कल्की
भाग:२
दुपारी कॉलेज सुटल्यानंतर रमा कॉलेजच्या पायऱ्या उतरत होती. तेव्हाच निशांतने तिची वाट अडवली. त्याच्याबरोबर महेश सुद्धा होता.
"ए हिरोईन, तुझ्या बाबाबद्दल ऐकले. ऐकून खूप वाईट वाटले. नेहमी यायचा ना तुला घरी न्यायला. पण तू घाबरु नकोस हं. माझ्याबरोबर ये, मी सोडतो तुला घरी." निशांतने मस्करी करत म्हटले.
" काही गरज नाही." रमाने त्याच्याकडे न पाहताच उत्तर दिले.
" काही गरज नाही? तुझ्या सारख्या सुंदर मुलींसाठी हे जग सुरक्षित नाही गं बाळा. तुझे हे रुप, तुझा रंग, तुझी चाल पाहून कोणाचीही नियत बिघडू शकते. ये ना बेबी, घरी सोडतो मी तुला. हे बघ, आता तुझे बाबा पण नाहीत." निशांतने तिचा हात घट्ट पकडत म्हटले.
" हे बघ निशांत, माझी वाट सोड. नाहीतर..." रमाने हळू आवाजात म्हटले आणि आपला हात सोडवायचा प्रयत्न केला.
" नाहीतर काय? बाबाना सांगणार? चल सांग ना. चल जा, सांग तुझ्या बापाला. कॉलेजमधली मुले छेडतात म्हणून सांग." निशांत विचित्र हसत म्हणाला.
तेव्हाच प्रिन्सिपल घरी जात होती. तिने घडणारा प्रकार पाहिला.
" काय चालले आहे इथे?" प्रिन्सिपलने मोठ्या आवाजात विचारले.
" काही नाही मॅडम." असे म्हणत निशांतने रमाचा हात सोडला व ते दोघेही निघून गेले.
************
रमा घरी आली. तिच्या मनात कल्कीचेच विचार चालले होते. कुठल्याच कामात तिचे लक्ष लागत नव्हते. डोळे बंद केले तरी तोच दिसत होता.
पहिल्याच भेटीत कल्कीने तिच्या मनात घर केले होते.
कल्कीचा तो रुबाब, त्याची उंची, त्याचे ते कमावलेले पिळदार शरीर, ती मजबूत रुंद शरीरयष्टी, एकूण एक आकर्षक व्यक्तिमत्त्व होते ते.
कल्कीचा तो रुबाब, त्याची उंची, त्याचे ते कमावलेले पिळदार शरीर, ती मजबूत रुंद शरीरयष्टी, एकूण एक आकर्षक व्यक्तिमत्त्व होते ते.
"काय गं बाळा, कुठे हरवली आहेस?" आजीने रमाला विचारले.
"आजी, कल्की म्हणजे श्रीहरींचा दहावा अवतार आहे. बरोबर?" रमाने गालातच हसत प्रश्न केला.
" अगदी बरोबर. अथासौ युग-सन्ध्यायां, दस्यु-प्रायेषु राजसु, जनिता विष्णु-यशसो, नाम्ना कल्किर्जगत्पतिः
नारायणाचा कलयुगी अवतार म्हणजे कल्की." आजीने रमाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटले.
नारायणाचा कलयुगी अवतार म्हणजे कल्की." आजीने रमाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटले.
" तो दिसायला कसा असतो गं आजी?" रमाने विचारले.
" भागवत पुराणात म्हटले आहे की, जेव्हा जग अधर्माने ग्रासले जाईल, तेव्हा कल्की श्वेत घोड्यावर बसून, एक योद्धा बनून जगाला अधर्मापासून मुक्त करण्यासाठी येणार." आजी.
" घोडा? आणि आजच्या युगात? टीशर्ट जीन्स घालून येऊ नाही शकत का तो?" रमा.
" काय काय म्हणून तुमच्या डोक्यात येते श्रीहरीच जाणे." आजी हसत म्हणाली.
*****
दुसऱ्या दिवशी बसमधून उतरताक्षणीच रमाला कल्की भेटला. कल्की तिथे तिचीच वाट पाहत उभा होता. कालच्या सारखाच दोघांनीही रस्ता क्रॉस केला.
" कल्की , तू आज कॉलेज सुटल्यानंतर जरा माझ्यासाठी थांबणार का?" रमा
" का गं? घरी जाताना तर रस्ता क्रॉस करायची गरज नसते. घरी जायला बस याच बाजूने थांबणार." कल्की
" क्रॉसिंगसाठी नव्हे." रमा.
" तर मग..." कल्की.
" कल्की, तो निशांत आणि महेश मला खूप त्रास देतात. मला चिडवतात, नको नको ते बोलतात. काल तर त्यांनी माझा हात सुद्धा पकडला. मला खूप भिती वाटते त्यांची." रमा.
" हो का. दुपारी बघूयाच त्यांना." असे म्हणत कल्की तिथून गेला.
**********
कॉलेज सुटले. रमा कल्कीची वाट पाहत कॉलेजमध्येच थांबली, पण कल्की आलाच नाही. शेवटी कल्की विसरला असेल, असा विचार करुन नाईलाजाने रमा एकटीच रस्त्यावर आली.
अचानक तिच्या समोर एक गाडी येऊन थांबली. त्या गाडीत महेश आणि निशांत होते. महेशने गाडीचे दार उघडले आणि बाहेर येऊन रमाला उचलून गाडीत मागे टाकले. रमाने भितीने आरडा ओरड सुरु केली. महेशने आपल्या हाताने तिचे तोंड घट्ट दाबून धरले.
" ए , जास्त ओरडू नको. नाहीतर तुला इथेच मारुन तुझ्या बाबाजवळ पाठवीन." निशांतने गाडी स्टार्ट करत म्हटले.
महेशने आपल्या जवळ असलेला एक रुमाल तिच्या तोंडात कोंबला आणि तिच्या गळ्यावर एक चाकू धरला.
त्यांनी तेजगतीने गाडी हाकली आणि सत्तरीतल्या जंगलातून जाणाऱ्या एका निर्जन रस्त्यावर थांबवली.
तिथे पोहचताच महेशने तिच्या तोंडातला रुमाल काढला. रमा मदतीसाठी आकांताने ओरडत होती. पण त्या रस्त्यावर कोणीच नव्हते.
तिथे पोहचताच महेशने तिच्या तोंडातला रुमाल काढला. रमा मदतीसाठी आकांताने ओरडत होती. पण त्या रस्त्यावर कोणीच नव्हते.
"तुला किती ओरडायचे आहे ते ओरड. आता तुझ्या मदतीला इथे कोणीही येणार नाही. इथे आहे फक्त मी, निशांत आणि तू." महेशने आपले टीशर्ट उतरवत म्हटले.
रमाला काय करावे तेच समजत नव्हते.
" ॐ नमो भगवते वासुदेवाय.." रमाच्या तोंडून नकळत शब्द आले.
आणि तेव्हाच...
कुठून तरी कल्की तिथे पोहचला. त्याचे डोळे क्रोधाने लाल झाले होते. त्याने निशांतला एक जोरदार ठोसा दिसा. त्याबरोबर निशांत खाली पडला. निशांत खाली पडलेला पाहताच महेश एक सूरा घेऊन कल्कीच्या अंगावर धावत आला. तेव्हा कल्कीने त्याच्या पोटावर एक जोरदार लाथ मारुन त्याला सुद्धा खाली पाडले. त्याने महेशच्या हातातला सूरा ओढून आपल्या हातात घेतला आणि त्याच्या अंगावर सपासप वार करत राहिला.
हे सगळे पाहून रमाच्या डोळ्यासमोर अंधार आला आणि ती भोवळ येऊन खाली पडली.
****************
रमाने घडलेली सगळी हकीकत इन्स्पेक्टर नाईकला सांगितली. कॉन्स्टेबलने सगळे लिहून घेतले. रमाने त्यांना निशांतचा पत्ता दिला.
रमाने घडलेली सगळी हकीकत इन्स्पेक्टर नाईकला सांगितली. कॉन्स्टेबलने सगळे लिहून घेतले. रमाने त्यांना निशांतचा पत्ता दिला.
"पण तो कल्की तिथे कसा पोहचला? रमा, तू जरा पोलिस स्टेशनवर जाऊन थांबशील का? काही फॉर्मालिटिज पूर्ण करायच्या आहेत. मी थोड्याच वेळात तिथे पोहचतो." नाईक
" हो सर." रमा
" कॉन्स्टेबल तुम्ही जाऊन निशांतला अरेस्ट करा. मी या कल्कीला बघतो. कॉलेजमध्ये त्याचा पत्ता असणारच. तुम्ही मर्डर व्हेपन कुठे दिसते तर बघा. " नाईक
*******
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा