आपण मागील भागात पाहिले की एक व्यक्ती मीराचा काका म्हणून घरी येते आणि मीराला जबरदस्ती घेऊन जात असते.. अमर त्यात मधे येतो तर तो अमरलाच धमकी देऊन जातो.. आता पुढे..
मीरा नुसता त्या व्यक्तीचाच विचार करत असते.. "कोण असेल तो?? खरंच माझा काका असेल का?? तर मग तो इतक्या वर्षांनी का बरं आला असेल?? काही काम असेल का?? आणि खरंच माझ्या आईबाबांनी माझ लग्न लहानपणीच ठरवले असेल का??" असे एक नाही अनेक प्रश्न तिच्या मनात चालू असतात..
काकू तेथे येतात.. मीराला तसे विचारात बघून तिच्या डोक्यावरून हात फिरवतात.. "मीरा इतका काय विचार करतेस बाळ.." काकू
"काही नाही काकू असच.." मीरा
"सांगणार नाहीस का ग??" काकू
"नको काकू उगाच त्रास.." मीरा
"आपल्या माणसांचा त्रास होत नाही ग.." काकू
"खरं आहे काकू.. पण उगीचच कोण कसे काय त्रास देऊ शकत.." मीरा
"आपण दुर्लक्ष करायच.." काकूंना लक्षात आले की ही त्या व्यक्ती बद्दल बोलत आहे..
"होत नाही काकू तस.. आणि कोण असेल हो तो?? खरंच माझा काका असेल का??" मीरा
"माहित नाही ग.. पण तू काळजी करू नकोस.." काकू
इतक्यात तेथे अमर येतो.. तो मीराकडे बघून म्हणतो "तुझ्या अनाथ आश्रमात जर चौकशी केलीस तर.. म्हणजे तुला घेऊन कोण आलेल?? काय सांगून तिथे ठेवल?? वगैरे.." अमर
"अरे हा.. मी लगेच फोन करते.." मीरा
मीरा आश्रमात फोन करते.. "हॅलो मॅडम.. मी मीरा बोलते.."
"बोल ना ग मीरा.. काय म्हणतेस??" मॅडम
"मी लहान असताना मला अनाथ आश्रमात कोण घेऊन आले होते ते विचारायचे होते.. प्लीज जरा सांगाल का??" मीरा
"थांब ह.. मी बघते.." म्हणून त्या बघू लागल्या.. बघून झाल्यावर परत "अग तुझे आजी आजोबांनी तुला इथे आणलं होतं.." मॅडम
"काय?? पण का?? काहीतरी बोललेच असतील की ते.." मीरा
"ते मला माहित नाही ग.. त्यावेळी मी नव्हते.." मॅडम
"मग कोण होतं?? प्लीज मला सांगा ना मॅडम.." मीरा
"अग नीता मॅडम होत्या.. चार वर्षांपूर्वी ज्या रिटायर्ड झाल्या.." मॅडम
"ओह.. मग त्यांचा नंबर असेलच ना मॅडम तुमच्याकडे.. प्लीज मला देता खा??" मीरा
"नंबर होता पण त्यांचा नंबर बदलला आहे ग.. मी पत्ता सांगेन बघ.. तू जमल्यास भेट.." मॅडम
"हो चालेल मॅडम.. मला पत्ता मेसेज करा.. थॅन्क्यू सो मच.." मीरा
"इट्स ओके.. टेक केअर.." मॅडम
त्या मॅडमनी पत्ता पाठवला.. मग मीरा आणि अमर त्यांना भेटायला लगेच जातात.. बरोबर ठिकाणी गेल्यावर मीरा बेल वाजवते.. मॅडम दार उघडतात..
"अगं मीरा तू.. इकडे कशी काय ग अचानक.. काही काम होत का??" त्या मॅडम
"हो मॅडम.. थोडं काम होत.." मीरा
"बरं.. या आत बसून बोलू.." मॅडम
मग ते दोघे आत जातात.. मॅडम लगेच पाणी आणून देतात..
"बोल मी काय मदत करू तुला.." मॅडम
"मॅडम मला अनाथ आश्रमात कोण घेऊन आले होते.." मीरा
"का ग?? काही अडचण आहे.." मॅडम
"नाही.. मी विचारले.." मीरा
"तुझे आजी आजोबा घेऊन आले होते.. तू खूपच लहान होतीस.." मॅडम
"मग ते काही म्हणाले का??" मीरा
"तुझ्या आईवडिलांचा ऍक्सिडेंट झाला आहे.. सांभाळायला कोण नाही.. म्हणून इथे ठेवत आहोत असे म्हणाले.." मॅडम
"आणखी काही.." मीरा
"का ग??" मॅडम
"मॅडम एक माणूस आला होता.. माझा काका म्हणून.. त्याने मला सांगितले की आजी आजोबा जबरदस्ती मला अनाथ आश्रमात घेऊन आले म्हणून.." मीरा
"अगं हो.. ते होय.. विसरलेच मी.. अगं तुझे आईबाबा गेले.. तू त्यांची एकुलती एक मुलगी.. त्यांच्या नावावर वीस एकर शेती होती.. ती वारसाने तुलाच मिळणार होती.. मग त्या इस्टेटीसाठी तुझ्या जीवाला धोका होता.. कारण ते तुझं काहीही करू शकले असते.. म्हणून तुझ्या आजी आजोबांनी तुला आश्रमात आणलं.. आणि हे कधीच तुझ्या काकाला कळायला नको असे सांगितले होते.. पण बघ ना हे मी रिटायर होताना आत्ताच्या मॅडमना सांगायला विसरले.. आणि नेमका आताच तो माणूस आला.. तू थोड जपूनच रहा ग.." मॅडम
"अच्छा.. म्हणजे तो त्या जागेसाठी आला आहे.. म्हणूनच आता पुतणीची आठवण झाली होय.. ओके थॅन्क्यू मॅडम.. आम्ही बघतो काय करायचं ते.." मीरा
"थोड जपूनच रहा ग.. टेक केअर.." मॅडम
"हो मॅडम.." मीरा
दोघेजण तेथून निघून घरी येतात.. मीराला तर आता काय करावे सुचेना.. ती तिच्या विचारातच होती..
"काय माणसं असतात.. इस्टेटीसाठी किती खालच्या पातळीला जातात.. मला तर काहीच कळेना.. आता काय करायचं.." मीरा
"तू काही काळजी करू नकोस.. बघूया काय होतय ते.." अमर
"माझ्या बाबांची इस्टेट मी त्या माणसाला घेऊ देणार नाही.." मीरा
"बघू ग.. आधी काही प्रोसेस आहे ते बघू.. मग तुझ्या नावावर करून घेऊ.. नाहीतर मधल्या मधे ते गडप करतील.." अमर
"मला तर तो माणूस तुम्हाला बघून घेईन म्हणाला तेच आठवत सारखं.. काही होणार नाही ना.." मीरा
"नाही ग काही होत.. तू काळजी करू नकोस.. मी आहे ना.." अमर
आता पुढे काय होईल.. खरंच मीराची भीती खरी ठरेल का?? इस्टेट मीराच्या नावाने होईल का?? हे आपण पुढच्या लेखात पाहू.
क्रमशः
आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा