काळीज येंधळ हरलं... भाग : ३
मागच्या भागात...
" अरे एक मिनिट. ऐक तरी हा यज्ञ..." अंश तीला आवाज देत यज्ञची आठवण करून देणार पण तोपर्यंत बेला मॅडमची गाडी सुसाट सुटली पण होती. आणि एवढ्या वेळचा एकटक तिच्याकडे पाहणारा यज्ञ मात्र तिच्या धूसर होत असलेल्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत डोळे घट्ट बंद करून घेतो.
एक तो होता जो तिच्यासाठी तडफडत होता... आणि तीला मात्र या गोष्टीचा काडीमात्र फरक पडत न्हवता. तो आहे काय? आणि नाही काय.?
आता पुढे...
बेला तर केबिनमधून निघून जाते. पण यज्ञ मात्र अजून पण ती गेली त्या दिशेनेच बघत होता. अंश मागे वळून त्यांच्याकडे बघतो आणि बोलू लागतो.
" तू ओळखलं का हिला ? ही रघु काकांची बेला... तुझ्याबरोबर नेहमी भांडायची नां तीच..." अंश यज्ञ च्या समोरच्या खुर्चीवर बसत बोलतो.
" हम्म... तीला कस विसरू शकतो मी...तीला विसरणं म्हणजे श्वासांशी वैर करून घेणं आहे माझ्यासाठी." यज्ञ तोंडातल्या तोंडात पुटपुटतो. जे समोर बसलेल्या अंशला काहीच समजत नाही.
" काय बोललास.? " न समजून अंश त्याला परत विचारतो.
"अ.. हा ओळखलं मी तीला... ही तुफान एक्सप्रेस आजून आहे तशीच आहे का.? पटरीवर लागायच्या आधीच सुसाट धावत सुटते. कधी मोठं होणार आहात तुम्ही लोक देव जाणे. आणि आज काय धुमाकूळ घालणार आहात. " स्वतःला सावरत यज्ञ अंशबरोबर बोलू लागतो.
" काही नाही रे... ते नेहमीचंच. आज शनिवार नां... रात्री सगळे मिळून टेकडीवर भेटतो आम्ही. फुल्ल धिंगाणा. ये यावेळेस तू जॉईन हो नां आम्हाला. जाम मज्जा येईल." अंश सांगतो. सांगताना त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद काही औरच होता. का नसावा आठवड्याभराचा सगळा थकवा या एका रात्रीत नाहीसा झाल्यासारखं असायचा त्यांच्यासाठी. किती मस्ती करायचे सगळे. आणि त्यात बेला मॅडमचा खारीचा वाटा असायचा. जादूची छडी होती ती सगळ्यांची.
" बघू! मला काम आहे खूप. जमलं तर येईन." यज्ञ आणि अंश बोलतच होते की केबिनचा दरवाजा परत नॉक होतो. समोर समीर असतो.
" मे आय कम ईन सर." तो आत येण्याअगोदर परमिशन घेतो.
" अरे समीर ये नां ये." अंश बोलतो तसा समीर आतमध्ये येतो.
" सर ते गाडी तयार आहे... साईटवर जायचं होत नां." तो बोलतो तस यज्ञ पण हो मध्ये मान हलवतो. आणि हातातील कॉफी कप खाली ठेवत तो पण उठून उभा राहतो.
" गुड... देन लेट्स गो.!!" बोलतच तो बाहेरच्या दिशेने जाऊ लागतो.
" यज्ञ एक काम कर नां... तू जाऊन ये. समीर येईल तुझ्याबरोबर मला जरा इम्पॉर्टन्ट काम आहे. आपण घरी भेटू ठीक आहे." अंश बोलतो तस यज्ञ पण हो मध्ये मान हलवून निघून जातो.
*****
साईटवर यज्ञ आणि समिरची चांगलीच ओळख होते. यज्ञ अगदी नॉर्मल होऊन त्याच्याशी बोलत होता. त्यामुळे समीर पण खूप कॉमफॉर्टेबल फील करत होता त्याच्याबरोबर.
असच साईटवर फिरत असताना अचानक समीरचा फोन वाजतो. खिशातून फोन काढून तो रिसिव्ह करतो. तस त्याला काही बोलू न देता समोरची व्यक्ती सगळं बोलून फोन ठेवून पण देते. तसा समीर पण बंद झालेल्या फोनकडे हसत बघू लागतो.
साईटवर यज्ञ आणि समिरची चांगलीच ओळख होते. यज्ञ अगदी नॉर्मल होऊन त्याच्याशी बोलत होता. त्यामुळे समीर पण खूप कॉमफॉर्टेबल फील करत होता त्याच्याबरोबर.
असच साईटवर फिरत असताना अचानक समीरचा फोन वाजतो. खिशातून फोन काढून तो रिसिव्ह करतो. तस त्याला काही बोलू न देता समोरची व्यक्ती सगळं बोलून फोन ठेवून पण देते. तसा समीर पण बंद झालेल्या फोनकडे हसत बघू लागतो.
" या बेला मॅडम पण नां.... कहर आहेत कहर.!!" समीर हसतच बोलतो. तेच यज्ञ त्याच्याजवळ येऊन उभा राहतो. आणि त्याला अस हसताना बघून तो त्याच्याशी बोलू लागतो.
" काय रे! कोणाचा फोन होता जे तू एवढा हसत आहेस.?" यज्ञ विचारतो तस भावनेच्या भरात समीर पण पटकन बेलाच नाव घेऊन मोकळा होता. पण तीच नाव ऐकताच पुढे पडत असलेली यज्ञची पावलं जागीच थांबतात. जे समीरच्या बरोबर लक्षात येत.
" काय झाल सर... " समीर यज्ञ जवळ येत त्याला विचारतो... बेलाच नाव निघताच एक वेगळीच चमक उठून दिसत होती यज्ञ च्या डोळ्यांत. आणि कसली चमक आहे हे न कळण्याइतपत तर समीर मूर्ख न्हवता.
" काही नाही... लेट्स गो... घरी जायला उशीर होतोय. निघू या आपण." यज्ञ बोलतो आणि दोन्ही पँटच्या खिश्यात हात टाकत चालू लागतो. तस इकडे समीरच्या चेहऱ्यावर हसू पसरत.
" ओके बॉस..." बोलतच समीर यज्ञच्या मागे पळतच जातो.
****
रात्री ठरल्याप्रमाणे सगळेजण टेकडीवर भेटले होते. यात आज नवीन म्हणजे यज्ञ पण सामील झाला होता. तो इथे पण फक्त बेलाला लांबून बघता येईल म्हणूनच आला होता. आणि तो करत पण तेच होता. जवळ जवळ पाच सहा जण होते ते. सगळे खेळत होते एक यज्ञ मात्र त्यांच्यापासून लांब बसला होता. कोणाला कळू किंव्हा न कळू पण समीरच्या त्याच्या मनातील बेला साठी असलेल्या भावना त्याला बरोबर समजल्या होत्या.
यज्ञच बेलाकडे बघणं चालूच होत. अधून मधून तीच ऑन लक्ष जायचं त्याच्याकडे. पण तिने बघताचक्षणी यज्ञ त्याची नजर फिरवून घ्यायचा. तीला हे थोडं खटाकायचं. एव्हाना त्यांची ओळख पण पटली होती तीला. तो यज्ञ आहे हे तिने दुपारीच केबिनमध्ये गेली तेव्हा ओळखलं होत. पण त्याला अस अचानक समोर बघून तीला पण खूप मोठा आश्चर्यचा धक्का बसला होता.त्यावेळेला तीला त्याच्याशी काय बोलाव हेच सुचलं न्हवत. म्हणून ती तिथून त्याच्याशी काही न बोलता निघून गेली होती.
****
प्रिकॅप
समोर सोफ्यावरच बसलेल्या सगळ्यांना आनंदात बघून यज्ञ त्यांच्याजवळ जातो... सगळे अगदी आनंदात एकमेकांना मिठाई भरवत होते... तेच त्यांच्या कानावर यज्ञ चा आवाज पडतो.
" आई... काय झालंय... मिठाई कशासाठी भरवताय एकमेकांना." समोर येत सगळ्यांकडे बघत बोलतो. तसे सगळे त्याच्याकडे बघू.
" आनंदाचीच गोष्ट आहे यज्ञ... तुझ्या अंश दादाच लग्न ठरलं आहे. याचाच आनंद साजरा करतोय आम्ही सगळे." कुमोद (अंशची आई.) यज्ञ च्या जवळ येत त्याला पण एक पेढा भरवते.
****
प्लीज कंमेंट करून सांगा स्टोरी कशी वाटली ते... तुमच्या कंमेंट ची आतुरतेने वाट पाहत आहे मी.. धन्यवाद
राम कृष्णा हरी मंडळी.
*****
प्लीज कंमेंट करून सांगा स्टोरी कशी वाटली ते... तुमच्या कंमेंट ची आतुरतेने वाट पाहत आहे मी.. धन्यवाद
राम कृष्णा हरी मंडळी.
*****
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा