आपण मागील भागात पाहिले की मीराचा पाय मुरगाळला होता.. तिच्या पायाला प्लॅस्टर घातला होता.. एका लग्नाची पूर्ण तयारी अमरने केली.. काकांनी मित्र परिवारासाठी सेलेब्रेशन पार्टी ठेवली.. पार्टी झाल्यावर मीरा मनालीला सोडायला जाते.. आणि येताना वाटेत प्रमोद दिसतो.. आता पुढे..
प्रमोदला समोर बघून मीरा खूपच घाबरते.. त्यावेळी रस्त्यावर कोणीच नसते.. त्याला चुकवून ती भराभर जात असते.. मान खाली घालून ती जाऊ लागते.. तोच प्रमोद तिच्या समोर येतो.. मीरा आणखीनच घाबरते..
"हे बघ.. माझा रस्ता सोड.. मला जाऊ दे.." मीरा
"हातात आलेल्या पक्ष्याला जाऊ कसा देऊ.." प्रमोद
"मला जाऊ दे.. नाहीतर बघ हं.." मीरा
"नाहीतर काय करणार?? ओरडणार.. ओरड.. हॅलो कोणी आहे का??" प्रमोद
"असे करू नकोस.. हे तू चांगलं करत नाहीस.." मीरा
"काय चांगलं आणि काय वाईट?? तू कोण सांगणार??" प्रमोद असे म्हणत तिचा हात पकडतो.. ती ओरडते.. पण रस्त्यावर कोणीच नसते.. तो तिला ओढत रस्त्याच्या कडेला नेतो.. ती प्रतिकार करते.. पण त्याच्या ताकतीपुढे तिचं काय चालणार??
तो तिला ओढत ओढत रस्त्याच्या कडेला नेतो.. तिथे झटपटीत तिचा ड्रेस फाटतो..
"प्रमोद.. तुला मी सगळी प्राॅपर्टी देते.. प्लीज मला सोड.." मीरा
"ससा हाती लागल्यावर कोण सोडतय काय?? मला तू पाहिजेस पहिला.. तू मिळालीस तर प्राॅपर्टी आपोआप मिळेलच.." प्रमोद
"अस करू नकोस रे.. प्लीज मी तुझ्या पाया पडते.." मीरा
"अय्यो रामा.. आता पाया पडतीस.. मी तुला सोडणार नाही.. बघू तुला वाचवायला कोण येतंय??" प्रमोद
"अरे दुष्टा का माझ्या मागे लागलायस?? सोड ना.. वाचवा.." मीरा
"कोणी येणार नाही.. आता बघतोच तुझ्याशी कोण लग्न करतंय ते.." प्रमोद
इतक्यात एक पोलिस गाडी येते.. प्रमोद मीराच्या तोंडावर हात धरतो.. तिला ओढत अजूनच आत नेतो.. मीराला ओरडता येत नाही.. ती प्रयत्न करू लागते पण व्यर्थच..
"मीरा आता जर तू प्रयत्न केली नाहीस तर सगळं संपलं.. तुझं आयुष्यच संपल.. प्रयत्न कर मीरा.." मीरा मनात विचार करून प्रमोदचा प्रतिकार करते..
प्रमोदची पकड खूपच घट्ट असल्याने तिला काहीच करता येईना.. मग ती त्याच्या हाताला जोरात चावते.. आणि किंचाळते.. पोलिस ते ऐकून त्या दिशेला जातात.. तेवढ्यात प्रमोद तिच्या तोंडावर हात धरून तिला आणखी आत नेतो.. पोलिस सगळीकडे बघतात.. पण कोणच दिसत नाही..
पोलिस जात असतात.. इतक्यात मीरा आणखीनच जोरात ओरडते.. पोलिस त्या दिशेला जातात.. तेव्हा मीरा आणि प्रमोद दिसतात.. पोलिस प्रमोदला पकडून पोलिस स्टेशनला नेतात.. आणि मीराला घरी सोडतात..
घरी आल्यावर मीरा घाबरून काकूंना बिलगून रडू लागते..
"काय झालं बाळ.." काकू
"ते प्रमोद.." इतकंच ती बोलली आणि रडू लागली..
तिच्या ड्रेसवरून सगळं समजलं.. कुणीही काहीही बोललं नाही.. फक्त तिच सांत्वन करू लागले.. मीरा खूप रडली आणि खोलीत गेली.. अमरला काहीच कळेना की हा प्रमोद कोण?? आणि ती हिच्या मागे का लागला आहे?? तो काकूंना विचारतो..
"अरे प्रमोद म्हणजे मीराच्या आत्याचा मुलगा.. मीराचे आईवडील गेल्यावर तिला इस्टेट मिळाली ती हवी आहे त्याला.." काकू
"मग हिने देऊन टाकावी ना.. जीवापेक्षा इस्टेट महत्वाचे आहे का??" अमर
"अरे पण तिला ते देता येत नाही ना.." काकू
"का??" अमर
"कारण तिच्या आजीने मृत्यूपत्रात अटच घातली आहे की ही इस्टेट मीराला आणि नंतर तिच्या मुलांनाच मिळावी.. जर मीराला कोणी मारले किंवा तिला काही झाले तर ती इस्टेट अनाथ आश्रमला मिळावी.." काकू
"बापरे.. मला तर तिचे दुःख बघवेना.. बिचारी.. आपल माणूस जर दुःखी असेल तर मनाला खूप वेदना होतात.." अमर
"म्हणजे??" काकू
"मला मीरा खूप आवडते.. मला तिच्याशी लग्न करायचं आहे. " अमर
"काय??" काकू
"हो आई.. मला खरंच ती आवडते.." अमर
"अरे मग आधी का नाही सांगितलंस.." काकू
"पण तिला मी आवडेन काय??" अमर
"अरे तू विचारून तरी बघायच ना.." काकू
"हो.. विचारतो.." अमर
"आता नको.. नंतर विचार.." काकू
"बरं " अमर
दोन दिवस झाले तरी मीरा रूममधून बाहेर आलीच नाही.. ती आतच असते..
"ए मीरा.. चल आवर.. जरा बाहेर जाऊन येऊया.." अमर
"मी नाही येणार.. तुझं तू जा.." मीरा
"प्लीज यार.. असे नको करू.. चल ना माझ्यासाठी.." अमर
"प्लीज माझ्यासाठी नको.." मीरा
"मला तुझ्याशी काही बोलायचं आहे.." अमर
"इथेच बोल ना.." मीरा
"इथे नको प्लीज.. बाहेर जाऊया ना.." अमर
आता मीरा बाहेर जाते का?? आणि अमर तिला काय सांगणार हे आपण पुढच्या लेखात पाहू..
क्रमशः
आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा