कळत नकळत पर्व 2 भाग 5

Marathi love story

आपण मागील भागात पाहिले की प्रमोद आणि काका मिळून अमरचा ऍक्सिडेंट करतात.. मीराला फोन येतो.. मीरा काका काकूंना सांगत नाही.. ती लगेच हाॅस्पिटलमध्ये जाते.. आता पुढे..

डाॅक्टरांनी अमरची गॅरेंटी देत नाही म्हटल्यावर मीरा खूपच रडू लागली.. तिला काका काकूंना कसे सांगायचे याचही टेन्शन आलेच होते.. ती थोडा वेळ खुर्चीत बसून राहिली.. नंतर थोडे बाजूला आल्यावर तिला श्रीगणेशाची मूर्ती दिसली..

देवाला नमस्कार करून ती मनोमन प्रार्थना करत होती.. "हे संकटमोचन विघ्नहर्ता.. तू सगळ्याचे संकट दूर करतोस ना.. मग माझ्याच आयुष्यात इतकी संकट का दिलीस.. मलाच का इतकं दुःख दिलंस.. जर इतकं दुःख आणि इतके संकट देणारच होतास तर मग मला जन्मालाच का घातलेस??

माझे दुःख तुला दिसत नाही का रे.. का मी तुझ्या भक्तीत कोठे कमी पडले.. असे रडत कुडत आयुष्य जगण्याचा कंटाळा आला आहे रे.. तू माझं आयुष्य अमरला दे आणि त्याला लवकर बर कर.." मीरा असे म्हणत देवाला जणू आळवतच असते.. थोडा वेळ तेथेच बसून ती परत ऑपरेशन थिएटरजवळ जाते..

अमरचे ऑपरेशन चालू असते.. बराच वेळ ऑपरेशन चालू असते.. मीरा बाहेर टेन्शनमध्ये असते.. कधी ऑपरेशन होईल याची वाट बघत असते.. बराच वेळ गेल्यानंतर डाॅक्टर येतात.. मीरा लगेच उठून उभी राहते..

"डाॅक्टर अमर कसा आहे आता??" मीरा

"ऑपरेशन सक्सेसफुल झालेल आहे.. पण आताच काही सांगता येणार नाही.. ते शुध्दीवर आल्याशिवाय काहीच सांगू शकत नाही.. तुम्ही एक काम करा.." डाॅक्टर

"काय डाॅक्टर.." मीरा

"त्यांच्या आईवडीलांना घेऊन या.. मला थोडं बोलायचं आहे.." डाॅक्टर

"डाॅक्टर काही घाबरण्याचे कारण नाही ना.." मीरा

"ते मी आताच सांगू शकत नाही.." डाॅक्टर

"डाॅक्टर अमरचे बाबा हार्ट पेशंट आहेत.. मग कसं सांगायच.." मीरा

"म्हणजे?? त्यांना अजून माहित नाही.." डाॅक्टर

"नाही.." मीरा

"ते आईवडील आहेत.. त्यांना माहीत असायला हव.. समजा जर काही झालं असत तर कोण जबाबदारी घेणार.." डाॅक्टर

"ते कसं सांगायच तेच कळेना.." मीरा

"त्यांना घेऊन या.. मी सांगतो.." डाॅक्टर

"बरं.." मीरा

मीराला आता थोडं बरं वाटलं.. ऑपरेशन यशस्वी झाले.. पण अमर कधी शुध्दीवर येणार हे माहित नाही.. मग ती डाॅक्टरांना सांगून घरी गेली.. घरी गेल्यावर

"कुठे होतीस बाळ इतका उशीर??" काकू

"सांगते काकू जरा थांबा.." मीरा

"अगं अमर पण अजून आला नाही.. इतका वेळ का बरं गेला असेल??" काकू

हे ऐकून मीराला रडूच येते.. पण ती लगेच सावरते.. काका काकू जेवले आहेत का ते बघते.. ते जेवलेले असतात.. मग ती त्यांच्या जवळ जाते..

"काका काकू आपल्याला दवाखान्यात जायचं आहे.." मीरा

"का ग.. कुणाला काय झालं आहे का??" काकू

"तुम्ही तिथे चला.. मग तुम्हाला सांगते.." मीरा

"पहिला सांग बाई.. उगीच मनाला हुरहूर लागून राहते ग.." काकू

"प्लीज काकू.. तिथे जाऊया ना.." मीरा

"बरं.. चला जाऊ.." काका

मग सगळे दवाखान्यात जातात.. डाॅक्टर अजून असतात.. परवानगी घेऊन सगळे आत जातात.. आत गेल्यावर डाॅक्टर त्यांना बसायला सांगतात..

"डाॅक्टर काय झालंय.. ही मीरा पण काही सांगत नाही.." काका

"हे बघा मी तुम्हाला सगळं सांगतो.. घाबरण्याचे काही कारण नाही.." डाॅक्टर

"हो.." काका

"तुमच्या मुलाचा ऍक्सिडेंट झाला आहे.." डाॅक्टर

"काय?? कधी??" काकू

"रिलॅक्स.. मी सांगतो.." डाॅक्टर

"आम्हाला आधी का सांगितले नाही.." काका

"हे बघा.. त्यांना डोक्याला खूप लागलं होतं.. ताबडतोब ऑपरेशनची आवश्यकता होती.. ऍक्सिडेंट केस म्हणून पोलिस कंम्लेन्ट करून मग ऑपरेशन करावं लागल.." डाॅक्टर

"काय?? इतकं सगळं झालं.." काकू तर रडूच लागल्या..

"हो.. तुमची होणारी सूनेन सगळं हिमतीने निभावल म्हणून.." डाॅक्टर

"मीरा.. आम्हाला सांगायच तर ग.." काकू

"बरं ऐका.. त्यांच्या डोक्याला खूप लागलंय.. त्यामुळे काही सांगता येणार नाही.." डाॅक्टर

"म्हणजे??" काका

"म्हणजे आधीच त्यांना आठवेल की नाही.. किंवा किती आठवेल.. थोडं आठवेल की सगळं काहीच माहिती नाही.. कदाचित तो तुम्हा सगळ्यांना विसरू शकतो.. किंवा सगळंही आठवू शकेल.. काहीच सांगता येणार नाही.. पण या सगळ्यात त्यांना तुमची साथ महत्वाची आहे.." डाॅक्टर

"किती दिवसांनी आठवेल डाॅक्टर.." काकू

"कधीच आठवणार नाही.. किंवा कदाचित आठवेलही मी काहीच सांगू शकत नाही.. पण तुम्ही मुद्दाम त्यांना आठवेल म्हणून प्रयत्न करायचे नाहीत.. मग ते कोमातही जाऊ शकतात.." डाॅक्टर

"काय?" काकू

"हो.. म्हणूनच त्यांना जपायला हव.." डाॅक्टर

"बरं.. आता आम्ही भेटू शकतो का??" मीरा

"नाही.. फक्त लांबूनच बघा.. त्यांना जेव्हा शुध्द येईल तेव्हाच भेटा.." डाॅक्टर

"बरं.." म्हणून सगळे अमरला लांबूनच बघतात.. काकू आणि मीरा त्याला बघून खूप रडतात.. काकांना पण अश्रू आवरता येत नाही..

बाहेर आल्यावर मीरा काका काकूंना घरी जायला सांगते आणि ती पोलिस स्टेशनला जाते.. तिथे त्या काका आणि प्रमोद विरूध्द कंम्लेन्ट नोंदवते..

दुसर्या दिवशी एका मैत्रिणीला सोबत घेऊन गावी जाते.. सगळे कागदपत्रे जमवून घेऊन शेती स्वतःच्या नावावर करण्यासाठी रजिस्टर ऑफिसमध्ये देते..

तिच्यात इतकं बळ कुठून येत काय माहित?? अमर सांगत होता तेव्हा ऐकले असते तर बरे झाले असते.. असे तिला सारखे वाटत होते.. आता सगळे अमर शुध्दीवर येण्याची वाट बघत होते.. देवाकडे प्रार्थना करत होते.. सगळेच टेन्शनमध्ये होते..

आज तिसरा दिवस अमर अजूनही शुध्दीवर आला नव्हता.. आता सगळ्यांना अधिकच काळजी वाटत होती.. काकूंनी तर सगळे देव पाण्यात ठेवते होते.. त्यांच्या डोळ्यातील पाणी थांबायला तयार नव्हते.. सारखे ओघळतच होते..

आता पुढे बघूया अमर शुध्दीवर येतो की नाही.. आणि आला तर त्याला काय काय आठवेल..

क्रमशः

यापुढील भाग आपण पुढच्या लेखात पाहू..

आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका..

🎭 Series Post

View all