कळत नकळत पर्व 2 भाग 8

Marathi love story

आपण मागील भागात पाहिले की अमर आणि मीरा अमरच्या ऑफिसला जातात.. तिथे सर अमरला ओरडतात.. मग मीरा आत जाऊन सरांशी बोलते.. अमरला प्रोजेक्टसाठी वेळ वाढवून मिळते.. नंतर त्या दोघांची मैत्री होते.. आता पुढे..

अमर मैत्रीचा हात पुढे केल्यावर मीराला खूप आनंद होतो.. तिला आता थोडी आशा वाटते की अमर तिचा होईल.. ती आनंदाच्या भरात लगेच अमरच्या हातात हात देते.. नंतर ते दोघे घरी येतात.. घरी आल्यावर मीरा आनंदाने ती गोष्ट काकूंना सांगते.. काकूंना पण खूप आनंद होतो..

"बघ मी तुला म्हणाले होते ना सगळं चांगलंच होणार.. ही तर सुरुवात आहे.. आता पुढे बघ.. तो तुझ्या प्रेमातही पडेल.." काकू

"त्या दिवसाची मी आतुरतेने वाट पाहत आहे.." मीरा

आता मीरा खूप खूश असते.. कारण अमरने मैत्रीचा हात पुढे केलेला असतो.. आता हळूहळू सगळं ठिक होईल ही आशा असते..

मीरा हाॅलमध्ये एकटीच बसलेली असते.. तिला बघून अमर तेथे येतो..

"हाय.. काय करत आहेस??" अमर

"पेपर वाचत आहे.. बोल ना.." मीरा

"मला तुझी थोडी मदत हवी आहे.." अमर

"बोल ना.. काय करू मी तुझ्यासाठी.." मीरा

"माझ्या प्रोजेक्टमध्ये मला मदत हवी आहे.." अमर

"अरे मग मला काय येतंय त्यातलं.. प्रोजेक्ट वगैरे जमत नाही बाबा मला.." मीरा

"मी सांगतो ना तुला काय करायचं ते.. तू फक्त तस करायच.. एकट्याने होतं नाही ग.. कारण माझा हात फ्रॅक्चर आहे ना.. प्लीज चल ना.." अमर

"बरं चल बघू तुझा प्रोजेक्ट आहे तरी कसा??" मीरा

ते दोघेजण प्रोजेक्ट करायला म्हणून रूममध्ये जातात.. तोच मीराला तेथे झुरळ दिसते.. ते बघून ती अमरला जाऊन बिलगते.. अमर काहीच जाणून न घेता तिचा हात झटकतो आणि तो लगेच बाजूला होतो.. तेव्हा मीराला खूप वाईट वाटते आणि ती तिच्या रूममध्ये जाते..

"हा स्वतःला समजतो तरी काय?? अस कुणी ढकलत का?? माझ्या मनाचा तरी विचार करायचा.."मीरा मनात विचार करत असते..

तेवढ्यात अमर येतो.. "साॅरी यार.. मी झुरळ बघितला नाही.. मला वाटल की तू.." अमर

"म्हणजे मी तुला तशी मुलगी वाटली.. कोण समजतोस तू स्वतःला.. मी इथे राहते.. मला कोण नाही म्हणजे मी काहीही करत असेन.." मीरा थोडी चिडून बोलते..

"अगं तस काही नाही.." अमर

"मग कसं?? सांग ना.. तुला काय म्हणायचंय.." मीरा

"तू झुरळला घाबरतेस.." असे म्हणून अमर हसू लागला..

"ए हसतोस काय?? वाटते मला भीती त्यात काय एवढं.."मीरा

"अगं पण ते झुरळ केवढ.. तू केवढी.. आणि त्याला तू घाबरतेस.." अमर तिला चिडवून म्हणाला..

"ए जा रे तू.. उगाच माझे डोकं खाऊ नकोस.." मीरा

"म्हणजे तुला डोकं आहे.." अमर

"आहे म्हणजे?? आहेच.." मीरा

"आहेच तर.. म्हणूनच तर तुला प्रोजेक्टसाठी बोलवत आहे.." अमर

"अच्छा.. म्हणून लाडीगोडी लावत आहेस होय तू.." मीरा

"तसं काही नाही.. मी तुला आधी पण बोलावलं होतंच की.." अमर

"जा आता.. कर जा तुझं तू.." मीरा

"अगं साॅरी म्हटलं ना तुला.. आता काय पाया पडू काय तुझं.." असे म्हणून अमर गुडघ्यावर बसतो..

"ए गप्प बस नौटंकी.. तुझी सगळी नाटकं मला माहित आहेत.." मीरा

"कस काय??" अमर आश्चर्याने विचारतो..

"अरे काकू म्हणत होत्या.." मीरा थोडी दबकतच म्हणाली..

"अच्छा.. चल आता जास्त भाव खाऊ नकोस.." अमर

दोघेही अमरच्या रूममध्ये जातात.. गेल्यावर अमर "बघ बाई आणि झुरळ यायचा.." असे हसत म्हणतो..

"जाऊ काय आता??" मीरा

"साॅरी साॅरी.." अमर

मग दोघे मिळून प्रोजेक्ट करू लागतात.. अमर तिला कसे करायचे ते सांगत असतो.. आणि मीरा त्याप्रमाणे करत असते.. मीराची एकग्रता पाहून अमर तिच्याकडे बघतच बसतो.. तिची काम करण्याची शैली त्याला खूप आवडते.. एखाद्या कामात स्वतःला कसे झोकून द्यायचं हे मीराकडून शिकावं.. अमर तिच्याकडे बघतोय हे मीराला समजले.. तिला खूप भारी वाटत होते..

थोड्या वेळाने ती "काय झालं.." म्हणून अमरला विचारते..

"काही नाही.." अमर

"मग असा का बघत आहेस.." मीरा

"तू किती मन लावून काम करतेस.. हे मला खूपच आवडलं.. कोणतही काम असो.. मन लावून केल्यावर ते छानच होतं.." अमर

"हमम.." मीरा

"एक विचारू.." अमर

"विचार ना.." मीरा

"तू ते मॅरेज अरेंजमेंटच काम का करत नाहीस.." अमर

"असंच.." मीरा

"हे काही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही.." अमर

"काही प्रश्नांची उत्तरे नसतात.." मीरा

"बरं.. मग आता परत सुरू कर ना.." अमर

"बघू.." मीरा

"माझ्या बाॅसच्या मुलीच लग्न चार दिवसांनी आहे.. ते करतेस का बघ??" अमर

"नाही बाबा.. पुढे बघूया.." मीरा

थोडा वेळ प्रोजेक्ट करून दोघेही जेवायला येतात.. मग अमर मीराच्या मॅरेज मॅनेजमेंटचं विषय काढतो..

"मीरा मला पण वाटतं की तू आता पुढे पाऊल टाकावं.. किती दिवस अशीच बसून राहणार आहेस.. तू काहीतरी करावं.." काका

"हो काका मी पण करणारच आहे.. पण थोडा वेळ जाऊ दे.." मीरा

"अजून किती थोडा वेळ.. असे करत बसलीस तर काहीच होणार नाही.." काका

"हो ना.. मी पण तेच म्हणतोय.. शुभश्च शिघ्रम.. माझ्या बाॅसच्या मुलीच लग्न आहे.. ते काम घे म्हणत आहे.. तर ही भावच खाते.." अमर

"बघते काका.. नंतर सांगते.." मीरा

आता मीरा काय निर्णय घेते ते पुढच्या लेखात पाहू..
क्रमशः

आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका..


🎭 Series Post

View all