कळत नकळत पर्व 2 भाग 13 (अंतिम)

Marathi love story

आपण मागील भागात पाहिले की प्रमोद मीरावर जबरदस्ती करत असतो.. तेवढ्यात पोलिस येतात.. पोलिसांमुळे मीराची सुटका होते.. आणि पोलिस प्रमोदला घेऊन जातात.. मीरा घरी आल्यावर खूप रडते.. अमर तिला बाहेर घेऊन जायचा प्रयत्न करतो.. आता पुढे..

अमर खूपच फोर्स करत असतो.. शेवटी त्याच्या इच्छेखातर मीरा जायला तयार होते..
"तू आवरून ये.. मी खाली वाट बघतो.." असे म्हणून अमर खाली जातो..

मीरा तयार होऊन येते.. ती यलो कलरचा पंजाबी ड्रेस घातलेली असते.. ती खूप सुंदर दिसत होती.. पण तिचा उदास चेहरा तिचं सौंदर्य लपवत होता.. अमरने काकूंना सांगितले होते.. त्यामुळे उशीर झाला तरी चालणार होते..

अमरने गाडी बाहेर काढली आणि मीरा त्यात बसून दोघेही जाऊ लागले..
अमर नदीच्या काठावर गाडी थांबवतो.. मग दोघेही उतरतात.. मग नदीच्या काठावर जाऊन बसतात..

"मीरा तुला थोडं निवांत वाटावं म्हणून येथे घेऊन आलोय.." अमर

"मनाला झालेली जखम कुठेही गेला तरी भरून निघते का??" मीरा

"पण मन तर प्रसन्न होते ना.." अमर

"पण ती गोष्ट मनात तशीच राहते ना रे.." मीरा

"थोडा वेळ निसर्गाच्या सान्निध्यात शांत बस.. नंतर बोलू.." अमर

"हममम.." मीरा

थोडा वेळ ते तसेच शांत बसतात.. निसर्गाच्या सान्निध्यात मनात चालू असलेला कालवा थोडा शांत होतो..

"मीरा एक सांगू.." अमर

"हम्म.. " मीरा

"मला कितीही टेन्शन आलं की मी इथेच येतो.. या नदीसमोर सगळी दुःख मोकळे करतो.. मन शांत झाल्यावर मग जातो.." अमर

"हमम.." मीरा

"आता कसं वाटतय तुला??" अमर

"थोड बर वाटतंय.." मीरा

"मग एक सांगायचं होतं तुला.." अमर

"बोल ना.." मीरा

"तू रागावणार नाहीस ना.." अमर

"तुझ्यावर मी का रागावेन??" मीरा

"हे बघ तुला आवडल नाही तर मला कानाखाली मार.. पण रागावू नकोस.. बोलणं सोडू नकोस.." अमर

"तसं काही होणार नाही.. तू बोल.." मीरा

"बरं.. मीरा तुला आठवतंय.. तुझ्या नविन ऑफिसमध्ये पूजा होती.." अमर

"हं.." मीरा

"तेव्हा आपण सगळेच किती छान आवरून गेलो होतो.." अमर

"मग??" मीरा

"तेव्हा तुला पाहिल्यावर माझ्या हृदयाची धडधड वाढली ग.." अमर

"का??" मीरा

"माहित नाही.. पण त्यानंतर प्रत्येक वेळी तुला पाहिल्यावर माझ्या हृदयात तसच होऊ लागल.." अमर

"..." मीरा फक्त त्याच्याकडे बघत होती..

"अगदी खरं सांगतोय तुला.. मी तेव्हापासून तुझ्या प्रेमात वेडा आहे ग.." अमर

"काय??" मीरा

"होय.. पण हे आज तुला सांगत आहे.. कारण धाडसच झालं नाही कधी.. तू मला मारशील किंवा सोडून जाशील ही मनात भीती होती.. पण आज धाडस करत आहे.. प्लीज माझ्या स्वप्नातली परी बनून माझ्या आयुष्यात येऊन माझे आयुष्य सुंदर बनवशील.. मी एका जीवनसाथीच्या रूपात तुला पाहतो.. तर तू माझ्या आयुष्यात येऊन माझे जीवन पूर्णत्वास नेशील.. तू मला आयुष्यभरासाठी साथ देशील.." अमर

"माझ्या आयुष्यात काय घडतय माहित नाही.." मीरा

"मला सगळं माहित आहे.. आईने सांगितले आहे.. तू त्याची काळजी करू नकोस.. तू फक्त मला साथ दे.. सुखे तुझ्या पायाशी लोळत येतील.." अमर

"तसं नाही रे.. माझ्यामुळे कुणाला त्रास झालेला मला चालणार नाही.. तुला तर नाहीच नाही.." मीरा बोलता बोलता सहज म्हणाली

"मला का बरं नाही.." अमर

मीराला आपण हे चुकून बोललो असे म्हणत ती विषय टाळू लागते..

"मला का बरं नाही.. सांग.." अमर तिला पकडून विचारतो..

"काळजी वाटते रे.." मीरा

"का??" अमर

"माणुसकी म्हणून.." मीरा

"खोटं.. मला खरंच काय सांग.." अमर परत तिच्या हाताला धरून विचारतो..

"माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.." मीरा अनावधानाने बोलून जाते.. हे बोलताना तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले.. अमर तिचे डोळे पुसतो आणि कपाळावर एक किस करतो.. मीरा आणखीनच रडू लागते आणि अमरला मीठी मारते.. बराच वेळ ते दोघे तसेच राहतात..

रात्र होते तरी दोघेही तिथेच बसतात.. शांत एकमेकांच्या हातात हात घेऊन.. एकांतात बराच वेळ बसल्यानंतर मग घरी जातात..

घरी गेल्यावर काका काकूंना अमर सगळं सांगतो.. त्यांना तर सगळे आधीच माहित असते.. त्यामुळे त्यांची काहीच अडचण नव्हती..

मग चार दिवसांनी अगदी साध्या पद्धतीने मीरा आणि अमरचे लग्न झाले... आता प्रमोद आणि काका काहीच करू शकत नव्हते.. कारण मीराच्या आजीने मृत्यूपत्र तसेच बनवले होते.. आता मीराच्या आयुष्यातील सर्व दुःख संपून नव्या संसाराची वाटचाल चालू होती..

समाप्त..

अशाप्रकारे कळत नकळत कथेचे दोन्ही पर्व संपले आहेत.. तुम्ही भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद..
अशाच माझ्या कथा वाचण्यासाठी मला फाॅलो करायला नक्कीच विसरू नका..

🎭 Series Post

View all