काळीज येंधळ हरलं... भाग : १
घराच्या अंगणात काही मुलं खेळत होती. चांगलाच डाव रंगला होता त्यांचा. बाजूलाच एका नवीन इमारतीच काम चालू होत. चांगलच मोठं मेन्शन उभारण्याचं काम चालू होत. बराच कच्चा माल खाली पडलेला होता.
चार पाच मुलं तरी होतीच. तिथे खेळण्यात चांगलीच रमली होती. पण एकजण असा होता. जो त्यांच्याबरोबर न खेळता बाहेरच व्हरांड्यात बसून कोणाकडे तरी एकटक बघत होता. नेहमीच होत त्याच. असा तर तो जास्त कोणाच्यात मिक्स होतच न्हवता. पण ती आली की चोरून चोरून तीला बघण्यासाठी तिच्या आसपासच घुटमळत राहायचा. आवडता छंदच होता जणू तो त्याचा. तीच ते निरागस रूप, तीच बोलणं, बोलता बोलताच मधेच हसणं, हसताना गालांवर पडणारी ती नाजूक खळी आणि सगळ्यांत सुंदर म्हणजे तिच्या पायांत असलेल्या घुंगराच्या पैंजणांचा आवाज. मधुर धूनच जणू त्याच्या कानावर पडत असावी अस वाटत होत त्याला. घायाळ झाल होत त्याच काळीज.

जेव्हा जेव्हा ती समोर असायची त्याला दुसरं कोणी दिसतच न्हवत. ती आणि फक्त तीच. नुकतच तरुण वयात पाऊल ठेवलेल त्याच मन अजून पण याच संभ्रमात होत की या भावनेला नाव काय द्याचं. आकर्षण की... प्रेम! प्रेम हा शब्द डोक्यात येताच त्याच्या काळजात नुसती धडधड धडधड सुरु व्हायची. एवढी की आपल काळीज बाहेर येतंय की काय अस वाटून जातं होत त्याला त्या वेळी. स्वतःच्या हृदयावर हात ठेवून तो आता पण तिच्याकडे बघतच वाढलेल्या हृदयाच्या ठोक्यांना आटोक्यात आणण्याचा निष्फळ प्रयत्न करत होता.
इकडे खेळता खेळता मात्र ती मुलगी कधी त्या बांधकामच्या ठिकाणी पोहचते हे तीच तीला पण कळत नाही. खेळण्याच्या नादात असलेले सगळे त्यांचं पण लक्ष तिच्याकडे जातं नाही. पण त्या मुलाच्या जसं लक्षात येत तसा तो पळतच तिच्याकडे धाव घेतो.
ती तिच्या नादात पुढे पळत होतीच की... मागून तिच्या हाताला जोरात हिसका बसतो तशी बेसावध ती खसकन मागे ओढली जाते. तिचा तोल जाऊन ती पडणारच होती की तो मुलगा गरकन तीला फिरवून तीला स्वतःच्या आड झाकून घेतो. आता ती खाली जमिनीवर तर तो तिच्या वर होता. पण दोघांमध्ये त्याने बरंच अंतरं ठेवलं होत. स्वतःच शरीर उचलून धरलं होत हाताच्या बळावर. ती दोघ खाली पडायला आणि वरून बांधकामचा माल खाली पडायला एकच टाइम होतो. तसा त्यातील थोडाफार माल त्या मुलाच्या पाठीवर पण पडतो. त्या माराने तो कळवळतो पण. पण तिच्या शरीराला मात्र साधं खरचटून पण देत नाही. ती मुलगी तर डोळे झाकून बसली होती. काय झाल तीला समजत पण नाही.
दुसऱ्या मिनिटाला ती हळूच डोळे उघडून समोर बघते तर तो तिच्या अंगावर होता. तशी ती घाबरून जाते. आणि तिच्या डोळ्यांत भीती बघून तो क्षणात तिच्यापासून बाजूला होतो.
" आह !!" उठताना हालचाल झाल्यामुळे पाठीत चांगल्याच वेदना जाणवत होत्या त्याला. पण त्याकडे दुर्लक्ष करत तो समोर बघतो. तर ती पण उठून स्वतःचा ड्रेस झाडत होती.
" डोक्यात काय दगड भरली आहेत का काय ग तू.? मंद. एवढा मोठा बोर्ड लावला आहे इथे डेंजर झोन म्हणून दिसत आहे नां.? तरी बोंबलत आलीये इकडे पळत. मूर्ख. !! आज काय झाल असत म्हणजे तुला. कधी मोठं होणार आहात तुम्ही सगळे. आठवी नववी दहावीला आहात आता. खेळायचं वय नाहीये हे. मूर्खासारखे लागोर खेळत आहेत." तिच्याकडे बघतच तो धाड धाड तिच्यावर शब्दांचा मारा सुरु करतो. आणि त्याच अस अचानक अंगावर येऊन ओरडण तीला काय सहन होत नाही. तशी ती रडतच आत निघून जाते. बाकी सगळे तीला अस रडताना बघून ते पण तिच्या मागे जातात.
" आई बाबा मला इथे थांबायचं नाहीये. आताच्या आता चला इथून." रडतच ती तिच्या आईवडीलांना बोलू लागते.
" काय झाल बाळा? तू रडत का आहेस एवढी." समोरच्या सोफ्यावर बसलेली एक महिला त्या मुलीला जवळ घेत बोलते.
" विचारा तुमच्या लाडक्या मुलाला. नेहमी सारखं आज पण मलाच ओरडला तो. काकी आई मी सांगून ठेवते. मी आता परत कधीच तुमच्या घरी येणार नाही. तुमची आठवण आली तर तुम्हाला आमच्या घरी बोलावून घेईन पण इथे येणार नाही. " एवढंच बोलून ती परत एकटीच बाहेर निघून जाते. दरातच तो मुलगा उभा राहिला होता पण ती मात्र त्याच्याकडे एक नजर बघत पण नाही. ती जशी त्याला क्रॉस करून जाते. तसा इकडे तो त्याचे डोळे घट्ट बंद करून घेतो.
" बेला अग झाल तरी काय ते तर सांग. थांब नां राजा !!" त्या मुलीची आई तीला आवाज देतच तिच्यामागे जाऊ लागते.
" आम्ही बघतो काय झाल ते खेळताना काहीतरी झाल असेल तुम्ही नका टेन्शन घेऊ. आणि हो उद्या भेटू मग आपण शोरूम मध्ये." तिचे वडील उठत बोलतात आणि ते पण तिच्या मागे निघून जातात.
***
सगळ चित्र जश्याच तस त्याच्या बंद डोळ्यांच्या पापण्यामागे फिरत राहत. पण ती जशी घरातून पाय टाकते हे दिसताच तो खाडकन जागा होतो.
***
सगळ चित्र जश्याच तस त्याच्या बंद डोळ्यांच्या पापण्यामागे फिरत राहत. पण ती जशी घरातून पाय टाकते हे दिसताच तो खाडकन जागा होतो.
" व्हाट्स रॉंग विथ यु यज्ञ? आज परत तेच स्वप्न. का बाहेर पडत नाहीये मी तिच्यातून. आज दहा वर्ष होऊन गेली त्या घटनेला त्यानंतर हार्डली एक दोन वेळा दिसली होती ती मला. पण त्यानंतर तर किती अंतर आलं होत आमच्यात. पण माझ्या मनात तिची जी जागा होती ती कधीच कोणी घेऊ शकलं नाही. " यज्ञ स्वतःशीच बोलत बाजूलाच टेबलवर ठेवलेल त्याच वॉच उचलतो आणि टाइम बघतो तर सकाळचे सहा वाजले होते. तस टाइम बघताच तो बेडवरून खाली उतरतो आणि पळतच बाहेर जातो.
एवढ्या सकाळी तर कोणीच उठलेलं न्हवत. पण हे साहेब मात्र त्यांच्याच नादात घराच्या बाहेर पडले होते. घराच्या गॅरेजमधून त्याची जुनी सायकल बाहेर काढून ती थोडी साफ करतो आणि तिथून निघून पण जातो. गेटवरचा वॉचमेन तर त्याच्याकडे बघतच राहतो.
***
प्रिकॅप :
***
प्रिकॅप :
यज्ञ एका पिलरच्या आड लपून नुकताच डोंगराच्या मागून वर डोकावून पाहणाऱ्या सूर्याच्या सोनेरी किरणांच्या उजेडात नाचत असलेल्या त्या मुलीकडे बघत होता. त्याच सगळं लक्ष फक्त तिच्या पायांकडे होत. गाण्याच्या तालावर थिरकणारे तिचे ते पाय आणि घुंगरांचा नाद बेधुंद करून जातं होता त्याला...
ती मात्र भान हरपून नाचत होती. नां जगाची फिकीर. नां वेळेच भान. फक्त ती आणि तिच्या घुंगरांची तीला असलेली साथ. तिच्याच धुंदीत ती बेधुंद होऊन नाचत होती.
***
नवीन स्टोरी आहे... आवडली तर नक्की कंमेंट आणि लाईक करा
प्लीज नेक्स्ट पार्ट उद्या येईल.
|| राम कृष्णा हरी ||
***
नवीन स्टोरी आहे... आवडली तर नक्की कंमेंट आणि लाईक करा
प्लीज नेक्स्ट पार्ट उद्या येईल.
|| राम कृष्णा हरी ||
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा