जलद लेखन स्पर्धा जून 2025
कलाटणी
भाग -1
( ही कथा पूर्णतः काल्पनिक आहे. कुठे नामसाधर्म्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा.)

आतून पांढरे शर्ट पांढराच नेकबँड पण वरतून...? काळा कोट. वकीलाची ओळख.
काळ्या कोटाच्या आत शुभ्र धवल सत्य सहज दडवलं जाते. असा एक 'गैर'समज सर्वसामान्यांमध्ये पसरलेला.
प्रत्येक वेळी तसे नसेलही आणि प्रत्येक वकील तसा नसेलही पण... जनसामान्यांमध्ये साधारण हीच ओळख.हीच प्रतिमा.
म्हणून भल्याने वकीलाची पायरी चढू नये असे म्हणतात.
पण चढावी लागतेच.

पण ही ओळख शरयूने आपल्या बुद्धीचातुर्यासोबतच पारदर्शी व्यवहाराने खोटी ठरविली होती.
शरयू एक नामवंत वकील. एडवोकेट शरयू देशपांडे नुसतं नाव जरी घेतलं तरी भल्याभल्यांना घाम फुटत असे.
महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडायची, समस्या सोडवायच्या.त्यांच्या हक्कांसाठी लढायचं या वेडाने ती झपाटलेली होती.
तिच्याकडे जास्तीत जास्त केसेस महिलांच्याच असत. कौटुंबिक अत्याचार,मानसिक अत्याचार, हुंड्यासाठी छळ अशा एक ना अनेक समस्या. तिची ओळख महिलांसाठी लढणारी वकील अशीच झालेली होती.

त्याला कारणही तसेच होते.
अशातच तिच्या जीवनातला 'टर्निंग पॉईंट' आला.जो जीवनाला कलाटणी देवून गेला.
सायली, दिसायला अगदी सायलीच्या फुलासारखीच नाजूक.
संसाराची गोड स्वप्न उराशी जपलेली तरुणी. अगदी तारुण्यात प्रवेश आणि लग्न. पण लग्न झाले आणि सहा महिन्याच्या आतच तिच्या लक्षात आले आपण जे पाहिले ते स्वप्नच राहिले सत्यात उतरलेच नाही आणि उतरणारही नाही.
तिला हुंड्यासाठी छळले जात होते. सासूसासरे, ननंद तर छळ करतच होती पण नवरा ही त्यातलाच.
नवरा जर चांगला असेल तर स्त्री बाकी सगळ्यांचे अत्याचार सहन करून घेते पण इथे तर कुंपणच शेत खात होते.

सायली, एडवोकेट शरयूचे नाव ऐकून तिच्याकडे आली होती. तिच्या खूप अपेक्षा होत्या एडवोकेट शरयू कडून. केवळ अपेक्षाच नाही तर विश्वासही होता.
सायलीने नमस्कार केला आणि आपली केस पेपरची फाईल एडवोकेट शरयूच्या टेबलवर ठेवत तिने त्यांना मला न्याय मिळवून द्यावा अशी विनंती केली.
वकिलांनी फाईल हाती घेत त्यावरून नजर टाकली आणि...
त्या एकदम स्तब्ध झाल्या क्षणभर शून्यात नजर लावून विचार करू लागल्या.
पाच मिनिट विचार केल्यानंतर त्या सायलीला म्हणाल्या,

" मी ही केस लढणार. "
पण एडवोकेट शरयूला हे पूर्णपणे माहीत होते की आपण तिच्या बाजूने लढण्याचा निर्णय घेत तर आहोत पण विरोधी पक्ष आपल्याला सळो की पळो करून सोडेल. धमक्याही येतील.
सायली या तरुण मुलीची केस तुम्ही लढवू नका म्हणून आपल्यावर दबावही टाकला जाईल.
तरीपण सगळी कल्पना असताना सुद्धा एडवोकेट शरयू ने ही केस घेतली.
धमक्यांना भीक न घालता वेळ पडली तर आपल्याला आपलं स्वतःचं जीवनही पणाला लावण्याची वेळ येऊ शकते त्यासाठी तिने मनाची तयारी केली. आणि तिने जिद्दीने ही केस घेतली.
क्रमश:
बाकी पुढील भागात भाग-2 मध्ये
एडवोकेट शरयू क्षणभर स्तब्ध का झाली, शून्यात नजर का लावून बसली त्यांनी ही केस लढण्यासाठी का घेतली बघुयात पुढील भागात.
©®शरयू महाजन

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा