या मुलाशीच लग्न करून दिल असतं.." मीरा
"अगं अनोळखी कुठ.. तुझ्या आत्याचा तर मुलगा आहे.. प्रमोद नाव त्याच.." ती व्यक्ती
"पण मी त्याला ओळखत नाही.. आणि मी त्याच्याशी लग्न करणार नाही.." मीरा
"कशी करणार नाहीस बर.. चल बॅग भर.." म्हणून ती व्यक्ती मीराचे हात धरून नेत होती.. तेव्हा अमर मधे येतो..
"तुम्ही तिला अशी जबरदस्ती करू शकत नाही.." अमर
"ए हिरो.. तुला काय करायचंय.. आमच्या मधे येऊ नकोस.." ती व्यक्ती
"ती माझी होणारी बायको आहे.. तिला तुम्ही जबरदस्तीने नेऊ शकत नाही.." अमर
"लग्न अजून व्हायच आहे.. आणि मी तिचा सख्खा काका आहे.. त्यामुळे मी तिला घेऊन जाऊ शकतो.." ती व्यक्ती
"जबरदस्ती केलात तर मी पोलिस कम्प्लेंट करेन.." अमर
"तू मला धमकी देतोस.." ती व्यक्ती
"तस समजा.." अमर
तरिही तो नेत असताना..
"फोन करतोच पोलिसांना.. त्याशिवाय सोडणार नाही.. आणि तिचे वय 18 पूर्ण आहे.. त्यामुळे तिला सगळे अधिकार आहेत.." अमर
"अधिकाराची भाषा मला शिकवू नकोस.." ती व्यक्ती
"आमच्या घरातून चालते व्हा.. इतका वेळ मोठे आहात म्हणून गप्प बसलो होतो.. पण आता नाही.." अमर
"अस होय.. ठिक आहे.. मी आता जातो.. पण तुम्हाला बघून घेईन.." असे रागात बोलून तो माणूस निघून जातो..
"जा जा.. काय करायचं ते कर.." अमर पण थोडा चिडूनच बोलतो..
मीराला खूप वाईट वाटते.. ती रडू लागते..
"अगं मीरा रडू नकोस.. आम्ही आहोत ना.. तू घाबरू नकोस.." मीरा
"नाही रे.. माझं काहीतरी होऊ दे.. पण माझ्यामुळे तुम्हाला किती त्रास याच वाईट वाटत.." मीरा
"अगं आता तू आमचीच आहेस.. मग यात माझ तुझ कुठून आल.. आपण तर एक आहोत.." अमर असे म्हटल्यावर मीरा त्याला मीठी मारून आणखीच रडू लागते..
"ए वेडाबाई.. अशा लोकांना घाबरायच नसत.. त्यांना सामोरे जायच असत.. डोळे पुस बघू आधी.." अमर तिला समजावतो..
"आधीच काय कमी होत काय.. किती सहन केलंस तू.. आणि आता नविनच काहीतरी.." मीरा
"अजून थोड सहन करू.. सबर का फल मीठा होता है.." अमर
मीरा डोळे पुसतच "हा कुठून आला मला काही माहीत नाही.." म्हणते
"बघू चल.. आपण शोधू कोण आहे तो.." अमर
"पण कसं.." ते आपण पुढच्या लेखात पाहू..
क्रमशः
आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा