आपण मागील भागात पाहिले की मीरा आणि अमर दोघेही ती व्यक्ती कोण आहे याचा शोध घेत असतात.. मग त्यांना कळते की खरंच तो मीराचा काका आहे.. आता पुढे..
आज मीरा काही काम होते म्हणून बाहेर गेली होती.. तिथे एक मुलगा आला.. तो मीराकडे वाईट नजरेने बघत असतो.. मीराला खूप अवघडल्यासारख वाटतं.. ती तेथून निघून येते.. तो मुलगा तिच्या मागेमागे येतो.. ती थोडी घाबरते.. तशीच भराभर पावले टाकत जात असते.. आणि तो मुलगा तितक्यात वेगात तिच्या मागून येत असतो.. शेवटी तो तिला गाठून तिच्या पुढ्यात येतो.. ती खूपच घाबरते..
"ए मीरा अगं मला ओळखली नाहीस.." तो मुलगा
मीरा नुसता मानेनेच नाही म्हणते.. कारण ती खूप घाबरलेली असते..
"अगं मी प्रमोद.. तुझ्या आत्याचा मुलगा आणि तुझा होणारा नवरा.." तो मुलगा म्हणजेच प्रमोद म्हणतो..
"काय?? आणि तुला मी कशी ओळखले.." मीरा
"तुझ्या काकाने म्हणजेच माझ्या मामाने.." प्रमोद
"कस काय??" मीरा
"हे बघ त्या दुकानात उभा आहे तो.." प्रमोद
काकाला पण तिथे बघून मीरा खूपच घाबरते.. तेथून निघते तर तो तिचा हात पकडतो.. ती आणखीनच घाबरते..
"काय सुंदर दिसतेस ग तू.." प्रमोद
"छी.." करून हात झटकू लागते.. पण तो जोरात हात पकडलेला असतो..
"आता तू माझी राणी होणार आहेस.. मग घाबरायचं काय त्यात.." प्रमोद
"तुझ्याबरोबर आणि लग्न.. शक्यच नाही.." मीरा
"कस शक्य नाही बघतोच मी.. चल.." म्हणून तो तिचा हात ओढतो..
मीरा ओरडते.."काय जबरदस्ती आहे ही.. मी येणार नाही.."
"तुला माझ्याशीच लग्न करावे लागणार आहे.. नाहीतर मी पळवून नेईन तुला.. चल.." म्हणत तो तिचा हात ओढतो..
मीरा हात झटकते आणि त्याला जोरात एक थप्पड मारते.. प्रमोद रागाने लालबुंद होतो.. आणि तिला धरणार तेच आजूबाजूचे लोक जमा होतात.. लोक जमा झालेले बघून प्रमोद थोडा घाबरतो..
"ए काय रे मुलीची छेड काढतोस??" एक माणूस
"अहो नाही ओ.. ही माझी होणारी बायको आहे.." प्रमोद
"नाही.. हा खोटं बोलतोय.. हा माझा कुणीच लागत नाही.. माझं दुसर्या एका मुलासोबत लग्न ठरले आहे.." मीरा
"खोटं बोलतोस तू.. मुलीची छेड काढायला लाज वाटत नाही.." असे म्हणून ते लोक त्याच्या अंगावर धावून येतात.. तोवर लगेच काका तिथे येतो..
"साॅरी ह.. चूक झाली.. चल रे.." म्हणून काका प्रमोदला घेऊन जातो..
मीरा सगळ्यांना थॅन्क्यू म्हणून घरी जाते.. घरी गेल्यावर तिला रडूच आले.. ती बसून रडू लागली..
"काय झालं मीरा.. आणि इतकी घाबरली का आहेस.." अमर
तरी मीरा रडू लागली.. ती काहीच बोलली नाही.. काकू तिच्या डोक्यावरून हात फिरवत होत्या.. ती काकूंना मीठी मारून रडू लागते.. तिचे रडणे शांत झाल्यावर परत तिला अमर विचारतो.. "काय झालं मीरा??"
"आज मला तो भेटला.. आणि.." मीरा परत शांत झाली
"कोण??" अमर
"प्रमोद.." मीरा
"काय?? तो इथे आलाच कस??" अमर रागाने म्हणतो
"काका बरोबर आला होता.. आणि माझी वाट अडवून मला घेऊन जात होता.." मीरा
"काय?? मग तू मला का फोन केली नाहीस.. मी आलो असतो ना ग.." मीरा
"अरे तो माझा हातच सोडायला तयार नाही.. मग कशी करणार तुला फोन.. तरी मी एक कानाखाली वाजवली.." मीरा
"मग??" अमर
"सगळे लोक जमा झाले.. मग घाबरून गेला.. पण परत येणार नाही कशावरून.." मीरा
"चल आपण पोलिस कंम्लेन्ट करूया.." अमर
"नको रे.. नाहीतर पुन्हा काहीतरी करायचा तो.." मीरा
"काय करतोय?? काही होत नाही चल.." म्हणून अमर तिचा हात धरतो..
"अरे आता नको.. थोड्या दिवसांनी जाऊ.." मीरा
"तुझ तर काहीतरीच असतय.." अमर वैतागून..
इकडे काका प्रमोदला घेऊन गेल्यावर प्रमोदला खूपच राग येतो.. मीराचा काका हा प्रमोदचा मामा असतो..
"काय हे मामा.. तू मला का आणलास?? मी दिले असते ना दोन दणके तिला.. मग कळाल असत.." प्रमोद
"द्यायला तर पाहिजेच.. लई चुरूचुरू जीभ चालते.. तिला जरा बघायलाच पाहिजे.." काका
"मी बघितलं असत ना.. तुम्ही घेऊन आलात लगेच.." प्रमोद
"अरे तिथं लोकं जमले ना.. नाहीतर दाखवलं असत तिला तिथंच.." काका
"लोकांच काय आहे.. काहीतरी सांगून कटवल असत की.." प्रमोद
"शहाणा आहेस.. पोलिस आले असते तर.." काका
"होय रे मामा.. हुशार आहेस ह तू.." प्रमोद
"हं.. आता काहीतरी आयडिया शोध.. म्हणजे जमीन पण मिळेल आणि मीरा पण.." काका
"हो.." म्हणून दोघे विचार करत असतात
"एक आहे.." काका
"काय??" प्रमोद
"तिच्या हिरोला मारायचं.." काका
"काय??" प्रमोद
"त्याशिवाय पर्याय नाही.." काका
"पण कसं?? नंतर शिक्षा झाली म्हणजे.." प्रमोद
"मारायचं म्हणजे ऍक्सिडेंट करायच.. कुणाला कळणार नाही.." काका
"वा मामा काय डोकं वापरताय .." प्रमोद
"हं.. माझा एक मित्र आहे.. ट्रक ड्रायव्हर.. त्याच्याकडून काम फत्ते करायच.. मग बघू ही काय करते.." काका
"होय बघ.. लई चुरूचुरू चालते.. मग लगेच तिला आणू.. मग लग्न.." प्रमोद
"होय.. नाहीतर इस्टेट जायची.. कायमची.." काका
क्रमशः
यापुढील भाग आपण पुढच्या लेखात पाहू..
आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा