कल्की - एक अनावृत रहस्य ( भाग ३)

भगवान कल्की यांच्या प्रकटीकरणाचे रहस्य

मोबाईलची रिंग वाजताच निरंजनने कॉल रिसिव्ह केला.

“ हॅलो…हो निघालोच.”निरंजन

“ काय हे? निघालास?”आई

“ आई,संशोधन माझा आत्मा आहे.त्यामुळे काम आलं की ते निष्ठेने फत्ते केल्यावरच मला समाधान मिळते.” निरंजन

“ हो रे बाळा.रामसुद्धा वडीलधाऱ्यांचे ऐकून मोठ्या निष्ठेने वनवासाला निघाला होता.”आई

( मनातल्या मनात ,’आईचा ईश्वराचा फिवर पिक पॉइंटला आहे.’)“ बरं आई,येतो मी..”निरंजन

_____________

( ऑफिसमध्ये)

“ हॅलो निरंजन..”

“ हॅलो वर्मा सर..”

“ वुई आर हेडिंग यू टू टेक चार्ज ॲज अ प्रोजेक्ट हेड फॉर फाइंडिंग कल्की.”वर्मा सर

“ कल्की?”निरंजन

“ येस.”

“कल्की,म्हणजे भगवान विष्णूचा अंश असलेला,दहावा दैवी अवतार.”

“ आय सी..”

“ येस.देन गो फॉर इट..”

“ ओके सर..”
(मनातल्या मनात,’यांना मीच सापडलो का यासाठी?’)

“ निरंजन आय कॅन रिड युवर माईंड. मला माहित आहे की इतर विषय असणारे संशोधन करण्यात तुला जास्त इंटरेस्ट आहे पण ही एक मोठी संधी आहे तुझ्यासाठी..”

“ ती कशी?’

“ पुरातन संस्कृतींचा,पौराणिक इतिहासाचा अभ्यास कर,मागोवा घे अन् मिशन फत्ते कर.तुला हळूहळू समजेल सगळं.तू हे सगळं छान पार पाडशील,असा मला विश्वास आहे.म्हणून गेट रेडी फॉर अ न्यू थ्रीलिंग एक्सपेयरीन्स!”

“ ओह येस सर अँड थॅन्क्स फॉर ट्रस्टींग मी..”

“ ओके.रेडी फॉर द धमाका ?”

“येस सर..”

वर्मा सर निघून गेले.

“ निरंजन सर, वर्मा सरांनी धमाका, थ्रीलिंग एक्सपेयरीन्स असे शब्द का वापरले असतील?” सचिन

“ ए सचिन,असं काहीही नाही बरं! मी फक्त कल्कीला लवकरात लवकर शोधून काढावं असं त्यांना वाटतं म्हणून असं बोलले ते.त्यात काय एवढं? तुला तर माहीतच आहे की मी कशालाही घाबरत नाही.”निरंजन

“ मी तर तुमचा असिस्टंट आहे सर.आय नो यू..”

“ हो ना,मग मला आताच्या आता सगळे डिटेल्स दे.”

“ येस सर.”

सचिनने कल्कीशी संबंधित सारे डिटेल्स असणारी पुस्तके निरंजनसमोर मांडली.

“सर,ही काही पुस्तकं आहेत ज्यात कल्कीशी संबंधित माहिती आहेत.”

“ ओके.बघत काय बसलास? वाचून दाखवण्याचे उपकार करशील?”

सचिनने मोठ्या उत्साहात वाचायला सुरुवात केली.

“ या कलियुगात पाप वाढीस लागल्यावर ,सर्वत्र नीतिमत्ता ढासळत असताना,अधर्म पसरला असताना,सुयोग्य धर्माचे पालन करण्यासाठी
कल्की अवतार जन्म घेईल.”

“घ्या! मला तर वर्मा सरांनी त्याचा शोध घ्यायला लावलं आहे..बरं,आणखी काय आहे पुढे?”निरंजन

“हिंदू धर्माच्या ग्रंथात कल्की अवतार संबंधित श्लोकाचा उल्लेख आहे, ज्यामध्ये असे दिसून येते की कलियुगात देवाचा कल्की अवतार केव्हा आणि कोठे असेल तसेच त्याचे वडील कोण असतील..

ऐका,

सम्भल ग्राम मुख्यस्य ब्राह्मणास्यमहात्मन।
भगवनविष्णुयशसः कल्कि प्रादुर्भाविष्यति।।

अर्थात, भगवान कल्की यांचा जन्म संभळ गावात विष्णूयश नावाच्या एका श्रेष्ठ ब्राह्मणाच्या मुलाच्या रुपात होईल. देवदत्त नावाच्या घोड्यावर ते तलवारीने दुष्टांचा नाश करतील, तेव्हाच सत्ययुग प्रारंभ होईल. भगवान विष्णूचा कल्की अवतार मिस्सकलंक अवतार म्हणूनही ओळखला जाईल. या अवतारात, त्यांच्या आईचे नाव सुमती असेल. याव्यतिरिक्त त्यांना तीन मोठे भाऊही असतील. ते सुमंत, प्राज्ञ आणि कवि म्हणून ओळखले जातील. यज्ञवल्क्य हे पुजारी आणि भगवान परशुराम हे त्यांचे गुरु असतील. भगवान कल्की यांच्या लक्ष्मीरुपी पद्मा आणि वैष्णवीरुपी रमा अशा दोन पत्नी असतील. त्यांची मुले जय, विजय, मेघमाल आणि बलाहक असतील.”

“ त्यांची वंशावळ तर समजली.बरं..एक मिनिट आधी तू काय म्हणालास? या कलियुगात पाप वाढीस लागल्यावर कल्की भगवान प्रगट होतील?”

“ हो..”

“ आपण कलियुगात राहतोय राईट?”

“ हो.”

“ हे कधी संपणार?”

“ सर,यातील कालखडांच्या माहितीनुसार आपल्याकडे खूप कमी वेळ आहे.आता कलियुग लवकरच संपणार आहे.”

“ म्हणजे हे संपायच्या आत संभळ या गावात जाऊन
चौकशी करायला हवी.”

“ ह्मम..”

तेवढ्यात बाहेर कसलातरी आवाज आला.
निरंजनच्या ऑफिसच्या खिडकीला कोणीतरी दगड मारला.

“ कोण आहे रे?”निरंजन

निरंजन धावतच उठला.त्याच क्षणी दुसरा एक दगड त्या फुटलेल्या काचेतून थेट निरंजनच्या कपाळावर आदळला.

निरंजन जागीच कोसळला.सचिनने त्याच्या तोंडावर पाणी मारले. त्याला जाग आली.तो उठण्याचा प्रयत्न करू लागला.

“ सर,सांभाळून..” सचिन आधार देत म्हणाला.

“ ह..”

सचिनने निरंजनच्या जखमेवर मलम लावले आणि पट्टी बांधली.त्यामुळे निरंजनला जरा बरे वाटले.

“ मला वाटतं सर,आपल्याला पावलोपावली सावध राहावे लागणार!”सचिन

“ झालं तुझं सुरू?”निरंजन

“ ओके.शांत बसतो मी..”सचिन

बराच वेळ गेल्यानंतर..

“ सर,कल्की भगवानसंबंधी बरीच माहिती तर आपण मिळवली पण यात एक वेगळीच व्यक्ती मला जास्त धोकादायकरित्या परिचित झाली.ती म्हणजे काली राक्षस.”सचिन

“ ह्म.. आपल्या स्टडीनुसार,हा काली राक्षस अधर्माचा
प्रचार करून लोकांना दुर्बुद्धी देईल आणि त्यामुळे सर्वत्र अधर्म पसरेल.बरोबर?”निरंजन

“ होय.”सचिन

“ हा आणखी एक! “निरंजन

“ काय?”सचिन

“ कल्की आणि काली राक्षस यांच्या धर्म आणि अधर्मच्या लढाईत ते आठ चिरंजीव काय रोल प्ले करणार आहेत हे एकदा बघायला हवं.”निरंजन

“ येस सर.करेक्ट! यू आर मास्टर माईंड..”सचिन

“ चल नखरे नको.आता कामाची वेळ संपली.उद्या लवकर माझ्या घरी ये.पुढचा तपास लवकर करावा लागेल कारण कदाचित हा अधर्माचा हलकल्लोळ सुरू देखील झालेला असावा..”निरंजन

निरंजन घरी जायला निघाला.जाताना त्याला अनेक विचित्र संकटे दिसली.तिकडे तो जाणार तेवढ्यात त्याला आईचा फोन आला आणि तो तसाच
घरी गेला.

खरंच अधर्म पसरला होता? कलियुगातील हलकल्लोळ सुरू झालेला होता? कोण आहे हा काली राक्षस?

क्रमशः

©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे


🎭 Series Post

View all