काळीज येंधळ हरलं... भाग : २
सकाळीच यज्ञ घराबाहेर पडला होता. एवढ्या सकाळी तर कोणीच उठलेलं न्हवत. पण हे साहेब मात्र त्यांच्याच नादात घराच्या बाहेर पडले होते. घराच्या गॅरेजमधून त्याची जुनी सायकल बाहेर काढून ती थोडी साफ करतो आणि तिथून निघून पण जातो. गेटवरचा वॉचमेन तर त्याच्याकडे बघतच राहतो. बघता बघता यज्ञ दिसेनासा पण होतो.
सकाळीच यज्ञ घराबाहेर पडला होता. एवढ्या सकाळी तर कोणीच उठलेलं न्हवत. पण हे साहेब मात्र त्यांच्याच नादात घराच्या बाहेर पडले होते. घराच्या गॅरेजमधून त्याची जुनी सायकल बाहेर काढून ती थोडी साफ करतो आणि तिथून निघून पण जातो. गेटवरचा वॉचमेन तर त्याच्याकडे बघतच राहतो. बघता बघता यज्ञ दिसेनासा पण होतो.
जवळ जवळ अर्धा तास सायकल चालवून तो एका मंदिराच्या ठिकाणी पोहचला होता. सायकल तशीच टाकून तो पळतच मंदिराच्या मागच्या बाजूला जातो. तिथेच बाजूला काही मुली डान्सची प्रॅक्टिस करत होत्या. तिथेच मंदिराच्या आड लपून तो सगळ्यांवर नजर टाकतो. पण त्याला जो चेहरा बघण्याची आस लागली होती तो चेहरा काय त्याच्या नजरेस पडत नाही. तसा त्याचा थोडा हिरमोडाच होता.
" ही गेली की काय येऊन? पण ती तर याच टाइमला रियाज करायला यायची इथे. आता येत नाही का इथे? दुसरीकडे गेली का कुठे.? " मनातच विचार करून तो नाराज होतो. ती दिसणार नाही हा विचार करूनच काळीज जणू बंद पडतय का काय अस वाटत होत त्याला. कपाळावर असंख्य आठ्या पडल्या होत्या. चिडचिड होऊ लागली होती त्याची.
एकतर काल शहरात परत आल्यापासून तीला एक नजर बघण्याची ओढ त्याला शांत बसू देत न्हवती. कसा बसा मनाला आवर घातला होता त्याने रात्रभर. पण आता पण पदरी निराशाच होती बहुतेक त्याच्या. पडलेला चेहरा आणि नाराज मन घेऊन तो परत जायला वळलाच होता की अचानक त्याच्या कानावर ओळखीचा आवाज पडतो. क्षणभरासाठी तो स्तब्धच होऊन जातो आवाज ऐकून.
एवढा वेळ त्याच्या काळजात लागलेली आग क्षणात शांत झाली होती नुसता तिचा आवाज ऐकून. तिचा आवाज कानांवर पडताच आपोआप त्याचे डोळे बंद होतात. आणि ओठांवर हलक हसू पसरत. हळूच मान वळवून तो मागे बघतो तर बघतच राहतो. अल्लड वयात उमगलेलं त्याच प्रेम आज एवढ्या वर्षांनी त्याच्या समोर आलं होत. पण आजही त्याची हालत तशीच झाली होती जशी दहा वर्षांपूर्वी होत होती.
श्वास घेणं विसरून गेला होता तो तीला बघण्याच्या नादात. आजही सगळ्या जगाला विसरून फक्त ती आणि तीच दिसत होती त्याला. बाकी सगळं जग धूसर झाल होत त्याच्यासाठी.
ती मात्र तिच्याच नादात तिच्या सखीबरोबर गप्पा मारत रियाज करण्यासाठी तयार होत होती. पायांत घुंगरू बांधून तिने तिचा ठेका धरला. आणि थिरकायला लागले तिचे पाय. काय सुंदर दृश्य होत हे त्याच्यासाठी. सूर्याच्या त्या सोनेरी किरणामध्ये तीच सौंदर्य अधिकच तेजस्वी दिसत होत. आणि त्यात कहर म्हणजे तीच नाचण. सोने पे सुहागा था! त्याच्यासाठी.
तिच्याकडे बघता बघता यज्ञ एका पिलरच्या आड लपून नुकताच डोंगराच्या मागून वर डोकावून पाहणाऱ्या सूर्याच्या सोनेरी किरणांच्या उजेडात नाचत असलेल्या त्या मुलीकडे बघत होता. त्याच सगळं लक्ष फक्त तिच्या पायांकडे होत. गाण्याच्या तालावर थिरकणारे तिचे ते पाय आणि घुंगरांचा नाद बेधुंद करून जातं होता त्याला. एक मिनिट सुद्धा त्याची नजर तिच्या पायांवरून हटली न्हवती.
" लोग केहते है... हम हमारे प्यारे शक्स के चेंहरे में हमारी दुनिया ढुंडते है!!
हम तो उनके पैरोंतले अपना दिल हार बैठे है !!"
तिच्याकडे बघता बघता सहज यज्ञ बोलून जातो. नाचताना हवेत उडणारे तिचे ते काळे भोर केस. गालांवर उमटलेलं हलकस हसू. आणि त्यात ती पडणारी खळी. शिवाय तिच्या त्या मोहक अदा. काळजाच नुसतं पाणी पाणी झाल होत त्याच्या.
हम तो उनके पैरोंतले अपना दिल हार बैठे है !!"
तिच्याकडे बघता बघता सहज यज्ञ बोलून जातो. नाचताना हवेत उडणारे तिचे ते काळे भोर केस. गालांवर उमटलेलं हलकस हसू. आणि त्यात ती पडणारी खळी. शिवाय तिच्या त्या मोहक अदा. काळजाच नुसतं पाणी पाणी झाल होत त्याच्या.
ती मात्र भान हरपून नाचत होती. नां जगाची फिकीर. नां वेळेच भान. फक्त ती आणि तिच्या घुंगरांची तीला असलेली साथ. तिच्याच धुंदीत ती बेधुंद होऊन नाचत होती.
आता बराच वेळ झाला होता ती नाचत होती. तस थकून ती आता बास करणार की अचानक तीला कोणीतरी आपल्याकडेच बघतंय अस वाटून जातं. दूरवर नजर फिरवत ती बघते पण तीला कोणीच दिसत नाही.
तर इकडे यज्ञ त्या पिलरच्या मागे लपून बसला होता. त्याला जेव्हा समजल की ती आपल्याला बघणार तसा तो लगेच मागे झाला होता.
" बेला काय ग काय झाल? काय बघतीयेस तिकडे.? " त्रिशा तिची जिवलग मैत्रीण तीला विचारते.
" त्रिशा मला अस वाटलं की कोणीतरी आपल्याला बघत होत. पण आता बघतीये तर कोणीच नाहीये ग. " बेला अजून पण त्याच दिशेला बघत होती.
" अग तुला भास झाला असेल. कोणी नाहीये एवढ्या सकाळी कोण येणार आहे इथे. अजून तर पंडितजी पण आले नाहीयेत. चल उशीर होतोय आज काय जायचं नाहीये का कॉलेजला मॅडम." त्रिशा बोलतच तीला ओढत घेऊन जाते. ती निघून जाताच इकडे यज्ञ सुटकेचा श्वास घेतो.
***
डायनिंग टेबल वर सगळी देसाई फॅमिली जमली होती. सगळेजण मज्जा मस्ती करत नाश्ता करत होते. तेच पायऱ्यांवरून यज्ञ रेडी होऊन खाली येतो. त्याला एकदम सुटबूट मध्ये बघून सगळे त्याच्याकडे बघतच बसतात.
***
डायनिंग टेबल वर सगळी देसाई फॅमिली जमली होती. सगळेजण मज्जा मस्ती करत नाश्ता करत होते. तेच पायऱ्यांवरून यज्ञ रेडी होऊन खाली येतो. त्याला एकदम सुटबूट मध्ये बघून सगळे त्याच्याकडे बघतच बसतात.
'टक टक... टक टक ' बुटांचा आवाज करत यज्ञ डायनिंग एरियामध्ये येतो. सगळ्यांची आपल्यावर खिळलेली नजर बघून तो साफ सगळ्यांकडे दुर्लक्ष करतो आणि नाश्ता करायला बसतो.
" मोठी काकी काय बनवलं आहेस आज नाश्त्याला. लवकर दे जाम भूक लागली आहे." तो बोलतो तसे सगळे एकमेकांकडे बघू लागतात. यज्ञची आई हळूच त्याच्या वडिलांकडे बघतात. त्यांचा इशारा समजून ते पण डोळ्यांनीच त्यांना विचारतो म्हणून खुणावतात.
" यज्ञ... अरे सकाळी सकाळी तयार झालास कुठे बाहेर निघाला आहेस का.? " गौरव ( यज्ञचे वडील ) बोलतात.
" बाहेर नाही निघालो कुठे बाबा. मी पण तुमच्याबरोबर शोरूमला येणार आहे. आणि नंतर साईट वर पण जाऊन येईल अंश बरोबर. चालेल नां अंश." तो समोरचा चहाचा कप उचलतच बोलतो.
" यज्ञ अरे कालच आला आहेस नां आज आराम कर की लगेच काय काम सुरु करतो. " अक्षय ( यज्ञचे काका ) बोलतात.
" आराम हराम असतो काकाश्री!! आणि मला कुठे दुसरिकडे जायचं आहे. आपल्याच शोरूमला येत आहे. घरी बसून बोर होऊन जाईन दिवसभर. " चहाचा एक घोट घेत तो बोलतो. आणि हलक हसत नाश्ता करू लागतो.
" अरे पण यज्ञ..." स्मिता ( यज्ञची आई ) काही बोलणार की यज्ञ त्यांचं बोलणं मधेच तोडत बोलू लागतो.
" आई लवकर घरी येतो मी. पण प्लीज घरी थांबवून घेऊ नको खरंच खूप कंटाळा येईल मला." तो असे बारीक डोळे करून बोलतो की त्याच्या आईला पुढे काही बोलताच येत नाही.
सगळ्यांचा नाश्ता होतो तसे सगळे आपल्या आपल्या कामाला निघून जातात. यज्ञ आणि अंश आज एकाच गाडीत जाणार होते. यज्ञ ड्रायविंग करत असतो तर अंश त्याच्या बाजूच्या सीटवर बसलेला असतो.
" मग... काय काय केल साहेब यूएस ला राहून. पोरी फिरवल्या की नाही.?" अंश मस्करीत यज्ञला विचारू लागतो.
" तिथे मी पोरी फिरवायला नाही स्टडी साठी गेलो होतो." यज्ञच रेकलं उत्तर येत. तसा आतापर्यंत हसणारा अंश क्षणात त्याचा चेहरा निर्विकार होतो.
"काय राव तू? खूपच बोर आहेस बाबा. तुझ्याशी नां बोलणंच बेकार आहे राव." अंश चिडून बोलतो.
" मग नको बोलू. शांत बस." यज्ञ परत त्याला गप्प करतो तसा अंश पण आता तोंड फुगवून बाहेर बघू लागतो. अवघ्या काहीच मिनिटांत ते शोरूमला पोहचतात.
यज्ञ आज अंशच्या केबिन मध्येच बसला होता. आल्यापासून त्याने पूर्ण शोरूम फिरून काढला होता. एका एका डिपार्टमेंट मध्ये जाऊन डेटा कलेक्ट केला होता. आता पण लंच ब्रेक मध्ये अंशला कॉफ़ी आणायला सांगून स्वतः काम करत बसला होता.
तो त्याच्या कामात व्यस्त झालाच होता की धाडकन केबिनचा दरवाजा उघडून कोणतरी आत येत.
" अंश किती फोन करायचे रे तुला..." बोलतच ती मुलगी समोर बघते तर अंशच्या खुर्चीवर कोणीतरी दुसरंच बसलं होत. तस समोर अंश खुर्चीवर बसलेला यज्ञ पण समोर बेलाला बघून स्तब्ध होऊन जातो. आता तो एकटक तिच्याकडे बघत होता. तर ती पण त्याच्याकडेच बघत होती.
तेच तिच्या मागोमाग अंश हातात कॉफी घेऊन केबिनचा दरवाजा उघडून आत येतो. समोर बेलाला बघून तो तिच्याशी बोलू.
" अरे बेला तू कधी आली. ये कॉफी घे. " अंशचा आवाज कानांवर पडताच दोघे पण भानावर येतात. यज्ञ इकडे तिकडे बघत परत चेअरवर बसतो तर बेला आता अंशकडे वळते.
" आताच आले. पण तुझ्या केबिनमध्ये हे बसले होते. ते जाऊ दे तू मला सांग आज संध्याकाळी तू येणार आहेस ना. येनवेळेला माघार घेतलीस तर माझ्यासारखं वाईट कोणी नाही." बेला त्याच्याकडे बोट दाखवत बोलते.
" हो ग अंबाबाई. येणार आहे मी. पण प्लॅनिंग काय आहे. आणि तिथेच भेटायचं आहे जिथे दरवेळेस आपण भेटतो." अंश बोलतो.
" हो सगळे तिथेच येणार आहेत. तू पण वेळेवर ये प्लीज." ती हात जोडत त्याला बोलते. तसा अंश पण गालात हसतो.
" चल मी निघते...बाय खूप तयारी करायची बाकी आहे अजून."बोलतच ती बाहेर निघून पण जाते.
" अरे एक मिनिट. ऐक तरी हा यज्ञ..." अंश तीला आवाज देत यज्ञची आठवण करून देणार पण तोपर्यंत बेला मॅडमची गाडी सुसाट सुटली पण होती. आणि एवढ्या वेळचा एकटक तिच्याकडे पाहणारा यज्ञ मात्र तिच्या धूसर होत असलेल्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत डोळे घट्ट बंद करून घेतो.
एक तो होता जो तिच्यासाठी तडफडत होता... आणि तीला मात्र या गोष्टीचा काडीमात्र फरक पडत न्हवता. तो आहे काय? आणि नाही काय.?
***
नवीनच स्टोरी आहे... प्लीज आवडत असल्यास कंमेंट करून नक्की सांगा. आणि लाईक करायला विसरू नका... आणि हो मी पण या प्लॅटफॉर्मवर नवीनच आहे तर थोडं समजून घ्या.
***
नवीनच स्टोरी आहे... प्लीज आवडत असल्यास कंमेंट करून नक्की सांगा. आणि लाईक करायला विसरू नका... आणि हो मी पण या प्लॅटफॉर्मवर नवीनच आहे तर थोडं समजून घ्या.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा